Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Dhule424001

धुळे कचरा डेपोला आग लागल्याने ग्रामस्थांना त्रास, महापालिका का दुर्लक्ष करते?

PPPRASHANT PARDESHI
Aug 09, 2025 14:02:20
Dhule, Maharashtra
Anchor- धुळे महानगरपालिकेच्या वरखेडी कचरा डेपोला वारंवार आग लागल्याचे प्रकार समोर आले आहेत. या कचरा डेपोला मोठ्या प्रमाणात आग लागून धुराचे लोट मोठ्या प्रमाणात पसरले आहेत, त्यामुळे परिसरातील वरखेडी, कुंडाणे, आर्णी यासह इतर गावांच्या ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. धुराचे लोट एवढ्या मोठ्या प्रमाणात असून रस्त्यावरून ये जा करणाऱ्यांना देखील काही दिसत नाहीत. त्यामुळे अपघात देखील घडत आहे. अनेकदा परिसरातील नागरिकांनी कचरा डेपो हलवावा अशी मागणी महापालिकेकडे केली होती मात्र पालिकेने याकडे सक्षम दुर्लक्ष केले आहे. अनेकांना या धुरामुळे श्वसनाचे आजार देखील उद्भवत आहे, त्यामुळे हा डेपो हटवावा अशी मागणी आता ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे. मात्र झोपेचं सोंग घेतलेला महापालिका प्रशासन याकडे सोयीने दुर्लक्ष करीत आहे. Byte - ग्रामस्थ प्रशांत परदेशी, धुळे.
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JMJAVED MULANI
Aug 10, 2025 13:03:40
Baramati, Maharashtra:
JAVED MULANI SLUG 1008ZT_DAUNDCRIME FILE 3 दौंडच्या वरवंड मध्ये वीट व मिक्सर ठोकळ्याने युवकाचा खून,, यवत पोलिसांची दोन दिवसांत घेतलं ताब्यात... ANCHOR — दौंड तालुक्यातील वरवंड गावच्या हद्दीत ५ ऑगस्ट रोजी एका युवकाचा वीट व सिमेंट मिक्सरच्या ठोकळ्याने डोक्यावर वार करून खून करण्यात आला होता. यवत पोलिसांनी केवळ दोन दिवसांत तपास उलगडत विनोद उर्फ नंदू दत्तात्रय रणधीर आणि गणेश उर्फ अक्षय तानाजी उमाटे या दोघांना अटक केली. फॉरेन्सिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी खून केल्याची कबुली दिली आहे. पुढील तपास यवत पोलीस करत आहेत...
0
Report
APAMOL PEDNEKAR
Aug 10, 2025 13:00:22
Mumbai, Maharashtra:
शिवसेना चांदिवली विधानसभा विभागाच्या वतीने श्रावण मासानिमित्त भव्य कावडयात्रा anchor : एकीकडे राज्यात आणि मुखतः मुंबईत मोठ्या प्रमाणात भाषिक वाद सुरू आहे. आशयात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने राज्यात ठिकठिकाणी उत्तर भारतीयांचा मोठा सहभागी असलेली कावड यात्राचे आयोजन केले जात आहे. शिवसेनेचे चांदिवली विधानसभा विभागाचे आमदार दिलीप लांडे यांच्या नेतृत्वाखाली, श्रावण मासाचे पावित्र्य लक्षात घेऊन भगवान शंकराच्या जयघोषात व भगव्या वातावरणात, भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.कुरल्याच्या छत्रपती शिवाजी महाराज तलाव ते काजूपाडा पाईप लाईन ते श्री शंभो महादेव मंदिर अशी ही कावड यात्रा काढण्यात आली होती. या कावडयात्रेत हजारो उत्तर भारतीय महिला भगवी साडी परिधान करून श्री शंभो महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करण्यासाठी कलश घेऊन सहभागी झाले. तसेच शेकडो पुरुष हे भगवे कुर्ते परिधान करून कावड घेऊन उपस्थित होते.या कावडयात्रे दरम्यान हिंदू देव-देवतांचे भगवान शंकर, श्रीराम, हनुमान आदी मुर्त्यासह चलतचित्र देखावा प्रदर्शित करण्यात आले.ही हिंदूंची संस्कृती असून कोण काय आरोप करतो या पेक्षा रामाचा धनुष्य शंकराची भक्ती आणि सनातन धर्म आमच्या मनात असल्याने सालाबादप्रमाणे आम्ही या कावड यात्रेचे आयोजन करीत असल्याचे आमदार दिलीप लांडे म्हणाले. byte : दिलीप लांडे( चांदिवली विधानसभा शिवसेना आमदार)
0
