Back
आ. रोहित पवार यांचा भाषण: भाजप विरोधात एकत्र येण्याची गरज!
VKVISHAL KAROLE
Aug 07, 2025 10:01:02
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजीनगर..
*राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात आ.रोहित पवार यांच्या भाषण पॉइंटर*
- आपण सर्व पक्षासोबत राहिला त्याबद्दल आभार मानतो...
- ही भूमी पवित्र भूमी आहे. या भूमीने अन्यायाविरोधात लढा काढलेला आहे.
- लोकसभेच्या काळात वातावरण जबरदस्त होत.त्यावेळी पवार साहेबांनी निर्णय घेतला होता. मात्र मित्रपक्षाने इच्छा व्यक्त केली होती. आणि संविधान टिकविण्यासाठी एखाद सीट कमी मिळालं तरी. चालले अशी भूमिका घेतली होती. ताकत असताना काही मतदारसंघात मित्रपक्षाला पुढे करून माघार घेतला होता. ते भाजप संपविण्यासाठी.
- या देशात भाजप विरोधात सर्वात जास्त खासदार आले असतील तर या भूमीत झाले आहे.
- लोकसभेत अहंकाराचा घडा फुटला मात्र त्या नंतर आपण हवेत गेलो.. आणि सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा वापर केला, गुंडांची मदत घेतली,
- लाडकी बहीण, आनंदाचाशिधा , सरकारचा पैसा विविध योजनेत वापरला...
- लाडक्या बहिणीनं तेंव्हा वाटलं पैश्यात वाढ होईल...
- नोकरी नसल्याने लाडक्या बहिणीनं आज दीड हजार रुपये मोठे वाटत आहे. त्या नादात कुठेतरी गल्लत झाली...
- निवडणुकीच्या दोन चार दिवस सत्ताधारी कडून पैसे वाटप केला गेला, त्यामुळे आपला पराभव झाला..
- काही पुरावे असे आहेत की, Evm मध्ये काहीतरी घोटाळा आहे असे आहेत. हा मुद्दा राहुल गांधी उचलत आहे....
- येणाऱ्या निवडणुकीत evm मशीनवर देखील लक्ष ठेवायचे आहे. त्याकडे येत्या काळात लक्ष देऊ.
- विधानसभेत निवडणूक झाल्यावर आमदार निवडणून आल्यावर कुठे जल्लोष दिसला नाही. जाणवला नाही. लोक आश्चर्यचकित झाले होते की, हा सरकार आला कसा.. आता आपल्याला सर्वांना मिळून लढावं लागेल...
- *शरद पवार यांनी आता अनेक निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे.*
- काही ठिकाणी आपले उमेदवार चुकले असे अनेकाना वाटत आहे. जे झाले ते झाले. आता पुढे जायचे आहे.
- येत्या निवडणुकीत निवडून येईल किंवा नाही, पण जे प्रामाणिक कार्यकर्ते असतील त्यांना उमेदवारी द्यावीच लागेल....
- जर कुणाचा घर जात असेल तर त्यांना मोबदला मिळावा लागेल..
- *काही महिला पदाधिकारी म्हणाल्या की आम्हाला या शहरात फिरायला सेफ वाटत नाही.. हा फक्त शहराचा नाही तर राज्याचा विषय आहे...* पॉक्सो ची प्रकरणे वाढत जात आहे...
- *मुख्यमंत्री हे त्यांचे मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्यांना चून चून के मारण्यामधे आणि त्यांची जिरविण्यामध्ये व्यस्त आहे.*
- एका मंत्र्याकडे कोट्यवधी रुपयाचा व्हिडिओ समोर आला, पुढे काय झालं.त्र्यंबकेश्वर मध्ये जमीन घेतली आहे. ती विकली जात असल्याचे आम्हाला कळले आहे.
- एकीकडे मिडिया मध्ये सांगता खात्याला पैसे नाही आणि दुसरीकडे हॉटेल खरेदी करायला निघाले....
- सरनाईक यांनी रॅपिडो बुक केली, जेव्हा चालक आला तेव्हा त्यांनी मंत्र्यांना ओळखले नाही.काल दहीहंडी स्पर्धेला रॅपिड स्पॉन्सर केला.. मंदावली झाली असा आमचा आरोप आहे. हे नेते पदाचा वापर करीत आहेत...
