Back
अकोला हॉटेलवर हल्ला: CCTV फुटेजने उघडकीस आणले खळबळजनक सत्य!
JJJAYESH JAGAD
Aug 08, 2025 10:04:16
Akola, Maharashtra
Anchor : अकोला शहरातील सिव्हिल लाइन पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका हॉटेल व्यावसायिकावर दोन अज्ञात इसमांनी हल्ला केल्याची घटना घडली होती..शुभम जाधव हे आपल्या हॉटेलमध्ये दैनंदिन कामकाज करीत असताना, दोन तरुण तोंडावर दुपट्टा बांधून मुख्य दरवाजातून आत आले आणि त्यांनी अचानक शुभम यांच्यावर लाकडी दांड्याने हल्ला करत गंभीर जखमी केले, हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाला आहेय..शुभम यांनी या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली आहेय..मात्र पोलीस योग्यरिते तपास करीत नसल्याचा आरोप हॉटेल व्यवसायिकानी केलाय..तर पोलिस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करीत आहेय.
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSudarshan Khillare
FollowAug 08, 2025 13:31:16Chandwad, Maharashtra:
छोटाहत्ती वाहनाची शाळकरी विद्यार्थ्यांना धडक...
चार विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर....
जखमी विद्यार्थ्यांची शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी घेतली भेट....
अँकर :-नाशिकच्या चांदवड तालुक्यातील सोग्रस फाटा येथे मुंबई आग्रा महामार्गावर पिंपळगाव बसवंत होऊन चांदवडच्या दिशेने येत असलेल्या भरधाव वेगातील छोटाहत्ती या मालवाहू वाहनाने रस्ता ओलांडत असलेल्या 12 शाळकरी विद्यार्थ्यांना जोरदार धडक दिली आहे या धडकेत चार शाळकरी मुले चिरडली असून इतर विद्यार्थी गंभीर जखमी आहेत
अति गंभीर जखमी विद्यार्थी नाशिकच्या रुग्णालयात हलवले असून काही विद्यार्थी चांदवड व पिंपळगाव बसवंत येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दरम्यान या अपघाताची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना कळताच त्यांनी तातडीने जखमी विद्यार्थ्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे
0
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 08, 2025 13:17:55Jalna, Maharashtra:
FEED NAME : 0808ZT_JALNA_BAVANKULE(3 FILES)
जालना : राज्यात कृत्रीम वाळू धोरण येणार, सर्व शासकीय बांधकामे कृत्रीम वाळूने होणार
जालन्यात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
टीव्हीमध्ये दिवसभर चेहरा चालला पाहिजे म्हणून प्रयत्न
रोहित पवारांवर बावनकुळे यांची टीका
आयकर विभागाच्या सर्वांना नोटीस येत असतात
सुधाकर चतुर्वेदीलाही बावनकुळे यांनी खडसावलं
उध्दव ठाकरे यांनी स्वतः त्यांचा सन्मान जपावा, ते रांगेत मागे बसल्याने मलाही वाईट वाटलं.
Anchor :राज्यात कृत्रीम वाळू धोरण येणार असून सर्व शासकीय बांधकामे आता कृत्रीम वाळूने होणार असल्याची महत्वाची घोषणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलीेये.जालन्यात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत महसूल सप्ताहाचा समारोप करण्यात आला.. यावेळी विविध योजनांआधारीत लाभार्थांचा सत्कार करण्यात आला.. दरम्यान यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.. नदीतून वाळुची चोरी थांबवण्यासाठी राज्यात आता कृत्रीम वाळू धोरण येणार असून एकट्या जालना जिल्ह्यात पन्नास क्रेशर मशीन देणार असल्याचं बावनकुळे यांनी म्हंटलंय.. त्याचबरोबर एकनाथ खडसे यांच्या कुटुंबातील एका सदस्याला आणि शिंदें यांच्या सर्व मंत्र्यांना ईडी आणि आयकर विभागाची नोटीस आल्याचं रोहित पवारांनी म्हंटलं होतं.. त्यावर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली असून टीव्हीवर दिवसभर चेहरा दिवसण्यासाठी हा प्रयत्न असल्याचा टोला बावनकुळे यांनी रोहित पवारांना लगावलाय... दरम्यान सनातन दहशत वादाच्या मुद्द्यावर पृथ्वीराज चव्हानांच्या कानशिलात लगावण्याची भाषा सुधाकर चतुर्वेदी यांनी केली होती.. यावरही बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत असं बोलणं योग्य नसून कोणीही कोणाच्या कानशिलात लगावण्याची भाषा करू नये असंही बावनकुळे यांनी खडसावलंय.उध्दव ठाकरे यांनी स्वतः त्यांचा सन्मान जपावा, ते रांगेत मागे बसल्याने मलाही वाईट वाटलं असा टोला बावनकुळे यांनी उध्दव ठाकरे यांना लगावलाय.
