Back
माळीण दुर्घटनेला 11 वर्ष: 151 जीवांचे दुर्दैवी नुकसान!
HCHEMANT CHAPUDE
Jul 30, 2025 03:16:12
Ambegaon, Maharashtra
Feed 2C
Slug: Malin 11 Year
File:02
Rep: Hemant Chapude (Ambegaon)
Anc:आंबेगाव तालुक्यातील माळीण दुर्घटनेला आज 11 वर्ष पूर्ण होत आहेत, 30 जुलै 2014 रोजी भूस्खलन होऊन डोंगराखाली संपूर्ण माळीण गाव गाडलं गेलं, या दुर्दैवी घटनेत 151 नागरीकांचा मृत्यू झाला तर 900 पेक्षा जास्त मुक्या प्राण्यांना यात आपल्या जीव गमवावा लागला आजही या आठवणीने माळीण वासीयांना अश्रृ अनावर होत आहेत,याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...
Wkt: हेमंत चापुडे (प्रतिनिधी)
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया आंबेगाव पुणे...
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
YKYOGESH KHARE
FollowJul 30, 2025 17:45:14Nashik, Maharashtra:
Breaking -
nsk_ashimatrasnfer
images 2 vidoe 2
- आयएएस अधिकारी अशिमा मित्तल यांची बदली
- मित्तल आता जालन्याच्या नव्या जिल्हाधिकारी
- मित्तल सध्या नाशिक जिल्हा परिषदेच्या सीईओ म्हणून होत्या कार्यरत
- सीईओ पदाचा तात्पुरता कार्यभार विभागीय आयुक्त पाहणार
- नाशिक जिल्हा परिषदेच्या सीईओ पदावर कुणाची वर्णी लागणार याकडं लक्ष
14
Report
NMNITESH MAHAJAN
FollowJul 30, 2025 17:30:44Jalna, Maharashtra:
FEED NAME | 3007ZT_JALNA_TRANSFER(2 FILES)
जालना : जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांची ठाण्याच्या जिल्हाधिकारीपदी बदली,आशिमा मित्तल जालन्याच्या नव्या जिल्हाधिकारी
अँकर : जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांची ठाण्याच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.त्यांच्या जागी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची जालना जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागानं मित्तल यांच्या नियुक्तीचे आदेश काढले आहे.जालन्यात गाजलेल्या 2024 मधील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याचा तपास जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली 8 सदस्यीय समितीने केला होता.यात दोषी आढळून आलेल्या 21 पेक्षा अधिक तलाठी,मंडळाधिकारी यांना निलंबित करण्याचे आदेश पांचाळ यांनी काढले होते.या घोटाळ्याचा तपास अजूनही सुरूच असताना पांचाळ यांची बदली झाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
14
Report
SGSagar Gaikwad
FollowJul 30, 2025 17:00:46Nashik, Maharashtra:
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_sp_byte
2008 साली मालेगाव मध्ये झालेल्या बॉम्ब स्फ़ोट चा निकालाच्या पश्वभूमीवर पोलीस सज..
बॉम्बे स्पोर्ट मध्ये सहा लोकांचा झाला होता मृत्यू
अँकर
2008 साली नाशिकच्या मालेगाव मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट खटलेचा निकाल उद्या लागणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलीस सज्ज झाली आहे मालेगाव शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. 2008 मध्ये मालेगाव मध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते. याप्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंग कर्नल प्रसाद पुरोहित सह जण संशयित आरोपी होते...याचा खटला कोर्टात सुरु होता तब्बल 17 वर्षांनी याचा निकाल लागणार आहे. निकाला नंतर कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील हे मालेगाव मध्ये विशेष लक्ष ठेऊन आहे ..