- तत्कालीन कृषीमंत्री यांना त्यांच्या खात्यात काय चाललं हे माहिती नाही मात्र रम्मी साठी बँक खाते लिंक करावे लागतात म्हणे. ते कसे माहिती.
- 6 तासात भुमरे यांचं लायसन्स झाले. त्यांची 16 दुकान आहे. त्यांचे ड्रायव्हर जगातील सर्वात श्रीमंत ड्रायव्हर आहे. आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही बघतोय तुम्ही कधी ती तुमच्या नावावर कधी करतात.
- हे हिंदू बाबत बोलतात मात्र आम्ही हिंदू संस्कृती जपणारे. माणुसकी जपण्याची शिकवण हिंदू संस्कृतीने दिली आहे.
- कोल्हापूरमध्ये अन्याय विरोधात सर्व धर्मीय लोक एकत्र आले आणि त्यांचा विजय झाला...
- आत्महत्या करणाऱ्या 10 मधून 7 हिंदू आहे..
- बलात्कार होत आहेत त्यातही अनेक महिला हिंदू आहे....
- तुम्ही म्हणतात हिंदू खत्रे मे है, हिंदू - मुस्लिम करतात, मराठा - ओबीसी करतात.... मुंडे यांनी प्रकरण समोर आल्यावर मुख्यमंत्री फोन करतात, मुंडे हिंदू नव्हते का?
- जर सर्व सामन्याचे मुद्दे घेऊन गेल्यावर कुठलाही पोलिस अधिकारी मोठ्या आवाजात बोलत असेल तर त्याला आवाज खाली कर म्हणायचा आहे. इथे आवाज फक्त मराठी माणसाचा आवाज चालेल.
- फडणवीसांना दिल्लीचे वेध लागले आहे..
- दिल्लीला आणि शेतात का जात आहे. कारण त्यांना खूप टेन्शन आहे..
- कदाचित असा निर्णय होऊ शकते की, धनुष्यबाण उद्धव ठाकरे यांना आणि घड्याळ आपल्याला मिळू शकते...
- भाजपला फक्त 12 आमदार कमी आहे. जालना किंवा अनेक ठिकाणी भाजप प्रयत्न करीत आहे...
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRANAV POLEKAR
FollowAug 07, 2025 15:31:36Ratnagiri, Maharashtra:
ब्रेकिंगमुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करण्यासाठी आलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा धावता दौरा.....
मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करण्यासाठी आलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा धावता दौरा.....
मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम येथील घाटाची पाहणी न करताच मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दौरा आटपला.
परशुराम घाटातील वारंवार घडणाऱ्या दुरावस्थेकडे मंत्र्यांची पाठ.
रायगड नंतर रत्नागिरी मधील महामार्गाची पाहणी करताना मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी टाकला टॉप गिअर.
मंत्र्यांच्या धावत्या दौऱ्यामुळे महामार्गाच्या पाहणी दौऱ्यावर प्रश्नचिन्ह.
