Back
पिंपरी DP विरोधात 49,570 नागरिकांची आवाज उठवली!
KPKAILAS PURI
FollowJul 15, 2025 03:33:04
Pune, Maharashtra
pimpri dp
kailas puri Pune 19-7-25
feed by 2c
Anchor - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून जाहीर करण्यात आलेल्या डीपी अर्थात विकास आराखड्याला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात हरकती दाखल झाल्या आहेत. या डीपी विरोधात शहरातील 49 हजार 570 नागरिकांनी हरकती नोंदवल्या आहेत. या डीपी विरोधात हरकती नोंदवण्याचा सोमवारचा शेवटचा दिवस होता. महापालिकेने शहरातील 28 गावांसाठी हा डीपी सादर केला होता. मात्र महापालिकेने टाकलेली आरक्षण आणि रस्त्या विरोधात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात विरोध करत डीपीच्या प्रती जाळण्यात आल्या होत्या. अजूनही अनेक ठिकाणी नागरिकांचा या डीपीला विरोध आहे
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRASHANT PARDESHI
FollowJul 15, 2025 09:05:47Dhule, Maharashtra:
Anchor :- नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना पूर्ण झाल्या असून, यासाठी अधिसूचना जारी केली असून, या प्रभाग रचनेंवर हरकती आणि सूचना देण्यासाठी २१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील चार नगरपालिका, जिल्हा परिषद आणि सहा पंचायती समितीच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी प्रभाग रचना आराखडा तयार करण्यात आला असून, या प्रभाग रचनेच्या आराखडावर कोणाला हरकती किंवा सूचना द्यायच्या असणार तर त्यांनी संबंधित तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात यावा असं आवाहन जिल्हाधिकारी मित्तल सेठी यांनी केला आहे. नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या प्रभाग रचनेच्या आराखडा नंतर नगरपालिकेतील प्रभाग, जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समितीचे गण यांच्यात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हरकती आणि सूचना दाखल करण्यासाठी २१ जुलै पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
प्रशांत परदेशी, नंदुरबार.
4
Share
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowJul 15, 2025 09:05:38Dhule, Maharashtra:
anchor - नंदुरबार जिल्ह्याच्या आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणे मुळे आई आणि मुलाला आपला जीव गमवावा लागला. आईच्या उपचारासाठी रुग्णवाहिका बोलावली परंतु रुग्णवाहिका न आल्याने मोटरसायकलवर उपचारासाठी नंदुरबारकडे येत असताना झाड कोसळल्याने दुर्दैव दोघींच्या मृत्यू झाला. आई आणि मुलाच्या मृत्यू झाल्याने गावित कुटुंबावर दुःखाच्या डोंगर कोसळला असून या मृत्यूला जबाबदार कोण असा संतप्त प्रश्न उपस्थित केला जात आहे. खांडबारा येथून नंदुरबारकडे येणाऱ्या एका आई आणि तिच्या मुलावर झाड कोसळले आणि या भीषण अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आईच्या उपचारासाठी मुलाने रुग्णवाहिका बोलवली होती परंतु रुग्णवाहिका आली नसल्याने दुचाकी वर नंदुरबार येथे आई आणि मुलगा उपचारासाठी रुग्णालयात येत होते. मात्र, रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे आई आणि मुलाला आपला जीव गमवावा लागला, या घटनेमुळे आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आरोग्य विभाग अजून किती निष्पापांचे बळी घेणार, असा संतप्त सवाल आता स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. झाड कोसळल्याने आईचा जागीच मृत्यू झाला, तर मुलाचा मृत्यू रुग्णालयात नेत असताना झाला. काही क्षणात काळाने झडप घालून एका कुटुंबावर दुःखाच्या डोंगर कोसळल आणि आई-मुलाचा जीवनप्रवास संपुष्टात आला. दीपा दाविद गावित, दिशांतकुमार दाविद गावित नवापूर तालुक्यातील वासदा गावाचे रहिवासी होते, त्यामुळे या आई मुलाच्या मृत्यूला दोषी कोण असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
प्रशांत परदेशी, नंदुरबार.
