Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Beed431122

जरांगे पाटीलच्या मुंबईतील दंगलीच्या योजनेवर लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप!

MMMahendrakumar Mudholkar
Aug 12, 2025 09:32:13
Beed, Maharashtra
बीड: बीड शहर जरांगे पाटील यांनी जाळले, त्याच गोष्टी त्यांना मुंबईत करायच्या आहेत... ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांचा गंभीर आरोप... Anc- मंडल आयोगाचे जनक शरद पवार ही शुद्ध भामटेगिरी आहे.. महाराष्ट्रातील ओबीसींना वेड्यात मुर्खात काढण्याचा प्रयत्न शरद पवार यांच्या पक्षाचा आहे.. शरद पवार आणि मंडल आयोगाचा कुठलाही काहीही संबंध नाही. बीड शहर जरांगे पाटील यांनी जाळलं.. त्याच गोष्टी त्यांना मुंबईमध्ये करायच्या आहे. त्यांनी जी तारीख निवडली आहे ती गणेशोत्सवाची आहे, असा गंभीर आरोप ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांनी केला आहे. बीडमध्ये ते पत्रकार परिषदेत बोलत होते. मुंबईतील गणेशोत्सवात जायचं आणि दंगल घडून आणायची हा एकमेव प्रोग्राम जरांगे पाटील यांनी आखला आहे.बीड मधील जाळपोळीतील आरोपी नेमके कुठे आहेत? त्या आरोपीला शिक्षा झाली का? असाही सवाल हाके यांनी उपस्थित केला आहे. माझी गृहमंत्र्यांना विनंती आहे. जरांगे पाटील यांना अंतरवालीत उपोषण करू द्या.. पण महाराष्ट्रातील सणासुदीचे वातावरण जाळपोळ करण्याचा डाव जरांगे पाटील यांना करायचा आहे.. मुंबईत देखील त्यांना दहशत निर्माण करायची आहे.. ओबीसींनी महाराष्ट्राच्या विरोधात कधी आंदोलन केले का.? महाराष्ट्रातील वातावरण बिघडवायचे हा एकमेव कार्यक्रम शरद पवार आणि जरांगे पाटील यांचा आहे. जरांगे पाटील या बबड्याला मोठे करण्याचे काम कोणी केलं? हे पाप केवळ शरद पवार यांचे आहे असेही हाके यांनी म्हटले आहे. मागील आठवडाभरापासून पश्चिम महाराष्ट्र नंतर मराठवाड्याचा दौरा करत आहे. ओबीसींच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहे. जरांगे मुंबईला जात आहे म्हणून आमचे काउंटर आंदोलन नाही. महाराष्ट्रातील ओबीसींना एकत्र करण्याचे काम आम्ही करत आहोत. जरांगेच्या झुंडशाहीला बळी पडून प्रशासनाने वेगळा निर्णय घेतला तर त्याला प्रत्युत्तर ओबीसी समाज देईल. असा इशाराही लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. बाईट: लक्ष्मण हाके, ओबीसी आंदोलक
14
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
UPUmesh Parab
Aug 12, 2025 12:46:32
Oros, Maharashtra:
PKG --- छत्रपतींच्या इतिहासाचे साक्षीदार मोजतायेत अखेरची घटका ?? छत्रपतीनी उभारलेले किल्ले सांभाळताना 20 व्या दशकातील मावळ्यांची होतेय दमछाक अँकर --- हिंदवी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले उभारले तर काही किल्ले पराक्रमानी मिळविले. आज हे किल्ले छत्रपतींच्या जाजवल्य इतिहासाचे साक्षीदार आहेत. मात्र तेच किल्ले सांभाळताना किंबहुना त्या किल्ल्याचे संवर्धन करताना पुरातत्व विभागाची उदासीनता दिसून येतेय. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजयदुर्ग किल्ला ढसाळत असल्याने पुरातत्व विभागाच्या कामाबद्धल प्रश्नचिन्ह उभ राहिलंय V.O -- छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाजवल्य इतिहासाचा साक्षीदार असलेला विजयदुर्ग किल्ला. अरबी समुद्राच्या किनारी असलेला हा जलदुर्ग गेली अनेक वर्ष समुद्री लाटा आणि सोसाट्याची वादळे सोसून उभा आहे. मात्र सद्य परिस्थितीत विजयदुर्ग किल्ल्याची तटबंदी आणि बुरुज कोसळत आहेत. विजयदुर्ग किल्ल्यावर