Back
दौंडमध्ये बिबट्याचा चमत्कारिक बचाव, नागरिकांची गर्दी!
JMJAVED MULANI
Aug 08, 2025 11:34:16
Baramati, Maharashtra
JAVEDMULANI
SLUG 0808ZT_DAUNDBIBT
FILE 5
दौंड तालुक्यातील नानगावमध्ये फाशात अडकलेल्या बिबट्याला सुखरूप पणे वाचवण्यात यश
रेस्क्यू टीम आणि वनविभागाने फाश्यातून बिबट्यास सोडवले..
Anchor - दौंड तालुक्यातील नानगावमध्ये डुक्कर पकडण्याच्या फाशामध्ये अडकलेल्या बिबट्याला सुखरूप पणे सोडवण्यात वन विभागास यश आले आहे.
वनविभागाचे अधिकारी कर्मचारी आणि रेस्क्यू टीम यांनी संयुक्तपणे काम करत बिबट्यास बेशुद्ध करून फाश्यातून बाहेर काढले ..
पुढील उपचारासाठी बिबट्यास वनविभागाच्या ताब्यात देण्यात आलेय दरम्यान अशात अडकलेल्या बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowAug 08, 2025 14:18:18Kalyan, Maharashtra:
कल्याणात नारळी पौर्णिमेचा सण उत्साहात पारंपारिक वेशभूषेत कोळी बांधवाची कल्याणच्या गणेश घाटावर मिरवणूक
कल्याण डोंबिवलीत आगरी कोळी समाजाचा महापौर बसवावा - शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांची नेत्यांकडे मागणी..
आमदार विश्वनाथ भोईर यांनी आगरी,कोळी नृत्यवर ठेका धरत केलं कोळी बांधवासोबत केला नृत्य.
Anchor : नारळी पौर्णिमेनंतर मासेमारी सुरु होत असल्याने नारळी पौर्णिमेनिमित्त कोळी बांधव दरवर्षी पारंपारिक वेशभूषेत शोभायात्रा काढत दर्याला नारळ अपर्ण करत शांत होण्याचे आवाहन करतात. सालाबादाप्रमाणे यंदा देखील कल्याणात नारळी पौर्णिमानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक ते दुर्गाडी किल्ला गणेश घाट पर्यंत आगरी कोळी बांधवांनी मिरवणूक काढली होती . या मिरवणुकीत हजारो आगरी कोळी बांधव पारंपारिक वेशभूषित वाजत गाजत सहभागी झाले होते .तर आमदार विश्वनाथ भोईर यांनी आगरी कोळी गाण्यावर ठेका धरत न्युत केले आगरी कोळी समाजाच्या संस्कृतीचे परंपरेची माहिती मिळावी यासाठी विविध कचित्ररथ देखील मिरवणुकीत सहभागी करण्यात आले होते.दुर्गाडी खाडी किनारी आगरी कोळी बांधवानी
खाडीला नारळ अर्पण केला . शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला यावेळी त्यांनी दि बा पाटील यांचे आगरी कोळी समाजाच नव्हे तर सर्वच समाजासाठी मोठे योगदान आहे . नवी मुंबई विमानतळाला दिवा पाटील यांचे नाव द्यावे यासाठी आगरी समाज झटत आहे . पुढे बोलताना भोईर यांनी आगरी कोळी समाज हा जातीपातीचा राजकारण करत नाही मात्र कल्याण डोंबिवलीत आगरी कोळी नगरसेवकांची संख्या जास्त आहे त्यामुळे यंदा आगरी कोळी समाजाचा महापौर बसवण्यात यावा अशी मागणी त्यांनी मिरवणुकीच्या माध्यमातून नेत्यांकडे केली
Byte :-विश्वनाथ भोईर ( आमदार शिंदे गट )
2
Report
AAASHISH AMBADE
FollowAug 08, 2025 14:02:51Gadchiroli, Maharashtra:
Feed slug :--- 0808ZT_GAD_BLDG_COLLAPSE_1_2
( 2 file sent on 2C)
टायटल:--गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी शहरात टू व्हिलर शोरूम इमारतीचा भाग अचानक कोसळला, ढिगाऱ्याखाली 4 लोक दबले असल्याची प्राथमिक माहिती
अँकर:--गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी शहरात टू व्हिलर शोरूम इमारतीचा भाग अचानक कोसळलाय. ढिगाऱ्याखाली 4 लोक दबले असल्याची प्राथमिक माहिती आहे. प्रशासन आणि पोलिसांची चमू घटनास्थळी दाखल झाली आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इमारत जुनी असल्याची माहिती असून पंचायत समिती मार्गावर असलेल्या इमारतीचा भाग कोसळल्याने एकच खळबळ उडाली आहे. जेसीबीच्या साह्याने ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
गडचिरोली
4
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowAug 08, 2025 13:48:03Raigad, Maharashtra:
स्लग - रायगडात नारळी पौर्णिमा उत्साहात
अँकर – नारळी पौर्णिमेचा सण रायगड जिल्हयात मोठया उत्साही वातावरणात साजरा झाला. अलिबाग मुरूड, श्रीवर्धनसह ठिकठिकाणच्या कोळीवाडयातून संध्याकाळी मिरवणूका काढण्यात आल्या. सोन्याच्या मुलामा दिलेला नारळ सागराला अर्पण करण्यासाठी कोळी बांधव भगिनी पारंपारीक वेषात सहभागी झाले होते. वाद्यांच्या तालावर धुंद होवून नाचत होते. नारळाची सागराची पूजा करून नारळ सागराला अर्पण करण्यात आला.
