Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

कृत्रिम वाळू धोरण: शासकीय बांधकामे आता बदलणार!

NMNITESH MAHAJAN
Aug 08, 2025 13:17:55
Jalna, Maharashtra
FEED NAME : 0808ZT_JALNA_BAVANKULE(3 FILES) जालना :  राज्यात कृत्रीम वाळू धोरण येणार, सर्व शासकीय बांधकामे कृत्रीम वाळूने होणार जालन्यात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती टीव्हीमध्ये दिवसभर चेहरा चालला पाहिजे म्हणून प्रयत्न रोहित पवारांवर बावनकुळे यांची टीका आयकर विभागाच्या सर्वांना नोटीस येत असतात सुधाकर चतुर्वेदीलाही बावनकुळे यांनी खडसावलं उध्दव ठाकरे यांनी स्वतः त्यांचा सन्मान जपावा, ते रांगेत मागे बसल्याने मलाही वाईट वाटलं. Anchor :राज्यात कृत्रीम वाळू धोरण येणार असून सर्व शासकीय बांधकामे आता कृत्रीम वाळूने होणार असल्याची महत्वाची घोषणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलीेये.जालन्यात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत महसूल सप्ताहाचा समारोप करण्यात आला.. यावेळी विविध योजनांआधारीत लाभार्थांचा सत्कार करण्यात आला.. दरम्यान यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.. नदीतून वाळुची चोरी थांबवण्यासाठी राज्यात आता कृत्रीम वाळू धोरण येणार असून एकट्या जालना जिल्ह्यात पन्नास क्रेशर मशीन देणार असल्याचं बावनकुळे यांनी म्हंटलंय.. त्याचबरोबर एकनाथ खडसे यांच्या कुटुंबातील एका सदस्याला आणि शिंदें यांच्या सर्व मंत्र्यांना ईडी आणि आयकर विभागाची नोटीस आल्याचं रोहित पवारांनी म्हंटलं होतं.. त्यावर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली असून टीव्हीवर दिवसभर चेहरा दिवसण्यासाठी हा प्रयत्न असल्याचा टोला बावनकुळे यांनी रोहित पवारांना लगावलाय... दरम्यान सनातन दहशत वादाच्या मुद्द्यावर पृथ्वीराज चव्हानांच्या कानशिलात लगावण्याची भाषा सुधाकर चतुर्वेदी यांनी केली होती.. यावरही बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत असं बोलणं योग्य नसून कोणीही कोणाच्या कानशिलात लगावण्याची भाषा करू नये असंही बावनकुळे यांनी खडसावलंय.उध्दव ठाकरे यांनी स्वतः त्यांचा सन्मान जपावा, ते रांगेत मागे बसल्याने मलाही वाईट वाटलं असा टोला बावनकुळे यांनी उध्दव ठाकरे यांना लगावलाय. बाईट :चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKSudarshan Khillare
Aug 08, 2025 16:30:37
Chandwad, Maharashtra:
अँकर.....नाशिकच्या चांदवड तालुक्यातील सोग्रस येथे संध्याकाळी पाच वाजेच्या दरम्यान श्री अजित दादा पवार माध्यमिक विद्यालय सोग्रस येथील विद्यार्थी मुंबई आग्रा महामार्ग ओलांडून घराकडे जात असताना पिंपळगाव बसवंत येथे टमाटे विक्री करून पुन्हा भरधाव वेगाने मध्य धुंद अवस्थेत घराकडे जात असताना शालेय विद्यार्थ्यांना धडक दिल्याची घटना घडली यात 13 मुले व मुली गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून यात पाच ते सहा विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक होती. यातील एकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय या अपघातानंतर संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थ आक्रमक होत त्यांनी थेट मुंबई आग्रा महामार्ग तब्बल तीन तास रोखून धरल्याने वाहनाच्या पाच ते सहा किलोमीटर लांबच लांब रांगा लागल्या होत्या यावेळी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी ग्रामस्थ व नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र संतप्त ग्रामस्थ आणि नातेवाईक आक्रमक असल्याने त्यांनी वाहने रोखून धरली याची माहिती मंत्री दादा भुसे यांना