तब्बल 20 बुरुज असून त्यातील तीन ते चार बुरुज ढासळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. विजयदुर्ग किल्ला केंद्रीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे. मागील अनेक वर्ष या किल्ल्याची डागडुजी झाली नसल्याने किल्ल्याची दुरावस्ता होत असून याला पुरातत्व विभागाची उदासीनता कारणीभूत असल्याचा आरोप शिवप्रेमीनी केलाय. Byte --- प्रसाद देवधर, शिवप्रेमी विजयदुर्ग V. O ---- पुरातत्व विभागासोबत राजकीय नेते किल्ल्याच्या दुरावस्थेला जबाबदार असल्याचा थेट आरोप माजी खासदार विनायक राऊत यांनी केलाय. राजकोट येथील छत्रपतींचा पुतळा असो वा किल्ल्याची डागडुजी असो यात राज्य कर्त्यांनी लाखो रुपये उखळले असल्याचे सांगत राऊत यांनी थेट सत्ताधाऱ्यांना किल्ल्याच्या दुरावस्थेला जबाबदार धरलंय. Byte --- विनायक राऊत,माजी खासदार उबाठा V. O --- राज्यातील इतर जिल्ह्याप्रमाणे विजयदुर्ग किल्ल्याचा युनिसकोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आलाय. आणि त्यांच्या माध्यमातून किल्ल्याचे संवर्धन होईल आणि युनिस्को हाच एक आशेचा किरण असल्याचे शिवपप्रेमीना वाटतंय. त्यासोबत किल्ल्याकडे दुर्लक्ष झाल्यास छत्रपतींचा इतिहास पुसला जाण्याची भीती देखील शिवप्रेमिनीं व्यक्त केलीय. Byte --- प्रसाद देवधर, शिवप्रेमी End --- छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारे आणि पर्यटन क्षेत्रात देशाला जगात अग्रस्थान मिळवून देणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले अशा प्रकारे ढासळत राहिले आणि त्यांचे संवर्धन करताना 20 दशकातील मावळ्यांची दमछाक होत असेल तर मात्र शिव प्रेमिनीं व्यक्त केलेली भीती सत्य होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे आपली उदासीनता दूर करुन केंद्रीय पुरातत्व विभाग किल्ल्याच्या संवर्धानाकडे गंभीर्याने पाहिल का ? आणि आपल्या किल्ल्याचे जतन करेल का ?......... उमेश परब, सिंधुदुर्ग व्हिडिओ byte, wkt 2c ( बातमी सोबत ) विनायक राऊत byte - on desk
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Aug 12, 2025 12:45:53
Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI SLUG 1208ZT_BARAMTIIGLOLE BYTE 1 जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर कारवाई न झाल्यास 15 ऑगस्ट पासून राज्यात खाटीक समाज करणारा आंदोलन... Anchor _जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या वरती 14 ऑगस्ट पर्यंत जर कारवाई झाली नाही गुन्हा दाखल झाला नाही तर 15 ऑगस्ट पासून संपूर्ण महाराष्ट्रात खाटीक समाज आंदोलन करणार आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक प्रांत कार्यालयाच्या बाहेर खाटीक समाजाकडून अर्जुन खोतकर यांच्या विरोधात 15 ऑगस्ट पासून कारवाई न झाल्यास धरणे आंदोलन घंटानाद आंदोलन केला जाणार असल्याचा इशारा हिंदू खाटीक संघटनेचे कार्याध्यक्ष सुनील इंगुले यांनी दिला आहे. अर्जुन खोतकर यांनी काही दिवसांपूर्वी प्रसार माध्यमांना मुलाखत देत असताना खाटीक समाजाबद्दल आक्षेपार्ह उदाहरण देऊन गोष्ट बोलली होती. त्यांच्या विरोधात चार तारखेला बारामती शहर पोलीस स्टेशन आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात तक्रारी अर्ज दिला होता. महाराष्ट्रामध्ये खाटीक समाजाने वेगवेगळ्या 22 ठिकाणी गुन्हा दाखल व्हावा यासाठी अर्ज दिला पण होता परंतु अद्याप पर्यंत अर्जुन खोतकर यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल झाला नाही किंवा कोणतीही चौकशी झालेली नाही. त्यामुळे जर 14 ऑगस्टपर्यंत ही कारवाई झाली नाही गुन्हा दाखल झाला नाही तर 15 ऑगस्ट पासून खाटीक समाजाने महाराष्ट्रभर आंदोलनाचा इशारा दिलाय. बाईट_करण सुनील इंगुले, कार्याध्यक्ष हिंदू खाटीक समाज संघटना बारामती
