Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune410502

अंगारक चतुर्थी: लेण्याद्री गणपतीच्या गाभ्यात रंगीबेरंगी सजावट!

HCHEMANT CHAPUDE
Aug 12, 2025 07:07:35
Junnar, Maharashtra
Feed 2C Slug: Junnar Lenyadri Ganpati File:02 Rep: Hemant Chapude(Junnar) Anc: आज अंगारक चतुर्थी निमित्त अष्टविनायक लेण्याद्रीच्या गिरजात्मज बापाचा गाभारा आकर्षक अशा विविध रंग फुलांनी सजविण्यात आला असून आकर्षक सजावटीने लाडक्या बाप्पाचे रूप विलोभणीय असेच दिसत आहे. आज अंगारक चतुर्थी निमित्त लाडक्या बापाच्या दर्शनासाठी भाविक भक्तांची सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत असून आज गणेशयागा सह विविध कार्यक्रमांचे हि आयोजन देवस्थान ट्रस्ट मार्फत करण्यात आलंय प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया जुन्नर पुणे...
14
comment
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
MNMAYUR NIKAM
Aug 12, 2025 10:04:24
Buldhana, Maharashtra:
आ संजय गायकवाड बाईट गेल्या दहा महिन्यापासून कोणत्याच योजनेवरती पैसे नाही हे खर आहे.. मागील दोन अधिवेशनामध्ये बजेट नुसार पैसे नाहीत.. कोणत्याही मंत्र्याकडे गेले की सांगतात पैसे नाहीत..मात्र पुढील काळात परिस्थिती सुधारेल अस मुख्यमंत्री सांगतात.. बाईट - आ संजय गायकवाड
0
comment
Report
MMMahendrakumar Mudholkar
Aug 12, 2025 10:03:53
Beed, Maharashtra:
बीड ब्रेक: वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राजाभाऊ फड यांचा दारुण पराभव वैद्यनाथ बँकेवर पंकजा मुंडे यांचे वर्चस्व कायम Anc: वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राजाभाऊ फड यांचा दारुण पराभव झालाय. केवळ 1407 मतं राजाभाऊ फड यांना मिळाले असून त्यांच्या समोरील उमेदवार रमेश कराड यांचा 14316 मतांनी विजय झाला आहे. या निवडणुकीत पहिल्यांदाच शरद पवार गटाने उमेदवार दिले होते. शरद पवार गटाचे तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यात प्रामुख्याने राजाभाऊ फड यांचा हा दारून पराभव आहे. वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच मुंडे बहीण भाऊ एकत्र होते. पंकजा मुंडे यांनी आपले वर्चस्व कायम राखल्याचे दिसून आले. बाईट: रमेश कराड - विजयी उमेदवार
0
comment
Report
UPUmesh Parab
Aug 12, 2025 10:02:37
Oros, Maharashtra:
सिंधुदुर्ग ---- माजी खासदार विनायक राऊत byte --- *ऑन विजयदुर्ग किल्ला* --- छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर पैसे उकळविणाऱ्यांचे सध्या दिवस आहेत. सध्याच्या राज्यकर्त्यांनी लाखो रुपये उखळण्याचे काम केले आहे. किल्ल्याच्या परिस्थितीला पुरातत्व विभागासोबत इथले पालकमंत्री जबाबदार आहेत. माजी खासदार विनायक राऊत यांचा आरोप *ऑन भरत गोगावले* ( बैठक उपस्थिती नाही ) ---- एकनाथ शिंदे गटाला अंतर्गत कुरघोडीनी पोखरल आहे. संजय गायकवाड संजय शिरसाट आणि भरत गोगावले यांना थोपवण एकनाथ शिंदेना पेलणार नाही. *रायगडच पालकमंत्री पद कोणत्याही परिस्थितीत अजित पवार गटाला मिळणार* आपल्याला मिळणार नाही हे गोगावलेंना माहिती असल्याने ते आता ओम फट स्वाहा करायला निघालेले