Back
रक्षाबंधनावर 100 वर्षांची बहिण आणि 104 वर्षांचा भाऊ, नात्याची खरी किंमत!
KJKunal Jamdade
Aug 09, 2025 08:21:54
Shirdi, Maharashtra
Anc - सध्याच्या युगात अनेक नाती कमकुवत होत असताना, नात्यांची खरी किंमत काय असते, हे दाखवणारा एक अनोखा सोहळा अहिल्यानगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यात पाहायला मिळाला. येथील जोगेश्वरी आखाडा येथे 100 वर्षांच्या बहिणीने आपल्या 104 वर्षांच्या भावाला राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.जोगेश्वरी आखाडा येथील ह.भ.प. नारायण डौले (वय 104) आणि त्यांची धाकटी बहीण पार्वताबाई भुजाडी (वय 100) यांनी हा सोहळा साजरा केला. या दोघांनीही वयाची शंभरी पार केली असली तरी, त्यांच्यातील भावा-बहिणीचे प्रेम आजही तितकेच घट्ट आहे. पार्वताबाईंनी नारायण डौले यांना राखी बांधताना त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहण्यासारखे होते.सध्या सोशल मीडियावर या दोघांचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.या शतायुषी रक्षाबंधनाने अनेक लोकांना भावूक केले असून त्यांच्यातील अतूट नात्याची चर्चा सर्वत्र होत आहे.
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PTPRAVIN TANDEKAR
FollowAug 09, 2025 17:45:24Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 0908_BHA_MURDER
FILE - 10 VIDEO
भंडारा शहरातील मुस्लिम लायबरी चौकात दोघांचा खून...
Anchor :- भंडारा शहरातील मुस्लिम लायबरी चौकात दोघांचा खून करण्यात आला आहे. अज्ञात लोक येऊन मुस्लिम लायबरी चौकात उभे असलेल्या टिंकू खान, शशांक गजभिये यांच्यावर चाकूने सपासप वार केला यात शशांक गजभिये याचा जागीच मृत्यू झाला तर टिंकू खान याला रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी भंडारा शहरात डब्बल मर्डर झाल्याने जागोजागी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. जुन्या वैमनस्यातून खून झाल्याचं बोलले जात आहे.
12
Report
PNPratap Naik1
FollowAug 09, 2025 17:31:28Kolhapur, Maharashtra:
करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीवर तातडीने संवर्धन प्रक्रिया केली जाणार
दिनांक 11 आणि 12 ऑगस्ट रोजी केली जाणार संवर्धन प्रक्रिया
भारतीय पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षणानुसार केली जाणार अंबाबाई देवीच्या मूर्तीची संवर्धन प्रक्रिया
दिनांक 11 आणि 12 ऑगस्ट रोजी भाविकांना अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन घेता येणार नाही
या कालावधीत अंबाबाई देवीच्या उत्सव मूर्तीच दर्शन घ्यावं लागणार
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांची प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती
14
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowAug 09, 2025 17:31:24Junnar, Maharashtra:
Feed 2C
Slug: Junnar Bharne Voting Theft
File:03
Rep: Hemant Chapude(Junnar)
Byte :-
*दत्तात्रय भरणे कृषीमंत्री*
- केंद्रात आणि राज्यात कृषीमंत्री मामाच आहे
- आम्ही दोन्ही मामा कृषीमंत्री म्हणुन शेतकऱ्यांच्या अडचणी समजुन घेऊन नवीन योजना शेतकरी हिताचे निर्णय घेऊ..