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Aug 12, 2025 12:39:01
Nashik, Maharashtra:
Nsk_yutipkg Feed by live u 51 Anchor राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे उबाठा युतीची नांदी नाशिकमध्ये पाहायला मिळतेय. लागोपाठ एकत्रित बैठकांचे सत्र नियोजनासाठी सुरु झालेय. बघू या कधीकाळी दोघांच्या या बालेकिल्लामध्ये सध्या काय राजकीय खिचडी पिकते आहे.. Vo 1 लोकांच्या मूलभूत समस्या, शेतकऱ्यांचे प्रश्न ,वादग्रस्त मंत्री याच मोदी आणि फडणवीस सरकारच्या रामभरोसे कारभाराबाबत उबाठा सक्रिय झाली आहे . सरकार विरोधात जनजागृती करण्यासाठी गेल्या आठवड्यात उबाठा गटाच्या कार्यालयात झालेल्या मनसे आणि सेना कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्याच्या नियोजनाबाबत आज मनसे कार्यालयात उबाठा गटाने हजेरी लावत वेळेचे आयोजन आणि गर्दी नियोजन केले...त्यावेळी दोघां पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन आणि समन्वय पाहायला मिळाला. Byte दिनकर पाटील प्रदेश सरचिटणीस मनसे Vo 2दोन्ही पक्षांचे एकच लक्ष्य म्हणजे महानगरांमधल्या महापालिका आहेत. उबाठाला मुंबईसह राज्यातील चार महापालिका तर मनसेला गतकाळातील नाशिक महापालिकेप्रमाणे इतर महापालिकांमध्ये पुन्हा आपली सत्ता आणायची आहे. GFX मनसे वर्चस्व 2006 मध्ये मनसेची स्थापना झाल्यानंतर २००७ च्या निवडणुकीत मनसेचे १२ नगरसेवक निवडून आले होते. ऑक्टोबर २००९ मध्ये शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघांत मनसेचे आमदार निवडून आले. यात नाशिक मध्य मतदारसंघातून वसंत गीते, पश्चिम मतदारसंघातून नितीन भोसले आणि दिवंगत नेते उत्तमराव ढिकले हे आमदार झाले. २०१२ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत मनसेचे ४० नगरसेवक निवडून आले. राज्यातला मनसेचा पहिला महापौर नाशिकने दिला. त्यावेळी अशोक मुर्तडक हे नाशिकमध्ये महापौर झाले. २००९ मध्ये मनसेने पहिली लोकसभा निवडणूक लढवली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार समीर भुजबळ यांच्याविरोधात हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यात आली. मनसेने दुसऱ्या क्रमांकाची मते घेत शिवसेनेला मागे टाकले शिवसेना वर्चस्व नाशिक मधील शिवसेनेचे वर्चस्व दोन हजार च्या दशकात आपल्याला पाहायला मिळाले.. नाशिक महापालिकेसह विधानसभेमध्ये शिवसेनेचा हा बालेकिल्ला होता. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना युतीच्या काळात नाशिकने शिवसेनेला भरभरून मते दिली होती . तत्कालीन महापौर दशरथ पाटील यांच्या नेतृत्वात नाशिक महापालिका सुद्धा ताब्यात होती. मात्र राज ठाकरे यांनी मनसे स्थापन केल्यापासून यशाचा हा आलेख घसरू लागला आता हे दोन्ही पक्ष पुन्हा गमावलेले बालेकिल्लातील वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करतील अशी अपेक्षा आहे. तर जिल्हा परिषद निवडणुकात त्यावेळी असलेला सदस्यांसह ग्रामीण भागही ताब्यात घ्यायचा आहे. विधानसभा लोकसभा निवडणुकीचे पायाभरणी करण्याची ही वेळ आहे. Byte डी जी सूर्यवंशी जिल्हाप्रमुख नाशिक Vo 3 मराठीसाठी मुंबईमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित एकदाच उतरले असले तरी राज्यामध्ये त्याची सकारात्मक प्रतिक्रिया पाहायला मिळते.. . सध्या त्यांनी युतीबाबत निवडणुका जाहीर झाल्यावर बघू असा पवित्रा घेतला असला तरी पदाधिकाऱ्यांचा मनोमिलनातला हा समन्वय बघता दोन्ही पक्ष प्रमुखांना आता एकत्रित येण्याच्या निर्णयावर शिक्कामोरताब करावे लागणार हेच खरे
