Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Bhandara441904

मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांवर कृषी विभागाची धडक कारवाई!

PTPRAVIN TANDEKAR
Jul 14, 2025 06:07:33
Bhandara, Maharashtra
Pravin Tandekar Gondia Slug - 1407_GON_KHAT FILE - 7 VIDEO महाराष्ट्रातील खतावर मध्यप्रदेश राज्यातील शेतकऱ्यांचा डल्ला... विना परवाना रासायनिक खतं घेऊन जाणाऱ्या परप्रांतीय शेतकऱ्यांवर कृषी विभागाची कारवाई...... महाराष्ट्र मधील खत मध्यप्रदेश राज्यात नेणारी तीन मालवाहक जप्त..... Anchor :- गोंदिया जिल्ह्यातील आमगाव शहराच्या लगतच मध्यप्रदेश राज्याची सीमा आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मध्यप्रदेश मधील शेतकरी विना परवाना रासायनिक खते घेऊन जातानी कृषी विभागाच्या भरारी पथकाने कारवाई केली. या कारवाईत तीन मालवाहक जप्त करण्यात आले असून गाडी चालकांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शेतकरी कृषी केंद्रात रासायनिक खते खरेदीसाठी गर्दी करून आहेत परंतु काही कृषी केंद्र लालसेपोटी परप्रांतीय शेतकऱ्यांना विनापरवाना खत विक्री करीत असल्याचे शहरात आढळून आले आहेत. VO:- परप्रांतीय शेतकरी रासायनिक खते पर राज्यात घेऊन जात असताना कृषी विभागाला माहिती मिळताच कृषी विभागाच्या भरारी पथकाने कारवाई करून तीन वाहन जप्ती केले आहेत. ४५ बोरी रासायनिक खत एकूण किंमत ४५ हजार रुपये किमतीची रासायनिक खते जप्त करण्यात आली आहेत. या गाडी चालकांवर रासायनिक खत नियंत्रण आदेश १९८५ (४) (ब ) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. परप्रांतीय शेतकरी आमगाव तालुका जवळ असल्यामुळे आमगाव शहरातील रासायनिक खते विक्री करणाऱ्या दुकानदाराकडून विनापरवाना खत खरेदी करून नेत असल्याची चर्चा नेहमीच ऐकायला मिळत असे परंतु कृषी विभागाची कारवाई मात्र शून्य असायची. विनापरवाना खत घेऊन जातानीमागील काही वर्षात पहिल्यांदाच कृषी विभागांनी केलेली कारवाई असून खत विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करणार काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तालुक्यातील काही दुकानदार विनापरवाना परप्रांतीय शेतकऱ्यांना खते विकतात आज केलेल्या कारवाईत खरेदी केलेल्या दुकानदारांवर सध्या कृषी विभागाने कोणती कारवाई केली नाही. रासायनिक खत विक्री केल्याची कच्ची पावती शेतकऱ्यांकडे दिसून आली आहे. आमगाव शहराच्या टोकावर व अगदी सीमेवर काही रासायनिक खतांची दुकान असून काही दुकानदार परप्रांतीयांना रासायनिक खते विक्री करतात परंतु पुराव्या अभावी त्यांच्यावर कुठलीच कारवाई झालेली दिसत नाही. काही रासायनिक खत विक्री करणाऱ्या दुकानदारांची नावे समोर आली असून तपास सुरू आहे तपासानंतर पुरावा आढळल्यास त्या दुकानदारावर कारवाई करण्यात येईल असे अधिकारी सांगतात आता या दुकानदारावर कोणते कारवाई होते हे पहा न महत्वाचे ठरणार आहे. BYTE :- संतोष सातदिवे (जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी कृषी विभाग गोंदिया)
4
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top