Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

आदिवासी समाज की भव्य रैली; पूरा यवतमाल शहर पीले रंग में रंगा

Oct 10, 2025 14:00:37
Yavatmal, Maharashtra
आज यवतमाल शहर में आदिवासी समाज द्वारा अनुसूचित जनजाति आरक्षण के समर्थन में एक विशाल मोर्चा निकाला गया। “अनुसूचित जनजाति का आरक्षण संवैधानिक अधिकार है, इसे कोई छीन नहीं सकता” — ऐसे नारे लगाते हुए हजारों कार्यकर्ता शहर की मुख्य सड़कों पर शांतिपूर्ण रैली में शामिल हुए। पीले झंडों और बैनरों से सजा यह मोर्चा देखने के लिए नागरिकों की भारी भीड़ उमड़ी। सुबह से ही पूरे शहर का माहौल उत्साहपूर्ण बना हुआ था। मोर्चे के कारण पूरा यवतमाल शहर मानो पीले रंग में नहा गया था। प्रमुख चौकों पर गूंजते नारे, पारंपरिक ढोल-ताशों की थाप पर नाचते युवा और समाजबंधुओं का जोश देखकर वातावरण में एक अलग ही ऊर्जा निर्माण हुई।
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKSACHIN KASABE
Oct 10, 2025 16:54:09
Pandharpur, Maharashtra:विधानसभा निवडणुकीत महायुतीत आपल्याच उमेदवारांचा पराभव करण्याचे काम मित्र पक्षांनी केले असल्याचे सत्य सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे जाहीर वक्तव्याने समोर आले आहे. सांगोलयात शेकापचे आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या काही समर्थकांचा आज भाजप मध्ये प्रवेश झाला. हा प्रवेश होऊ नये यासाठी आमदार देशमुख यांनी प्रयत्न केले. हाच धागा पकडून पालकमंत्री जय कुमार गोरे यांनी आमदार डॉ देशमुख यांना उद्देशून आठवण करून दिली तुम्ही आमदार होताना जय कुमार गोरे यांनी मदत केली म्हणून तुम्ही आमदार झाला तेव्हा मी पालकमंत्री नव्हतो. याचा अर्थ महायुतीचे उमेदवार शहाजी बापू पाटील यांच्या विजया पेक्षा गोरे यांनी विरोधी उमेदवार डॉ देशमुख यांच्या मदत केली असल्याचे सांगितले असे वक्तव्य करून पालकमंत्री गोरे यांनी सांगोला मध्ये शिवसेना उमेदवार शहाजी बापू पाटील यांच्या पराभवात आपला सहभाग असल्याची अप्रत्यक्ष कबुली दिली आहे. यामुळे आता शिवसेनेमधून काय प्रतिक्रिया उमटतात हे पहावे लागेल.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Oct 10, 2025 16:17:23
Yavatmal, Maharashtra:राज्याचे मंत्री संजय राठोड यांनी संवैधानिक दृष्टीने बंजारा समाजाला अनुसूचित जातीत टाकता येत नसतानाही मुंबई येथील बैठकीत जाहीर रित्या बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण देण्याची बाब मांडली. त्यामुळेच ग्राम पातळीवर बंजारा और आदिवासींमध्ये वाद निर्माण झाला आहे. असे भूमिका भाजप आमदार राजू तोडसाम यांनी मांडली आहे. मत्र्याला असंवैधानिक बाब बोलता येत नाही, मात्र मंत्री असलेल्या माणसाने आणि वीस वर्षांपासून लोकप्रतिनिधी असलेल्या संजय राठोड यांच्याकडून जबाबदारीने वक्तव्य होणे गरजेचे होते. या दोन्ही जातीत झालेले विवाद मिटवायचे असतील तर मंत्री संजय राठोड व मी स्वतः स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे तेव्हाच दोन्ही समाजात सलोखा निर्माण होईल असेही आमदार राजू तोडसाम यांनी सांगितले.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 10, 2025 14:48:51
Akola, Maharashtra:राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची दखल घेत राज्य सरकारने सुधारीत यादी जाहीर केली आहे. याआधी मदत यादीतून वगळले गेलेले काही तालुके आता नव्याने समाविष्ट करण्यात आले आहेत. राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ३४७ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या पंचनाम्यानुसार जून ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत सुमारे २६.६९ लाख हेक्टर क्षेत्राचे, तर सप्टेंबर महिन्यात जवळपास ३९ लाख हेक्टर क्षेत्राचे शेतीपिक नुकसान झाले आहे. म्हणजेच राज्यभरात तब्बल ६५ लाख हेक्टर क्षेत्रावर अतिवृष्टीचा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने ९ ऑक्टोबर २०२५ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयातील परिशिष्ट ‘अ’ मध्ये सुधारणा करत नव्या तालुक्यांचा समावेश केला आहे. या सर्व नव्याने समाविष्ट तालुक्यांना आता आपत्तीग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले असून, दुष्काळ सदृष्य परिस्थितीत लागू असणाऱ्या सर्व सवलती या तालुक्यांनाही लागू होतील. सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या सवलती पुढीलप्रमाणे.. १. जमीन महसूलात सूट. २. सहकारी कर्जांचे पुनर्गठन. ३. शेतीशी संबंधित कर्ज वसुलीस एक वर्षाची स्थगिती. ४. तिमाही वीज बिलात माफी. ५. परीक्षा शुल्क माफी तसेच दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची फी माफी. या सवलतींच्या अंमलबजावणीसाठी संबंधित प्रशासकीय विभागांना कार्यवाहीचे आदेश देण्यात आले आहेत. सुधारित शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर www.maharashtra.gov.in वर उपलब्ध आहे.