1
comment0
Report
MKManoj Kulkarni
Aug 12, 2025 12:37:44
Mumbai, Maharashtra:
अँकर --  दादर मधील कबूतर खाना बंद करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.यावर कबूतर खाण्या जवळ आंदोलनही झालं होत.सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला.महापालिकेने पुन्हा कबूतर खाण्यावर ताडपत्री टाकली. आता या परिसरात असलेल्या इमारतीवरील गच्चीवर काही लोक कबुतरांना दाणे टाकत असल्याचे दिसत आहे त्यामुळे कबूतर खाण्यावर बंदी घालून काही उपयोग होत नसल्याचे दिसत आहे.या ठिकाणचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज कुळकर्णी यांनी wkt  Byte -- प्रमोद चितारी स्थानिक मनोज कुळकर्णी. काही विडीओ whats aap वर पाठवलेत Feed send TVU ४८ Slug -- dadar kabutar khana wkt 
4
comment0
Report
ABATISH BHOIR
Aug 12, 2025 12:06:54
Kalyan, Maharashtra:
कल्याण ब्रेकिंग केडीएमसी चिकन मटन मच्छी बंदी प्रकरण मनसे नेते राजू पाटील आक्रमक केडीएमसी आयुक्तांनी हा फतवा मागे घ्यावा पोलिस आयुक्तांना ट्वीटद्वारे केली विनंती चांगल्या दिवशी होऊ घातलेला संघर्ष टाळावा १५ ऑगस्टला मांसाहारी हा’टेल्स, केएफसी, मॅकडॉनल्ड्स सारखे उपहारगृह बंद ठेवणार का असा केला सवाल कल्याण डोंबिवलीला लागून असलेल्या उल्हासनगर, नवी मुंबई, ठाणे या महापालिकांनी असा फतवा काढलेला नाही.
4
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Aug 12, 2025 12:06:10
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - शरणू हांडे अपहरण प्रकरणातील सर्व आरोपींना 14 दिवसांचे न्यायालयीन कोठडी - शरणू हांडे अपहरण प्रकरणातील सर्व आरोपींना 14 दिवसांचे न्यायालयीन कोठडी - शरणु हांडे यांना मारहाण करून अपहरण केल्याप्रकरणी सात आरोपींना करण्यात आली होती अटक - आज आरोपींची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने आरोपींना सुनावली न्यायालयीन कोठडी - पोलिसांनी आणखी दोन आरोपीना तीन दिवसांच्या पोलीस कोठडीची केली होती मागणी - मात्र न्यायालयाने सर्वांनाच 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे
9
comment0
Report
GMGANESH MOHALE
Aug 12, 2025 11:50:46
Washim, Maharashtra:
वाशिम: File:1208ZT_WSM_MUNICIPAL_COUNCIL_RISOD रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम अँकर : वाशिमच्या रिसोड नगरपरिषदेच्या प्रारूप प्रभाग रचनेची गोपनीय माहिती अधिकृत तारखेच्या आधीच बाहेर आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्याची अधिकृत तारीख १८ ऑगस्ट असूनही, जिल्हाधिकाऱ्यांची स्वाक्षरी असलेली प्रत काही लोकांच्या हाती लागल्याची माहिती समोर आली आहे.आधीच प्रभाग रचनेवरून रिसोड शहरात राजकीय वातावरण तापलेले असताना, या ‘माहिती लिक’ प्रकरणामुळे संशयाची सुई संबंधित अधिकाऱ्यांकडे वळली आहे. या प्रकरणी रिसोड येथील इरफान कुरेशी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली असून, प्रकरणाची चौकशी करून पुन्हा प्रभाग रचना करण्याची मागणी त्यांनी केली आहे.रिसोड येथील प्रारूप प्रभाग रचनेची प्रत मुंबईतील मंत्रालयासाठी संबंधित अधिकाऱ्याकडे देण्यात आली होती.मात्र ही गोपनीय प्रत अधिकृत प्रसिद्धीपूर्वीच रिसोडमध्ये पोहोचणे ही गंभीर बाब असल्याचे जिल्हाधिकारी बुवनेश्वर एस. यांनी सांगितले.याबाबतची सविस्तर माहिती मंत्रालयाला कळविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.आणि ज्यांनी कोणी ही माहिती बाहेर दिली त्यांच्यावर नक्कीच कारवाई करण्यात येईल असे सांगितले. बाईट : इरफान कुरेशी,रिसोड,वाशिम. बाईट : बुवनेश्वरी एस .जिल्हाधिकारी वाशिम