आहेत. *ऑन संजय गायकवाड वक्तव्य* ( बापाला कॉपी करणं ) --- असल्या वात्रट आणि अक्कल शून्य लोकांची कीव करावीशी वाटते. तुमच्या वात्रट चाळ्यामुळे महाराष्ट्राची बदनामी होतेय. त्यामुळे राज्यातील जनता ज्याला बाप दाखवायचा आहे त्याला नक्की बाप दाखवेल. *ऑन उदय सामंत* ( भाजप डिवचन ) --- हे उदय सामंत यांचं शिंदे गटावरच नकली प्रेम आहे. जिकडे सरशी असते तिकडे धावत जाणारे उदय सामंत. भाजपशी पंगा घेतील अस मला वाटत नाही. *ऑन भास्कर जाधव* --- भास्कर जाधव ज्या अर्थी आरोप करत आहेत त्यात नक्की तथ्य असेल. *ऑन सिंधुदुर्ग उबाठा* ( दोन गट ) --- वैभव नाईक आणि मी एकत्र आहोत संघटनेच्या कामासाठी कटिबद्ध आहोत. काही रिकाम टेकडे लोक हे कंडे पिकवण्याचे धंदे करत आहेत. byte विनायक राऊत, माजी खासदार उबाठा feed on desk
0
comment
Report
MKManoj Kulkarni
Aug 12, 2025 10:00:43
Mumbai, Maharashtra:
अँकर -- कबुतरांमुळे मानवी आरोग्य धोक्यात येत असल्याने मुंबईतील कबूतर खाणे बंद करण्यात यावे असे उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत.यावरून बरेच रणकंदन सुद्धा माजले होते.अनेक ठिकाणी अजूनही कबुतरांना खाद्य दिले जाते.गेट वे ऑफ इंडिया येथेही कबूतर खाना आहे.पर्यटक कबुतरांना खाद्य देत असतात पण गेल्या काही दिवसात या ठिकाणी खाद्य देणाऱ्यांना पालिका कर्मचारी बसू देत नाही त्यामुळे येथील कबुतरांची संख्या कमी झाल्याचे दिसते.याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज कुळकर्णी यांनी  Wkt  मनोज कुळकर्णी  Feed send TVU 48  Slug-- Gate way Kabutarkhana wkt 
0
comment
Report
VKVISHAL KAROLE
Aug 12, 2025 10:00:28
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn rail roko av Feed by I've u छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर युवक काँग्रेसच्या वतीने रेल रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळेस मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली,  भाजप मतांची चोरी करते आहे मात्र त्यांना कोणीही थांबवत नाही असा आरोप करीत ही दादागिरी गुंडगिरी चालणार नाही अशी घोषणाबाजी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली आणि रेल्वे स्थानकावर अर्धा तास आंदोलन करण्यात आला यावेळी त्यांनी नागरसोल एक्सप्रेस रोखण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे...
0
comment
Report
PTPRAVIN TANDEKAR
Aug 12, 2025 09:39:43
Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara Slug - 1208_BHA_ACCIDENT FILE - 2 VIDEO, 1 IMAGE चारचाकीने दुचाकीला दिली जोरदार धडक.... तिघांची प्रकृती गंभीर Anchor :- भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तिरोडा मार्गावरील एलोरा गावाजवळ इनोव्हा चारचाकी गाडीने दुचाकीला जोरदार धडक दिली यात दुचाकीवरील तिघे जण गंभीर जखमी झाले आहे. धडक दिल्यानंतर गाडी चालक फरार झाला आहे. सद्या तिघांना तुमसर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून तिघांची प्रकृती गंभीर आहे. तिघेही एडमाकोट येथील रहिवासी असून ते मुंडिकोटा गावाला जात असल्याची माहिती समोर येत आहे.
