icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
401208
PTPRATHAMESH TAWADE13 Aug 2025, 06:21 am

वसईत तरुणीने बहिणीच्या घरी दरोडा टाकला, दीड कोटींचे दागिने चोरले!

Vasai-Virar, Maharashtra: Date-13aug2025 Rep-prathamesh tawade Loc-vasai Slug-VASAI CRIME Feed send by 2c Type-avb Slug- वसईत तरुणीने बहिणीच्याच घरी टाकला दरोडा वेश बदलून घेतला होता घरात प्रवेश दीड कोटी दागिन्यांची केली चोरी इंस्टाग्रामवरून मिळवला पुरुषाचा वेश पोलिसांनी १२ तासात नवसारी येथे आरोपी महिलेस अटक शेअर बाजारात हरल्यामुळे घरातील गहाण ठेवलेले दागिने सोडवण्यासाठी एका तरुणीने तिच्याच सख्ख्या बहिणीच्या सासरी चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत पोलिसांनी दीड कोटींचे दागिने अवघ्या बारा तासांत जप्त करून आरोपीला अटक केली आहे. ओधवजी खिमजी भानुशाली, वय ६६ वर्षे, हे घरात एकटेच असताना, एक दाढीवाला पुरुष कच्छी भाषेत बोलत "मला रूम हवी आहे, मला मदत करा" असे सांगून घरात शिरला. त्यांनी आपल्या गावाकडचा असल्यामुळे त्याला घरात घेतले आणि गजरा समाजाविषयी बोलल्यामुळे आपुलकी वाढली. त्या चोरट्याने वॉशरूममध्ये जायचे आहे असे सांगितले आणि वॉशरूममध्ये जाऊन "तुमचे बाथरूम लिकेज झाले आहे" असे सांगून ते दाखवण्याच्या बहाण्याने ओधवजी यांना त्या बाथरूममध्ये ढकलून आतून कोंडले आणि घरातील मौल्यवान दागिने घेऊन पसार झाला.प्रकरण गंभीर असल्यामुळे वरिष्ठ पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे शाखेचे एक विशेष पथक तयार करण्यात आले. मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एका कॅप घातलेल्या पुरुषाच्या वेशातील इसमाला बॅग घेऊन जाताना दिसले. पुढे तपास करताना, त्या परिसरातील झुडपात बॅग लपवलेली आढळून आली. काही वेळाने एका महिलेने येऊन ती बॅग उचलून घेतली असल्याचेही सीसीटीव्हीमध्ये दिसले. तपासाचा माग काढत पोलीस गुजरातमधील नवसारी येथे पोहोचले आणि ज्योती मोहन भानुशाली, वय २७ हिला ताब्यात घेतले. तिच्याकडून दीड कोटींचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. पुरुषाचा वेश धारण करण्यासाठी तिने इन्स्टाग्रामवरील रिल पाहून प्रमृत्यक्षात केली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.. बाईट- मदन बल्लाळ, पोलिस उपायुक्त.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

यवतमाळ में बायो-बीज के फर्जीपन पर छह मुकदमे, कंपनियों के खिलाफ कार्रवाई

Yavatmal, Maharashtra:यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीनचे बियाणे उगवण न झाल्याप्रकरणी सहा गुन्हे पोलिसांनी दाखल केले आहे. बूस्टर, पार्श्व जेनेटिक्स आणि विगर कंपनी विरोधात हे गुन्हे दाखल झाले आहेत. दारव्हा, बाभूळगाव, दिग्रस, आर्णी आणि यवतमाळ मध्ये हे गुन्हे दाखल झाले आहेत. कृषी विभागाच्या गुणनियंत्रक विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे बोगस बियाण्यांचा शिरकाव झाला, ते बियाणे शेतकऱ्यांना विक्री केल्या गेले. ज्यात त्यांची फसगत झाली. जिल्ह्यात लाखो हेक्टर वरील सोयाबीन बियाण्यांची उगवण झाली नसल्याने या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलं.
0
0
Report
Advertisement

देहू संस्थान ने पंजीकृत वारकऱ्यों के दुखद निधन पर एक लाख मदद की घोषणा

Varsoli, Maharashtra:Headline: वारकऱ्यांसाठी देहू संस्थानचा मोठा निर्णय आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी श्री संत तुकाराम महाराज संस्थान, देहू यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पालखी सोहळ्यात दिंडीत चालणाऱ्या नोंदणीकृत वारकऱ्याचा अपघाती मृत्यू किंवा हृदयविकाराच्या झटक्यामुळे दुर्दैवी निधन झाल्यास, संबंधित वारकऱ्याच्या कुटुंबाला संस्थानच्या वतीने एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. देहू संस्थानने स्पष्ट केले आहे की, ही मदत दुःखाची भरपाई नसून संत तुकाराम महाराजांच्या सेवाभावातून वारकरी कुटुंबाला दिलासा देण्याचा एक प्रयत्न आहे. दरम्यान, या आर्थिक मदतीसाठी काही नियम व अटी लागू असणार आहेत. संबंधित वारकरी हा श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात नोंदणीकृत दिंडीत सहभागी असणे आवश्यक असल्याचे संस्थानने स्पष्ट केले आहे.
0
0
Report

