Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

दसऱ्याचं सोनं: विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचा संदेश दिला!

Oct 12, 2024 17:36:35
Yavatmal, Maharashtra

यवतमाळच्या कळंब तालुक्यातील सुकळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी दसऱ्यानिमित्त “दसऱ्याचं सोनं, व्यसनमुक्तिचं लेनं” हा अभिनव उपक्रम राबविला. तंबाखूमुक्त शाळा अभियान अंतर्गत, विद्यार्थ्यांनी आपट्याच्या पानावर व्यसनमुक्तीचे संदेश लिहून मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. या उपक्रमाचा उद्देश व्यसनमुक्त समाज निर्माण करणे आहे.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
APAMOL PEDNEKAR
Dec 14, 2025 08:35:34
Mumbai, Maharashtra:निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेली दिखाऊ कामं मनसे कधीही सहन करणार नाही...राजेश चव्हाण, मुलुंड विभाग अध्यक्ष - मनसे लोकार्पण म्हणजे नेमकं काय, हे ज्यांनी लोकार्पणाच्या सोहळ्याचे बॅनर लावले आहेत त्यांनी आधी समजून घ्यावं. जे रुग्णालय पूर्णतः सुसज्ज, कार्यक्षम आणि लोकांच्या सेवेसाठी सज्ज आहे, त्याच रुग्णालयाचं लोकार्पण केलं जातं. परंतु सध्या मुलुंडच्या एम टी अग्रवाल रुग्णालयाचं लोकार्पण करण्याची घाई केली जात आहे, ते रुग्णालय अजूनही अर्धवट अवस्थेत आहे. या ठिकाणी केवळ ओपीडी सुरू होणार आहे, आणि सध्या ज्या ठिकाणी ओपीडी चालू आहे, ती आधीपासूनच सुरू आहे. मग घाईघाईत लोकार्पण करण्यामागचा हेतू काय, हा प्रश्न मुलुंडकर जनतेला पडला आहे. संपूर्ण मुलुंडमध्ये सध्या केवळ बॅनरबाजी सुरू आहे. या रुग्णालयासाठी कोणी काय काम केलं आहे, हे मुलुंडच्या सुज्ञ जनतेला चांगलं माहीत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कोणत्याही श्रेयवादात पडायचं नाही. आमची एकच स्पष्ट मागणी आहे—हे रुग्णालय पूर्णपणे सुसज्ज स्वरूपात लोकांसाठी उपलब्ध करून द्यावं. एवढं मोठं रुग्णालय उभारलं असेल, तर त्यामध्ये सर्व आवश्यक सुविधा लोकांना मिळायलाच हव्यात. जर हे रुग्णालय खऱ्या अर्थाने लोकांच्या सेवेसाठी सुसज्जपणे सुरू झालं, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने, मी स्वतः पेढे वाटून आनंद साजरा करीन. पण जर हे रुग्णालय अर्धवट अवस्थेत राहिलं आणि मुलुंडच्या जनतेच्या उपयोगाचं ठरलं नाही, तर मनसेची भूमिका काय असते, हे संबंधित प्रशासनाला चांगलंच माहीत आहे.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Dec 14, 2025 08:15:52
Yeola, Maharashtra:पुणे–इंदोर राष्ट्रीय महामार्ग येवला शहरातून जात असल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून शहरात तीव्र वाहतूक कोंडी होत आहे. अवजड वाहने, खासगी बस, ट्रक व स्थानिक वाहतूक एकाच मार्गावरून जात असल्याने परिस्थिती बिकट झाली आहे. विंचूर चौफुली व फत्तेबुरुज नाका येथे तासन्‌तास वाहतूक ठप्प राहत असून रुग्णवाहिका व अत्यावश्यक सेवांनाही अडथळे येत आहेत. या कोंडीमुळे अपघातांत जीवितहानी झाली असून व्यापार, दैनंदिन कामकाज व विद्यार्थ्यांनाही फटका बसत आहे. त्यामुळे पुणे–इंदोर महामार्गासाठी त्वरित पर्यायी बायपास मंजूर करून काम सुरू करावे व शहरातील वाहतूक नियोजनात सुधारणा करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Dec 14, 2025 06:46:03
Amravati, Maharashtra:अमरावती महानगरपालिके की प्रारूप मतदाता सूची में भारी गड़बड़ी सामने आई है। प्रभाग क्रमांक 18, राजापेठ Shankar नगर में एक ही घर के पते पर लगभग 200 मतदाताओं के नाम दर्ज होने की शिकायत कांग्रेस ने की है। घर बंद होने की पुष्टि नगरपालिका के सत्यापन में हुई। इस बारे में कांग्रेस ने आरोप लगाया है कि जिन घरों में यह 200 मतदाताएं पाई गईं, वे भाजप के कार्यकर्ता सारंग राऊत से जुड़े बताए गए हैं। कांग्रेस ने यह भी कहा कि एक ही घर में 200 मतदाता कैसे हो सकते हैं यह प्रश्न है। तक्रार के बाद निर्वाचन विभाग ने कहा कि नाम हटाने का अधिकार हमने नहीं, यह राज्य चुनाव आयोग का prerogative है, ऐसी प्रतिक्रिया युवक कांग्रेस के समीर जवंजाळ ने दी। साथ ही शिकारी पुन्नीबाई के घर में भी 45 मतदाताओं के नाम बताए गए हैं।