8
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Aug 12, 2025 11:50:17
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव DHARA_DRAGJ तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी आणखी दोन आरोपींना अटक. अटक आरोपी पैकी एक जण पुजारी आत्तापर्यंत तीस आरोपी अटक तर आणखी आठ जण फरार. अँकर धाराशिव _ बहुचर्चित तुळजापूर ट्रक तस्करी प्रकरणी पोलिसांनी आणखी दोघा आरोपींना अटक केली आहे. तुळजापूर येथील जगदीश पाटील या आरोपीला लातूर येथून तर अभिजीत पाटील या आरोपीला सोलापूर मधून पोलिसांनी अटक केली आहे. हे दोन्ही आरोपी तस्करी प्रकरणातील आहेत. विशेष म्हणजे जगदीश पाटील हा तुळजाभवानी देवीचा पुजारी आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष काँग्रेसचे धाराशिव जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांचे ते चुलत बंधू आहे. पोलिसांनी तुळजापूर ड्रग्स तस्करी प्रकरणी आत्तापर्यंत तीस आरोपींना अटक केली असून आठ आरोपी फरार आहेत.
10
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Aug 12, 2025 11:49:40
Yavatmal, Maharashtra:
AVB Anchor : यवतमाळच्या कळंब तालुक्यातील रोजगार हमी योजनेच्या कामात झालेल्या अनियमिततेची पोलखोल विधानमंडळ समिती समोर झाली आहे. समिती प्रमुख आमदार सुनील शेळके यांना गांढा येथील शाळेची सुरक्षा भिंत बांधकाम व उमरी पिंपळगाव पांदन रस्त्याबाबत शंका उत्पन्न झाल्याने समितीने बीडीओ व ग्रामसेवकांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मजुरांचे जॉब कार्ड वापरून मशनरीने काम झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर चौकशीअंती कारवाईचा इशारा देखील आमदार सुनील शेळके यांनी दिला आहे. बाईट : आमदार सुनील शेळके : समिती प्रमुख आमदार किशोर दराडे : समिती सदस्य
11
comment0
Report
AKAMAR KANE
Aug 12, 2025 11:49:29
Nagpur, Maharashtra:
Ngp Rain Shots live u ने फीड पाठवले ----- नागपूर नागपुरात पावसाचे पुनरागमन.... पुढील तीन दिवसांसाठी विदर्भात पावसाचा यलो अलर्ट गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आज दुपारनंतर शहरात जोरदार पाऊस कोसळला त्यामुळे असह्य झालेल्या उकाड्यापासून नागपूरकरांना थोडा दिलासा मिळाला. दरम्यान पुढील तीन दिवस नागपूर सह संपूर्ण विदर्भात दमदार पावसाचा इशारा नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे
11
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Aug 12, 2025 11:48:31
Shirur, Maharashtra:
Feed 2C Slug: Junnar Ozar Ganpati File:02 Rep: Hemant Chapude(Junnar) Anc: आज अंगारक चतुर्थी निमित्त अष्टविनायक ओझरच्या विघ्नहराच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची रिघ लागली असून चतुर्थी निमित्त लाडक्या बापाचा गाभारा आकर्षक अशा विविधरंगी फुलांनी सजविण्यात आल्याने लाडक्या बापाचे रूप विलोभनीय असेच दिसत होते,चतुर्थी निमित्त देवस्थान ट्रस्ट कडून गणेशयागा सह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होत... प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया जुन्नर पुणे...