7
comment
Report
GDGAJANAN DESHMUKH
Aug 12, 2025 09:35:40
Parbhani, Maharashtra:
अँकर- परभणीच्या पांघरा ढोणे येथील शेत जमिनीतून वाफ निघत असल्याने येथील शेतकरी भयभीत झाली आहेत. मागील सहा दिवसांपासून नरहरी पावडे यांच्या शेतातून अधून मधून ही वाफ निघू लागलीये. पावडे भाजीपाला उत्पादन करीत असतात त्यांनी या शेतात भेंडीची लागवड केली आहे, पण अचानक शेतातील बांधाच्या बाजूला असलेल्या एका ठिकाणाहुन गरम वाफ निघू लागल्याने शेतकरी भयभीत झाली आहेत... बाईट- शेतकरी
9
comment
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Aug 12, 2025 09:35:29
Latur, Maharashtra:
लातूर ब्रेकिंग न्यूज... स्किप्ट::- कराड यांच्या वक्तव्यावर रोहित पवारांचा हल्लाबोल...लातूर ग्रामीण वाद पवारांचा मुख्यमंत्र्यांनाही सवाल.... AC ::- लातूर ग्रामीणचे आमदार रमेश कराड यांनी लातूर ग्रामीण मतदारसंघ म्हणजे पाकिस्तानात भारताचा झेंडा लावण्यासारखा आहे" असं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केलेलं वक्तव्य सध्या चांगलंच गाजत आहे. काँग्रेसने कारवाईची मागणी केली असतानाच, आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट चे नेते आमदार रोहित पवार यांनी विडीओ ट्विटर करून हल्लाबोल केला आहे. "हे वक्तव्य म्हणजे लातूर ग्रामीणच्या जनतेचा अवमान आहे, माफी मागावी," अशी मागणी करत पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही व्यासपीठावर असूनही कराड यांना रोखलं नाही, यावरून "त्यांचा याला पाठींबा आहे का?" असा सवाल उपस्थित केला आहे.
7
comment
Report
KJKunal Jamdade
Aug 12, 2025 09:33:02
Shirdi, Maharashtra:
Anc - संगमनेर शहरात भाकड जनावरांच्या प्रश्नावरून शेतकरी आक्रमक झाले. शिवआर्मी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी भाकड जनावरे घेऊन थेट प्रांत कार्यालयात घुसले.प्रांत अधिकाऱ्यांच्या दालनासमोर शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या मांडला.‘गोवंश हत्या बंदी कायद्यात सुधारणा करा’, ‘भाकड जनावरे आमच्या शेतात नकोत तसेच शासनाने भाकड जनावरांची खरेदी योजना राबवावी अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलय.या प्रश्नाची शासनाने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी आंदोलकांनी केलीय...गायींचे गोऱ्हे घेऊन प्रांत अधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या देऊन शेतकऱ्यांनी या प्रश्नावर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली.राज्य शासनाने तत्काळ शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घ्यावी अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी गोरे आणि वळू सोडू असा इशाराही शेतकऱ्यांनी दिलाय...या आंदोलनाचा आढावा घेत शेतकऱ्यांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी.... WKT_121 विथ दत्ता ढगे , आंदोलक
5
comment
Report
MMMahendrakumar Mudholkar
Aug 12, 2025 09:32:13
Beed, Maharashtra:
बीड: बीड शहर जरांगे पाटील यांनी जाळले, त्याच गोष्टी त्यांना मुंबईत करायच्या आहेत... ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांचा गंभीर आरोप... Anc- मंडल आयोगाचे जनक शरद पवार ही शुद्ध भामटेगिरी आहे.. महाराष्ट्रातील ओबीसींना वेड्यात मुर्खात काढण्याचा प्रयत्न शरद पवार यांच्या पक्षाचा आहे.. शरद पवार आणि मंडल आयोगाचा कुठलाही काहीही संबंध नाही. बीड शहर जरांगे पाटील यांनी जाळलं.. त्याच गोष्टी त्यांना मुंबईमध्ये करायच्या आहे. त्यांनी जी तारीख निवडली आहे ती गणेशोत्सवाची आहे, असा गंभीर आरोप ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांनी केला आहे. बीडमध्ये ते पत्रकार परिषदेत बोलत होते. मुंबईतील गणेशोत्सवात जायचं आणि दंगल घडून आणायची हा एकमेव प्रोग्राम जरांगे पाटील यांनी आखला आहे.