बाईट : बाळासाहेब पाटील ( पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण )
14
Report
AKAMAR KANE
FollowJul 30, 2025 17:00:11kolhapur, Maharashtra:
Ngp Chess fan
live u ने फीड पाठवले
------
नागपूर
फीडे वुमेन्स वर्ल्ड कप 2025 मध्ये विजेती ठरलेली वर्ल्ड चॅम्पियन बुद्धीबळपटू दिव्या देशमुखचे थोड्या वेळात नागपूरच्या विमानतळावर आगमन होणार आहे.. यावेळी महाराष्ट्र चेस असोसिएशन कडून तिचे नागपूर विमानतळावर स्वागत केले जाणार आहे.. नागपूरकर ही आपल्या या चॅम्पियन खेळाडूचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर पोहचले आहेत.. यावेळी त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी
14
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 30, 2025 16:46:22Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 3007ZT_CHP_KATTA_MURDER
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर शहरातील जुनोना चौकातील विक्तूबाबा मठ परिसरात बंदुकीचा थरार, देशी कट्ट्यातून गोळ्या झाडून भावाची हत्या, बुद्धा टाक 45 असे मयताचे नाव, त्याच्या सख्ख्या भावानेच केली राहत्या घरी हत्या
अँकर:--चंद्रपूर शहरातील जुनोना चौकातील विक्तूबाबा मठ परिसरात बंदुकीचा थरार बघायला मिळाला आहे. संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास देशी कट्ट्यातून गोळ्या झाडून भावाची हत्या करण्यात आली आहे. बुद्धा टाक 45 असे मयताचे नाव असून त्याच्या सख्ख्या भावानेच राहत्या घरी ही हत्या केली. गोळ्या झाडून आरोपी भाऊ सोनू टाक फरार झालाय. या घटनेत आणखी एक आरोपी सामील असल्याचा संशय आहे. मयत आणि आरोपी यांच्यावर याआधी अनेक गुन्हे दाखल आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोचले आहेत. श्वान पथक, फॉरेन्सिक चमुच्या मदतीने घटनेचे धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलिसांनी मृतदेह रुग्णालयात पाठवून घटनेचा तपास सुरू केलाय. जमिनीच्या वादातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
14
Report
ABATISH BHOIR
FollowJul 30, 2025 16:00:40Kalyan, Maharashtra:
फेरीवाला प्रश्नावरुन केडीएमसी आयुक्तांच्या दालनासमोर उद्धव ठाकरे गटाचे ठिय्या...
Anc..कल्याण-डोंबिवली स्टेशन परिसर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फेरीवाला मुक्त करण्यात यावा या मागणीसाठी उद्धव ठाकरे सेने कडून डोंबिवलीत महापालिका प्रशासनाच्या विरोधात बेमुदत उपोषण सुरु आहे. या मुद्यावर चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे गटाचे शिष्टमंडळ आज महापालिका आयुक्तांकडे पोहचले. स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करण्याचे लेखी आश्वासन द्या असा आग्रह धरला. चर्चे दरम्यान आयुक्त अभिनव गोयल यांचा संयम ढळल्याचा आरोप महिला पदाधिकाऱ््याने केला. या कारणावरुन शिष्टमंडळाने चर्चा सोडून आयुक्तांच्या दालना बाहेर ठिय्या दिला.
vo..पुन्हा आयुक्तांनी त्यांच्याशी चर्चा केली. लेखी आश्वासन देण्याचे मान्य केल्याचे उद्धव ठाकरे गटचे शिष्टमंडळाने सांगितले.
उद्धव गटाचे शहर प्रमुख अभिजीत सावंत यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डोंबिवली स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करण्यासाठी ११ जून पासून स्टेशन परिसरात बेमुदत उपाेषण सुरु केले होते.पुन्हा तीन दिवसान पासून हे उपोषण सुरु होते. त्यांना त्यावेळी आश्वसन दिले गेले. त्यावेळी उपोषण मागे घेण्यात आले. त्यानंतर दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झाली नाही. अखेरीस शहर प्रमुख सावंत यांनी पुन्हा २१ जुलै रोजी स्टेशन परिसरात बेमुदत उपोषण सुरु केले. त्यांच्या उपोषणाचा आज दहावा दिवस होता. स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करण्याच्या मागणीवर आग्रही असलेल्या उद्धव ठाकरे गटचे पदाधिकारी, आयुक्तांची भेट घेतली. शिष्टमंडळाला स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करण्याचे आयुक्तांकडून लेखी आश्वासन हवे होते. चर्चेच्या वेळी आयुक्त महिला पदाधिकारी दरेकर यांच्यावर आेरडले. या कारणावरुन शिष्टमंडळाने आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या दिला. पुन्हा आयुक्तांनी त्यांना चर्चेकरीता बोलविले. फेरीवाला प्रश्न लेखी आश्वासन देण्याचे मान्य केले असल्याचे सावंत यांनी सांगितले.