Report
YKYOGESH KHARE
Aug 10, 2025 12:48:33
Nashik, Maharashtra:
*Breaking... विशाल मोरे, मनमाड* Anc: मनमाड जवळ पुणे-इंदौर महामार्गावर धावत्या ओव्हरलोड ट्रकचा थरार पाहवयाला मिळाला असून ट्रक मध्ये क्षमते पेक्षा जास्त माल भरलेला होता त्यामुळे ट्रक एका बाजूने झुकलेला असताना देखील चालकाने त्याची परवा न करता ट्रक चालवीत होता अखेर मनमाड पासून काही अंतरावर एका बाजूने तोल जाऊन धावता ट्रक पलटी झाला. सुदैवाने ट्रक डाव्या बाजूने पलटी झाल्यामुळे पुढील अनर्थ टळला. ट्रक पलटी झाल्यामुळे चालक जखमी झाला असून ट्रकचे देखील मोठे नुकसान झाले आहे विशेष म्हणजे एका बाजूने ट्रक झुकल्याचे पाहून त्याच्या मागे दुचाकी वरून चालणाऱ्या तरुणाने ट्रक पलटीचा थरार त्याच्या मोबाईल मध्ये कैद केला. व तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ओव्हर लोड माल भरून अनेक ट्रक हायवे वरून धावत असतांना देखील पोलिस करतात तरी काय असा प्रश्न उपास्यत कला जात आहे.
6
Report
JMJAVED MULANI
Aug 10, 2025 12:47:07
Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI SLUG 1008ZT_INDAPURMARKET FILE 5 इंदापूर आठवडे बाजारात पावसाचा कहर... इंदापूरच्या आठवडे बाजारात पावसाचा धडाका, शेतकऱ्यांची धावपळ... Anchor: इंदापूरच्या आठवडे बाजारात अचानक पावसाचे आगमन झाले आणि बाजारपेठेत विक्रीसाठी आलेल्या शेतकरी व विक्रेत्यांची धावफळ उडाली. जोरदार पावसामुळे उघड्यावर ठेवलेला भाजीपाला पाण्यात भिजला. पावसापासून माल वाचवण्यासाठी शेतकरी घाईगडबडीत स्टॉल्स झाकू लागले, तर काहींनी माल वाहनात भरून नेण्यास सुरुवात केली. या अचानक झालेल्या हवामान बदलामुळे खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांचीही पळापळ झाली.
8
Report
PPPRASHANT PARDESHI
Aug 10, 2025 12:32:10
Dhule, Maharashtra:
anchor - धुळे जिल्ह्यातील पांझरेच्या पात्रात विनापरवानगी गॅबियन वॉल उभारण्यात आल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. नदीचा प्रवाह बदलण्याची शक्यता यामुळे निर्णय. अं झालीय सून , हरित लवाद व उच्च न्यायालयाच्या निर्णयांना थेट आव्हान देणारे काम थांबवा असे मागणे शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. साक्री रोडवर वरील मंहिंदळे शिवारात हॉटेल महेंद्र च्या मागील बाजूस पांझरा नदी पात्रात गॅबियन पद्धतीने भिंतीचे प्रचंड मोठे काम म्हणजे नदीपात्राच्या मुख्य पूररेषेत मधोमध पूर्वेकडून पश्चिमेकडे जवळपास एक किलोमीटर लांब व पाच मीटर उंच दोन मीटर रुंद अशा महाकाय भिंतीचे काम विनापरवानगी सुरू आहे, असा आरोप्प करीत दोशन वर कारवाईचे मागणी ठाकरे गटाने केली आहे. सदरचे काम म्हणजे भिंत बांधून त्या लेव्हलपर्यंत सपाटीकरण करून हजारो ट्रक मुरुमाची भर टाकून लेआउट पाडून प्लॉट विक्री करण्याचे प्रयोजन संबंधितांचे आहे. थेट नदीपात्रात लेआउट पाडून प्लॉट विक्री करून नागरिकांना लाखो रुपयांना फसून करण्याचा हा उद्योग शासनाने तात्काळ थांबवा असे मागणी शिवसेना ठाकरे गटाने केली आहे. नदीपात्रात पूर रेषेच्या आतील बांधकाम बेकायदेशीर ठरवून ते काढून टाकण्याचे आदेश न्यायालयाने यापूर्वी अनेक शहरात दिले आहेत, पांझरा नदीकाठी होणारे हे बेकायदेशीर काम महानगरपालिका, तहसील कार्यालय ,जलसंपदा विभाग येथील काही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादा शिवाय होणे शक्यच नसल्याने वरिष्ठ पातळीवरून या कामाचे चौकशी करण्यात यावी, अशा मागणी आंदोलन शिवसैनिकांनी केली आहे. byte - धीरज पाटील, महानगर प्रमुख प्रशांत परदेशी, धुळे.