मिळतात त्यांनी घटनास्थळी येऊन संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांची चर्चा करत समजूत काढली यावेळी ग्रामस्थांनी या ठिकाणी उड्डाणपूल झाला पाहिजे अशी मागणी केली असता तत्काळ दोन दिवसात या ठिकाणी गतिरोधक आणि झेब्रा क्रॉसिंग चे काम केले जाईल आणि उड्डाणपुलासाठी पाठपुरावा केला जाईल त्याचबरोबर जखमी झालेल्यांचा शासकीय खर्चाने उपचार करण्यात येईल आणि मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याला चार लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्याची घोषणा केली या संपूर्ण घटनेची माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आल्याची सांगितल्यानंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रस्ता रोको आंदोलन स्थगित केले आहे. बाईट :- दादा भुसे ( कॅबिनेट मंत्री)
11
Report
MMMahendrakumar Mudholkar
Aug 08, 2025 16:00:30
Beed, Maharashtra:
बीड: 8 वर्षांनी मायलेकरांची भेट, पोलिसांच्या प्रयत्नाने हरवलेला राजू आईच्या कुशीत परतला... काळजाच्या तुकड्याला पाहताच पोलिसांसमोरच आईने हंबरडा फोडला Anc : कधी काळी हरवलेली आशा आणि आज डोळ्यांतून वाहणारे आनंदाश्रू हे अश्रू आहेत. बीड मधील एका ऊसतोड दांपत्याचे घरातून निघून गेलेला मुलगा आठ वर्षानंतर बीड पोलिसाच्या तपासामुळे आपल्या आई-वडिलांना पुन्हा भेटला आणि पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रत्येकाचे डोळे पाणावले. 2017 मध्ये दहावीचे शिक्षण घेत असलेला राजू काकासाहेब माळी हा अचानक बेपत्ता झाला होता. आई-वडील ऊसतोड मजुरीसाठी कर्नाटकात होते. परिस्थिती हलाखीची होती आणि आई-वडील अशिक्षित होते त्यामुळे कसल्याही प्रकारचा गुन्हा त्यांनी पोलीस ठाण्यात दाखल केला नाही. मात्र 2023 मध्ये आईने दिलेल्या तक्रारीनंतर तपासाला सुरुवात झाली आणि पोलिसांनी धीर न हरवता तपास पुढे नेला. राजू पुण्यात असल्याचं निष्पन्न झालं आणि त्याला शोधून पुन्हा बीडमध्ये आणण्यात आलं. आज पोलीस अधीक्षक कार्यालयात राजूची त्याच्या आईवडिलांशी भेट घडवून आणण्यात आली. ते क्षण पाहणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. बीड पोलिसांनी केवळ एक मुलगा शोधून काढलेला नाही. तर एक मोडलेलं कुटुंब पुन्हा जोडून दिलं आहे.
14
Report
SKSACHIN KASABE
Aug 08, 2025 15:45:41
Pandharpur, Maharashtra:
08082025 Slug -PPR_SANDMAFIYA file 01 ---- Anchor - सोलापूर जिल्ह्यातील माढयाच्या तहसीलदारावर वाळू माफियांचा जीवघेणा हल्ला, सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील मुंगशी येथे सीना नदीपात्रातून वाळू उपसा करत असलेल्या वाळूमाफिया वर कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदार संजय भोसले आणि महसूल पथकाच्या वाहनाला पाठीमागून धक्का देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे. यानंतर वाळू पाट्याने स्कॉर्पिओ वाहन तहसीलदारांच्या वाहना पुढे आडवे लावून त्यांचा रस्ता रोखण्याचा प्रयत्न सुद्धा केला आहे. याप्रकरणी कुर्डूवाडी पोलीस स्टेशनमध्ये वाळू माफिया स्वप्निल कांबळे यांच्यासह त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
13
Report
AKAMAR KANE
Aug 08, 2025 15:18:20
kolhapur, Maharashtra:
Ngp swadeshi andolan live u ने फीड पाठवले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या आयात शुल्काचा निषेध म्हणून किरकोळ व्यापाऱ्यांनी स्वदेशीचा मार्ग अवलंबिला आहे. या अंतर्गत भारतीय सामान, आपला स्वाभिमान अभियान सुरू करण्यात आले असून ग्राहकांना स्वदेशी वस्तू घेण्याबाबत जागरुक करण्यात येणार आहे.उपराजधानीतून सुरू झालेले हे अभियान संपूर्ण देशभर राबविण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना भारतीय वस्तू खरेदी करा आणि विक्री करा, असे आवाहन केल्यानंतर त्याला पाठिंबा देत *कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स* आणि *स्वदेशी जागरण मंच* यांनी हे अभियान सुरू केले. या अंतर्गत महाल येथील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून जोरदार घोषणाबाजी रॅली काढण्यात आली. याबाबत अधिक सांगताना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतिया यांनी सर्व व्यापारी प्रतिनिधींनी एकमुखाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाचे स्वागत करत देशभरातील ४८ हजारहून अधिक व्यापारी संघटनांच्या माध्यमातून देशातील ८ कोटी किरकोळ व्यापाऱ्यांनी अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. जर आपण परकीय कंपन्यांच्या देशी उत्पादनांना प्रोत्साहन दिले, तर आपला व्यापार मजबूत होईल असेही ते म्हणाले... यावेळी कॉन्फिडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे बी सी भरतीया आणि स्वदेशी जागरण मंचचे धनंजय भिडे यांच्याशी बातचीत केली आहे आमची प्रतिनिधी अमर काणे यांनी -===----------- बाईट-- बी सी भरतीय, कॅट बाईट - धनंजय भिडे,स्वदेशी जागरण मंच
14
Report
PPPRANAV POLEKAR
Aug 08, 2025 15:18:12
Ratnagiri, Maharashtra:
रत्नागिरी - नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने रत्नागिरी पोलिसांकडून देखील समुद्राला नारळ अर्पण केला गेला. पक्ष अनेक वर्षांपासून चालत आलेली प्रथा पोलीस दलामध्ये आज देखील कायम आहे. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी यावेळी मांडवी समुद्रकिनारी समुद्राला नारळ अर्पण केला.
14
Report
JJJAYESH JAGAD
Aug 08, 2025 15:01:58
Akola, Maharashtra:
Anchor : अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील निर्गुणा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या एका युवकाला गावातील युवकांनी वाचविले आहेय..सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वाडेगाव येथील पस्तीस वर्षीय युवक बजरंग ढोरे सकाळी नदी पलीकडे शेत मजूरी करुन घरी परततांना नदीला पूर आलेला दिसला..बजरंग ढोरे यांनी स्मशानभूमी जवळून नदी पात्रातून येण्याचा प्रयत्न केला असता पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने वाहुन गेला..वाहून जात असताना नदीला आलेला पूर पाहण्यासाठी नदी काठी उभे धाडसी युवकांनी नदीपात्रात उड्या मारीत वाहत जाणाऱ्या युवकाला वाचविले..
13
Report
SKSudarshan Khillare
Aug 08, 2025 15:01:47
Chandwad, Maharashtra:
* - नासिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी समजूत महामार्ग सुरळीत करण्याचा केला प्रयत्न.... - - मात्र नातेवाईक ग्रामस्थांच्या संतप्त भावना कायम.... - पुन्हा महामार्ग रोखून धरल्याने तणावाची परिस्थिती
14
Report
SKSACHIN KASABE
Aug 08, 2025 15:01:35
Pandharpur, Maharashtra:
08082025 Slug - PPR_NARLI_POURNIMA file 01 ------ Anchor - नारळी पौर्णिमे निमित्त श्री विठ्ठल रूक्मिणी मातेस पारंपारिक अलंकार परिधान करण्यात आले आहेत. त्यामध्ये श्री विठ्ठलास सोने मुकुट, नाम निळाचा, कौस्तुभ मणी, मोठ्या दंडपेट्या जोड, हि-याचा कंगन जोड, मोत्याची कंठी, मोत्याचा तुरा, लहान व मोठा शिरपेच, मत्स्य जोड, मोठी बोरमाळ, लक्ष्मीहार, तोडे जोड, मोहनमाळ, तुळशीची माळ तसेच श्री रूक्मिणी मातेस सोने मुकुट, वाक्या जोड, तोडे जोड, तानवड जोड, चिंचपेटी तांबडी, जवमणी पदक, जवेच्या माळा, लक्ष्मीहार, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, सरी, कंबरपट्टा इत्यादी अलंकार परिधान करण्यात आले
