Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ratnagiri415621

खेडमध्ये सैराटसारखे अपहरण, पतीने पत्नीला मारहाण केली!

HCHEMANT CHAPUDE
Aug 04, 2025 10:18:15
Khed, Maharashtra
Feed 2C Slug: Khed Sairat File:05 Rep: Hemant Chapude(Khed) ब्रेक* *खेड/पुणे* - पतीला जबर मारहाण करत २८ वर्षीय पत्नीचे अपहरण - पुण्याच्या खेड तालुक्यातील खरपुडी येथील धक्कादायक प्रकार - सैराट चित्रपटा सारखा अंतर जातीय प्रेम विवाहातून मारहाण आणि अपहरण झाल्याचा प्रकार - खेड पोलिस स्टेशनमध्ये मुलीचा भाऊ आणि आई सह १५ जणांवर अपहार आणि जबर मारहाण केल्याचा गुन्हा दाखल - विश्वनाथ गोसावी आणि त्याची पत्नी प्राजक्ता गोसावी २८ वर्षीय असे मारहाण झालेल्या दांपत्याचे नाव Byte: विश्वनाथ गोसावी(पती) Byte: स्नेहल राजे (सहाय्यक पोलिस निरीक्षक ) प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया खेड पुणे
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SGSagar Gaikwad
Aug 04, 2025 13:19:22
Nashik, Maharashtra:
Feed send by mozo Reporter-sagar gaikwad Slug-nsk_bhide_prg नाशिक - - नाशिक मध्ये शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन - व्याख्यानाच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात - सकाळी संभाजी ब्रिगेडने दिलेल्या इशाऱ्यानंतर पोलिसांचा बंदोबस्त - संत तुकारामांचं पुस्तक देऊन आंदोलनाचा दिला होता इशारा - यानंतर संभाजी ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ठेवले होते नजर कैदेत - व्याख्यानाच्या ठिकाणी माध्यमांनाही प्रवेश नाही
5
Report
ABATISH BHOIR
Aug 04, 2025 13:03:07
Kalyan, Maharashtra:
कल्याण कोर्टाचा मोठा निर्णय: 18 वर्षांनंतर निकाल.. राष्ट्रवादी शरद पवार कटाच्या नेत्यांच्या मुलाच्या हत्ये प्रकरणी 3 दोषी तर शिंदे गटाचे पदाधिकारी महेश पाटील सह 10 जण निर्दोष २००७ मध्ये कल्याण पूर्व येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वंडार पाटील यांचा मुलगा विजय पाटील यांच्या हत्येप्रकरणी 18 वर्षांनंतर कल्याण न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे.​२३ मार्च २००६ रोजी गोलवली येथे होळीच्या कार्यक्रमात बाळा भोईर यांची हत्या झाली होती. या हत्येचा बदला घेण्यासाठी १० एप्रिल २००७ रोजी विजय पाटील यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप होता. या प्रकरणात शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी महेश पाटील यांच्यासह एकूण १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि गेल्या १८ वर्षांपासून या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. याप्रकरणी न्यायालयाने विजय बाबुराव वाकडे, साजिद हमीद शेख आणि सुनील रामचंद्र भोईर या तिघांना दोषी ठरवले आहे. त्यांना सध्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले असून, ७ ऑगस्ट रोजी त्यांना शिक्षा सुनावली जाईल.या प्रकरणात ज्या दहा जणांची निर्दोष मुक्तता झाली आहे, त्यात शिंदे गटाचे पदाधिकारी महेश पाटील यांचाही समावेश आहे. आरोपींचे वकील हरीश सर्वोदय यांनी सांगितले की, ज्यावेळी विजय पाटील यांची हत्या झाली, तेव्हा महेश पाटील सकाळी ११ ते सायंकाळी ५.३० या वेळेत कल्याण न्यायालयात हजर होते, याचे पुरावे आम्ही सादर केले. त्यामुळे त्यांची निर्दोष सुटका झाली.