- शेतक-यांना शेती परवडत नाही हा शेतक-यांचा समज असतो हि अडचण किंवा चुक नसते
- *शेती करत असताना अचानक बाजारभाव कमी जास्त होतात,नुकसान होते,काही शेतक-यांना शेतीतुन पैसे मिळतात तर काहीना मिळत नाही त्यामुळे शेती शाश्वत नाही यासाठी शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे या शेती शाश्वत होण्यासाठी प्रयत्न करणार*
- *शेती परवडत नाही हे शेतक-यांची मत चुकीचं नाही दत्ता मामांनी कबुली देत शेतक-यांच्या भावना रास्त असल्याचे म्हटलं*
*On - टोमँटोला उच्चांकी बाजारभाव दिला*
- बाजार समितीतल्या लिलावाचा अनुभव हा लहान पणापासुनचा आहे
- माझ्या हातुन टोमँटोला भाव शेतक-यांना मिळाला हाच भाव चढत रहावो..
*मत चोरी आणि शरद पवारांचा दावा*
- जय पराजय प्रत्येकाच्या वाट्याला असतो त्यामुळे पराभव पण स्विकारला पाहिजे विजय हा विजयच असतो
- *मतदारांच्या मताची चोरी होते हे म्हणणं चुकीचं तसं असतं तर आम्हीही आमच्या सहकार्यांचा पराभव होऊन दिला नसता त्यामुळे मतांची चोरी होतेय हे म्हणणं चुकीचं असं ठाम मत कृषीमंत्री दत्तामामा भरणेंनी व्यक्त केलं*
-
- शरद पवारांनी केलेला दावा असं म्हणणं चुकीच पण यावर राज्याचे नेते बोलतील
-
*शेती प्रयोग..बारामतीचा उल्लेख टाळला*
- शेतीतील नाविन्यपूर्ण प्रयोग करणारे पुणे जिल्ह्यात दोनच तालुके असल्याचे सांगत कृषीमंत्री दत्तामामा भरणेंनी बारामतीचा उल्लेख टाळला त्यावर बोलताना शेतातले नाविन्यपूर्ण प्रयोग जुन्नर आणि इंदापूर तालुक्यातच केले जातात असा दावा कृषीमंत्र्यांनी केलाय
- शेततळी,द्राक्षबागा कुठं आहे हे पहावे सुरुवात करताना पुणे जिल्ह्यात जुन्नर आणि इंदापूर हे दोन तालुके पुढे दिसतात असं म्हणत बारामतीच्या शेती प्रयोगांवर यशस्वी कामगिरीवर कृषीमंत्री भरणेंनी बोलणं टाळलं
Byte: दत्तामामा भरणे (कृषीमंत्री)
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया जुन्नर पुणे...
14
Report
SRSHRIKANT RAUT
FollowAug 09, 2025 17:30:43Yavatmal, Maharashtra:
AVB
Anchor : यवतमाळ च्या पुसद येथील
वसंतनगरमध्ये फुटबॉल खेळण्याच्या वादातून गोळीबार झाल्याने परिसर हादरून गेला आहे. गोळीबारमध्ये अजिज खान फतेह खान हा व्यक्ती जखमी झाला आहे. बंदुकीतून झाडलेली गोळी पोटाला चाटून गेल्याने ते थोडक्यात बचावले. जखमीचा मुलगा हसन खान याने दिलेल्या तक्रारीवरून चार जणांविरोधात गुन्हे दाखल झाले आहे. हसनचा मावस भाऊ व शेख साहिल यांच्यामध्ये फुटबॉल खेळण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला होता. त्यानंतर गोळीबाराची घटना घडली. दरम्यान पोलिसांनी परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
बाईट : हसन खान
14
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowAug 09, 2025 17:16:41Junnar, Maharashtra:
Feed 2C
Slug: Junnar Farmer Loss Bharne
File:02
Rep : Hemant Chapude(Junnar)
Anc :-शेती परवडत नाही, परवडत नाही" अशा शेतकऱ्यांची सततच्या बोलण्यावरुन आता कृषीमंत्री दत्तामामा भरणेंनी शेतक-यांनाच सुनावलेय
Vo :- मुंबईत राहून शेती परवडत नाही असे रडगाणे गायचे, पण शेतीत चढ-उतार होतातच, असं स्पष्ट करत उच्चशिक्षित तरुण प्रयोगशील शेती करत असल्याचं उदाहरणही त्यांनी दिलं.यावेळी मनातील खंत व्यक्त करताना ते म्हणाले मला हलकं-फुलकं आवडतं तो आनंद गोड असतो. सर्वजण सुखी नसतात, प्रत्येकाला कुठेतरी दु:ख असतं. मंत्र्यालाही किती वेदना असतात ते मला माहीत आहे; दिसतं तसं नसतं, म्हणूनच जग फसतं माजी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधानानंतर शेती परवडत नाही यावरुन दत्तामामा भरणेंनी शेतक-यांनाच सुनावलेय जुन्नर तालुक्यातील पिडिसीसी बँकेच्या शाखा उद्घाटन प्रसंगी बोलत होते
Byte :- दत्तामामा भरणे (कृषीमंत्री)
*(शेती परवडत नाही)*
*(दिसतं तसं नसतं म्हणुन जग फसतं)*
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया जुन्नर पुणे...