8
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Aug 10, 2025 12:31:23
Latur, Maharashtra:
लातूर ब्रेकिंग न्यूज...‌ Ac ::- छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ते उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस हे लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, या भेटीत शेतकऱ्यांची कर्जमाफी, कापसाला योग्य बाजारभाव आणि सोयाबीनला साडेआठ हजार रुपये भाव मिळावा, या प्रमुख मागण्यांवर चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचा लातूर दौरा उद्या असून, या भेटीत शेतकऱ्यांच्या हिताच्या निर्णयांबाबत महत्त्वपूर्ण चर्चा छावा संघटनेचे शिष्ट मंडळ करणार आहेत. बाईट ::- विजयकुमार घाडगे पाटील
5
Report
SRSHRIKANT RAUT
Aug 10, 2025 12:17:20
Yavatmal, Maharashtra:
AVB Anchor : यवतमाळच्या आझाद मैदानात व्यवसाय करणाऱ्यांना त्या ठिकाणी दुकाने मांडण्यास प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतर आता या व्यवसायिकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रक्ताने पत्र लिहिले आहे. अन्य व्यवसायासाठी आझाद मैदान उपलब्ध करून देता येते तर मग अनेक वर्षांपासून येथे छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्यांना सुद्धा परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.  अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह ज्या व्यवसायावर अवलंबून होता, तो व्यवसाय गेल्या पन्नास दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे व्यवसायिक आर्थिक अडचणीत आली असल्याने पर्यायी  जागा द्यावी अन्यथा इच्छा मरणाची परवानगी द्यावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.       बाईट : श्रद्धा लोळगे : व्यवसायिक 
11
Report
PTPRAVIN TANDEKAR
Aug 10, 2025 12:05:29
Bhandara, Maharashtra:
भंडाऱ्यातील दुहेरी हत्याकांडातील चार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात...भर चौकात चाकूने वार करून केली हत्या...जुन्या वैमनस्यातून झाला कांड Anchor ;- भंडारा शहरात शनिवारी रात्री दुहेरी हत्याकांडाची घटना घडली.रात्री उशिरा दुकानात बसलेल्या एका तरुणावर काहीजणांनी धारदार शस्त्राने हल्ला केला.यावेळी मध्यस्थी करायला आलेल्या दुसऱ्या तरुणावर देखील आरोपींनी सपासप वार केले.हा हल्ला इतका भयंकर होता की,हल्लात दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. Vo ;- जुन्या वैमनस्यातून दोघांचा खून केल्या गेल्याची घटना शनिवार, 9 ऑगस्ट रोजी रात्री साडे नऊ वाजताच्या दरम्यान भंडारा येथील गजबजलेल्या मिस्कीन टैंक परिसरात घडली.या घटनेत टिंकू उर्फ वसीम खान (35) आणि शशांक गजभिये (22) या दोघांचा कुऱ्हाड आणि चाकूचे घाव घालून खून करण्यात आला.या प्रकरणात पोलिसांनी रात्रीच फैजान शाकीर शेख (24) , साहिल शाकीर शेख (22), आयुष मुन्ना दहिवले (19, तिघेही रा. भंडारा) व प्रीतम विलास मेश्राम (33, रा. शहापूर )या चार आरोपींना अटक केली आहे.मृतक हे फिर्यादी मोहम्मद यासीन शेख ( 29,रा. अशरफी नगर, तकिया वार्ड, भंडारा) दुकानात बसले असता,लहान कुऱ्हाड व चाकु घेवुन टिंकू याचे मागे धावून गेले.मृतक टिंकूला जमीनवर पाडून कुऱ्हाड व चाकुने मारत असतानी जोर-जोरात शिवीगाळ करीत होते.साहील व फैजान शेख से दुश्मनी करोंगे तो जान से जाओगे.कुत्ते की तरह दौडा-दौडाकर मारेंगे असे जोरात बोलत आरोपीं साहीलने लहान कुऱ्हाडीने आणि फैजान व त्याच्या साथीदारांनी चाकुने टिंकूच्या शरीरावर वार केले.