​या प्रकरणातील तपास अधिकारी यांचे निधन झाले असून, मृत व्यक्तीच्या शरीरातून गोळी आढळली नाही, असेही वकील हरीश सर्वोदय यांनी सांगितले. त्यामुळे न्यायालयाने नेमक्या कोणत्या कलमांखाली तिघांना दोषी ठरवले आहे, हे ७ ऑगस्ट रोजी शिक्षेच्या सुनावणीवेळी स्पष्ट होईल. दरम्यान, या प्रकरणी आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचेही वकिलांनी स्पष्ट केले आहे. सध्या न्यायालय परिसरात तणावाचे वातावरण असून, सर्वांचे लक्ष ७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या शिक्षेच्या सुनावणीकडे लागले आहे. byte... हरी सरोदे वकील
9
Report
JMJAVED MULANI
Aug 04, 2025 12:48:39
Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI SLUG 0408ZT_DAUNDAXSI FILE 5 बनावट दारूवर महागडे लेबल लावून केली जात होती वाहतूक..दौंड राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई चार आरोपींना घेतले ताब्यात अँकर:- बनावट दारूवर महागडे लेबल लावून वाहतूक करीत असताना दौंड मधील राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करून चार आरोपींना ताब्यात घेतले. बनावट दारूवर महागडे लेबल लावलेली दारू वाहतूक करीत असताना दौंड मधील राज्य उत्पादन शुल्क विभागाने सापळा रचून कारवाई केली या कारवाईमध्ये नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला... बारामती वरून मदनवाडी या ठिकाणी एका चार चाकी गाडीमध्ये बनावट दारू आणि महागड्या दारूचे लेबल घेऊन जात असल्याची माहिती दौंड मधील राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती तसेच चार आरोपींमधील एका आरोपीच्या घरात बनावट दारूच्या बॉटेलला महागड्या दारूचे लेबल लावण्यात येत होते यावरून चार आरोपींना दौंड मधील राज्य उत्पादक शुल्क विभागाने ताब्यात घेतले असून कोर्टात हजर करण्यात आले आहे
8
Report
NMNITESH MAHAJAN
Aug 04, 2025 12:35:15
Jalna, Maharashtra:
FEED NAME : 0408ZT_JALNA_BYTE_ON_SC(2 FILES) जालना : सुप्रिम कोर्टानं जातीयवादी खोडसाळ लोकांच्या तोंडावर मारलेली ही चपराक आहे. ओबीसी नेते नवनाथ वाघमारे ओबीसी समाजाला सुप्रीम कोर्टाने  न्याय दिला सर्व ओबीसी समाजाच्या वतीने सुप्रीम कोर्टाचे मानले आभार अँकर :नवीन प्रभाग रचनेसह आता निवडणूक होणार असून ओबीसी आरक्षणासह निवडणूका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.हा निकाल म्हणजे खोडसाळ लोकांच्या तोंडावर मारलेली चपराक असल्याची प्रतिक्रिया ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी दिली आहे.तसेच वाघमारे यांनी या निकालाचं स्वागत देखील केलं आहे. बाईट : नवनाथ वाघमारे, ओबीसी नेते
10
Report
GDGAJANAN DESHMUKH
Aug 04, 2025 12:33:55
Hingoli, Maharashtra:
अँकर- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कावड यात्रे निमित्ताने हिंगोली येथे येणार आहेत,उपमुख्यमंत्री शिंदे कावड यात्रेला संबोधित करणार होते. पण उपमुख्यमंत्र्याच्या सभेवर पावसाच सावट घोंगावतेय. हिंगोली शहरातील गांधी चौकात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेसाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे,नेतेमंडळींना बसण्यासाठी व्यासपीठ उभारण्यात आले असून भाविकांसाठी मात्र मोकळे मैदान आहे,पण अर्धा तासापासून जोरदार पाऊस सुरू झाला असून सभास्थळी पावसाचे पाणी साचलय,पावसाचा जोर ही कायम असल्याने उपमुख्यमंत्री यांच्या सभेचे काय होणार असा सवाल उपस्थित केला जातोय...