14
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowAug 09, 2025 16:00:16Narayangaon, Maharashtra:
Feed 2C
Slug: Narayangaon Bharne Tomato
File:01
Rep: Hemant Chapude(Narayangaon)
ब्रेकिंग जुन्नर पुणे
- पुणे मुंबई टोमँटोने शंभरी घाटलीय
- टोमँटोचे हब असलेल्या नारायणगाव बाजारात थेट कृषीमंत्री दत्तामामा भरणेंनी टोमँटोच्या लिलावाची बोली लावली
- कृषिमंत्र्यांच्या लिलावातुन टोमँटोला उच्चांकी बाजारभाव
- टोमँटोला ७० रुपये किलो मिळाला बाजार
- २० किलो कँरेटला १४०० रुपयांनी कृषी मंत्र्यांना फोडला बाजार
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया नारायणगाव पुणे...
14
Report
MAMILIND ANDE
FollowAug 09, 2025 14:50:30Wardha, Maharashtra:
वर्धा स्टोरी
SLUG- 0908_WARDHA_HEAVY_RAIN
वर्ध्याच्या पाच गावांत ढगफुटीसदृश पाऊस
घरांमध्ये शिरले पाणी, शेतशेवार जलमय, नागरिकांचे नुकसान.
अँकर - वर्धा जिल्ह्यात ढगफुटीसदृश पावसाने कहर केला आहे. आर्वी तालुक्यातील धनोडी (बहादूरपूर), दिघी होणाडे, सायखडे, वडगाव आणि हिरवारीठ या पाच गावांत तब्बल दोन तास मुसळधार पाऊस कोसळला. या पावसाने नदी-नाले तुडुंब भरले, तर धनोडी परिसरात वाहणाऱ्या नाल्याचं पाणी थेट गावात शिरलं. अनेक घरांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांचे संसार साहित्य भिजून नासधूस झाली. शेतशिवार जलमय झाल्याने कपाशी, सोयाबीन आणि तूर या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून ग्रामस्थांना मोठा आर्थिक फटका बसलाय.
14
Report
SKSACHIN KASABE
FollowAug 09, 2025 14:47:32Pandharpur, Maharashtra:
09082025
Slug - PPR_RAKHI_ALNKAR
file 02
------
Anchor - आज राखी पौर्णिमा निमित्ताने विठोबाला सोन्याची राखी मनगटावर बांधण्यात आली. तसेच श्री विठ्ठल रूक्मिणी मातेस पारंपारिक अलंकार परिधान करण्यात आले आहेत.
श्री विठ्ठलास सोने मुकुट, नाम, कौस्तुभ मणी, मोत्याचा तुरा, दंडपेट्टया जोड, हि-याचा कंगन जोड, मोत्याची कंठी, मोत्याचा हार, बाजीराव कंठी, मत्स्य जोड, तुळशीची माळ, सहा पदरी जान्हवे, लहान-मोठा शिरपेच, राखी तसेच श्री रूक्मिणी मातेस सोने मुकुट, वाक्या जोड, तोडे जोड, तानवड जोड, चिंचपेटी तांबडी, जवमणी पदक, जवेच्या माळा, लक्ष्मीहार, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, सरी, कंबरपट्टा इत्यादी अलंकार परिधान केले.