दरम्यान, टिंकू याला वाचविण्याकरीता शशांक गजभिये हा गेला असता तेव्हा चारही आरोपींनी शशांकलाही चाकु व कु-हाडीने मारुन खाली पाडले.विशेष म्हणजे, ळचारही आरोपींनी अत्यंत निर्दयपणे दोघांवरही घाव घातले.ते निपचित पडल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. काही वेळपर्यंत ते दोघेही तसेच पडून होते. काही नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोघांनाही रुग्णालयात पाठविले.दरम्यान वसीम खान व शशांक गजभिये यांचे मरणास कारणीभुत झाले असल्याचे फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून व वैद्यकीय अधिकारी यांचे अभिप्रायवरुन चारही आरोपींविरुध्द विविध कलमांव्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पुढील तपास पोलिस करीत आहेत. Byte ;- निलेश मोरे , अप्पर पोलिस अधीक्षक
10
Report
PPPRASHANT PARDESHI
Aug 10, 2025 12:02:36
Dhule, Maharashtra:
Anchor शिरपूर शहरात रस्त्या लगत असलेल्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे.झाडांमुळे बिल्डींग झाकले जात असल्याने सावली देणाऱ्या उभ्या झाडांची कत्तल करण्यात आली असून हे कृत्य करणाऱ्या विरोधात कडक शासन करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रीन आर्मी च्या वतीने करण्यात आली आहे.शिरपूर शहरात ग्रिन आर्मी या सामाजिक संघटनेकडून वेगवेगळ्या ठिकाणी झाडांची लागवड करण्यात येते.त्यांची निगा राखण्यात येत असते.काल शिरपूर शहरातील शहादा रस्त्यावरील मेन रोडवर असलेल्या सावली देणारे १८ ते २० फुटांच्या तीन झाडांची कत्तल करण्यात आली आहे. शहरात सर्वत्र सिमेंट रस्ते आहेत दिवसेंदिवस शिरपूर शहरात उष्णतेचे प्रमाण वाढत आहे.रस्त्यावरुन उन्हात पायीपीट करणाऱ्यांसाठी हे झाड सावली देण्याचे काम करतात.यासाठी शहरात मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड होणे अपेक्षित असल्याने ग्रीन आर्मी या सामाजिक संघटनेकडून शहरात ठिकठिकाणी झाडे लावण्यात आली आहेत‌.मात्र यातील तीन झाडांची काही एक कारण नसतांना कत्तल करण्यात आल्याने ग्रीन आर्मी संघटनेस शिरपूर संतप्त झाले आहेत. Byte धिरज माळी ,ग्रीन आर्मी संघटना प्रशांत परदेशी, धुळे.
11
Report
SMSarfaraj Musa
Aug 10, 2025 11:50:10
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - जयंत पाटलांचे छत्रपती,शाहू,फुले, आंबेडकर व साठेंचे विचार केवळ मतांच्यासाठी - डॉ. महेशकुमार कांबळे. अँकर - राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटलांचे छत्रपती,शाहू,फुले,आंबेडकर व साठे यांचे विचार केवळ मतांच्यासाठी असल्याचा आरोप आंबेडकरी चळवळीचे नेते डॉ महेशकुमार कांबळे यांनी केलाय.आमदार जयंत पाटील यांच्या मतदारसंघात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मगाव आहे.पण तरी देखील गेल्या 40 वर्षात जयंत पाटलांनी आमदार मंत्री असून देखील अण्णाभाऊ साठेंचा स्मारक करू शकले नाहीत,कारण जयंत पाटलांचे राजकारण हे स्वार्थाचे आहे,त्यामुळेच आत्तापर्यंत जॉईंट पाटलांनी अण्णाभाऊ साठेंचे स्मारक केलं नाही असा आरोप देखील महेश कांबळेंकडून करण्यात आला आहे.इस्लामपूर मध्ये अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक करावं यासाठी एक ऑगस्टपासून मातंग समाज व सह विविध संघटनांकडून आंदोलन करण्यात आलं होतं,त्यानंतर जयंत पाटलांनी आंदोलनाची दखल घेत,अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्याची घोषणा केली आहे, यावरून महेश कांबळे यांनी जयंत पाटलांच्यावर टीका केली आहे. बाईट - डॉ.महेशकुमार कांबळे - नेते, आंबेडकर चळवळ ,सांगली.