बीड मधील जाळपोळीतील आरोपी नेमके कुठे आहेत? त्या आरोपीला शिक्षा झाली का? असाही सवाल हाके यांनी उपस्थित केला आहे. माझी गृहमंत्र्यांना विनंती आहे. जरांगे पाटील यांना अंतरवालीत उपोषण करू द्या.. पण महाराष्ट्रातील सणासुदीचे वातावरण जाळपोळ करण्याचा डाव जरांगे पाटील यांना करायचा आहे.. मुंबईत देखील त्यांना दहशत निर्माण करायची आहे.. ओबीसींनी महाराष्ट्राच्या विरोधात कधी आंदोलन केले का.? महाराष्ट्रातील वातावरण बिघडवायचे हा एकमेव कार्यक्रम शरद पवार आणि जरांगे पाटील यांचा आहे. जरांगे पाटील या बबड्याला मोठे करण्याचे काम कोणी केलं? हे पाप केवळ शरद पवार यांचे आहे असेही हाके यांनी म्हटले आहे. मागील आठवडाभरापासून पश्चिम महाराष्ट्र नंतर मराठवाड्याचा दौरा करत आहे. ओबीसींच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहे. जरांगे मुंबईला जात आहे म्हणून आमचे काउंटर आंदोलन नाही. महाराष्ट्रातील ओबीसींना एकत्र करण्याचे काम आम्ही करत आहोत. जरांगेच्या झुंडशाहीला बळी पडून प्रशासनाने वेगळा निर्णय घेतला तर त्याला प्रत्युत्तर ओबीसी समाज देईल. असा इशाराही लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. बाईट: लक्ष्मण हाके, ओबीसी आंदोलक
4
comment
Report
VKVISHAL KAROLE
Aug 12, 2025 09:00:42
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn accused arrogance pkg Feed by  live u aropi shots and dcp byte Anchor : छत्रपती संभाजी नगरात तेजा नावाच्या कुख्यात आरोपीने मध्यरात्री मैत्रिणी वर गोळी चालवली, त्यात मैत्रीण जखमी झाली आणि पोलिसांनी तेजा ला अटकही केली मात्र सकाळी पोलिसांच्या ताब्यात असताना आरोपी किती मुजोर आहे याचा प्रचिती आली.. थेट पोलिसां समोरच बाहेर आल्यावर आणखी मुलींना गोळी मारतो असे हा आरोपी म्हणाला... Vo 1... पोलिसांच्या दारातच आरोपीची मुजोरी.. बाहेर आल्यावर आणखी मुलींना गोळी मारण्याची दिली धमकी आरोपीना ना पोलिसांचा धाक , ना कायद्याची भीती... छत्रपती संभाजी नगरातील हा सराईत गुन्हेगार सय्यद फैजल ऊर्फ तेजा, पोलिसांच्या ताब्यात असल्यावरही याची भाषा ऐका , पोलीस त्याला घेऊन जाताय मात्र आरोपीने कॅमेरा पाहताच त्याची मुजोरी ऐका.. बाहेर आल्यावर आणखी एक दोन तीन मुलींना गोळी घालण्याची तो भाषा करतोय, तर मी चांगला दिसलो पाहिजे व्यवस्थित शूट करा असा दमही तो माध्यम प्रतिनिधींना देतोय.. ( अंबिअन्स वापरा ) तेजाला पोलिसांनी काल अटक केलीय,  त्याने किरकोळ वादातून मैत्रिणीवर गोळी झाडली. गोळी तिच्या हाताला लागल्याने ती जखमी झाली. ही घटना शहरातील किलेअर्क परिसरात घडली,  सय्यद फैजल रात्री १२ वाजेच्या सुमारास  तिथे गेलेला, राखी असे जखमी मैत्रिणीचे नाव आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी गेले आणि त्यांनी आरोपीला अटक केली, मात्र त्याचे हे वर्तन पोलिसांना ही धक्कादायक वाटले या गुन्ह्यासह त्याच्या वर्तुणुकी बाबत ही त्यावर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.. Byte रत्नाकर नवले, पोलीस उपायुक्त Vo 2.. तेजा हा सराईत गुन्हेगार आहे   त्याच्यावर बलात्कार, चोरी, खुनाचा प्रयत्न यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर एमपीडीएनुसारही कारवाई झाली होती. तो सुरुवातीला भुरट्या चोऱ्या करायचा. नंतर तो काही सराईतांच्या संपर्कात आला अन् गंभीर गुन्हे करू लागला. २०२१ मध्ये त्याच्या अल्पवयीन मैत्रिणीने बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. त्याने तिला चाकूने भोसकल्याचीही नोंद आहे. एप्रिलमध्ये त्याने टीव्ही सेंटर चौकात भरदिवसा एका रिक्षाचालकावर कोयत्याने हल्ला केला होता. दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी त्याला अटक करून त्याच ठिकाणी त्याची धिंड काढली होती. मेमध्ये त्याच्या सासुरवाडीत ड्रग्जचा गोरखधंदा सुरू असल्याचे अमली पदार्थविरोधी पथकाने कारवाई केलेली... आणि या प्रकरणानंतर त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांचे म्हणणे आहे... Byte रत्नाकर नवले, पोलीस उपायुक्त Vo 3... आरोपीची ही वागणूक आणि धमकी देण्याची पद्धत धक्कादायक आहे,  त्यामुळं असल्या आरोपींच्या नांग्या ठेवण्याची वेळ आली आहे असेच हे पाहता म्हणता येईल.. विशाल करोळे, छत्रपती संभाजी नगर...