5
Report
UPUmesh Parab
FollowAug 08, 2025 13:34:21Oros, Maharashtra:
अँकर --- नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून मालवण किनार पट्टीवर महिलांसाठी नारळ लढविण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली. मालवण किनार पट्टीवर असंख्य महिलांच्या उपस्थितीत नारळ लढविण्याच्या स्पर्धेचा आमदार निलेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या स्पर्धेत आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली होती. महिलांनी उत्स्फूर्त पणे नारळ लढविण्याच्या स्पर्धेत भाग घेत आपले नशीब आजमावले.
Byte. --- सौ. मोंडकर, आयोजक
feed on desk
8
Report
AKAMAR KANE
FollowAug 08, 2025 13:34:15kolhapur, Maharashtra:
Ngp sharad pawar arrival
live u ने फीड पाठवले
----
राष्ट्रवादी काँग्रेस (sp )नेते शरद पवार यांचे आज संध्याकाळी नागपुरात आगमन झाले.... उद्या ते मंडल यात्रेला नागपूर आतून हिरवी झेंडी देणार आहे... या यात्रेला सुरुवातिला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राज्यातील अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहे... तत्पूर्वी उद्या शरद पवार यांची प्रेस क्लब मध्ये मिट द प्रेस सुद्धा असणार आहे. दरम्यान शरद पवार यांचा आजचा मुक्काम हॉटेल रेडिसन येथे असणार... शरद पवार आज दिल्लीतून नागपुरात ज्या विमानाने आले... त्याच विमानाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ही आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे
6
Report
LBLAILESH BARGAJE
FollowAug 08, 2025 13:33:55Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- सुजय विखे पाटील
फीड 2C
सुजय विखे ऑन उद्धव ठाकरे
Anc:- काल इंडिया आघाडीची बैठक दिल्लीत पार पडली या बैठकीत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे पाचव्या रांगेत बसले होते, यावर आता सर्वत्र टीका होत असतांना भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी निशाणा साधला आहे...इंडिया बैठकीच्या आघाडीत उद्धव ठाकरेंना फार पाठीमागची खुर्ची दिली गेली हा त्यांच्या स्वाभिमानाचा भाग होता...एकनाथ शिंदे हे मोदींच्या मागे दुसऱ्या रांगेत बसले होते आता त्यांना मागच्या रांगेत बसावे लागते आहे त्यावरून त्यांची चव काढली... मात्र जो कधी पंतप्रधान होऊ शकत नाही (राहुल गांधी) त्याच्यापुढे बसले होते... त्यामुळे त्यांचा इंडिया आघाडीत असलेलं उद्धव ठाकरे यांचं महत्त्व सिद्ध होतं असा टोला सुजय विखे यांनी लगावला.