12
Report
SMSATISH MOHITE
Aug 10, 2025 11:50:00
Nanded, Maharashtra:
Satish Mohite Slug - Ned_PoliceCar Feed on - 2C ---------------------------------- Anchor - संशयित कारचा पाठलाग करताना पोलिसांची गाडी पलटून तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले. नांदेडमध्ये ही घटना घडली. बारड येथील महामार्ग पोलीस चौकी समोर वाहनांची तपासणी सुरु असताना एका इंडिका विस्टा कारमधून लाल रंगाचे पाणी निघत असल्याने पोलिसांना संशय आला. पोलिसांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला असता कार भरधाव वेगात निघून गेली. पोलिसांनी गाडीचा पाठलाग सुरु केला. संशयित गाडी गावाकडील छोट्या रस्त्याकडे वळाली. गाडीचा पाठलाग करत असताना पोलिसांचे टाटा सुमो वाहन उलटले. गाडीतील तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले. दरम्यान संशयित गाडीला तोरणतांडा येथील ग्राणास्थानी पकडले. गाडीचालक आणि अन्य एकाला पकडण्यात आले. या गाडीमध्ये गोमांस आढळले. -----------------------------
12
Report
TTTUSHAR TAPASE
Aug 10, 2025 11:49:50
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE 1 FILE SLUG NAME -SAT_HAKE_PAWAR साताऱ्यातील फलटण येथील जावली येथील एका कार्यक्रमात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी शरद पवारांची ओळख दगाबाज नेता म्हणून असल्याचे सांगितलं *बाईट: लक्ष्मण हाके पॉईंटर* निवडणुका जिंकण्याचे तंत्र आत्मसात केलेला हा नेता आहे. शरद पवारांची ओळखच दगाबाज नेता ही आहे. सांगायचे एक आणि करायचं एक असे शरद पवार आहेत ओबीसींच्या बाजूने गळा काढतात त्यावेळी ते ओबीसींच्या विरोधामध्ये षडयंत्र रचत असतात पवार साहेबांचं राज्यकारण म्हणजे एका बाजूला जरांगे नावाच्या बबड्याला फिरवणारे त्याचा आंदोलन उभं करणारे अशी त्यांची ओळख आणि तेच ओबीसींच्या बाजूने मंडळ यात्रा सुरू करत आहेत जरांगे पाटील यांनी लाखो कुणबी सर्टिफिकेट काढून ओबीसींचे पंचायत राज मधील आरक्षण असो किंवा शिक्षण आरक्षण उध्वस्त केले आहे. शरद पवारांचा ही मंडळ यात्रा काढून नेमका काय उद्देश आहे. मंडल आयोगाच्या 38 योजनांपैकी दोन योजना भारतीय व्यवस्थेत लागू झाले आहेत. शरद पवारांनी संपूर्ण महाराष्ट्र ओरखडून खाल्ला जवळच्या नातेवाईकांव्यतिरिक्त कोणाला किंमत दिली नाही. ज्याप्रमाणे इच्छाधारी नागा प्रमाणे शरद पवार वेटोळे घालून बसले आहेत. जरांगेंचं आंदोलन उभे राहतंय तर ओबीसी मध्ये फुट कशी पाडायची ही फोडा आणि जोडा ही राजनीती शरद पवार यांची आहे. शरद पवार ईस्ट इंडिया कंपनी प्रमाणे वागतात.. महाराष्ट्रातील ओबीसी आणि भटक्या विमुक्त जातींचं अंतकरण समजून घ्यायला हवं