14
comment
Report
MMMahendrakumar Mudholkar
Aug 12, 2025 09:00:37
Beed, Maharashtra:
बीड:वैद्यनाथ बँकेची मतमोजणी प्रक्रिया; मंत्री पंकजा मुंडेंचे पारडे जड Anc: बीडच्या परळी येथील वैद्यनाथ बँकेची नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. आतापर्यंत 17 फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत.. सध्या तरी मंत्री पंकजा मुंडे यांच्या पॅनलचे पारडे जड आहे.. तर दुसरीकडे शरद पवार गटाचे पॅनल पिछाडीवर आहे. अनेक ठिकाणी पवार गटाच्या उमेदवारांना खाते देखील उघडता आले नाही. सायंकाळी पाच वाजेपर्यंत निवडणूक निकालाचे चित्र स्पष्ट होईल. तर निवडणुकीपूर्वीच माजी खासदार प्रीतम मुंडे या बिनविरोध निवडून आल्या आहेत.
14
comment
Report
PNPratap Naik1
Aug 12, 2025 08:46:27
Kolhapur, Maharashtra:
Story :- Dog Bite Issue PKG Feed :- Live U Anc :- देशभरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न चिंताजनक बनला आहे. मागच्या वर्षी भारतात 37 लाखाहून अधिक जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना नोंद झाल्या आहेत. यातील साठहून अधिक नागरिकांचा रेबीज मुळे मृत्यू झालाय. नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल या राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या पाहणीत ही गोष्ट निदर्शनास आली आहे. GFX In भटक्या कुत्र्यांच्या चाव्यांच्या घटनेत वाढ. गेल्या वर्षभरात देशात 37 लाखाहून अधिक जणांना कुत्र्यांचा चावा. देशभरात कुत्र्यांचा चावाच्या घटनेत तब्बल 70% वाढ भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा नागरिकांची मागणी. GFX Out VO 1:- दररोज भटक्या कुत्र्यांचा चावा आणि त्याचबरोबर भटक्या कुत्र्यांचा लहान मुलांच्यावर होणारा जीवघेणा हल्ला हा नित्याचाच झाला आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आलाय.. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या डिसीज सर्विलन्स प्रोग्रॅम या विभागाच्या विश्लेषणानुसार देशभरात कुत्र्यांचा चावाच्या घटनेत तब्बल 70% वाढ झाली आहे. तर आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 15 वर्षाखालील मुलांच्या चाव्याची प्रकरणे देशभरात मोठ्या प्रमाणात नोंदवली जात आहेत. बहुतेक हल्ले हे शाळा किंवा मुलं ग्राउंड वर खेळताना झाली आहेत.. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अभ्यासानुसार भटक्या कुत्र्यांमध्ये खाण्याच्या पदार्थावरून जास्त आक्रमकता निर्माण होते. त्यातूनj ही भटकी कुत्री चावा घेतात असं स्पष्ट झाल आहे. Byte :- Dr. सॅम लुद्रीक, जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी VO 2 :- कुत्र्यांच्या चावण्याच्या घटनांमध्ये वृद्ध आणि लहान मुलं अधिक धोक्याच्या क्षेत्रात येतात असे आय एस डी पी चे निरीक्षण आहे. GFX In लहान मुलांनाच भटक्या कुत्र्यांचा चावा अधिक का होतो यामध्ये प्रामुख्याने लहान मुलांचे आकारमान कमी, प्राण्यांशी खेळण्याची सवय, धोका ओळखण्याच्या क्षमतेचा अभाव या कारणांने कुत्र्याचा चावा होतो. तर वयोवृद्धांमध्ये भटक्या कुत्र्यांचा