बाईट :चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री
4
Report
SKSACHIN KASABE
FollowAug 08, 2025 13:17:33Pandharpur, Maharashtra:
08082025
slug - PPR_RAILWAY_PASS
file 01
----
Anchor - पंढरपूर शहरातील व्हीआयपी रस्त्यावरील रेल्वे अंडरपासचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना आमदार समाधान आवताडे यांनी रेल्वे प्रशासनाला दिल्या आहेत .या रेल्वे अंडरपासच्या कामामुळे शासकीय कार्यालय ,शाळा ,महाविद्यालयामध्ये जाणाऱ्या नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच इतर दोन ठिकाणच्या पर्यायी रेल्वे अंडरपासच्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे आज आमदार समाधान आवताडे यांनी रेल्वे नगरपालिका महसूलच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी करून किमान दुचाकीसाठी तरी हा रस्ता तातडीने खुला करण्याच्या सूचना दिल्या आहेत
2
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowAug 08, 2025 13:03:45Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते शरणू हांडेला अपहरण प्रकरणातील चारही आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी
*- शरणू हांडे अपहरण प्रकरणातील आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी*
- आरोपी अमित सुरवसे याच्यासह 4 जणांना सुनावली पोलीस कोठडी
- आरोपीकडून कोयता, हॉकी स्टिक, साडी, ब्लेड पान आदी एकूण 25 शास्त्रास्त्र आणि वस्तू पोलिसांनी हस्तगत केले
- प्रकरणाचा अधिकचा तपास करण्यासाठी पोलिसांनी आरोपीच्या 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची केली मागणी
- पोलीस कोठडीच्या मागणीला आरोपीचे वकील ऍड. शरद पाटील यांनी युक्तिवाद करत विरोध केला
- आरोपीकडून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने पोलिस कोठडी ऐवजी न्यायालयीन कोठडी द्यायची विनंती केली
- दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर न्यायमूर्ती वी. ए. कुलकर्णी यांनी पोलीस कोठडी सुनावली
बाईट -
ऍंड. शरद पाटील (आरोपीचे वकील )
5
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 08, 2025 12:46:17Jalna, Maharashtra:
FEED NAME : 0808ZT_JALNA_SOLDIER_DTH(4 FILES)
जालना : सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू,शासकीय ईतमामात अंत्यसंस्कार
अँकर : सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू झालाय.अमोल दळवी असं मृत्युमुखी पडलेल्या जवानाचं नाव आहे.ते जालन्यातील बोरगाव जहागिर गावचे रहिवासी होते.आज बोरगाव जहागिर येथे दळवी यांच्या पार्थिवावर शासकीय ईतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.या घटनेमुळे परीसरातील गावांवर शोककळा पसरली आहे.यावेळी शासकिय अधिकारी,कर्मचारी देखील उपस्थित होते.
8
Report
GMGANESH MOHALE
FollowAug 08, 2025 12:32:32Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0808ZT_WSM_CONFISCATION_MARIJUANA
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर: वाशिमच्या मालेगाव पोलिसांनी अकोला–वाशिम रोड कोलदरा फाट्यावर कारवाई करून 1लाख 40हजार किमतीचा 11.7 किलो गांजा जप्त केला. मुक्ताबाई अशोक जाधव,सुशीला भानुदास जाधव आणि सरस्वती गोपीचंद चव्हाण या तिघी आरोपी महिलांना अटक करण्यात आली.पोलिसांनी गुप्त माहितीवरून सापळा रचून ही कारवाई केली. यांनी हा गांजा कुठून आणला याबाबतचा अधिक तपास मालेगाव पोलीस करीत आहेत.