होतं. तुम्ही निवडणुका जिंकण्याचं व्याकरण समजून घेतले शरद पवार हे दगेबाज नेते आहेत ओबीसी बांधवांना आवाहन करतो की अशा दगाबाज नेत्यांना खड्यासारखे बाजूला करा. *ओबीसी आणि मराठा समाजामध्ये देवेंद्र फडणवीस वाद तयार करत आहेत या मनोज जरांगे पाटील यांच्या विधानावर लक्ष्मण हाके यांचे उत्तर* मनोज जरांगे पाटील देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी काहीही बोलतात. फडणवीसांचा अपमान म्हणजेच महाराष्ट्राचा अपमान... त्यामुळे त्यांनी त्यांच्या पात्रतेनुसार आणि कुवतेनुसार बोलावे. लाखो कुणबी सर्किट मुळे ओबीसी आरक्षण उध्वस्त होणार असेल तर तुम्ही या ओबीसी आरक्षणाच्या बाजूने उभे रहा. यापुढे पंचायतराजच्या निवडणुकीमध्ये गावोगावी बोगस कुणब्याची सर्टिफिकेट 25 हजारापासून पाच लाखापर्यंत ही सर्टिफिकेट जरांगेंच्या पिलावळीने काढलीत आणि ओबीसी आरक्षण संपवल आहे. मराठा बांधव ओबीसी मध्ये समाविष्ट झाला तर शिक्षणामध्ये नोकऱ्यांमध्ये निवडणुकीमध्ये गावच्या सरपंच की मध्ये फडणवीस टिकतील का याविषयी फडणवीस यांनी ठाम भूमिका घ्यावी लागेल. जरांगेंच्या भूमिकेला बळी पडला तर ओबीसी या पुढील काळात मोठं जन आंदोलन उभारेल 29 ऑगस्टला मुंबईला येण्यासाठी मराठ्यांना जरांगे यांनी आवाहन केलं तरी ओबीसी ची एक संघर्ष यात्रा आम्ही काढणार आहोत... भटक्या विमुक्त जाती जमाती आणि ओबीसी एक आहेत 27% आणि एसबीसी चे दोन टक्के असे मिळून 29 टक्के आरक्षण ओबीसींचे आहेत. याचा आम्ही प्रसार करणार आहोत
14
Report
SMSarfaraj Musa
Aug 10, 2025 11:49:11
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - सांगलीत भाजपाचा काँग्रेससह विशाल पाटलांना धक्का..माजी महापौर सह विशाल पाटलांचे कट्टर समर्थकांचा उद्या भाजप प्रवेश.. अँकर - सांगलीमध्ये भाजपाने खासदार विशाल पाटलांसह काँग्रेसला पुन्हा खिंडार पाडले आहे.खासदार विशाल पाटलांचे कट्टर समर्थक नगरसेवक मनोज सरगरसह काँग्रेसच्या माजी महापौर आणि नगरसेविकेचा भाजपा प्रवेश उद्या सांगली मध्ये होणार आहे.भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडणार आहे.यामध्ये माजी महापौर कांचन कांबळे,नगरसेविका शुभांगी साळुंखे, नगरसेवक मनोज सरगर आणि काही काँग्रेसचे नेते भाजपात प्रवेश करणार आहेत. मनोज सरगर हे खासदार विशाल पाटलांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जायचे,तर कांचन कांबळे या मदन भाऊ गट समर्थक आहेत.त्यांचा हा पक्ष प्रवेश आगामी महापालिकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पखासदार विशाल पाटील आणि काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. बाईट - मनोज सरगर - नगरसेवक, विशाल पाटील समर्थक-सांगली.