0
Report
AAASHISH AMBADE
FollowAug 07, 2025 14:32:31Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0708ZT_CHP_RAKHI
( file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील 365 दिवस चालणाऱ्या पालडोह जि. प. शाळेतील विद्यार्थिनी बांधणार राष्ट्रपती मुर्मू यांना राखी, दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात पार पडणार रक्षाबंधन सोहळा
अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम तालुका जिवती च्या पालडोह या गावात जिल्हा परिषदेची 365 दिवस चालणारी शाळा आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी 9 ऑगस्टचे रक्षाबंधन खास ठरणार आहे. दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात रक्षाबंधन सोहळा साजरा होणार आहे. त्याकरिता ३६५ दिवस चालणाऱ्या शाळेतील दिव्यंका बाजगीर, पूजा सोनवळे, पायल चव्हाण, माधुरी रूंजे, प्रतिक्षा आईतवाड या पाच मुली व शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र परतेकी असे एकूण सहाजण रवाना झाले आहेत. महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर व पुणे या फक्त दोन जिल्ह्यांना हा मान मिळाला आहे. पालडोह येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र परतेकी हे सन २०१२ पासून ३६५ दिवस शाळा चालविण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम सातत्याने करीत आहेत. या रक्षाबंधन सोहळ्याकरिता देशातील एकूण १९ राज्यातील ३१ शाळांची निवड करण्यात आली आहे. सुमारे ५०० ते ६०० विद्यार्थी आपल्या पारंपरिक पोशाखात उपस्थित राहून हा रक्षाबंधन सोहळा साजरा करणार आहेत. यानिमित्त देशाच्या राष्ट्रपतींशी पालडोह मधील एक छोट्या गावातील मुले संवाद साधतील. हा जिवती सारख्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
बाईट १) पूजा सोनवळे, सहभागी विद्यार्थिनी
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
12
Report
SKSACHIN KASABE
FollowAug 07, 2025 13:48:48Pandharpur, Maharashtra:
07082025
slug - PPR_JANSHAKTI
file03
----
Anchor - सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील महिंद्रा कोटक बँकेच्या कर्मचाऱ्यांची आडमुठी भूमिका सेविंग खात्यातील साडेतीन लाख हवे असतील तर 25 हजारांची इन्शुरन्स पॉलिसी काढा
माढा तालुक्यातील उपळवटे येथील शेतकरी समाधान देवडकर यांनी त्यांच्या सेविंग खात्यामध्ये साडेतीन लाख रुपये ठेवले होते.दोन महिन्यांपासून सदर शेतकरी हे पैसे बँकेच्या कर्मचाऱ्यांना मागत आहे. मात्र या कर्मचाऱ्यांनी 25 हजाराची इन्शुरन्स पॉलिसी केली तरच पैसे मिळतील अशी भूमिका घेतली आहे.
त्यामुळे आज चार वाजल्यापासून जनशक्ती शेतकरी संघटनेचे नेते अतुल खूपसे आणि कार्यकर्त्यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना आतून कोंडून घेतल आहे. जोपर्यंत देवडकर यांचे सर्व पैसे त्यांच्या दुसऱ्या खात्यावर वर्ग केले जात नाहीत. तोपर्यंत आतून कोंडून घेतलेलं कुलूप काढले जाणार नाही अशी भूमिका घेतली आहे.
14
Report
JMJAVED MULANI
FollowAug 07, 2025 13:48:05Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 0708ZT_DAUNDPOLICE
FILE5
दोघांचा महिलेवर जबरदस्तीने अत्याचार,दौंड पोलिसात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
Anchor_दौंड तालुक्यातील माळेवाडी लिंगाळी येथे एका महिलेवर
दोघांनी जबरदस्तीने अत्याचार केलाय. तर अन्य तीन व्यक्तींनी या गुन्ह्यात आरोपींना मदत केल्याची तक्रार दौंड पोलिसात दाखल करण्यात आलीय.पीडितेच्या तक्रारीवरून या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात पाच व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
राजु काळे,संदीप राजु काळे,सुरज भावड्या पवार,निलेश जितेंद्र चव्हाण आणि जितेंद्र चव्हाण अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. ५ ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास दौंड तालुक्यातील माळेवाडी लिंगाळी येथे ही घटना घडल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.