0
Share
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowJul 15, 2025 09:05:28Dhule, Maharashtra:
ANCHOR - धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात गणेश मूर्ती तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे. हजारो गणेश मूर्ती तयार होतं आहेत. अनेकांना रंग देणे बाकी आहे. शेकडो मजूराच्या हाताने वेगवेगळ्या आणि सुंदर मुर्त्या तयार करण्याचे काम सुरू आहे. पेन पाठोपाठ सर्व प्रकारच्या रुबाबदार आणि सुंदर गणेश मुर्त्या नंदुरबार च्या कारखान्यात तयार होत असून, महाराष्ट्रसह गुजरात मध्य प्रदेश आणि राजस्थान येथील गणेश मंडळ गणेश मूर्ती बुकिंग करण्यासाठी येत आहेत. गणेश मुर्त्या मोठमोठ्या उंचीच्या तयार केल्या जात आहे. परंतु पीओपी वापरावी का नाही यावरून देखील अनेक तर्क वितर्क लावले जात आहे.
बाईट :- नारायण वाघ मूर्तिकार
प्रशांत परदेशी, धुळे.
0
Share
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowJul 15, 2025 09:05:19Dhule, Maharashtra:
Anchor :- नंदुरबार जिल्ह्यात बँकेची संख्या कमी आहे. त्यामुळे बँकेची शाखा वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रस्ताव पाठवण्यात आला असून, यासाठी आता जिल्ह्यात नवीन सात शाखा मंजूर झाल्या आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागात बँकेच्या शाखा गाठण्यासाठी अनेक किलोमीटरच्या प्रवास करावा लागत होता, मात्राचा सातपुडा सात ठिकाणी नवीन सात शाखा सुरू होणार असल्याने ग्राहकांना याची मोठी सोय होणार आहे विविध शाखातील ७ बँकेच्या शाखा लवकरच सुरू होणार असून यासाठी प्रशासनाच्या वतीने हालचाली सुरू झाल्या आहेत.
प्रशांत परदेशी, नंदुरबार.
0
Share
Report
LBLAILESH BARGAJE
FollowJul 15, 2025 09:05:11Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- सामूहिक अत्याचार
फीड 2C
Anc
अहिल्यानगरच्या केडगाव भागातील दूध सागर सोसायटी परिसरात महिलेवर सामूहिक अत्याचार..
मागील भांडणाच्या कारणावरून एका जणांने केला अत्याचार तर तीन जणांनी केली मारहाण...
आरोपी पीडित महिलेचे नातेवाईक...
सोमवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडीला घटना, आज सकाळी गुन्हा दाखल...
मारहाणीत महिला गंभीर जखमी; उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात केले दाखल..
डाळखुष काळे,अक्षय काळे,विनेश काळे, मोनेश टाटा चव्हाण या चार जणांवर कोतवाली पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल..
पोलिसांनी डाळखुष काळे या आरोपीला घेतले ताब्यात तर इतर तीन जण फरार..
बाईट- अमोल भारती, पोलीस उपाधीक्षक.
0
Share
Report
SKSudarshan Khillare
FollowJul 15, 2025 09:04:59Yeola, Maharashtra:
अँकर:-
येवला मुक्तीभुमी शेजारील अतिक्रमण हटवून व सुरू केलेले तार कंपाऊंडचे काम रद्द करून मंजुरी प्रमाणे तिथे तोरण गेट तसेच वालकंपाऊंड करा तसेच येवला मुक्तीभुमीवरील टप्पा क्रमांक १ व २ कामाची थर्ड पार्टी ऑडीट निःपक्ष संस्थेकडून सामाजिक न्याय विभागामार्फत करण्यात यावी तसेच कामात फेरबदल करणाऱ्या अधिकार्यावर ऑट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा अशा विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने येवल्यातील विंचूर चौफुली येथे लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले.