मालाड कुरार पुलिस ने तलवारधारी युवक को रंगेहात पकड़ा, बड़ा हादसा टला

Mumbai, Maharashtra:मालाडमध्ये कुरार पोलिसांची मोठी कारवाई; तलवारधारी तरुणाला अटक करून मोठी दुर्घटना टळली मालाड पूर्व येथील कुरार पोलिसांनी धाडसी कारवाई करत एका तलवारधारी तरुणाला रंगेहात अटक केली आहे. राधेय राजेंद्र राणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या कारवाईमुळे परिसरात होणारी एक मोठी दुर्घटना टळल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कुरार येथील नुतन स्कूलजवळ दोन गटांत जोरदार हाणामारी सुरू होती. याच दरम्यान आरोपी राधेय राणे हातात उघडी तलवार घेऊन विरोधी गटावर जीवघेणा हल्ला करण्याच्या उद्देशाने पुढे धावला. घटनास्थळी उपस्थित असलेले पोलीस उपनिरीक्षक (PSI) सचिन पांचाल यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, अत्यंत हुशारीने आणि जीवाची पर्वा न करता आरोपीला झडप घालून पकडले. त्याच्याकडची तलवारही जप्त करण्यात आली.
0
0
Report
Advertisement

नाशिक में Ring Road के विरोध में किसान आमरण उपोषण पांचवें दिन

Nashik, Maharashtra:कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या रिंग रोड बाधित शेतकऱ्यांचे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आमरण उपोषण सुरू आहे. आज या उपोषणाचा पाचवा दिवस असून गेल्या पाच दिवसांपासून या ठिकाणी हे शेतकरी उपोषण करत आहेत. रिंग रोडची अलाइनमेंट नवीन मार्गाने न घेता जुन्या मार्गाने घ्यावी या प्रमुख मागणी सह शेतकऱ्यांवर लाठी चार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांची निलंबन करण्यात यावे. या सह विविध मागण्यासाठी आंदोलन केले जात असून मुख्यमंत्र्यांची भेट न झाल्यास तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा देखील या आंदोलकांकडून देण्यात आलाय. आढावा घेतला घेत उपोषणकर्ताांशी बातचीत के लिए आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी...
0
0
Report

अभिजित बिचुकले बोले: आषाढ़ी वारी का खर्च सरकार उठाएगी, एकता दिखे वारकरी

Satara, Maharashtra:सातारा - आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अभिजित बिचुकले यांनी वारकरी संप्रदायाच्या एकतेचे कौतुक करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून सुरू असलेल्या वारीच्या परंपरेत सर्व जाती-धर्मांचे वारकरी कोणताही भेदभाव न ठेवता एकत्र पंढरपूरकडे मार्गक्रमण करतात. त्यामुळे समाजात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या राजकारण्यांनी वारकऱ्यांकडून एकतेचा आदर्श घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. माऊलीच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी अभिनेते अभिजित बिचुकले आले होते.वारीसाठी उभारण्यात येणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या स्वागत कमानींवर टीका करत, हा निधी वारकऱ्यांच्या अन्न, पाणी आणि मूलभूत सुविधांवर खर्च केला असता त्याचा अधिक फायदा झाला असता, असेही त्यांनी म्हटले. शासन वारकऱ्यांच्या सेवेत कमी पडत असल्याचा आरोप करत, मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो तर आषाढी वारीचा संपूर्ण खर्च शासनामार्फत उचलणार आणि वारकऱ्यांच्या सेवेत कोणतीही कमतरता राहू देणार नाही,अशी घोषणा अभिजित बिचुकले यांनी केली.
0
0
Report
Advertisement

लोडशेडिंग के विरोध में किसानों का आक्रोश, खामखेडा में बिजली उपकेंद्र के पास प्रदर्शन