10
Report
SKSACHIN KASABE
Aug 04, 2025 12:20:59
Pandharpur, Maharashtra:
04082025 Slug - PPR_HOLAR_COMMUNITY file 03 ----- Anchor - सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे होलार समाजाचा मेळावा संपन्न झाला. यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, रोहयो मंत्री भरत गोगावले उपस्थित होते. होलार समाज आर्थिक विकास महामंडळास 50 कोटीचा निधी घोषणा यावेळी मंत्री शिरसाट यांनी केली. होलार समाजासाठी स्वतंत्र होलार समाज अभ्यास आयोगाची निर्मिती करावी. होलार समाजाच्या वेगवेगळ्या जातीमध्ये लागलेल्या चुकीच्या जातीच्या नोंदी दुरुस्त करुन मिळाव्यात. होलार समाजाच्या जातीच्या चुकीच्या नोंदी दुरुस्त झाल्याशिवाय एस. सी. जातींचे उपवर्गिकरण करु नये. वाद्य कलावंताची वयाची अट कमी करावी. कलावंताच्या मानधनात भरीव वाढ करावी व कलावंतांची लाभार्थी संख्या वाढवुन मिळावी. अशा मागण्या या वेळी करण्यात आल्या.
13
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Aug 04, 2025 12:20:14
Ambernath, Maharashtra:
बदलापुरातून एका डॉक्टरला एटीएसने ताब्यात आतंकवादी संघटनेशी संबंध असल्याचा संशय बदलापूर शहरातून उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) एका व्यक्तीला ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. बंदी घातलेल्या सिमी या संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली. ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव ओसामा शेख असे असून तो बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खाजगी रुग्णालयात होमिओपॅथिक डॉक्टर म्हणून कार्यरत होता, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. एटीएसने ओसामा शेखला ताब्यात घेतल्यानंतर त्याला उल्हासनगर न्यायालयात कस्टडीसाठी हजर केले. असामी शेख याला उत्तर प्रदेश एटीएस अधिक तपासासाठी उत्तर प्रदेश येथे घेऊन गेली आहे
9
Report
GDGAJANAN DESHMUKH
Aug 04, 2025 12:19:54
Parbhani, Maharashtra:
अँकर- हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार संतोष बांगर यांच्या वतीने दरवर्षी श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी कावड यात्रा काढली जाते. कळमनुरी चिंचाळेश्वर महादेव मंदिर ते हिंगोली येथील ओम कयाधु अमृतधारा मंदिर अशी ही कावडयात्रा काढली जाते. चिंचाळेश्वर मंदिरात महादेवाची आरती करून या यात्रेला सुरुवात झाली होती,18 किलोमीटर ची पाई यात्रा करीत ही यात्रा हिंगोलीत पोहोचत असते. मागील तीन वर्षांपासून राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या कावड यात्रेला येतात, सदर कावड यात्रा हिंगोली शहरात दाखल झाली असून थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कावड यात्रेत सहभागी होणार आहेत. हिंगोली शहरातील गांधी चौकात त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
14
Report
JMJAVED MULANI
Aug 04, 2025 12:18:54
Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI SLUG 0408ZT_BARAMATIKHATIK BYTE 1 अर्जुन खोतकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची खाटीक समाजाची मागणी; खाटीक समाजाबद्दल वक्तव्यानंतर संताप.. Anchor : आमदार अर्जुन खोतकर यांनी कैलास गोरंट्याल यांच्यावर टिका करताना खाटीक समाजाबद्द्ल चुकीचे वक्तव्य केलं.. या पार्श्वभूमीवर हिंदू खाटीक समाज संघटनेचे कार्याध्यक्ष करण इंगुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खोतकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यासह उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे निवेदन देत खोतकर यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. बाईट. करण इंगुले
10
Report
PTPRATHAMESH TAWADE
Aug 04, 2025 12:18:34
Nala Sopara, Maharashtra:
नालासोपाऱ्यातील माजी नगरसेवक स्वप्निल बांदेकर शिंदे गटात प्रवेश; खंडणीप्रकरणावरून टीका अँकर - नालासोपाऱ्यातील उबाठा गटाचे माजी नगरसेवक स्वप्निल बांदेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे शिंदे गटात प्रवेश केला आहे. पालघर येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी आपल्या समर्थकांसह शिंदे गटात प्रवेश करत नवीन राजकीय वाटचालीला सुरुवात केली. मात्र, बांदेकर यांच्यावर एका बांधकाम व्यावसायिकाकडून तब्बल १० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल असून तपास सुरू आहे . अशा कार्यकर्त्यावर एकनाथ शिंदे यांनी विश्वास दाखवल्याने राजकीय वर्तुळात तीव्र टीका होत आहे. टीप - पहिला पक्ष प्रवेश केला तोच बांदेकर
13
Report
SKSACHIN KASABE
Aug 04, 2025 12:18:22
Pandharpur, Maharashtra:
04082025 Slug - PPR_GOGVALE_BYTE file 01 ---- Anchor - रायगड जिल्ह्यातील बार साठी करमणूक म्हणून परवानगी आहे. तिथे काही हिडीस फिडीस दाखवले जात नाही. जर काही डिफी कल्टी असेल तर तसे बार बंद करू असे वक्तव्य रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी केले आहे गैर वर्तन आणि चुकीचे बार असतील तर ते भाग वेगळा आहे. सगळीकडेच बार आहेत. तिथे खाणे पिणे चालते. त्यात काय डिफी कल्टी असेल तर शासन त्यावर बंदी आणेल. या पूर्वी अशा बार वर बंदी आणली आहे. पंढरपूर मध्ये शिवसेना पक्षात दोन गटात काय राडा झाला याबाबत माहिती घेऊ , पण जो काम करेल तो पुढे जाईल त्यामुळे कार्यकर्त्यांनी वाद करण्यापेक्षा पक्षाचे काम करावे असा सल्ला दिला आहे --- Byte - भरत गोगावले, मंत्री रोहयो
12
Report
TTTUSHAR TAPASE
Aug 04, 2025 12:17:04
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE 1 FILE SLUG NAME -SAT_SHINDE_JALLOSH सातारा: शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची आज जावळी तालुक्यातील मेढा येथे ढोल ताशाच्या गजरात जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण करत भव्य स्वागत रॅलीचे आयोजन करण्यात आले.या रॅलीला आ.रोहित पवार उपस्थित होते.यावेळी मेढा रस्त्यावर गावागावां मध्ये त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.. जन्मभूमी असणाऱ्या जावळी तालुक्यात आ. शशिकांत शिंदे यांना मानणारा जनसमुदाय मोठा असल्यामुळे जावळीकर रॅली मध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालेले पाहायला मिळाले.यावेळी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी उद्या पासून नाशिक ते विदर्भ पर्यंत दौरा करणार असल्याचे सांगत सरकार विरोधात आंदोलन करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे. byte शशिकांत शिंदे
13
Report