Byte...योगेश गोडसे
अतिरिक्त आयुक्त
Byte... वैशाली दरेकर
ubt.. पदाधिकारी
14
Report
MKManoj Kulkarni
FollowJul 30, 2025 15:45:59Mumbai, Maharashtra:
अँकर -- खराब हस्ताक्षर काढल्याने खाजगी शिकवणीतील शिक्षिकेने तिसरीच्या विद्यार्थ्याच्या हातावर दिले जळते मेणबत्तीचे चटके,यामुळे
पालकांनी संताप व्यक्त केला असून पोलीस कारवाई करण्यात आली आहे.
मुंबईच्या मालाड पूर्व येथील फिल्मसिटी रोडवरील गोकुळधाम परिसरात घडलेली ही घटना प्रत्येक संवेदनशील नागरिकाच्या मनात संताप आणणारी आहे. एका खासगी शिकवणीत तिसरीत शिकणाऱ्या चिमुरड्याला फक्त हस्ताक्षर नीट काढता येत नाही म्हणून शिक्षिकेने जळत्या मेणबत्तीचे चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटलेल्या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांनी संताप व्यक्त केला असून या प्रकरणी कुरार पोलीस ठाण्यात सदर शिक्षिका विरोधक तक्रार दिली असून पोलिसांकडून गुन्हा दाखल करून कारवाई सुरू झाली आहे.आरोपी शिक्षिकेचे नाव राजश्री राठोड असल्याचे पोलिसांनी सांगितले असून पुढील चौकशी करत असल्याचे स्पष्ट केले.
No byte
मनोज कुळकर्णी
पोलिस स्टेशन vdo २C
14
Report
APAMOL PEDNEKAR
FollowJul 30, 2025 15:33:36Mumbai, Maharashtra:
अँकर
मुंबईच्या रस्त्यांवरील एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरस होतोय . सध्या स्वानंद ना कार चालवण्याचा ट्रेडिंग दिल जात आहे की काय असा प्रश्न हा व्हिडिओ पाहिल्यावर सर्वांनाच पडतोय.मुंबईच्या अंधेरी भागात भर रस्त्यात एक कार पार्क केलीये आणि या कार मध्ये स्टेरिंग वर मालकाने चक्क आपल्या श्वानालाच गाडीचं सारथ्य करायला दिलाय श्वानाला स्टेरिंग वर बसून हा मालक गाडीतून निघून गेलाय ज्यामुळे या कारच्या मागे बेस्ट बस अडकून पडली आहे एकीकडे बसमधील प्रवाशांची आग पकडते मात्र कारच्या स्टेरिंग व्हील वर बसलेला हा श्वान निवांतपणे आपल्या मालकाची वाट पाहतोय .
मराठी
14
Report
YKYOGESH KHARE
FollowJul 30, 2025 15:01:02Nashik, Maharashtra:
nsk_blastcasestudy
feed by 2C
vidoe 10 images 4
Anc : Anchor नाशिक जिल्ह्यातील मालेगाव या सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील शहरात झालेल्या शक्तिशाली बॉम्बस्फोटाच्या सतरा वर्षांनंतर एनआयए विशेष न्यायालय गुरुवारी निकाल देणारे.