14
Report
AAASHISH AMBADE
FollowAug 07, 2025 13:47:59Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0708ZT_CHP_BHUSE_MEETING
( single file sent on 2C)
टायटल:-- शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी चंद्रपुरात घेतली शिक्षण गुणवत्ता आढावा बैठक, आगामी काळातील शैक्षणिक उपक्रमांची घेतली माहिती
अँकर:-- शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी चंद्रपुरात शिक्षण गुणवत्ता आढावा बैठक घेतली. त्यांनी बैठकीत आगामी काळातील शैक्षणिक उपक्रमांची माहिती घेतली. बैठकीत अनेक चांगल्या मुद्यांचे सादरीकरण झाले. आयडॉल शिक्षकांच्या उपक्रमांचा इतरांनीही आदर्श घ्यावा. त्यांनी केलेले काम केवळ त्यांच्या शाळेपुरतेच मर्यादित न राहता संपूर्ण केंद्रातील शाळांनी त्याचे अनुकरण करावे. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी ग्रामस्तरावरील शाळांना भेटी द्याव्यात. त्यामुळे स्थानिक स्तरावर छोट्या छोट्या अडीअडचणींची माहिती होते व हे प्रश्न सहजासहजी सुटण्यास मदत होते अशी भूमिका भुसे यांनी मांडली. शाळांच्या भौतिक सुविधा पुर्ततेला शासनाने प्राधान्य दिले आहे. यात शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छता, स्वच्छ शौचालय, इमारतींची देखभाल दुरुस्ती, ई- सुविधा, वाचनालय, क्रीडांगण, लॅब या बाबींचा समावेश आहे. शाळांना अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. स्थानिक स्तरावर सी.एस.आर फंड, खनिज विकास निधी व इतर स्त्रोतातूनही निधी उपलब्ध होऊ शकतो. विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी पालकांच्या उपस्थित करावी. प्रत्येक विद्यार्थ्याचे हेल्थ कार्ड तयार करण्यात येणार आहे. पूर्वीप्रमाणे पुन्हा एकदा इयत्ता 4 थी आणि 7 वी ची शिष्यवृत्ती परीक्षा सुरू करण्याचे नियोजन असल्याचे दादा भुसे म्हणाले.
15 ऑगस्ट रोजी देशभक्तीपर कवायत उपक्रम राज्यस्तरावर राबविण्यात येणार असल्याची।माहिती त्यांनी दिली.
बाईट १) दादा भुसे, शिक्षण मंत्री
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
14
Report
JMJAVED MULANI
FollowAug 07, 2025 13:33:59Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 0708ZT_DAUNDMEETING
BYTE 1
यवत पोलीस ठाण्यात पार पडली ग्रामस्थांची बैठक..... यवतमध्ये सामाजिक सलोखा राखण्याच पोलिसांच आवाहन
Anchor_दौंड तालुक्यातील यवत गावामध्ये एक ऑगस्ट पासून लावलेली जमावबंदी पुणे जिल्हाधिकारी यांनी आज पासून पूर्णपणे उठवली आहे. यानंतर यवत पोलीस ठाण्यात सर्व समाज बांधव यांची पोलिसांसोबत एक बैठक पार पडली आहे. सामाजिक सलोखा राखण्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
यवत घटनेची सीसीटीव्ही च्या आधारे पोलीस चौकशी करत असून यवतमधील स्थिती पूर्वीप्रमाणे नियंत्रणात राहण्यासाठी पोलीस विभागाची यवत मध्ये पुढील काही दिवस नजर असेल अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी बाबुराव दडस यांनी दिली आहे.
बाईट _बापूराव दडस उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड
14
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowAug 07, 2025 13:33:51Raigad, Maharashtra:
स्लग - मुंबई गोवा महामार्ग पूर्ततेसाठी नवीन डेडलाईन ...... डिसेंबर अखेर महामार्गाचे काम पूर्ण होणार ........ बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा दावा ..... मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची केली पाहणी ......
अँकर - गेली 14 वर्षे रखडलेला मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होण्यासाठी आता नवीन डेडलाईन देण्यात आली आहे. या महामार्गाचे काम येत्या डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल असा दावा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केलाय. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवेंद्रराजे यांनी आज मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी करून सद्यस्थितीचा आढावा घेतला. रखडलेल्या कामाची कारणमीमांसा केली. अयोग्य ठेकेदार, भूसंपादनातील अडचणी आणि नैसर्गिक अडथळे यामुळे काम रखडलं ही वस्तुस्थिती आहे. परंतु माणगाव आणि इंदापूर येथील बायपास ची कामे वगळता महामार्गाचे काम डिसेंबर अखेर पूर्ण होईल, असं शिवेंद्रराजे यांनी स्पष्ट केलं.