14
Report
AAASHISH AMBADE
FollowAug 09, 2025 14:32:32Gadchiroli, Maharashtra:
Feed slug :--- 0908ZT_GAD_DRIVER_ARREST
( single file sent on 2C)
टायटल:-- गडचिरोली जिल्ह्यातील काटली येथील अपघातात चार मुलांच्या मृत्युस कारणीभूत ठरलेल्या ट्रक चालकास गडचिरोली पोलीसांनी घेतले ताब्यात, 48 तासांहून अधिक प्रयास करुन केलेल्या तपासाअंती झाले निष्पन्न
अँकर:-- गुरुवारी पहाटे गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी ते गडचिरोली महामार्गावर एका अज्ञात ट्रकने सकाळी फिरायला गेलेल्या सहा मुलांना चिरडल्याची घटना घडली होती. यामध्ये दोन मुलांचा घटनास्थळीच मृत्यु झाला व दोघांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला होता. तसेच अपघातामध्ये जखमी झालेल्या इतर दोन मुलांना हेलीकॉप्टरच्या मदतीने नागपूर येथे खाजगी रुग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले होते. या घटनेतील ट्रक व ट्रक चालकाचे निष्पन्न झाले असून पोलिसांनी त्यांना छत्तीसगड राज्यातून अटक केली आहे. आव्हानात्मक अशा स्वरुपाच्या या गुन्ह्राच्या तपासादरम्यान पोलीस पथकांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, सिसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने गुन्ह्रातील ट्रकचा बारकाईने शोध घेतला तसेच न्याय वैद्यकीय प्रयोगशाळा, नागपूर येथील पथकाकडून प्राप्त पुराव्यांच्या मदतीने ट्रकचा गुन्ह्रामधील सहभाग निष्पन्न करुन वाहनाला छत्तीसगड राज्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी ट्रक चालक नामे
1) प्रविण बाळकृष्ण कोल्हे, वय 26 वर्षे, रा. चिचगड, ता. देवरी, जि. गोंदिया
2) सुनिल श्रीराम मारगाये, वय 47 वर्षे, रा. चिचगड, ता. देवरी. जि. गोंदिया , सहचालक
यांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून आरोपींना न्यायालयासमक्ष हजर करण्याची तजवीज करण्यात आली आहे. गडचिरोलीचे शहर पोलीस गुन्ह्राचा पुढील तपास करीत आहेत.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
गडचिरोली
14
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowAug 09, 2025 14:02:45Dhule, Maharashtra:
Anchor- जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने धुळे शहरातील आदिवासी मुला मुलींच्या वस्तीगृहातील विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली काढण्यात आली होती, साक्री रोड वरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून राहिलेला सुरुवात करण्यात आली. यावेळी आदिवासी समाजाचे संवर्धन संगोपन करण्याच्या उद्देशाने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. आदिवासींची पारंपारिक वेशभूषा यावेळी विद्यार्थ्यांनी परिधान केले होते. विद्यार्थ्यांच्या वतीने आदिवासी नृत्य देखील सादर करण्यात आले.
Byte - मनीष पाटकरी, गृहपाल
प्रशांत परदेशी, धुळे.
14
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowAug 09, 2025 14:02:20Dhule, Maharashtra:
Anchor- धुळे महानगरपालिकेच्या वरखेडी कचरा डेपोला वारंवार आग लागल्याचे प्रकार समोर आले आहेत. या कचरा डेपोला मोठ्या प्रमाणात आग लागून धुराचे लोट मोठ्या प्रमाणात पसरले आहेत, त्यामुळे परिसरातील वरखेडी, कुंडाणे, आर्णी यासह इतर गावांच्या ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. धुराचे लोट एवढ्या मोठ्या प्रमाणात असून रस्त्यावरून ये जा करणाऱ्यांना देखील काही दिसत नाहीत. त्यामुळे अपघात देखील घडत आहे. अनेकदा परिसरातील नागरिकांनी कचरा डेपो हलवावा अशी मागणी महापालिकेकडे केली होती मात्र पालिकेने याकडे सक्षम दुर्लक्ष केले आहे. अनेकांना या धुरामुळे श्वसनाचे आजार देखील उद्भवत आहे, त्यामुळे हा डेपो हटवावा अशी मागणी आता ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे. मात्र झोपेचं सोंग घेतलेला महापालिका प्रशासन याकडे सोयीने दुर्लक्ष करीत आहे.