बाईट:- सुजय विखे, माजी खासदार भाजप
सुजय विखे ऑन राहुल गांधी
Anc:- काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी मतदान यादी वरून निवडणूक आयोगावर अनेक आरोप केले यावरून माजी खासदार सुजय विखे यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे... तुमच्या गोष्टीत तथ्य असेल तर तुम्ही पुराव्यासह न्यायालयात गेले पाहिजे असं सुजय विखे यांनी म्हटलंय...मात्र त्यांना निवडणूक आयोग आणि न्यायालयावर विश्वास नसेल तर त्यांचा जिथून उगम आहे तिथून एखादा जज किंवा निवडणूक आयोगाचा अधिकारी परदेशातून आणून बसवला पाहिजे तर त्यांचा विश्वास बसेल असा टोला सुजय विखे यांनी लगावला आहे.
बाईट;- सुजय विखे, माजी खासदार भाजप
सुजय विखे ऑन रोहित पवार
Anc:- आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याचे अपहरण करण्यात आलं होतं यावरून आमदार रोहित पवार यांच्यावरही आरोप होत आहे...यावर सुजय विखे यांनी प्रत्युत्तर दिल आहे... मला इतर लोकांसारखं जिल्ह्याच्या बाहेर लुडबुड करण्याची सवय नसून जे जिल्ह्याबाहेर फिरत होते ते काही 500 मताने आले तर काही 500 मतांनी पडले असा टोला सुजय विखे यांनी रोहित पवार यांना लगावला आहे... काही लोक रोज मीडियावर येऊन महाराष्ट्राचे प्रश्न मांडतात...तुमचं जिल्ह्यात आणि तालुक्यात काही राहिलं नाही तिथून सुरुवात करा असा सल्ला रोहित पवार यांना सुजय विखे यांनी दिला आहे...तर पुढच्या निवडणुकीत संपूर्ण विश्लेषण मतातून बाहेर पडेल असा इशारा देखील सुजय विखे यांनी दिला आहे.
बाईट:- सुजय विखे, माजी खासदार भाजप
सुजय विखे ऑन रोहित पवार व्हिडिओ
Anc:- राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी गेल्या काही दिवसापासून मंत्र्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारला घेरलं आहे... यावर माजी खासदार सुजय विखे यांनी देखील जोरदार निशाणा साधला आहे... व्हिडिओ सगळ्यांकडेच असतात ते योग्य वेळी बाहेर येतात, तर आपण असा पिक्चर रिलीज करणार की तो सुपरहिट होणार असा विश्वास सुजय विखेंनी व्यक्त केला आहे... लवंगी फटाकडा आपण फोडत नाही तर अनुभव टाकतो असा इशारा सुजय विखे यांनी रोहित पवार यांना दिला आहे.
बाईट:- सुजय विखे, माजी खासदार भाजप
9
Report
SKSudarshan Khillare
FollowAug 08, 2025 13:31:16Chandwad, Maharashtra:
छोटाहत्ती वाहनाची शाळकरी विद्यार्थ्यांना धडक...
चार विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर....
जखमी विद्यार्थ्यांची शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी घेतली भेट....
अँकर :-नाशिकच्या चांदवड तालुक्यातील सोग्रस फाटा येथे मुंबई आग्रा महामार्गावर पिंपळगाव बसवंत होऊन चांदवडच्या दिशेने येत असलेल्या भरधाव वेगातील छोटाहत्ती या मालवाहू वाहनाने रस्ता ओलांडत असलेल्या 12 शाळकरी विद्यार्थ्यांना जोरदार धडक दिली आहे या धडकेत चार शाळकरी मुले चिरडली असून इतर विद्यार्थी गंभीर जखमी आहेत
अति गंभीर जखमी विद्यार्थी नाशिकच्या रुग्णालयात हलवले असून काही विद्यार्थी चांदवड व पिंपळगाव बसवंत येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दरम्यान या अपघाताची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना कळताच त्यांनी तातडीने जखमी विद्यार्थ्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे
8
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 08, 2025 13:17:55Jalna, Maharashtra:
FEED NAME : 0808ZT_JALNA_BAVANKULE(3 FILES)
जालना : राज्यात कृत्रीम वाळू धोरण येणार, सर्व शासकीय बांधकामे कृत्रीम वाळूने होणार
जालन्यात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
टीव्हीमध्ये दिवसभर चेहरा चालला पाहिजे म्हणून प्रयत्न
रोहित पवारांवर बावनकुळे यांची टीका
आयकर विभागाच्या सर्वांना नोटीस येत असतात
सुधाकर चतुर्वेदीलाही बावनकुळे यांनी खडसावलं
उध्दव ठाकरे यांनी स्वतः त्यांचा सन्मान जपावा, ते रांगेत मागे बसल्याने मलाही वाईट वाटलं.
