Back
यवतमाल नगरपालिका चुनाव: आदिवासी महिला उम्मीदवारों पर गोटियाँ, सत्ता की जद्दोजहद तेज
SRSHRIKANT RAUT
Dec 17, 2025 10:17:19
Yavatmal, Maharashtra
यवतमाळ नगरपरिषदच्या निवडणूकिसाठी पुन्हा प्रचार शिगेला पोहोचला आहे, नगराध्यक्ष पदासाठी आजी-माजी मंत्री आपली लेक आणि सुनेसाठी मैदानात उतरले असून, पालकमंत्र्यांनी देखील प्रचाराचा धुरळा उडवला आहे. सर्वाधिक नगरसेवकांसह नगरपालिका पद जिंकून एकहाती सत्ता मिळवण्यासाठी ही लढाई आहे.
यवतमाळ मध्ये २०१६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेचा नगराध्यक्ष तर भाजपच्या सर्वाधिक 29 जागा निवडून आल्या. काँग्रेसच्या12, शिवसेनेच्या 8, राष्ट्रवादी काँग्रेसच्या 4, बसपाच्या 2, तर एक अपक्ष नगरसेवक निवडून आला. यावेळी नगराध्यक्ष पद हे 93 वर्षानंतर आदिवासी महिलेसाठी राखीव झाले आहे. घराणेशाही ला विरोध करणाऱ्या भाजपाने आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची कन्या प्रियदर्शनी यांना उमेदवारी दिली तर माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांची सून प्रियंका ह्या काँग्रेसच्या उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरल्या. निवडणुकीत भाजपा स्वतंत्र लढत असून मित्रपक्ष शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची युती झाली आहे. शिवसेनेने तेजस्विनी चांदेकर यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीत देखील फूट पडली आहे. काँग्रेस आमदारावर आगपाखड करीत ठाकरे यांच्या शिवसेनेने वैष्णवी कोवे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे खासदार संजय देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
बाईट : प्रियदर्शनी उईके भाजप उमेदवार
प्रियंका मोघे काँग्रेस उमेदवार
यवतमाळ मंत्री उईके यांना माजी मंत्री मदन येरावार यांच्या गटाशी जुळवून निवडणुकीत यश प्राप्त करावयाचे असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रचार सभा घेतल्या. विकास कामात मित्रपक्ष शिवसेनेने खोडा घातला असा आरोप येरावार यांनी पालकमंत्री संजय राठोड यांच्यावर केला. तर पालकमंत्री संजय राठोड यांनी देखील भाजपच्या सत्ता काळात अमृत पाणीपुरवठा योजनेसह इतर योजनेतील भ्रष्टाचारावरून टीकास्त्र सोडले. काँग्रेसने देखील
भाजप नेत्यांची ठेकेदारी, विकास कामातील भ्रष्टाचार
या मुद्द्यांवरून आरोपांची राळ उठवली आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेने धनशक्ती विरुद्ध जनशक्ती चा नारा दिला आहे.
बाईट : तेजस्विनी चांदेकर : शिवसेना उमेदवार
वैष्णवी कोवे : शिवसेना युबीटी उमेदवार
शिवसेनेचा नगराध्यक्ष आणि भाजपाचे सभापती अशा परिस्थितीमुळे मागचा कार्यकाळ पूर्णतः भांडण तंट्यात गेला. रखडलेली अमृत पाणीपुरवठा योजना व भूमिगत गटार योजना, कचऱ्याचे कंत्राट, रस्त्यांची प्रचंड दुरावस्था, पार्किंगची समस्या आणि विद्युत पथदिव्यांमधील अनागोंदी या अनेक समस्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. पुन्हा तेच मुद्दे घेऊन सत्तेचे गणित उमेदवारांकडून पुढे ठेवल्या जात आहे त्यामुळे या हाय व्होल्टेज लढतीत कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागले आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SRSHRIKANT RAUT
FollowDec 17, 2025 11:54:300
Report
VNVishal Nagesh More
FollowDec 17, 2025 11:40:140
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 17, 2025 11:09:530
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 17, 2025 10:46:100
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 17, 2025 10:45:550
Report
PNPratap Naik1
FollowDec 17, 2025 10:35:150
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowDec 17, 2025 10:33:360
Report
LBLAILESH BARGAJE
FollowDec 17, 2025 10:30:400
Report
SMSATISH MOHITE
FollowDec 17, 2025 09:48:070
Report
PNPratap Naik1
FollowDec 17, 2025 09:19:560
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 17, 2025 09:19:390
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 17, 2025 09:04:160
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 17, 2025 09:04:020
Report
ABATISH BHOIR
FollowDec 17, 2025 08:18:070
Report