Byte - ग्रामस्थ
प्रशांत परदेशी, धुळे.
14
Report
SKSudarshan Khillare
FollowAug 09, 2025 13:46:10Yeola, Maharashtra:
अँकर:- पुणे- इंदोर महामार्गावर अनकवाडे शिवारात ओवरलोड असलेला एक मालवाहू ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला ही सर्व घटना एका मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाले असून सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र यामुळे पुणे इंदोर महामार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली असून अपघात ग्रस्त ट्रकला बाजूला करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.
14
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowAug 09, 2025 13:45:39Dhule, Maharashtra:
ANCHOR - केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसेंनी यांनी आपल्या माहेरी येत रक्षा बंधन साजरा केली. रक्षाबंधनासाठी केंद्रीय क्रीडा राज्य मंत्री रक्षा खडसे यां नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे आपल्या माहेरी आल्या. खडसेंनी आपल्या लाडक्या भावाला राखी बांधतं शुभेच्छा दिल्यात. भाऊ प्रियांक पाटील ला मंत्री रक्षा खडसेंनी राखी बांधत रक्षाबंधन साजरा केले. शहादा तालुक्यातील खेड गावात मंत्री रक्षा खडसेच माहेर घर आहे.
प्रशांत परदेशी, नंदुरबार.
14
Report
DPdnyaneshwar patange
FollowAug 09, 2025 13:33:01Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव
DHARA_RAKHI
भाजपा आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी साजरा केला आदिवासी मुली सोबत रक्षाबंधन
यमगरवाडी आदिवासी आश्रम शाळेतील हृदयस्पर्शी रक्षाबंधन
ANCHIR
धाराशिव - तुळजापूरचे भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी आदिवासी समाजातील मुलींसोबत साजरा केला रक्षाबंधन सण. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील एकलव्य आदिवासी आश्रम शाळेत हा भावस्पर्शी कार्यक्रम पार पडला.
महाराष्ट्रातील पंधरा जिल्ह्यांमधून आलेल्या आदिवासी समाजातील मुली-मुलं या आश्रम शाळेत शिक्षण घेतात.आमदार राणा पाटील यांना आदिवासी मुलींनीऔक्षण करून राखी बांधली. ‘मी तुमच्यासोबत आहे हे सांगण्यासाठी आलोय, रक्षाबंधनाचं हे नातं शब्दांत सांगता येणार नाही’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली. या हृदयस्पर्शी रक्षा बंधन सोहळ्यामुळे आदिवासी मुली भाऊक झालेल्या पाहायला मिळाल्या.
Byte आमदार राणा जगदीश सिंह पाटील
14
Report
SRSHRIKANT RAUT
FollowAug 09, 2025 13:16:55Yavatmal, Maharashtra:
यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांना रक्षाबंधन निमित्त राखी बांधण्यासाठी भनिगींनी झुंबड केली. यावेळी लाडक्या बहिणींनी पालकमंत्री संजय राठोड यांना राखी बांधून ओवाळले. संजय राठोड हे गेल्या २५ वर्षांपासून रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करत आहेत. दरवर्षी शेकडो बहिणी त्यांना राखी बांधण्यासाठी आणि ओवळण्यासाठी जिल्हाभरातून येतात. भगिनींना त्यांनी साडीचोळी देवून ओवाळणी दिली.
बाईट :
14
Report