Anchor :राज्यात कृत्रीम वाळू धोरण येणार असून सर्व शासकीय बांधकामे आता कृत्रीम वाळूने होणार असल्याची महत्वाची घोषणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलीेये.जालन्यात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत महसूल सप्ताहाचा समारोप करण्यात आला.. यावेळी विविध योजनांआधारीत लाभार्थांचा सत्कार करण्यात आला.. दरम्यान यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.. नदीतून वाळुची चोरी थांबवण्यासाठी राज्यात आता कृत्रीम वाळू धोरण येणार असून एकट्या जालना जिल्ह्यात पन्नास क्रेशर मशीन देणार असल्याचं बावनकुळे यांनी म्हंटलंय.. त्याचबरोबर एकनाथ खडसे यांच्या कुटुंबातील एका सदस्याला आणि शिंदें यांच्या सर्व मंत्र्यांना ईडी आणि आयकर विभागाची नोटीस आल्याचं रोहित पवारांनी म्हंटलं होतं.. त्यावर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली असून टीव्हीवर दिवसभर चेहरा दिवसण्यासाठी हा प्रयत्न असल्याचा टोला बावनकुळे यांनी रोहित पवारांना लगावलाय... दरम्यान सनातन दहशत वादाच्या मुद्द्यावर पृथ्वीराज चव्हानांच्या कानशिलात लगावण्याची भाषा सुधाकर चतुर्वेदी यांनी केली होती.. यावरही बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत असं बोलणं योग्य नसून कोणीही कोणाच्या कानशिलात लगावण्याची भाषा करू नये असंही बावनकुळे यांनी खडसावलंय.उध्दव ठाकरे यांनी स्वतः त्यांचा सन्मान जपावा, ते रांगेत मागे बसल्याने मलाही वाईट वाटलं असा टोला बावनकुळे यांनी उध्दव ठाकरे यांना लगावलाय.
बाईट :चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री
14
Report
SKSACHIN KASABE
FollowAug 08, 2025 13:17:33Pandharpur, Maharashtra:
08082025
slug - PPR_RAILWAY_PASS
file 01
----
Anchor - पंढरपूर शहरातील व्हीआयपी रस्त्यावरील रेल्वे अंडरपासचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना आमदार समाधान आवताडे यांनी रेल्वे प्रशासनाला दिल्या आहेत .या रेल्वे अंडरपासच्या कामामुळे शासकीय कार्यालय ,शाळा ,महाविद्यालयामध्ये जाणाऱ्या नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच इतर दोन ठिकाणच्या पर्यायी रेल्वे अंडरपासच्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे आज आमदार समाधान आवताडे यांनी रेल्वे नगरपालिका महसूलच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी करून किमान दुचाकीसाठी तरी हा रस्ता तातडीने खुला करण्याच्या सूचना दिल्या आहेत
12
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowAug 08, 2025 13:03:45Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते शरणू हांडेला अपहरण प्रकरणातील चारही आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी
*- शरणू हांडे अपहरण प्रकरणातील आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी*
- आरोपी अमित सुरवसे याच्यासह 4 जणांना सुनावली पोलीस कोठडी
- आरोपीकडून कोयता, हॉकी स्टिक, साडी, ब्लेड पान आदी एकूण 25 शास्त्रास्त्र आणि वस्तू पोलिसांनी हस्तगत केले
- प्रकरणाचा अधिकचा तपास करण्यासाठी पोलिसांनी आरोपीच्या 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची केली मागणी
- पोलीस कोठडीच्या मागणीला आरोपीचे वकील ऍड. शरद पाटील यांनी युक्तिवाद करत विरोध केला
- आरोपीकडून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने पोलिस कोठडी ऐवजी न्यायालयीन कोठडी द्यायची विनंती केली
- दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर न्यायमूर्ती वी. ए. कुलकर्णी यांनी पोलीस कोठडी सुनावली
बाईट -
ऍंड. शरद पाटील (आरोपीचे वकील )
12
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 08, 2025 12:46:17Jalna, Maharashtra:
FEED NAME : 0808ZT_JALNA_SOLDIER_DTH(4 FILES)
जालना : सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू,शासकीय ईतमामात अंत्यसंस्कार
अँकर : सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू झालाय.अमोल दळवी असं मृत्युमुखी पडलेल्या जवानाचं नाव आहे.ते जालन्यातील बोरगाव जहागिर गावचे रहिवासी होते.आज बोरगाव जहागिर येथे दळवी यांच्या पार्थिवावर शासकीय ईतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.या घटनेमुळे परीसरातील गावांवर शोककळा पसरली आहे.यावेळी शासकिय अधिकारी,कर्मचारी देखील उपस्थित होते.