JMJAVED MULANI
Aug 04, 2025 12:03:58
Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI SLUG 0408ZT_INDAPURGOGWLE BYTE 1 भरत गोगावले *ऑन_ कचरवाडी* बरळ शेतकरी बरं यांच्या शेतीची आयकीव माहिती होती प्रत्यक्षात पाहणीसाठी इथं आलो आहे.चांगली मेहनत घेतली चांगला विचार असला तर प्रगतशील शेतकरी कसा होऊ शकतो ते या बरळ कुटुंबाकडून मला कळाले.. बरळ यांच्याकडे 18 गुंठे शेतीची त्यांनी कष्टाने 18 एकर केली त्यामध्ये त्यांनी विविध फळबाग लागवड केली आहे.. शेतकऱ्याची संवाद साधला असता त्यांनी माझ्याकडील खात्याकडे काही मागण्या केल्या आहेत त्याची नोंद केली आहे. मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मी आणि आम्ही याच्यावरती विचार विनिमय करू..... *ऑन_रायगड राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश...* आम्हीपण मुंबईमध्ये धमाका उडवला आहे... तीन गावातील पक्षप्रवेश आम्ही पण घेतले आहेत. राजकारणात सकाळचा माणूस दुपारी कुठे असेल ते सांगता येत नाही.... आज रायगड जिल्ह्यात सात आमदार आहेत त्यापैकी त्यांचा एक आहे तीन आमचे भाजपाचे तीन आहेत... **शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन गोरगरिबांची विचारपूस करणे हे फक्त आम्ही करतो.** *ऑन_ शेततळी कागद अनुदान**. या प्रश्नासंदर्भात पूर्तता केली जाईल. **ऑन _धनंजय मुंडे बंगला ४२ लाख रुपये दंड** **त्याबाबतीत न शिरलेलं बरं...** आज आपण चांगल्या कामासाठी आलो आहोत शेतकऱ्यांच्या हिताचं जे काय असेल ते सांगा मागा ते देण्याचा प्रयत्न करतो. **बीडचं राजकारण कसं काय तापल आहे आणि काही हे तुम्हाला माहिती आहेच त्यामुळे बीडमध्ये सध्या तरी विचार नको.** *ऑन _राजीव साबळे राष्ट्रवादी प्रवेश शिंदे गटाला शह देण्याचा प्रयत्न?** काही लोकांचा वैयक्तिक स्वार्थ असतो.. ते देऊन पूर्ण झाल्यानंतर एका माणसाला किती द्यायचं काय द्यायचं याचं प्रमाण असतं... एखाद्याची भूक भागत नसेल तर त्याला तुमचा आमचा काय पर्याय नसतो ते ज्या घरी गेले त्या ठिकाणी ते सुखी राहू द्यात आमचे काही म्हणणे नाही... *एक राजू गेला तर आमच्याकडे अनेक राजू आहेत आम्ही काम करतो मेहनत करतो जोपर्यंत आमचे एकनाथ शिंदे आमच्या पाठीमागे आहेत तोपर्यंत आम्ही घाबरत नाही.* *ऑन _आमदार परिणय फुके* आमच्यात दोन शिवसेना आहेत ते कोणत्या शिवसेनेबद्दल बोलले माहित नाही. त्यामुळे त्याला विचारणे गरजेचे आहे कुठल्या नेमका शिवसेना तुम्ही बाप आहात. ? *ऑन_कृषी मंत्रालय..* कृषिमंत्री त्यांच्या खात्याचे काम करतील आम्ही आमच्या खात्याचे काम करू. .. *घडामोडी झाल्या त्या झाल्या काही चुकीच्या पण आहेत. नाही म्हणता येत नाही. पण तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे,आमच्या पक्षाचा प्रश्न नाही.* त्यामुळे आमचे तीनही नेते मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री त्यावर विचार करतील. *ऑन _ माणिकराव कोकाटे* सगळेच देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे होऊ शकत नाहीत. त्याप्रमाणे प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते. त्यामुळे त्यांची विचारसरणी वेगळी असू शकते. आमची वेगळी ... आम्ही सामान्य शेतकऱ्याचा मुलगा जनतेने चार वेळा निवडून दिले. ग्रामपंचायत सरपंच पदापासून ते मंत्री पदापर्यंत आलो आहे. शून्यातून गरिबीतून इथपर्यंत आलो आहे. *नेहमी लोकांना सांगत असतो गरिबी आली तर लाजायला नाही आणि श्रीमंती आली तर माजायचं नाही... या युक्तीप्रमाणे चालायचं माणूस कितीही मोठा झाला तर त्यांने जमिनीवरून चालायचं हवेत कोण चालतं का ? नाहीतर त्याचा जय महाराष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही.* *ऑन _ गोठ्या गीते* त्याने जे काल केला आहे ते चुकीच आहे. म्हणून मगाशी सांगितले बीडचा नामोल्लेख न करण बरे आहे.. हे सर्व बीडमध्येच जास्त घडलंय घडतय चाललय जो कोणी असे काही करेल त्याचे तो पतन भोगेल... *ऑन_ रायगड पालकमंत्री* मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निर्णय घेतील तो योग्य असेल असं मला वाटतं. . *ऑन _अमित ठाकरे* मुलगी ही कोणाची बहीण पत्नी आई असते या सर्वांचा विचार करत असताना मुलींवरती हात टाकणं चुकीच आहे परंतु त्याला कायदा सुव्यवस्था सर्व बाबी आहेत.. एकदम टोकाला जाता येत नाही.. अमित ठाकरेंनी केलेले वक्तव्य त्यांच्याप्रमाणे आहे. आम्हाला काही तस वक्तव्य करता येणार नाही... *ऑन _शिवसेना विस्तार* शिवसेना विस्ताराबाबत आमच्यापर्यंत काही आलेलं नाही बैठकीमध्ये ते ठरल आमचे नेते एकनाथ शिंदे देतील तो शिर सावंद्य मानून काम करू... *ऑन _ संजय राऊत* सप्टेंबर महिन्यात राजकीय भूकंप होईल असे ते गेले तीन वर्ष म्हणत आहेत. तीन वर्ष सकाळी उठल्यापासून तेच बोलत आहेत उद्या बघा काय होतंय.. परवा बघा काय होतंय.. अस ते नेहमी म्हणतात... आपण किती लक्ष द्यावं...
13
Report
PNPratap Naik1
Aug 04, 2025 11:50:29
Kolhapur, Maharashtra:
Story :- Sundar Elephant PKG Feed :- Old News Link, 2C & Photo Zee 24 Taas Old News Link https://youtu.be/_Z8rPKi7GjU?feature=shared https://youtu.be/4Icp1Jks3m4?feature=shared https://youtu.be/ShGfkC_Ctq0?feature=shared ANC :- आता बातमी 2014 मध्ये पेटाच्या तक्रारीनंतर मुक्तता केलेल्या दख्खनचा राजा जोतिबाच्या सुंदर हत्तीचे पुढे काय झाल याची.. नांदणी मठातील महादेवी हत्ती पेटाच्या तक्रारीनंतर गुजरात मधील वनतारामध्ये हलवण्यात आले. या घटनेच्या निमित्ताने जोतिबाच्या सुंदर हत्तीचं नेमकं काय झालं याची चर्चा सुरू झाली आहे.पाहूया त्यावरचा एक स्पेशल रिपोर्ट. VO 1 :- श्री क्षेत्र जोतीबाच्या सेवेसाठी वारणा उद्योग समहाचे प्रमुख आमदार विनय कोरे यांनी 2004 पूर्वी सुंदर हत्ती जोतीबाला भेट दिला होता. पण दरम्यानच्या काळात सुंदरला चांगली सोयी मिळत नाही, त्याचबरोबर माहूतकडून सुंदर हत्तीला मारहाण होत असल्याची तक्रार पेटा संघटनेन कोर्टात केली. यावर निर्णय देताना मुंबई उच्च न्यायालयानं सुंदरची मुक्तता करुन त्यांची जंगलात रवानगी करावी असा आदेश दिला. या आदेशानंतर आमदार विनय कोरे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. पण सर्वोच्च न्यायालयानही सुंदरला 15 जुन 2004 पर्यत बनेरगट्टा अभयारण्यात हालवण्याचे आदेश दिला.. त्यानंतर त्या सुंदर हत्तीला बाणेरगट्टा मध्ये हालविण्याची मोहीम हाती घेण्यात आली. यावेळी सुंदरला अनेक वेळा ट्रक मध्ये चढविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यानी दोन ते तीन वेळेला ट्रक मध्ये चढण्यास नकार दिला. तरीदेखील बाणेरगट्टा च्या टीमने वन विभागाच्या मदतीने