राज्य सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी दिलासा ठरणार आहे, विशेषत: आधी मदतीपासून वगळलेल्या भागांना आता आवश्यक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
4
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 10, 2025 14:18:39
Akola, Maharashtra:आंतरशालेय कुस्ती स्पर्धेत वजन करताना चौदा वर्षीय विद्यार्थ्याचा वस्त्रहरण अवस्थेतील व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी अकोट फाईल येथील कुस्ती प्रशिक्षक कुणाल माधवे विरुद्ध खदान पोलिसांनी बीएनएस २९६, ३५१(२) व माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७(बी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीमवाडी येथील पोलीस हॉलमध्ये जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या वतीने ही स्पर्धा झाली होती. या वेळी वजन मोजणी दरम्यान आरोपी प्रशिक्षकाने विद्यार्थ्याचा अनुचित व्हिडिओ चित्रीत करून व्हायरल केल्याचा आरोप फिर्यादी पालकांनी केला आहे. या प्रकरणी विद्यार्थ्याची मानसिक अवस्था बिघडल्याचे समोर आले असून, पालकांनी तत्काळ हा प्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना कळवला. पोलिस तपासात आरोपीचा मोबाईल तपासला जाणार असून, आणखी व्हिडिओ आणि छायाचित्रे सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याआधीही अकोला क्रीडा क्षेत्रात कोचच्या गैरवर्तनाच्या घटना समोर आल्या असून, या प्रकाराने पुन्हा एकदा क्रीडा क्षेत्राला काळीमा फासला आहे. खदान पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास करीत आहे.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Oct 10, 2025 14:18:24
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली ब्रेकिंग सांगली पुलिसांकडून 1 कोटी 11 लाख सहा हजार रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त अंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करत 5 जणांना करण्यात आली अटक. अटक करण्यात आलेल्या मध्ये कोल्हापूर मधील एका पोलीस कर्मचाऱ्याचा ही समावेश 99 लाख 23 हजार 300 रुपयांच्या नोटा जप्त,500 आणि 200 रुपयांच्या बनावट नोटांचा समावेश. पुणे-बंगळूर महामार्गावरील कासेगाव येथे बनावट नोटांची तस्करी करत असताना 98 लाखांच्या बनावट नोटा करण्यात आल्या जप्त. मुंबईकडे या नोटांची सुरू होती तस्करी कोल्हापूर शहरातील एका चहाच्या कंपनी मध्ये सुरू होती बनावट नोटांची छपाई . कोल्हापूर येथून महाराष्ट्रच्या विविध भागात सुरू होता बनावट नोटांच्या वितरणाचा सुरू होता उद्योग. मिरजेच्या महात्मा गांधी चौकी पोलिसांनी केला बनावट नोटांच्या टोळीचा पर्दाफाश. बाईट - संदीप घुगे - पोलीस अधीक्षक - सांगली
0
comment0
Report
AKAMAR KANE
Oct 10, 2025 14:01:50
0
comment0
Report
MKManoj Kulkarni
Oct 10, 2025 13:31:14
Mumbai, Maharashtra:अँकर -- सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्यात आला होता त्या विरोधात मुंबई युवक काँग्रेसच्या वतीने मंत्रालयाजवळ असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले यावेळी आरएसएस च्या स्वयंसेवकाच्या पोस्टरला चपलांचा हार घालूण घोषणाबाजी करण्यात आली आहे मुंबई व काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष जिनच शबरीन यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं आंदोलन करते अचानक रस्त्यावर उतरले आणि रस्ता रोको केला त्यामुळे प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडीत झाली या आंदोलनाची पोलिसांना कल्पना नसल्याने एकही पोलीस त्या ठिकाणी नव्हता रस्ता रोको झाल्यानंतर पोलीस या ठिकाणी आले आणि त्यांनी आंदोलकांना ताब्यात घेतले
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Oct 10, 2025 13:25:01