13
Report
GMGANESH MOHALE
FollowAug 08, 2025 12:32:32Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0808ZT_WSM_CONFISCATION_MARIJUANA
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर: वाशिमच्या मालेगाव पोलिसांनी अकोला–वाशिम रोड कोलदरा फाट्यावर कारवाई करून 1लाख 40हजार किमतीचा 11.7 किलो गांजा जप्त केला. मुक्ताबाई अशोक जाधव,सुशीला भानुदास जाधव आणि सरस्वती गोपीचंद चव्हाण या तिघी आरोपी महिलांना अटक करण्यात आली.पोलिसांनी गुप्त माहितीवरून सापळा रचून ही कारवाई केली. यांनी हा गांजा कुठून आणला याबाबतचा अधिक तपास मालेगाव पोलीस करीत आहेत.
13
Report
SRSHRIKANT RAUT
FollowAug 08, 2025 12:17:16Yavatmal, Maharashtra:
Anchor : यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकावरील हुमणी अळीच्या प्रादुर्भावाने झालेल्या नुकसानीची तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केली. मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची लागवड केलेली आहे, सद्यस्थितीमध्ये सोयाबीन पिकावर हुमणी अळीचे आक्रमण झाल्यामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीनचे पीक उध्वस्त झालेले आहे, उपाययोजना करण्यापूर्वीच या किडीने संपूर्ण सोयाबीनचे पीक फस्त केल्याचे आढळून आलेले आहे, यामुळे जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शिवसेना उबाठाणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली.
14
Report
SRSHRIKANT RAUT
FollowAug 08, 2025 12:06:29Yavatmal, Maharashtra:
AVB
Anchor : यवतमाळ च्या जिल्हा रुग्णालयात पालकमंत्री संजय राठोड यांनी पाहणी दौरा केला असता तेथील दुरावस्था समोर आली, शंभर कोटी रुपये खर्चून हे रुग्णालय अत्याधुनिक शल्यगृह, रुग्ण वार्ड आदींनी सज्ज होत असले तरी केल्या जात असलेल्या कामाची गुणवत्ता ठीक नाहीं, एमआरआय चे काम रखडले आहे, नव्यानेच लावलेल्या टाईल्स उखडल्या असून, ईमारत ठीकठिकाणी गळत असल्याचे दिसून आल्याने पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. कामाचा दर्जा सुधारा असे निर्देश त्यांनी दिले. आपली राजकीय कारकीर्द रुग्णसेवेपासून सुरु झाल्याने हे रुग्णालय सर्वसामान्यांसाठी सर्वसुविधायुक्त असले पाहिजे, नियमित देखभाल दुरुस्ती झाली पाहिजे अशा सूचना त्यांनी केल्या.
बाईट : संजय राठोड : पालकमंत्री
14
Report
SMSarfaraj Musa
FollowAug 08, 2025 12:04:00Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - गुंडागर्दी,अपहरण,खून कसं करायचं याचं विश्वविद्यालय शरद पवारांचा नेतृत्वाखाली रोहित पवार चालवत आहेत - आमदार सदाभाऊ खोत.
अँकर - राज्यात गुंडागर्दी,अपहरण,खून कसं करायचं याचं विश्वविद्यालय शरद पवारांचा नेतृत्वाखाली रोहित पवार चालवत आहेत, अशी घणाघाती टीका आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे.तसेच राज्यात राष्ट्रवादी पुरस्कृत आणि रोहित पवार समर्थन सुरू असलेली गुंडागर्दी मुख्यमंत्र्यांनी ठेचून काढावी,अशी मागणीही आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे,आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थक मारहाण प्रकरणावरून सर्व खोत यांनी रोहित पवारांवर ही टीका केली आहे.
बाईट - सदाभाऊ खोत - आमदार .
14
Report