चावा अधिक होण्याच्या कारणांमध्ये कमी दृष्टी, ऐकण्याच्या क्षमतेत बाधा, चालण्याकरता सहाय्यक वस्तू वापरणे याचा समावेश होतो. GFX OUT VO 3:- भटक्या कुत्र्यांची चावा घेण्याची कारणे कोणतीही असोत पण या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत. Byte :- सामान्य नागरीक VO 4:- एकीकडे भारत सरकारने 2030 पर्यंत देशातून रेबीजला हद्दपार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. पण दुसरीकडे मात्र मोकाट आणि भटक्या कुत्र्यांची वाढणारी संख्या आणि चावा घेण्याचे प्रमाण पाहता सरकार हे उद्दिष्ट कसे गाठणार हा खरा प्रश्न आहे. प्रताप नाईक झी 24 तास कोल्हापूर
13
comment
Report
PNPratap Naik1
Aug 12, 2025 08:40:14
Kolhapur, Maharashtra:
Story :- Dog Bite Issue PKG Feed :- Live U Anc :- देशभरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न चिंताजनक बनला आहे. मागच्या वर्षी भारतात 37 लाखाहून अधिक जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना नोंद झाल्या आहेत. यातील साठहून अधिक नागरिकांचा रेबीज मुळे मृत्यू झालाय. नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल या राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या पाहणीत ही गोष्ट निदर्शनास आली आहे. GFX In भटक्या कुत्र्यांच्या चाव्यांच्या घटनेत वाढ. गेल्या वर्षभरात देशात 37 लाखाहून अधिक जणांना कुत्र्यांचा चावा. देशभरात कुत्र्यांचा चावाच्या घटनेत तब्बल 70% वाढ भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा नागरिकांची मागणी. GFX Out VO 1:- दररोज भटक्या कुत्र्यांचा चावा आणि त्याचबरोबर भटक्या कुत्र्यांचा लहान मुलांच्यावर होणारा जीवघेणा हल्ला हा नित्याचाच झाला आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आलाय.. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या डिसीज सर्विलन्स प्रोग्रॅम या विभागाच्या विश्लेषणानुसार देशभरात कुत्र्यांचा चावाच्या घटनेत तब्बल 70% वाढ झाली आहे. तर आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 15 वर्षाखालील मुलांच्या चाव्याची प्रकरणे देशभरात मोठ्या प्रमाणात नोंदवली जात आहेत. बहुतेक हल्ले हे शाळा किंवा मुलं ग्राउंड वर खेळताना झाली आहेत.. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अभ्यासानुसार भटक्या कुत्र्यांमध्ये खाण्याच्या पदार्थावरून,मीटिंग, अधिवास या अनेक कारणामुळे जास्त आक्रमकता निर्माण होते. त्यातूनj ही भटकी कुत्री चावा घेतात असं स्पष्ट झाल आहे. Byte :- Dr. सॅम लुद्रीक, जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी VO 2 :- कुत्र्यांच्या चावण्याच्या घटनांमध्ये वृद्ध आणि लहान मुलं अधिक धोक्याच्या क्षेत्रात येतात असे आय एस डी पी चे निरीक्षण आहे. GFX In लहान मुलांनाच भटक्या कुत्र्यांचा चावा अधिक का होतो यामध्ये प्रामुख्याने लहान मुलांचे आकारमान कमी, प्राण्यांशी खेळण्याची सवय, धोका ओळखण्याच्या क्षमतेचा अभाव या कारणांने कुत्र्याचा चावा होतो. तर वयोवृद्धांमध्ये भटक्या कुत्र्यांचा चावा अधिक होण्याच्या