10
comment0
Report
JMJAVED MULANI
Aug 12, 2025 11:48:06
Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI SLUG 1208ZT_INDAPURPOLICE FILE 3 इंदापुरातील रास्ता रोको प्रकरणात आयोजकांवर गुन्हा दाखल..... उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांची माहिती.... काल इंदापूरच्या हिंगणगावात अडवला होता पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग..... भोसरीचे आमदार महेश लांडगेंच्या उपस्थितीत केला होता रस्ता रोको Anchor_ इंदापुरातील वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीवरील आणि समाधी स्थळावरील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी काल सोमवारी इंदापूरच्या हिंगणगाव मध्ये पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थिती आंदोलन करण्यात आलं होतं. यानंतर आता इंदापूर पोलिसांनी या रास्ता रोको आंदोलनाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी काल आंदोलन स्थळी सर्व चित्रीकरण केलं असून त्याद्वारे शहानिशा करून आम्ही यामध्ये इतर आंदोलकांना आरोपी करणार आहोत. ज्यांनी आंदोलन करणार आहोत याबाबतचे स्वाक्षरीनिशी निवेदन दिलं होतं त्यांना आम्ही आरोपी करत गुन्हा दाखल केला असल्याचं उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड यांनी सांगितल आहे.
11
comment0
Report
JMJAVED MULANI
Aug 12, 2025 11:34:31
Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI SLUG 1208ZT_INDAPURPOLICE FILE 1 गणेशोत्सव दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर इंदापूर पोलिस ठाण्यात पार पडली बैठक Anchor_इंदापूर पोलिस ठाण्यात आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध गणेश मंडळे, दहीहंडी उत्सव मंडळ आणि पोलीस पाटील यांसह नागरिकांची संयुक्त बैठक पार पडली आहे.या बैठकीत कायदा सुव्यवस्था राखण्यासह एक गाव एक गणपती ही मोहीम मोठ्या प्रमाणात राबवावी असं आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड यांनी केलेय.
13
comment0
Report
JMJAVED MULANI
Aug 12, 2025 11:33:42
Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI SLUG 1208ZT_INDAPURBULET BYTE 1 इंदापूर पोलिसांचा बुलेट राजांना दणका.....35 बुलेट गाडीच्या सायलेन्सर वर फिरवला बुलडोझर.... Anchor_ इंदापूर पोलिसांनी बुलेट राजांना मोठा दणका दिलाय. कर्कश्य आवाज करणाऱ्या 35 बुलेट दुचाकी वरती इंदापूर पोलिसांनी कारवाई केली आहे. या बुलेट दुचाकींच्या सायलेन्सर वर थेट इंदापूर पोलिसांनी बुलडोझर चालवला आहे. या कारवाईतून इंदापूर पोलिसांनी तब्बल 35 हजार रुपयांचा दंड देखील वसूल केलाय. बाईट_ डॉक्टर सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी
14
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Aug 12, 2025 11:33:30
Akola, Maharashtra:
Anchor : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गटाचे) आमदार अमोल मिटकरी यांनी भाजप नेते तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना कडक इशारा दिला आहे. “अजित पवार यांच्या विरोधात बोलल्यास मोठी किंमत चुकवावी लागेल,” असा स्पष्ट इशारा मिटकरी यांनी दिला.मंत्रालयात आमच्याही कानावर तुमच्याविषयी अनेक गोष्टी येतात, मात्र आम्हाला त्या बोलायला लावू नका, असा पलटवारही त्यांनी केला. यावेळी मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस युती धर्म पाळत असल्याचे सांगत, “विखे पाटील यांना मात्र युती धर्माचा विसर पडला आहे,” असा टोला लगावला. Byte : अमोल मिटकरी , राष्ट्रवादी काँग्रेस आमदार.
10
comment0
Report
Independence Day
Advertisement
Back to top