बाईट - शिवेंद्रराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री
12
Report
TTTUSHAR TAPASE
FollowAug 07, 2025 13:06:46Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
1 FILE
SLUG NAME -SAT_DESAI_PHONE
सातारा: साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे त्यांच्या जलद कार्यपद्धतीमुळे प्रचलित आहेत.त्यांच्याकडे एखादा प्रश्न आला की तडीस लावण्याचा त्यांचा हातखंडा आहे. असाच एक प्रत्यय आज जिल्हाधिकारी कार्यालयातील दालनात पत्रकार परिषद सुरू असताना आला. पत्रकार परिषद सुरु असताना अचानक जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलवरील लँडलाईन फोनची रिंग वाजली आणि तो वाजत असलेला फोन थेट पालकमंत्र्यांनी उचलला समोरील व्यक्ती बऱ्याच दिवसापासून सातबारा दुरुस्तीच्या कामासाठी सरकारी कार्यालयामध्ये हेलपाटे मारत होता. याची तक्रार त्यांनी जिल्हाधिकारी यांना करण्यासाठी फोन केला आणि जिल्हाधिकारी समजून संबंधित व्यक्तीने स्वतःचे तक्रार केली मात्र त्यांवर पालकमंत्र्यांनी त्यांचा प्रश्न समजून घेऊन प्रांतधिकाऱ्यांना फोन लावून तात्काळ हा प्रश्न मार्गी लावण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरून सूचना दिल्या. यामुळे फोन करणाऱ्या वयक्तीने शंभूराज देसाई यांचे आभार मानले आहेत. चुकून उचललेल्या फोन मुळे एकाचं काम मात्र मार्गी लागलं. Video सध्या चांगलाच व्हायरल होतोय
*फोन सुरु असतानाच video*
14
Report
JJJAYESH JAGAD
FollowAug 07, 2025 13:05:13Akola, Maharashtra:
Anchor : 'खालिद का शिवाजी' हा सिनेमा रिलीज होण्याआधीच वादात अडकला आहे..या सिनेमाचा टीझर नुकताच प्रसिद्ध झाला असून, त्यावर काही महंतांनी तीव्र आक्षेप नोंदवले आहेत.या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे..ते म्हणाले, "सिनेमा पाहिल्यावर त्यावर भाष्य करणं योग्य ठरेल, पण न पाहता केवळ नावावरून किंवा टीझरवरून आक्षेप घेणं हे चुकीचं आहे."त्यांनी यावर पुढे प्रश्न उपस्थित केला की,
"शिवरायांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात हेच तथाकथित महान कुठे होते?" अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला..तथापि, मिटकरी यांनी स्पष्ट केलं आहे की सिनेमाच्या नावाला मात्र आपला विरोध आहे.
Byte : अमोल मिटकरी , आमदार राष्ट्रवादी काँग्रेस..
13
Report
SRSHRIKANT RAUT
FollowAug 07, 2025 13:03:06Yavatmal, Maharashtra:
Anchor : यवतमाळ जिल्ह्यात दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावली, हवामान खात्याने येलो अलर्ट दिला असताना घाटंजी, आर्णी, पांढरकवडा येथे काही भागात मुसळधार पाऊस बरसला तर अन्य भागात पावसाने तुरळक हजेरी लावली. गेल्या दहा दिवसांपासून कडक ऊन तापत असून पिकांना पाण्याची आवश्यकता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत, दरम्यान काही भागात पाऊस सरी बरसल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.
13
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowAug 07, 2025 12:47:05Parbhani, Maharashtra:
अँकर - शाळकरी विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या ऑटो चालकाला आरटीओने दंड थोतावल्यानंतर सदर आरटीओ चालक यांनी याबाबत आमदार संतोष बांगर यांच्याकडे तक्रार केली असता आमदार बांगर यांनी समोरील आरटीओ कर्मचाऱ्याला फोनवरून धमकी देत मी उद्या सगळ्या शाळा बंद करेल आणि हे तुझ्यावर शेकेल असा दम भरला. ऑटो वाल्यांना तुम्ही जर 10 हजार रुपयांचा फाईन मारत असाल तर तुम्हाला काही लाजा शरमा आहेत का नाहीत म्हणत अधिकाऱ्यांची लाज ही काढली. बांगर एवढ्यावरच थांबले नाहीत त्यांनी आरटीओ ऑफिसला कुलूप लावून टाकेल असा ईशारा ही दिलाय, आमदार बांगर यांचा सदर व्हिडिओ समोर आलाय.