8
Report
SRSHRIKANT RAUT
FollowAug 08, 2025 12:17:16Yavatmal, Maharashtra:
Anchor : यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकावरील हुमणी अळीच्या प्रादुर्भावाने झालेल्या नुकसानीची तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केली. मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची लागवड केलेली आहे, सद्यस्थितीमध्ये सोयाबीन पिकावर हुमणी अळीचे आक्रमण झाल्यामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीनचे पीक उध्वस्त झालेले आहे, उपाययोजना करण्यापूर्वीच या किडीने संपूर्ण सोयाबीनचे पीक फस्त केल्याचे आढळून आलेले आहे, यामुळे जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शिवसेना उबाठाणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली.
14
Report
SRSHRIKANT RAUT
FollowAug 08, 2025 12:06:29Yavatmal, Maharashtra:
AVB
Anchor : यवतमाळ च्या जिल्हा रुग्णालयात पालकमंत्री संजय राठोड यांनी पाहणी दौरा केला असता तेथील दुरावस्था समोर आली, शंभर कोटी रुपये खर्चून हे रुग्णालय अत्याधुनिक शल्यगृह, रुग्ण वार्ड आदींनी सज्ज होत असले तरी केल्या जात असलेल्या कामाची गुणवत्ता ठीक नाहीं, एमआरआय चे काम रखडले आहे, नव्यानेच लावलेल्या टाईल्स उखडल्या असून, ईमारत ठीकठिकाणी गळत असल्याचे दिसून आल्याने पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. कामाचा दर्जा सुधारा असे निर्देश त्यांनी दिले. आपली राजकीय कारकीर्द रुग्णसेवेपासून सुरु झाल्याने हे रुग्णालय सर्वसामान्यांसाठी सर्वसुविधायुक्त असले पाहिजे, नियमित देखभाल दुरुस्ती झाली पाहिजे अशा सूचना त्यांनी केल्या.
बाईट : संजय राठोड : पालकमंत्री
13
Report
SMSarfaraj Musa
FollowAug 08, 2025 12:04:00Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - गुंडागर्दी,अपहरण,खून कसं करायचं याचं विश्वविद्यालय शरद पवारांचा नेतृत्वाखाली रोहित पवार चालवत आहेत - आमदार सदाभाऊ खोत.
अँकर - राज्यात गुंडागर्दी,अपहरण,खून कसं करायचं याचं विश्वविद्यालय शरद पवारांचा नेतृत्वाखाली रोहित पवार चालवत आहेत, अशी घणाघाती टीका आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे.तसेच राज्यात राष्ट्रवादी पुरस्कृत आणि रोहित पवार समर्थन सुरू असलेली गुंडागर्दी मुख्यमंत्र्यांनी ठेचून काढावी,अशी मागणीही आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे,आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थक मारहाण प्रकरणावरून सर्व खोत यांनी रोहित पवारांवर ही टीका केली आहे.
बाईट - सदाभाऊ खोत - आमदार .
12
Report
GMGANESH MOHALE
FollowAug 08, 2025 11:52:01Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0808ZT_WSM_ATMA
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर :कृषी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे पालकमंत्री असलेल्या वाशिम जिल्ह्यातील महिला अधिकाऱ्यानं शेतकऱ्यावर अरेरावी केल्याचा संताप जनक प्रकार समोर आला असून या घटनेच चित्रीकरण करणाऱ्या शेतकऱ्याचा मोबाईलही त्या महिला अधिकाऱ्याने हिसकावून घेतलाय.वाशिमच्या आत्मा विभागाअंतर्गत शाश्वत शेती दिनाच्या निमित्तानं शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.मात्र या कार्यक्रमात शेतकऱ्यांना जेवण अपुरं पडल्यामुळे बराच वेळ गोंधळ निर्माण झाला होता.मात्र शेतकऱ्यांनी जेव्हा अधिकाऱ्यांना विचारणा केली तेव्हा आत्मा विभागाच्या प्रकल्प संचालक असलेल्या अनिसा महाबळे ह्या शेतकऱ्यांवार एकदम भडकल्या आणि या घटनेचा एक शेतकरी चित्रीकरण करत असताना त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तो मोबाईलही हिसकावून घेतला.मात्र आता माध्यमांनी यासंदर्भात विचारणा केली असता असा कोणताही प्रकार घडला नसल्याचं सांगत महाबळे यांच्याकडून सावरासावर करण्याचा प्रयत्न केला.