सुंदरच्या पायाला दोरखंड बांधून जबरदस्तीने ट्रकमध्ये चढवले. यावेळी सुंदरला गुंगीचे औषध दिलाचा देखील आरोप करण्यात आला.. सुंदर हत्तीच्या नकारानंतरही सुंदर हत्तीला बाणेरगट्टा अभयारण्यात हलवलं... त्यानंतर या सुंदरला सगळेच विसरून गेले. पण महादेवी हत्तीनीच्या निमित्ताने सुंदर हत्तीचं काय झालं ? असा सवाल विचारला जाऊ लागला. ज्यांनी सुंदर हत्तीला सांभाळण्याची जबाबदारी उचलली होती त्याच वारणा उद्योग समूहाचे प्रमुख आमदार विनय कोरे यांनी याबाबत मौन सोडलं... 2004 मध्ये बाणेरगट्टा अभयारण्यात जबरदस्तीने नेलेल्या सुंदर हत्तीचा अवघ्या तीनच वर्षात मृत्यू झाला याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केलाय. Byte :- आमदार विनय कोरे, नेते जनसुराज्य शक्ती पार्टी VO 2 :- जोतिबा डोंगरावर सुंदर हत्तीची देखभाल व्यवस्थित होत नाही असा आरोप पेटा संघटनेन करत न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने प्रथमदर्शनी जे पुरावे समोर आले त्यानुसार सुंदर हत्तीनीला बनेरगट्टात सोडावे असा आदेश दिला. पण याच सुंदर हत्तीचे अवघ्या काही वर्षात निधन झाल हे पेटाने का जाहीर केले नाही.. त्याचबरोबर कोणत्या कारणाने सुंदर हत्तीचे निधन झाले त्याची वाचता का केली नाही ? असा संतप्त सवाल विचारला जातोय.. Byte :- राजू शेट्टी, नेते स्वाभिमानी शेतकरी संघटना VO 3:- सुंदर हत्तीला बाणेरगट्टा अभयारण्यात हलवत असताना पायाला जखम झाल्या. तरीदेखील सुंदरला जबरदस्तीने बाणेरगट्टा अभयारण्यात हलवले.. त्याच हत्तीचे निधन झाल्यानंतर पेटाने काय भूमिका घेतली. या बद्दल अद्याप कोणाला काहीही माहिती नाही.. त्यामुळेच नागरिकांच्या मनात पेटा संघटनेच्या कार्यपद्धतीवर देखील तीव्र आक्षेप आहे. प्रताप नाईक झी 24 तास कोल्हापूर
13
Report
PTPRATHAMESH TAWADE
Aug 04, 2025 11:50:09
Virar, Maharashtra:
Date-4aug2025 Rep-prathamesh tawade Loc-virar Slug-VIRAR CCTV Feed send by 2c Type-AV Slug- विरार मध्ये एटीएम मधून पैसे चोरणारी टोळी सक्रिय चोरीची घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद वसई विरार मध्ये चिमटा गँग सक्रीय नागिकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज अँकर - विरारच्या कारगील नगरातील हिताची कंपनीच्या एटीएम मधून पैसे चोरी करणारी चिमटा गँगची टोळी सुरक्षा रक्षाच्या सतर्कतेमुळे हाती लागली आहे. या दोन्ही चोरट्यांना परिसरातील नागरिकांनी बेदम चोप देऊन विरार पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. सोनू सूरजप्रसाद गौतम ( 28 ) रणजीतकुमार गोविंदप्रसाद पासी ( 22 ) असे या दोन्ही चोरट्यांची नावे आहेत. या एटीएम मध्ये चोरी करतानाच सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. चोरटे एटीएम मशीन मधून पैसे येण्याच्या ठिकाणी चिमटा लावून ठेवत असत जेणेकरून दुसऱ्या ग्राहकांनी काढलेले पैसे त्या चिमट्यामध्ये अडकले जायचे आणि ते पैसे हे चोरटे घेत असत. हा प्रकार सीसीटीव्ही तपासणाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर उघडकीस आला आहे. या चोरट्यांच्या विरोधात विरार पोलिसांनी विविध गुन्हे दाखल करून अटक केली आहे या दोघांनी आणखी कुठे कुठे चोरी केले आहेत त्याचा तपास पोलीस घेत आहेत...
9
Report
Advertisement
Back to top