Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Dhule424001

मोबाईल हॅकिंगच्या भीतीने २० वर्षीय विद्यार्थ्याने घेतला आत्महत्या!

PPPRASHANT PARDESHI
Jul 08, 2025 03:01:33
Dhule, Maharashtra
ANCHOR - शिरपूर तालुक्यातील ताजपुरी येथे एका २० वर्षीय बी. फार्मसीच्या विद्यार्थ्याने मोबाईल हॅक होऊन फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याच्या भीतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बंटी उर्फ किशन जितेंद्र सनेर (२०), असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. थाळनेरजवळ असलेल्या ताजपूरी गावातील सनेर कुटुंबाचा एकुलता एक मुलगा असलेल्या किशनने राहत्या घरी साडीने गळफास घेतला. कुटुंबियांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अज्ञात व्यक्तीने मृत किशनचा मोबाईल हॅक करून काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते. ही बाब किशनच्या लक्षात आल्यानंतर तो नैराश्यात गेला आणि त्यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले, असे बोलले जात आहे. या घटनेची थाळनेर पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. पोलीस अधिकारी शत्रुघ्न पाटील यांनी सांगितले की, मोबाईल हॅकची माहिती समोर आली असून, त्या दिशेने चौकशी सुरू आहे. यासाठी किशनचे काही निकटवर्तीय आणि मित्रांकडे विचारपूस करण्यात येणार असून, त्याचा मोबाईल देखील तपासला जाऊ शकतो. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. byte - स्थानिक byte - शत्रूगन पाटील, प्रभारी अधिकारी प्रशांत परदेशी, धुळे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top