बाईट : अनिसा महाबळे, प्रकल्प संचालक आत्मा.
12
Report
YKYOGESH KHARE
FollowAug 08, 2025 11:51:14Nashik, Maharashtra:
Nsk_bjp protest
feed by by live u 51
ashik breaking
- एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या नाशिक मध्ये आंदोलन
- नाशिक भाजप करणार खेवलकर यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन
- प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईल मध्ये मोठ्या प्रमाणात अश्लील व्हिडिओ सापडल्याने नाशिक भाजप आक्रमक
13
Report
VKVISHAL KAROLE
FollowAug 08, 2025 11:51:09Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn builder byte
Feed attached
फारोळा बिल्डिंग दुरवस्था प्रकरणी बिल्डर दीपक झुणझुणवाला आता पुढे आले आहे आणि ज्या ज्या लोकांचे फ्लॅट्स या कमकुवत इमारतीत जाणार आहे त्यांना बाजार दराप्रमाणे त्यांचे पैसे पुढील काही दिवसात परत करण्यात येईल अशा पद्धतीचा प्रस्ताव त्यांनी फ्लॅट ओनर समोर ठेवला आहे ,इतकच नाही तर त्या जागेवर नवी इमारत बांधून द्यायची असल्यास त्यासाठीही बिल्डर दीपक झुंणझुणवाला तयार आहे , एकाही फ्लॅट मालकाचे नुकसान होणार नाही अशी ग्वाही त्यांनी बिडकीन पोलीस ठाण्यात फ्लॅट ओनर्सला दिलेली आहे...
Byte दीपक झुणझुणवाला, बिल्डिंग मालक
11
Report
JMJAVED MULANI
FollowAug 08, 2025 11:46:35Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 0808ZT_INDAPURBAJARPET
FILE 3
रक्षाबंधन सणाच्या मुहूर्तावर इंदापूरची बाजारपेठ सजली… विविध प्रकारच्या राख्या बाजारात दाखल… खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी…
ANCHOR — इंदापूरमध्ये रक्षाबंधन सणानिमित्त बाजारपेठेचा रंगतदार माहोल पाहायला मिळत आहे. बाजारात वेगवेगळ्या डिझाईनच्या राख्यांची रेलचेल असून, ग्राहक खरेदीसाठी मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. राख्यांच्या किमती दहा रुपयांपासून ते हजारो रुपयांपर्यंत आहेत.
13
Report
JMJAVED MULANI
FollowAug 08, 2025 11:34:16Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 0808ZT_DAUNDBIBT
FILE 5
दौंड तालुक्यातील नानगावमध्ये फाशात अडकलेल्या बिबट्याला सुखरूप पणे वाचवण्यात यश
रेस्क्यू टीम आणि वनविभागाने फाश्यातून बिबट्यास सोडवले..
Anchor - दौंड तालुक्यातील नानगावमध्ये डुक्कर पकडण्याच्या फाशामध्ये अडकलेल्या बिबट्याला सुखरूप पणे सोडवण्यात वन विभागास यश आले आहे.
वनविभागाचे अधिकारी कर्मचारी आणि रेस्क्यू टीम यांनी संयुक्तपणे काम करत बिबट्यास बेशुद्ध करून फाश्यातून बाहेर काढले ..
पुढील उपचारासाठी बिबट्यास वनविभागाच्या ताब्यात देण्यात आलेय दरम्यान अशात अडकलेल्या बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
14
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 08, 2025 11:34:08Jalna, Maharashtra:
FEED NAME : 0808ZT_JALNA_DAM_OVER(3 FILES)
जालना : सोनखेडा येथील साठवण तलाव पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने भरला, आमदार संतोष दानवेंनी केलं जलपूजन
अँकर : जालन्यातील सोनखेडा येथील साठवण तलाव पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने भरलाय.यावर्षी एप्रिल महिन्यात या तलावाचं काम पूर्ण झालंय.तलावाचं काम पूर्ण झाल्यानंतर यावर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलाय.आज भोकरदन-जाफ्राबाद मतदार संघाचे आमदार संतोष दानवे यांच्या हस्ते या प्रकल्पातील पाण्याचं जलपूजन पार पडलं. यावेळी परीसरातील ग्रामस्थांची मोठया संख्येनं उपस्थिती होती.
14
Report