बाईट: महेंद्र पगारे - जिल्हाध्यक्ष
0
Share
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJul 15, 2025 09:04:47Shirur, Maharashtra:
Feed 2C
Slug: Shirur Rautwadi Farmer Land Fraud
File'01
Rep: Hemant Chapude(Shirur)
शिरूर
Anchor - शिरूर तालुक्यातील राऊतवाडी शिक्रापूर येथील राखीव भुखंडावर टेमघर प्रकल्पाचे लव्हार्डे पुनर्वसन गावठाण विकसीत करण्यात भूखंड देण्यात आले या राखीव जागेवर काही विकासकामे करण्यात आली मात्र ही सर्व कामे उखडून त्यावर प्लाॅट वाटत केले असून ते बेकायदेशीर हस्तांतरही केले आहेत पुनर्वसनाच्या नावाखाली प्रकल्पग्रस्तांच्या हक्कांवर डल्ला मारण्याचे काम करण्यात आले असून या प्रकरणी कारवाई करावी अशी मागणी आमदार जयंत पाटील यांनी अधिवेशनात केली आहे
Sound Byte - जयंत पाटील
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया शिरूर पुणे...
0
Share
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowJul 15, 2025 08:31:54Dhule, Maharashtra:
ANCHOR - धुळे जिल्ह्यात यां वर्षी कपाशी खालोखल मक्याची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात धुळे आणो शिंदखेडा तालुक्यात कमी पाऊस असल्याने शेतकऱ्यांनी मक्याला पसंती दिली आहे. मात्र मक्यावर सुरुवातीलाच लष्करी अळीचा प्रदुर्भाव दिसुन येत आहे. अनेक शेतकऱ्यांना त्यामुळे दुरबार पेरणी करावी लागली आहे. पावसाच्या अनियमित्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा मका विरळ झाला त्यांनाही दुबार पेरणी करावी लागली, मका लहावाफ केलेल्या शेतकऱ्यांनी पिकाला फवारणीचा सल्ला दिला आहे. दोन फवारण्या शेतकऱ्यांनी घ्याव्यात असा सल्ला तज्ञ् देत आहेत.
byte - जगदीश काठ्यपुरे, तज्ञ्
प्रशांत परदेशी, धुळे.
0
Share
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowJul 15, 2025 08:31:01Dhule, Maharashtra:
anchor - नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा डोंगर रंगांमध्ये यावर्षी चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ येथील धबधबे प्रावाहित झाले असून, दऱ्या खोऱ्याधे हिरवळ दाटली आहे, अश्या स्थितीत काही तरुण पर्यटक हुल्लडबाजी करत असल्याची दृश्य येथे नित्याची झाली आहेत. प्रसिद्ध सीताखाई पॉईंट वर जीव धोक्यात घालून तरुण फोटोशूट करीत आहेत. दोनशे पन्नास फूट खोल असल्याने सीताखाई पॉईंट असलेल्या दगडातून उभे राहून जीवघेणा फोटोशूट केले जातं आहे, याआधी येथे अनेकांना जीव गमावावा लागला आहे. काही तरुणांकडून सेल्फी आणि फोटो साठी अशी स्टबाजी सुरू. असून,याला कोणी अटकवा करतांना दिसून येत नाही. तोरणमाळ परिसरात सुरक्षेचा कोणत्याही उपाययोजना नाहीत. सर्व पर्यटन क्षेत्र रामभरोसे सुरू आहे.
प्रशांत परदेशी, नंदुरबार.
0
Share
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowJul 15, 2025 08:05:42Dhule, Maharashtra:
Anchor- धुळे शहरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने अनोखा आंदोलन करून निश्चित करण्यात आला. यावेळी संतप्त शिवसेना उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी खड्ड्यांमध्ये बसून कीर्तन केलं. यावेळी खड्ड्यांना फुले वाहत शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत महापालिका तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध केला. शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांची चाळण झाली असून धुळे शहरातील पारोळा रोडवर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचा साम्राज्य पसरल आहे. ऐन पावसाळ्यात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने धुळेकरांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. असं असताना मनपा तसेच बांधकाम विभाग मात्र फक्त ठेकेदारांना खुश करण्यात मश्गूल असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आला. यावेळी महापालिका तसेच बांधकाम विभागाचे विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
Byte- कार्यकर्ता, उबाठा
प्रशांत परदेशी, धुळे.