विशेष न्यायाधीश ए.के. लाहोटी यांनी सर्व आरोपींना ३१ जुलै रोजी न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या ब्लास्टमध्ये पीडित आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत
VO 1 :- 2008 साली मालेगावात ज्या भिक्कू चौकात बॉम्ब ब्लास्ट झाला होता त्याठिकाणी काही दुकानाच्या शटरला छऱ्यामुळे पडलेले छिद्र आजही कायम आहेत... इतकेच नव्हे तर एका हॉटेल मध्ये भिंतीवर असलेली घड्याळ बंद पडली होती ती घड्याळ बॉम्ब ब्लास्टची आठवण म्हणून हॉटेल मालकाने आज ही त्याचं भिंतीवर तशीच ठेवली आहे ...बॉम्ब ब्लास्ट झाल्यानंतर बंद पडलेली ही घड्याळ आज ही बंद असून त्यात 9 वाजून 35 मिनिट दाखविले जात आहे यांचा अर्थ बॉम्ब ब्लास्ट 9 वाजून 35 मिनटानी झाला होता. त्यावेळी घडलेला प्रकार सांगताना हॉटेल मालक खलील अहेमद काहीसे भावुक झाले
*बाईट:-खालील अहेमद, हॉटेल मालक*
VO2 : या बॉम्ब ब्लास्ट मध्ये जे 6 लोक मृत्यूमुखी पडले होते त्यात 10 वर्षाची परवीन देखील होती ती वडापाव घेण्यासाठी घराच्या बाहेर पडली होती आणि बॉम्ब ब्लास्ट मध्ये तीचा मृत्यू झाल्याचे तीच्या वडिलांनी सांगितले..या प्रकरणात दोषी असलेल्याना कडक शिक्षा देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
*बाईट:-लियाकत शेंख, मृत्यूमुखी पडलेल्या मुलीचे वडील*
VO 3 : मालेगावातील या बॉम्बस्फोटामध्ये सहा जणांचा मृत्यू आणि 101 जण जखमी झाले होते. या प्रकरणात एकूण १२ आरोपी होते ज्यापैकी पाच जणांना निर्दोष सोडण्यात आले आहे. नुकतेच मुंबई साखळी स्फोटातील सर्व आरोपी निर्दोष सुटले आहेत. मात्र 17 वर्षापूर्वी झालेल्या मालेगाव बॉम्ब ब्लास्ट प्रकरणी पीडितांना न्याय मिळेल का ? आरोपी निर्दोष सुटतात की त्यांना शिक्षा मिळते हे बघणं महत्वाचं ठरेल...
14
Report
MKManoj Kulkarni
FollowJul 30, 2025 14:47:05Mumbai, Maharashtra:
अँकर --जागतिक बुद्धिबळ
FIDE महिला विश्वचषक २०२५ चॅम्पियन महाराष्ट्राची लेक दिव्या देशमुख जिंकल्यानंतर आज दुपारी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झालं.
FIDE महिला विश्वचषक २०२५ चॅम्पियन जिंकणारी पहिली भारतीय महिला आहे. विमानतळावर तिच विमानतळ अधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात आलं.
अवघ्या १९ व्या वर्षी, दिव्याने प्रतिष्ठित FIDE महिला विश्वचषक २०२५ चॅम्पियन जिंकून ग्रँडमास्टर किताब मिळवून इतिहासात आपले नाव कोरले, ती भारताची ८८ वी ग्रँडमास्टर आणि ही उल्लेखनीय कामगिरी करणारी फक्त चौथी भारतीय महिला बनली. तिचा विजय जागतिक बुद्धिबळात भारताच्या वाढत्या वर्चस्वाच उदाहरण आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला तिच्या पुनरागमनाचा आनंद साजरा करण्यात आला.
मनोज कुळकर्णी
फोटो २C
14
Report
GMGANESH MOHALE
FollowJul 30, 2025 14:46:58Washim, Maharashtra:
वाशिम:
File:3007ZT_WSM_NAG_MAKAK_RALLY
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर:वाशिमच्या मंगरुळपिर तालुक्यातील कोठारी व कवठळ या गावात तसेच परिसरात शेकडो वर्षांपासून पासून चालु असलेल्या प्रथे नुसार नागपंचमी च्या दुसऱ्या दिवशी गांवातून नाग मखराची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली आहे.कोठारी येथे नागपंचमीला वारूळ पुजना नंतर रघुनाथ बाबा मंदीर व लक्ष्मी माता मंदीरात पुजा,आरती, होम हवन करून मखराची विधिवत स्थापना करण्यात येतंय मखर स्थापना झाली तेंव्हा पासुन बाऱ्यांना सुरुवात करण्यात आली आज नाग मखराची मोठ्या उत्साहात वाजत गाजत संपुर्ण गावातुन मिरवणुक काढण्यात आली. दरम्यान गांवातील चौका चौकात मखराचे पुजन करून ग्रामस्थांनी दर्शन घेतले.मिरवणूक संपल्या नंतर कोठारी परिसरातील गांव तलावात मखराचे विसर्जन करण्यात आले.
14
Report
SKSudarshan Khillare
FollowJul 30, 2025 14:11:15Vaijapur, Maharashtra:
अँकर:-
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शनिदेवगाव येथे सदगुरू योगीराज गंगागिरी महाराज यांच्या १७८व्या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याची सुरुवात भव्य मिरवणुकीने करण्यात आली.