14
Report
AAASHISH AMBADE
Aug 08, 2025 14:45:41
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0808ZT_CHP_BAD_ROAD ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील रस्ता उखडलेल्या गावाने तालुकास्थानी येण्यासाठी मागितले हेलिकॉप्टर, विद्यार्थी आणि नागरिकांनी अधिकाऱ्यांना निवेदन देत केली भन्नाट मागणी, अवैध रेती वाहतुकीने पिपरी -देश गावाच्या मार्गाची झालीये दैना अँकर:----   अवजड रेती वाहतुकीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती-पिपरी हा रस्ता पूर्णतः खराब झाला असून या रस्त्यावरून दुचाकी वाहने चालविणे कठीण झाले आहे. या खराब रस्त्यामुळे गावातील गावकरी तथा विद्यार्थी वर्गाचे दळणवळण बाधित झाले असून रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. या रस्त्यावर अनेकदा किरकोळ अपघात नेहमीच होत असतात. रस्ता वाहतुकीसाठी अयोग्य झाल्याने शासनाने गावकऱ्यांना ये-जा करण्यासाठी हेलिकॉप्टरची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी अनोखी मागणी  गावकरी आणि विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयात तहसीलदार राजेश भांडारकर यांना सादर केलेल्या निवेदनातून केली आहे. तहसील कार्यालयावर एक मोर्चा काढून ही समस्या त्यांनी शासनासमोर मांडली. पिपरी ते भद्रावती या रस्त्यावर अवैध रेतीव्यवसायिकांद्वारे अवजड वाहतूक करण्यात येत असल्याने रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे रस्त्याची अगदी चाळण झाली आहे. ग्रामस्थांची भन्नाट मागणी मात्र चर्चेचा विषय ठरली आहे. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
14
Report
SKSudarshan Khillare
Aug 08, 2025 14:33:09
Chandwad, Maharashtra:
नाशिकच्या चांदवड तालुक्यातील सोग्रस फाटा येथे 12 शालेय विद्यार्थ्यांना छोटाहत्ती वाहनाने चिरडले..... अपघातानंतर संतप्त पालकांकडून मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको... आरोपीला शिक्षा द्या तोपर्यंत रस्त्यावर उठणार नाही असा पवित्रा.... अपघातात चार विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक...
14
Report
ABATISH BHOIR
Aug 08, 2025 14:18:18
Kalyan, Maharashtra:
कल्याणात नारळी पौर्णिमेचा सण उत्साहात पारंपारिक वेशभूषेत कोळी बांधवाची कल्याणच्या गणेश घाटावर मिरवणूक कल्याण डोंबिवलीत आगरी कोळी समाजाचा महापौर बसवावा - शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांची नेत्यांकडे मागणी.. आमदार विश्वनाथ भोईर यांनी आगरी,कोळी नृत्यवर ठेका धरत केलं कोळी बांधवासोबत केला नृत्य. Anchor  : नारळी पौर्णिमेनंतर मासेमारी सुरु होत असल्याने नारळी पौर्णिमेनिमित्त कोळी बांधव दरवर्षी पारंपारिक वेशभूषेत शोभायात्रा काढत दर्याला नारळ अपर्ण करत शांत होण्याचे आवाहन करतात. सालाबादाप्रमाणे यंदा देखील कल्याणात नारळी पौर्णिमानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक ते दुर्गाडी किल्ला गणेश घाट पर्यंत आगरी कोळी बांधवांनी मिरवणूक काढली होती . या मिरवणुकीत हजारो आगरी कोळी बांधव पारंपारिक वेशभूषित वाजत गाजत सहभागी झाले होते .तर आमदार विश्वनाथ भोईर यांनी आगरी कोळी गाण्यावर ठेका धरत न्युत केले आगरी कोळी समाजाच्या संस्कृतीचे परंपरेची माहिती मिळावी यासाठी विविध कचित्ररथ देखील मिरवणुकीत सहभागी करण्यात आले होते.दुर्गाडी खाडी किनारी आगरी कोळी बांधवानी खाडीला नारळ अर्पण केला . शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला यावेळी त्यांनी दि बा पाटील यांचे आगरी कोळी समाजाच नव्हे तर सर्वच समाजासाठी मोठे योगदान आहे . नवी मुंबई विमानतळाला दिवा पाटील यांचे नाव द्यावे यासाठी आगरी समाज झटत आहे . पुढे बोलताना भोईर यांनी आगरी कोळी समाज हा जातीपातीचा राजकारण करत नाही मात्र कल्याण डोंबिवलीत आगरी कोळी नगरसेवकांची संख्या जास्त आहे त्यामुळे यंदा आगरी कोळी समाजाचा महापौर बसवण्यात यावा अशी मागणी त्यांनी मिरवणुकीच्या माध्यमातून नेत्यांकडे केली Byte :-विश्वनाथ भोईर ( आमदार शिंदे गट )