12
Report
KJKunal Jamdade
Aug 10, 2025 11:45:41
Shirdi, Maharashtra:
Anc - आम्हाला पोरा बाळांवर बोलायला लावू नका.. पोरा बाळांना सांगा काळ खूप मोठा आहे, काळजीपूर्वक जा.. असा टोला बाळासाहेब थोरात यांनी सुजय विखे यांना लगावला होता.त्या वक्तव्याला सुजय विखे यांनी जोरदार प्रतिउत्तर दिलं."जर पोरांबाळांवर बोलायचं नव्हतं , तर विधानसभेत माझ्यावर का बोललात..? अमोल खताळला खबरी का म्हणालात..? सुजय विखेंना काट्यात लपला का म्हणालात..? तेव्हा आम्ही पोरंबाळ नव्हतो , पण पराभवानंतरच पोरंबाळ झालो का..? आणि लक्षात ठेवा , एका पोराबाळानेच तुमचा पराभव केलाय असे उत्तर देत बाळासाहेब थोरात यांना चांगलचं सुनावले... बाळासाहेब थोरात ऑन सुजय विखे मी राधाकृष्ण विखेंवर बोलू शकतो सुजय विखेंवर काय बोलायचं.....? आम्हाला पोरा बाळांवर चर्चा करायला नका लावू.... *पोरा बाळांना सांगायचंय काळ खूप मोठा आहे ,काळजीपूर्वक जा.......* काँग्रेसनेते बाळासाहेब थोरात यांचा सुजय विखेंना सल्ला... सुजय विखे बाईट ऑन बाळासाहेब थोरात पोरंबाळ टीका ते मोठे नेते ते सल्ला देण्यासाठीच आहे.. जी भूमिका ते आज घेताय तीच भूमिका त्यांनी विधानसभेवेळी घेतली पाहिजे होती... जर पोराबाळांवर बोलायचं नव्हतं तर विधानसभेच्या प्रत्येक भाषणात माझ्यावर का बोलले..? का..तुम्ही अमोल खताळ ला खबरी म्हणाले...? सुजय विखेला आम्ही पळवून लावलं काट्यात लपला..का म्हणाले..? तेव्हा आम्ही पोरंबाळ नव्हतो... तुमचा पराभव झाला तर आम्ही पोरंबाळ झालो... माननीय थोरात साहेब आम्ही आमचा सन्मान करतो... आम्हाला पोरंबाळ म्हणण्याची चूक तुम्ही केली म्हणून एका पोरंबाळानेच तुमचा पराभव केला... मुलांमध्ये युवाशक्ती प्रचंड , सर्वसामान्य माणूस आमदार होऊ शकतो... हे त्यांना आजही पचत नाही... काळ प्रदीर्घ आहे , हे मान्य करायला आम्ही तयार... आमचे मागील ४० वर्ष संघर्षात गेले , पुढचे ४० वर्ष आम्ही संघर्ष करत राहणार... जी परिस्थिती येईल ती हाताळायला आम्ही समर्थ आहोत... सुजय विखेंचे बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या मुलांबाळांच्या वक्तव्यावर जोरदार उत्तर... bite - सुजय विखे माजी खासदार
9
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Aug 10, 2025 11:02:58
Ambernath, Maharashtra:
शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकांच्या ऑफिसबाहेर घोषणाबाजी मनसे कार्यकर्त्यांनी नोटा दाखवत केली घोषणाबाजी आता तुम्ही निवडून येऊनच दाखवा! मनसे उपजिल्हाध्यक्ष शैलेश शिर्के यांचा इशारा Anchor : मनसेतून शिवसेनेत गेलेल्या माजी नगरसेवकांच्या ऑफिसबाहेर आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. हे नगरसेवक नोटांसाठी गेल्याचा आरोप।करत मनसे कार्यकर्त्यांनी नोटा दाखवत घोषणाबाजी केली. Vo : मनसेचे शहराध्यक्ष कुणाल भोईर, जिल्हा संघटक संदीप लकडे, शहर संघटक स्वप्नील बागुल आणि माजी नगरसेविका अपर्णा भोईर।हे चार।माजी नगरसेवक शनिवारी मनसेला रामराम करत शिवसेनेत गेले. यानंतर रविवारी मनसे पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत या सर्वांचा निषेध केला. या सर्वांच्या ऑफिसबाहेर जाऊन घोषणाबाजी करत मनसेच्या कार्यकर्त्यांनी नोटा दाखवून घोषणाबाजी केली. यानंतर हे चौघेही पुढच्या निवडणुकीत कसे निवडून येतात ते आम्ही बघू, असं म्हणत कुणालाही प्रचाराला आणलं तरी तुम्हाला पाडणारच, असा इशारा मनसे उपजिल्हाध्यक्ष शैलेश शिर्के यांनी दिला. यावेळी जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव, माजी नगरसेवक दत्ता केंगरे, प्रशांत नलावडे यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. Byte : शैलेश शिर्के, उपजिल्हाध्यक्ष, मनसे चंद्रशेखर भुयार , अंबरनाथ
13
Report
Advertisement
Back to top