14
Report
PNPratap Naik1
FollowAug 07, 2025 12:31:33Kolhapur, Maharashtra:
Story :- Kop Mahadevi Land WT
Feed :- Live U
Anc :- नांदणी मधील जीनसेन भट्टारक महास्वामी मठाकडे एकूण 400 एकर जमीन आहे.. त्यातील तब्बल 42 एकरहून अधिक शेती महादेवी हत्तीच्या खाद्यासाठी राखून ठेवण्यात आली होती.. याच शेताच्या कुरणात महादेवी हत्ती मनसोक्त चरायची आणि त्याचबरोबर शेजारी असणाऱ्या पंचगंगा नदीमध्ये डुबकी मारायची. पण आता महादेवी हत्ती गावात नसल्यामुळे ग्रामस्थांच्या नजरेला महादेवी पडत नाहीये. त्यामुळे महादेवीच्या माहुतासह अनेक जण गावात सुन्न होवून बसले आहे. नांदणी गावातील महादेवीच्या कुरनातून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.
Play WT
Byte Name :- इस्माईल निर्गुद, माहूत महादेवी हत्तीन
14
Report
PNPratap Naik1
FollowAug 07, 2025 12:31:29Kolhapur, Maharashtra:
Kop Nanadani Math
Feed :- Live U
Anc - कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठाच्या महादेवी हत्तीणीबाबत कोर्टात जाण्याचा निर्णय झाला त्यानंतर आज वकील असीम सरोदे यांनी नांदणी मठाच्या स्वामींची भेट घेतली. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी देखील उपस्थित होते. नांदणी मठाचे स्वामी, नांदणी मठाचे विश्वस्त, माजी खासदार राजू शेट्टी यांनी बंद खोलीमध्ये चर्चा केली. यावेळी बोलताना असीम सरोदे यांनी एका शक्तिशाली व्यक्तीकडून महादेवी हत्तीणीला परत आणणं ही सोपी लढाई नव्हती, पण ती लढाई कोल्हापूरकरानी अर्धी जिंकली असं सांगितले.यावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी, सीमा भागातील मठाना दिलेल्या नोटिसीवर संताप व्यक्त केला. कर्नाटकातील मठांच्या हत्तीबाबत पेटाने तक्रारी करून ते प्रकरण कर्नाटकच्या उच्च न्यायालयात पोहोचले आहे. पण त्या ठिकाणी देखील जर चुकीचा निर्णय झाला तर जन आंदोलन उभारेल असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला...
Byte - असीम सरोदे, वकील
Byte - राजू शेट्टी, माजी खासदार
14
Report
VKVISHAL KAROLE
FollowAug 07, 2025 12:31:21Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
छत्रपती संभाजीनगर.
*आमदार रोहित पवार पत्रकार परिषद पॉईंट*
- मंत्रालयजवळ सरनाईक यांनी रॅपिडो बुककरून बोलावली होती. तो माणूस तेथे आला.तेंव्हा महाराष्ट्रात रॅपिडोला परवानगी दिली नाही असे मंत्री म्हणाले होते... मात्र कालच प्रो गोविंदा ही स्पर्धा सुरू झाली आहे. त्यांचे स्पॉन्सर हे रॅपिडो आहे.
- काही महिन्यापूर्वी तुम्ही कंपणीला धमकी देतात, त्यांना विचारणा करतात आणि आता सोनारशिप घेतात...
- काही वस्तू स्वरूपात मदत केली जाते.अंदाज आशा आहे की १० कोटी रुपयाची मदत रॅपिडो कंपनीने केली आहे...
- त्यावेळेस धमकी पैशे मिळावे यासाठी दिली होती का?
- आमचा सरळ सरळ मत आहे. पदाचा वापर करून दबाव आणून स्वतःच्या फायद्यासाठी केला....
- *पदाचा वापर स्पॉन्सर्सशिप गोळा करण्यासाठी केला आहे.*
- सरकारकडून याचा उत्तर दिले गेले पाहिजे अशी आमची मागणी आहे.
- midc मध्ये सामान्य व्यावसायिकांना न देता त्यांना दिली आहे अशी चर्चा आहे. सरकार कडून दारूचे लायसन्स दिले जाणार आहे.
- यावर उत्तर मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री यांनी द्यावे अशी आमची मागणी आहे...