कारणांमध्ये कमी दृष्टी, ऐकण्याच्या क्षमतेत बाधा, चालण्याकरता सहाय्यक वस्तू वापरणे याचा समावेश होतो. GFX OUT VO 3:- भटक्या कुत्र्यांची चावा घेण्याची कारणे कोणतीही असोत पण या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत. Byte :- सामान्य नागरीक VO 4:- एकीकडे भारत सरकारने 2030 पर्यंत देशातून रेबीजला हद्दपार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. पण दुसरीकडे मात्र मोकाट आणि भटक्या कुत्र्यांची वाढणारी संख्या आणि चावा घेण्याचे प्रमाण पाहता सरकार हे उद्दिष्ट कसे गाठणार हा खरा प्रश्न आहे. प्रताप नाईक झी 24 तास कोल्हापूर
13
comment
Report
VKVISHAL KAROLE
Aug 12, 2025 08:40:09
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn gold cheat pkg Feed : viral vdo attached Dcp byte and shop shots send by tvu Use general gold shots Anchor : सोन्याचा दर सध्या एक लाख रुपयांवर पोहोचलेला आहे त्यामुळे सोन आता विकत घेणं सर्वसामान्यांना कठीण झालंय त्यात स्वस्त सोन्याचं आमिष  दाखवून फसवणारी एक टोळीवर संभाजीनगर पोलिसांनी कारवाई  केलेली आहे त्यामुळे सोनं स्वस्त मिळत असेल तर सावधान तुमची फसवणूक होऊ शकते पाहूयात कशी होत होती ही फसवणूक Vo 1... 1 लाख रुपये तोळे असलेले सोने 93 हजारात संभाजी नगर मध्ये व्हायरल व्हीडिओचा पोलिसांनी केला भांडाफोड स्वस्त सोने विकणाऱ्या चार जणांवर पोलिसांची कारवाई संभाजीनगर मध्ये सध्या हा व्हायरल व्हिडिओ धुमाकूळ घालतोय,  या व्हिडिओत सांगितल्यानुसार सोन्याचा भाव हा एक लाख रुपये तोळे सोन आहे मात्र आम्ही तुम्हाला हे सोने अवघे  93 हजार रुपये तोळ्यांने विकणार म्हणजे एक तोळ्यामागे 7000 आणि एका ग्रॅम मागे  700 रुपयांचा फायदा तुम्हाला होणार,  हे सोनं तुम्ही विकत घ्या अथवा बाजारात विका आणि तात्काळ फायदा मिळवा अशा आशयाचे हा व्हायरल व्हिडिओ आहे, हा व्हायरल व्हिडिओ पोलिसांच्या ही हाती लागला आणि पोलिसांनी याची सत्यता तपासण्यासाठी आशीर्वाद ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानावर छापा घातला... त्यात हा सगळा प्रकार उघड झाला... ( viral व्हीडिओ वापरा ) कसा तयार करत होते सोने.. खरे 24 कॅरेट सोने आणून  त्यातून सोने बाहेर काढायचे त्यात चांदी अथवा पितळ टाकून पुन्हा सोन्याचा कॉइन तयार करायचा आणि हेच सोने 24 कॅरेट भासवून पुन्हा विकायचे... असा हा सगळा गोरखधंदा होता... पोलिसांनी हा व्हायरल व्हीडिओ दिसल्यावर पोलिसांनी 4 आरोपिना ताब्यात घेऊन चौकशी केली आणि कारवाई केली.. Byte रत्नाकर नवले, पोलीस उपायुक्त Vo 2... या माध्यमातून पोलिसांनी कारवाई केली खरी, मात्र यातून अनेकांची फसवणूक  झाल्याची भीती पोलिसांना आहे त्यामुळं नागरिकांनी पुढं येऊन तक्रारी कराव्यात असे आवाहन पोलिसांनी केलय.. Byte रत्नाकर नवले, पोलीस उपायुक्त Vo 3...  सोन महागले त्यामुळं सगळ्यांना हवेहवेसे वाटतेय त्यामुळं हा अनमोल सोन्यामुळे फसवणूक होऊ शकते असले अनेक भामटे तुम्हाला फसवू शकतात त्यामुळं सावधान... विशाल करोळे, छत्रपती संभाजी नगर...
14
comment
Report
Advertisement
Back to top