13
Report
AAASHISH AMBADE
Aug 08, 2025 14:02:51
Gadchiroli, Maharashtra:
Feed slug :--- 0808ZT_GAD_BLDG_COLLAPSE_1_2 ( 2 file sent on 2C)  टायटल:--गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी शहरात टू व्हिलर शोरूम इमारतीचा भाग अचानक कोसळला, ढिगाऱ्याखाली 4 लोक दबले असल्याची प्राथमिक माहिती अँकर:--गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी शहरात टू व्हिलर शोरूम इमारतीचा भाग अचानक कोसळलाय.  ढिगाऱ्याखाली 4 लोक दबले असल्याची प्राथमिक माहिती आहे. प्रशासन आणि पोलिसांची चमू घटनास्थळी दाखल झाली आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इमारत जुनी असल्याची माहिती असून पंचायत समिती मार्गावर असलेल्या इमारतीचा भाग कोसळल्याने एकच खळबळ उडाली आहे. जेसीबीच्या साह्याने ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे. आशीष अम्बाडे झी मीडिया गडचिरोली
13
Report
PPPRAFULLA PAWAR
Aug 08, 2025 13:48:03
Raigad, Maharashtra:
स्‍लग - रायगडात नारळी पौर्णिमा उत्‍साहात अँकर – नारळी पौर्णिमेचा सण रायगड जिल्‍हयात मोठया उत्‍साही वातावरणात साजरा झाला. अलिबाग मुरूड, श्रीवर्धनसह ठिकठिकाणच्‍या कोळीवाडयातून संध्‍याकाळी मिरवणूका काढण्‍यात आल्‍या. सोन्याच्या मुलामा दिलेला नारळ सागराला अर्पण करण्यासाठी कोळी बांधव भगिनी पारंपारीक वेषात सहभागी झाले होते. वाद्यांच्‍या तालावर धुंद होवून नाचत होते. नारळाची सागराची पूजा करून नारळ सागराला अर्पण करण्‍यात आला.
14
Report
UPUmesh Parab
Aug 08, 2025 13:34:21
Oros, Maharashtra:
अँकर --- नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून मालवण किनार पट्टीवर महिलांसाठी नारळ लढविण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली. मालवण किनार पट्टीवर असंख्य महिलांच्या उपस्थितीत नारळ लढविण्याच्या स्पर्धेचा आमदार निलेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या स्पर्धेत आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली होती. महिलांनी उत्स्फूर्त पणे नारळ लढविण्याच्या स्पर्धेत भाग घेत आपले नशीब आजमावले. Byte. --- सौ. मोंडकर, आयोजक feed on desk
14
Report
AKAMAR KANE
Aug 08, 2025 13:34:15
kolhapur, Maharashtra:
Ngp sharad pawar arrival live u ने फीड पाठवले ---- राष्ट्रवादी काँग्रेस (sp )नेते शरद पवार यांचे आज संध्याकाळी नागपुरात आगमन झाले.... उद्या ते मंडल यात्रेला नागपूर आतून हिरवी झेंडी देणार आहे... या यात्रेला सुरुवातिला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राज्यातील अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहे... तत्पूर्वी उद्या शरद पवार यांची प्रेस क्लब मध्ये मिट द प्रेस सुद्धा असणार आहे. दरम्यान शरद पवार यांचा आजचा मुक्काम हॉटेल रेडिसन येथे असणार... शरद पवार आज दिल्लीतून नागपुरात ज्या विमानाने आले... त्याच विमानाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ही आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे
14
Report
Advertisement
Back to top