Nashik, Maharashtra:- लोडशेडिंग विरोधात शेतकऱ्यांचा हुंकार... - नाशिकच्या देवळा तालुक्यातील खामखेडा वीज उपकेंद्रावर शेतकऱ्यांचा अंधार जनआक्रोश मोर्चा गेल्या पाच-सहा दिवसांपासून शेतशिवारातील वारंवार होत असलेल्या लोडशेडिंगमुळे संतप्त झालेल्या खामखेडा व परिसरातील शेतकरी, नागरिक आणि विद्यार्थ्यांनी देवळा तालुक्यातील खामखेडा येथील ३३/११ केव्ही महावितरण वीज उपकेंद्रावर "अंधार जनआक्रोश मोर्चा" काढत महावितरणच्या कारभाराचा तीव्र निषेध केला. हातात मेणबत्त्या आणि टेंभे घेऊन काढण्यात आलेल्या या आंदोलनात शेकडोच्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांनी लोडशेडिंगच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत “अंधार नको, वीज हवी!”, “लोडशेडिंग बंद करा, शेतकऱ्यांना न्याय द्या!” अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
0
0
Report

दापोली के सुतारवाडी में दराड-खतरे से लोग सुरक्षित स्थानों पर रवाना

Ratnagiri, Maharashtra:दापोली/ रत्नागिरी दापोलीत सुतारवाडीवर दरड कोसळण्याचे संकट दोन किलोमीटरपर्यंत भेगा; डोंगर कोसळण्याच्या भीतीने सुतारवाडीतील नागरिकांचे स्थलांतर सुरू अँकर : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील मळे-सुतारवाडी येथे मुसळधार पावसामुळे डोंगराला तब्बल दोन किलोमीटरपर्यंत भेगा पडल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी या भेगांची खोली दोन ते चार फूट असल्याचे प्राथमिक पाहणीत समोर आले आहे. संभाव्य दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन महसूल प्रशासनाने घटनास्थळी पाहणी करत नागरिकांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या आहेत. या घटनेची गंभीर दखल घेत भूवैज्ञानिक तज्ज्ञांच्या पथकाला पाचारण करण्यात आले असून त्यांच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, डोंगर कोसळण्याच्या भीतीने सुतारवाडीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
0
0
Report
Advertisement

चंद्रपूर में फिर टस्कर हत्ती: किसान दहशत में, प्रशासन सतर्क

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील उमरी तलाव परिसरात पुन्हा एक टस्कर हत्ती दाखल झाला आहे. हा हत्ती सामदा-सोनापूर नदीमार्गे गडचिरोली जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यात आला. सध्या या हत्तीने सावली तालुक्यातील उमरी तलाव परिसरातील जंगलात ठिय्या मांडला आहे. या हत्ती पाठोपाठ कळपातील इतर हत्ती सुध्दा परत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिसरात हत्ती दाखल होताच परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 2 महिन्यांपूर्वी 30 रानटी हत्तींच्या कळपाने उमरी तलाव क्षेत्रातील जंगलात ठिय्या मांडला होता. 1 जुलैला इतर हत्ती वैनगंगा नदीला पार करून गडचिरोली जिल्ह्यात परत गेले. त्यातील टस्कर हत्ती सुद्धा परतीच्या मार्गावर असतांना त्याने केलेल्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. उमरी जंगल परिसरात 3 मोठे तलाव आणि घनदाट जंगल असल्यामुळे हत्तीसाठी पोषक वातावरण आहे. कदाचित त्याच कारणामुळे हत्ती पुन्हा याच परिसरात परत आले असावे असा अंदाज वन विभागाद्वारे वर्तविला जात आहे. खरीप हंगाम सुरू असतानाच हत्तींच्या आगमनामुळे पिकांवर मोठे संकट ओढवण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.हत्तींच्या आगमनामुळे शेतजाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या जंगल परिसरात पाथरी , आसोला- चक, उसरपार- चक, उसरपार/ तुकूम, मंगरमेंढा, पालेबारसा, सायखेडा ही गावे आहेत. हत्तीच्या आगमनाने गावांतील सामान्य नागरिकांचेही दैनंदिन जीवन प्रभावित झाले आहे.
0
0
Report

आषाढ़ी एकादशी के लिए 225 विशेष बसें, पंढरपूर यात्रा सुरक्षित

Akola, Maharashtra:आषाढी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अकोला विभागाने विशेष नियोजन केले आहे. भाविकांच्या सोयीसाठी अकोला विभागातून ७ विशेष एसटी बस पंढरपूरकडे रवाना करण्यात आल्या आहेत. तर संपूर्ण अकोला विभागासाठी एकूण २२५ विशेष बस चालविण्याचे नियोजन करण्यात आले असून, यात्रेच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने या बस सेवा उपलब्ध राहणार आहेत. अकोला, अकोट, मूर्तिजापूर, कारंजा, मंगरुळपीर, वाशिम, रिसोड, व तेल्हारा आगारांमधून या बस चालविण्यात येणार आहेत. तसेच ४५ किंवा त्यापेक्षा अधिक प्रवासी असल्यास आगाऊ आरक्षणासह गावातून थेट पंढरपूरसाठी विशेष बसची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात्रेकरूंनी वेळेत आरक्षण करून सुरक्षित आणि सुखकर प्रवासाचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top