3
Share
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJul 15, 2025 08:05:32Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाईफेक प्रकरणी आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी
- संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाईफेक प्रकरणी आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी
- सदा प्रकरणातील आरोपी दीपक काटे आणि त्याच्या सहकाऱ्याला अक्कलकोट येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात हजर केले असता मिळाली दोन दिवसांची पोलीस कोठडी
- पोलीस बंदोबस्तात आरोपींची पोलीस कोठडीत केली रवानगी
- प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी दीपक काटे सह सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यासंदर्भात वाढत होता दबाव
- आता दोन दिवसांच्या पोलीस कस्टडीमध्ये अधिकची माहिती समोर येण्याची शक्यता
0
Share
Report
SNSWATI NAIK
FollowJul 15, 2025 08:05:23Navi Mumbai, Maharashtra:
story slug - नवी मुंबई मद्ये सखल भागात साचले पाणी
नवी मुंबई मे बारीश के कारण पाणी
ftp slug - nm water logging
shots-
reporter- swati naik
navi mumbai
Anchor - नवी मुंबई मद्ये सकाळी 11 वाजल्या पासून पावसाची संततधार सुरू झाली आहे, यामुळे नवी मुंबई मधील सखल भागात पाणी साचले आहे , यात सायन पनवेल महामार्गावर उरण फाटा येथे सखल भागात पाणी साचलं असून एपीएमसी मार्केट ,तुर्भे , येथे रस्त्यावर पाणी साचलं आहे ,तर पनवेल मद्ये देखील पावसाची जोरदार हजेरी लावली आहे।
Gf-
0
Share
Report
SKSACHIN KASABE
FollowJul 15, 2025 08:03:35Pandharpur, Maharashtra:
15072025
Slug - PPR_HAKE_GAYKAWAD
feed on 2c
file 01
----
Anchor - संभाजी ब्रिगेडने जे पेरले तेच उगवले प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याच्या प्रकरणात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची उडी
प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याच्या निषेध हाके यांनी केला आहे. मात्र रस्त्यावर दहशत माजवण्याच्या अनेक घटना संभाजी ब्रिगेड माध्यमातून घडल्याचा आरोप हाके यांनी केला. यामध्ये भांडारकर प्रकरण, वाघ्याचे स्मारक उखडणे, गडकरींचा पुतळा काढणे, चळवळी बदनाम करणे, गाड्या फोडणे अशा घटनांचा उल्लेख त्यांनी केला.
संभाजी ब्रिगेड कडून हिंसाचार माजविण्या काम करणाऱ्या लोकांचे सत्कार केले. हिंसाचाराचे सामान्यकरण केले.आता त्यांच्याच प्रदेशाध्यक्षावर ही वेळ आली आहे. अशी टीका या वादात उडी घेत लक्ष्मण हाके यांनी केली आहे
----
Byte - लक्ष्मण हाके
4
Share
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowJul 15, 2025 08:01:16Raigad, Maharashtra:
स्लग : रोह्यात जोरदार पर्जन्यवृष्टी ....... सर्वत्र पाणीच पाणी ...... रायगड जिल्ह्यात २४ तासांचा रेड अलर्ट .....
अँकर - रोहा तालुक्यात आज पहाटेपासून जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू झाली. रोहा शहराच्या बाजारपेठ, दमखाडी, छत्रपती शिवाजी नगर, त्रिमूर्ती नगर, नगर परिषद परिसर, वरसे आणि भुवनेश्वर येथे रस्त्यांवर पाणी साचले. पावसाने अचानक घेतलेल्या जोरदार धरल्याने काही घरांमध्ये पाणी शिरले आणि नागरिकांची धांदल उडाली. कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.
दरम्यान, रायगड जिल्ह्यास पुढील २४ तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून नदीकाठच्या गावांसह सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाकडून आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
0
Share
Report
PPPRANAV POLEKAR
FollowJul 15, 2025 07:34:59Ratnagiri, Maharashtra:
खेड येथे मच्छी मार्केटच्या पाठीमागे रस्त्यावर महिला पुराच्या पाण्यामध्ये फसली होती त्या महिलांना सुरक्षित पाण्यातून बाहेर काढून तिला सुखरूप घरी पाठवण्यात आलं त्यावेळी सरफराज पांगारकर एजाज खेडेकर, खालील जुईकर उपस्थित होते
अल सफा वेल्फेअर फाउंडेशनचे कार्यकर्ते सोबत होते
0
Share
Report