या उत्सवासाठी गावात भक्तिमय वातावरण तयार झाले असून, पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. महंत रामगिरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली सोहळ्याची सुरुवात झाली. यावेळी राज्याचे कृषी मंत्री मा. माणिक कोकाटे यांनीही हजेरी लावली आणि गंगागिरी महाराजांच्या कार्याचे गौरवोद्गार काढले.
मिरवणुकीमध्ये ढोल-ताशांचे पथक, पालखी, भजनी मंडळ, बालवृंद, आणि महिलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. संपूर्ण शनिदेवगाव 'हरिनामाच्या' गजरात न्हालं होतं.
या सप्ताहामध्ये कीर्तन, प्रवचन, आरती, महाप्रसाद अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, येत्या काही दिवसांत हजारो भाविकांच्या उपस्थितीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
14
Report
JMJAVED MULANI
FollowJul 30, 2025 14:10:23Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 3007ZT_INDAPURCOURT
FILE 1
इंदापूरात राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत न्यायालयीन कामकाजासाठी आले होते एकत्र...
ANCHOR:- 2012 मध्ये इंदापूरमध्ये ऊस दरवाढीसाठी झालेल्या आंदोलनातील खटल्याच्या सुनावणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी कृषी मंत्री सदाभाऊ खोत हे आज इंदापूर न्यायालयात हजर राहिले. 13 वर्षांपूर्वी दाखल झालेल्या विविध खटल्याच्या तारखेसाठी ते आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर विविध गुन्हे दाखल करण्यात आले होते.
इंदापुरात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात आले होते.शेट्टी आणि खोत जरी न्यायालयीन कामकाजासाठी एकत्र आले असले तरी संवाद सोडाच मात्र एकमेकांकडे पाहणे देखील टाळले.
14
Report
SRSHRIKANT RAUT
FollowJul 30, 2025 13:52:25Yavatmal, Maharashtra:
AVB
Anchor : महिला आर्थिक विकास महामंडळ सीएमआरसी केंद्राच्या कंत्राटी कर्मचारी संघाने आपल्या प्रलंबित मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आझाद मैदानात
धरणे आंदोलन केले. लोकसंचालित साधन केंद्रातील कर्मचाऱ्यांना मासिक मानधन व प्रशासकीय खर्चाकरिता २५ लक्ष रु. निधी महाराष्ट्रातील सर्व लोकसंचालित साधन केंद्राला उपलब्ध करुन द्यावेत. समुदाय साधन व्यक्ती यांना उमेद प्रमाणे ६०००/-रु. मासिक मानधन करिता तरतूद द्यावी, प्रत्येक गटाला ३०,०००/-रु. फिरता निधी तसेच ७% व्याजदराने बँक कर्ज उपलब्ध करुन देण्यात यावे अशा मागण्या करण्यात आल्या.
बाईट : सुनंदा मानकर,
14
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 30, 2025 13:50:06Gadchiroli, Maharashtra:
Feed slug :--- 3007ZT_GAD_UIKE_VISIT
( single file sent on 2C)
टायटल:-- गडचिरोली दौऱ्यावर आलेल्या आदिवासी विकास मंत्री डॉ. उईके यांनी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद, उच्च ध्येय गाठण्याचे केले आवाहन
अँकर:-- राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी आज गडचिरोली शहरातील सेमाना रोड येथील शासकीय इंग्रजी माध्यम आदिवासी आश्रमशाळेला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांना आदिवासी संस्कृतीचे जतन करण्याबरोबरच उच्च शिक्षण घेऊन देशाच्या विकासात योगदान देण्याचे आवाहन केले. "खूप शिका, मंत्री व्हा, कलेक्टर व्हा," असे प्रेरणादायी शब्द त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून उच्चारले. डॉ उईके आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना निसर्गाची काळजी घेण्याचा संदेश त्यांनी दिला. भेटीदरम्यान, मंत्र्यांनी मुलींच्या वसतिगृहात जाऊन तेथील निवास, भोजन आणि इतर सुविधांची पाहणी केली. विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी त्यांनी काही महत्त्वपूर्ण सूचनाही केल्या. यासोबतच वसतिगृहात महापुरुषांचे फोटो लावणे, विद्यार्थ्यांसाठी आचारसंहितेचे फलक लावणे, आणि अभ्यागतांसाठी बसण्याची व्यवस्था सुधारित करणे यांसारख्या सूचना दिल्या.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
गडचिरोली
14
Report