- आमचे काम आम्ही प्रामाणिकपणे करीत आहोत... आम्ही टाईमपास मजा करत नाही.
- आम्ही शेतकरी कष्टकरी यांचे प्रश्न मांडण्यासाठी प्रयत्न करीत आहोत...
- धनगर समाजाच्या मुलांच्या योजनेत पैशे खाल्ले गेलेले आहेत.
- आम्ही लाचार नाहीत, आम्ही संघर्ष करणारे माणस आहोत.
- येत्या काळात रस्त्यावर उतरू, आवाज यापेक्षा अधिक तीव्र करू...
-पुढील अधिवेशनात आम्ही कुठलाही मुद्दा सोडणार नाही..
- ज्यांना जे करायचे ते करू द्या..मात्र आम्ही अधिवेशनात पुराव्यासह बोललो.
ऑन आवाज निचे.
- आम्ही कार्यकर्त्याला पाहायला गेलो होतो.आम्ही आमदार असताना अशी वागणूक मग सर्वसाधारण लोकांसोबत काय होत असेल...
- उद्धव ठाकरे यांना धनुष्यबाण मिळण्याची शक्यता वाढली आहे. आम्हाला घड्याळ मिळण्याची शक्यता आहे.
- निवडणूक लागली तर आपल्या पक्षाकडे उमेदवार पाहिजे म्हणून सर्व पक्षाची तयारी सुरू आहे. जालन्यात गोरंट्याल ही देखील भाजपत गेले.. आता शिंदे आणि दादा समोर येत नाही, जेंव्हा समोर आले तेंव्हा दादा आक्रमक बोलून जातात...
- आजची परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न त्या चित्रपटात झाला असावा.. हा इतिहासावर आहे की परिस्थितीवर आहे.. थोडफार मागेपुढे झाले असेल तर इतिहासप्रेमी ते दुरुस्त करायला सांगितले...
- भाजप आणि त्यांच्या विचाराचे कार्यकर्ते यांनी विरोध केला.जेंव्हा असे होते तेव्हा मला आटते हा चांगला आहे.इतिसातील दाखले चुकले असतील तर आम्ही इतिहासकारांनी बोलू.....
- राजकारणात अंतर्गत माहिती आणि तर्क दोन्ही असतात.मी जे आज बोलतो ते होईलच असे नाही.
- जिथं कुठे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभे तिथे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पाने भाजपाल फायदा झाला आहे...
- तर्क वितर्क नाही, आकडे जर काढले तर वंचितमुळे भाजपला फायदा झालाच आहे.
- एकनाथ शिंदे यांच्या परिवारातील एका व्यक्तीला नोटीस देण्यात आली आहे.
- भाजप प्लॅनिंग करून एकनाथ शिंदे यांचे लोकप्रतिनिधी व त्यांच्या माणसानं चून चून के टार्गेट केले जात आहे.
- पूर्वी सरकारच्या माध्यमातून नियुक्ती होत होती.मात्र कलोजियम सिंपल मेकॅनिझेम ठरविण्यात आला आहे. त्या पदावर असताना त्यांचा इंटरव्ह्यूव कसा झाला. आरती साठे यांना एप्रव्ह केला..आमची भीती एवढीच आहे.तो सरकारच्या विरोधात जाण्याचा विचारात असेल आणि जज भाजप विचारच असेल तर..
- राहुल गांधी यांनी आज इलेक्शन कमिशनचे कपडे काढले आहे.
- इलेक्शन कमिशन भाजप चे झाले आहे.तसे न्याय व्यवस्थेच होऊ नये , एवढीच भीती वाटते.
14
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowAug 07, 2025 12:30:27Parbhani, Maharashtra:
अँकर- परभणी शहरातील पाथरी रोडवर एका वाहनाने दुचाकी स्वाराला धक्का देऊन पोबारा केला असता सदर दुचाकी चालकाने या वाहनाचा पाठलाग करून परभणी शहरातील बस स्थानक परिसरात या वाहनाला अडवून वाहन चालकाला चांगलाच चोप दिलाय. यामध्ये पोलिसांनी मध्यस्ती करून सदर प्रकरण मिटविलय. यावेळी बघ्यांची गर्दी जमली होती.
14
Report