Yeola, Maharashtra:नाशिकच्या निफाड तालुक्यातील नाशिक–छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावर शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले рस्त्यावर खड्ड्यांच्या मुद्द्यावर संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी तब्बल एक तासापासून रस्तारोको आंदोलन करत चक्का जाम करत शासनाला जाब विचारला ढोल-ताशांच्या गजरात घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. या आंदोलनादरम्यान युवासेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम रणदिवे यांनी सलाईन लावून अनोखे आंदोलन केले. नाशिक–छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून वाहनचालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली दरम्यान, पिंपळस ते येवला दरम्यान ६५ किलोमीटर चौपदरी रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू असले तरी कामाची गती अत्यंत मंद असल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे रस्तारोकोमुळे मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत शिवसेनेच्या पाच प्रमुख मागण्या: - रस्त्यावरील छोटे-मोठे खड्डे बुजवून कोट डांबरीकरण करावे. - सार्वजनिक सुरक्षिततेचा प्रश्न तातडीने सोडवावा. - नागरिकांच्या आरोग्य व जीविताला धोका टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात. - वाहतुकीस अडथळे दूर करावेत. - जबाबदार ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी.
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Oct 10, 2025 13:20:56
Thane, Maharashtra:भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनमोल सागर यांच्या आदेशानुसार शहरात होत असलेल्या अंतर्गत रस्त्यालगतच्या अतिक्रमणांवर पालिका प्रशासनडकडून मोठी कारवाई करण्यात आली. भिवंडीतील तीन बत्ती बाजारपेठ परिसरात रस्त्याच्या कडेला बेकायदेशीररित्या उभे करण्यात आलेले हात गाड्या आणि रस्त्यावरील दुकाने महानगरपालिकेच्या पथकाद्वारे हातोडा चालवत हटविण्यात आल्या आहेत. महानगरपालिकेच्या पथकाने अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवला आहे. या कारवाईमुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. या कारवाईची दहशत अतिक्रमण करणारे फेरीवाले यांना बसली आहे. या कारवाईचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायला होतं आहे.
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Oct 10, 2025 13:08:23
Baramati, Maharashtra:दौंड तालुक्यातील बोरीऐंदी गावात यवत पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 27 लाख 97 हजार 624 रुपयांचा गुटखा पानमसाला आणि तंबाखूचा अवैध साठा जप्त केला आहे. आरोपी नवनाथ रतन झुरंगे याने आपल्या घरासमोरील पत्र्याच्या खोलीत आरएमडी डायरेक्टर स्पेशल शॉट 999 विमल आणि व्ही-1 टोबॅको या विविध ब्रँडचा मोठा साठा साठवला होता. महाराष्ट्र राज्य अन्न सुरक्षा आयुक्तांच्या आदेशानुसार अशा गुटखा पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या साठा विक्री आणि वितरणावर बंदी असून आरोपीने या आदेशाचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून.. ही कारवाई यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विजय कोल्हे करीत आहेत.
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Oct 10, 2025 13:00:21
Nanded, Maharashtra:अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने विशेष पॅकेज ची घोषणा केली. पण काल काढलेल्या जीआर मध्ये नांदेड जिल्ह्याचेच नाव वगळण्यात आले. राज्यात सर्वाधिक 6 लाख 48 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान नांदेड जिल्ह्यात झालेले असताना नांदेडचा समावेश नसल्याचा प्रकार झी 24 तासाने लावून धरला. नांदेडमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलन केले. त्यांनंतर सरकारला जाग आली. नांदेडचे नाव टाकून सुधारित जीआर आजच निघेल असे नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांनी झी 24 तासशी बोलताना सांगितले होते. त्यानुसार सुधारित जीआर काढून त्यामध्ये नांदेड चा समावेश करण्यात आला. नांदेड सह इतर दोन जिल्ह्याचाही नव्याने समावेश करण्यात आलाय. कालच्या जीआर मध्ये एकूण 31 जिल्ह्याची नावे होती. आजच्या जीआर मध्ये एकूण 34 जिल्ह्याची नावे आहेत.
0
comment0
Report
Advertisement
Back to top