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 14, 2025 06:31:38
Akola, Maharashtra:युवक, युवती तथा महिला व पुरुष नागरिकांच्या आरोग्याविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने आज अकोला शहरात वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले. शहरातील मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या प्रांगणातून या वॉकेथॉनला उत्साहात सुरुवात झाली. तिक्ष्णगत फाउंडेशनच्या पुढाकाराने तसेच राज्य बालहक्क संरक्षण आयोग आणि पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात आला. वॉकेथॉनने शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत लालबहादूर शास्त्री प्रांगणात समारोप केला. या उपक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत “आरोग्य हेच खरे धन” असा संदेश दिला. यावेळी अनेक चिमुकल्यांनी हातात फलक घेऊन बालहक्क आणि आरोग्याबाबत जनजागृती केली. सिने अभिनेते गौरव मोरे आणि अंकुश चौधरी हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 14, 2025 06:23:30
Washim, Maharashtra:चारचाकी वाहनावर वाशिम जिल्ह्यातील लोणी बुद्रुक गावाजवळ अज्ञात व्यक्तींनी मध्यरात्री सुमारे एक वाजताच्या सुमारास जीवघेणा हल्ला केला.या हल्ल्यात चार प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रिसोड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.प्राथमिक माहितीनुसार,हल्लेखोरांनी प्रवाशांकडील काही रक्कमही लुटून नेल्याचे समोर आले आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी श्वान पथकाची मदत घेण्यात येत आहे.या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून,हा हल्ला केवळ चोरीच्या उद्देशाने करण्यात आला की यामागे अन्य काही कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Dec 14, 2025 06:06:34
Nashik, Maharashtra:नाशिकमध्ये घेण्यात आलेल्या सभेतील महत्वाचे मुद्दे मी इथे मोटार सायकलवर इथे पोहचलो आहे - आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुमच्या घरात सभा घेऊ - मागच्या काही दिवसांपासून नाशिक बातम्यांमध्ये आहे तपोवनात झाड तोडली जात आहे हजारोच्या संख्येने तोडले जात आहे मी अभिनंदन करतो नाशिकच्या जनतेचे ज्यांनी मुठभर लोकांनी जालीम हुकूमतच्या विरोधात उभे राहिले , मोगलीचिंग करून आम्हाला मारत होते आम्हाला संपवत होती आमचा नंबर संपला आता नाशिकमध्ये धर्माच्या आड येऊन झाडांना कापण्याचं काम करत आहे. मी सर्वांचे अभिनंदन करतो मी देखील तुमच्या लढाईमध्ये सामील आहे - कुंभमेळा होत आहे ज्याच्यासाठी सरकारने 25 हजार कोटी रुपयांचा फंड , कुंभमेळासाठी मंजूर केला आहे ठीक आहे धार्मिक कार्य आहे तुमचा उत्सव आहे तुम्ही बनवा परंतु 25000 करोड रुपये कोणत्या एका धार्मिक कार्यक्रमासाठी खर्च करणे , मी माध्यमांना देखील सांगतो तुम्ही याला मजबच्या चष्म्यातून बघू नका - औरंगाबाद मध्ये भारतीय जनता पार्टीचे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक बनवण्यासाठी जालना रोडची जमीन सगळ्यात किमती जमीन होती त्या स्मारकाचा विरोध एकट्या इम्तियाज जलीलने केला , मला शिव्या दिल्या फोन केला - मला आज एका गोष्टीचा गर्व आहे , माझी लढाई होती या देशात कोणत्या एका व्यक्तीच्या नावावर जाती धर्माच्या नावावर पैसे लुटले नाही पाहिजे , मी कोर्टात गेलो ज्या जागेवर स्मारक बनवत आहे त्या ठिकाणी हॉस्पिटल बनवा , आजच्या सहा महिन्यानंतर ज्या ठिकाणी भाजपने त्याचे स्मारक होणार होते त्या ठिकाणी 400 बेडचे हॉस्पिटल बनत आहे - देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे हा सेक्युलर देश आहे. या ठिकाणी सर्व जाती-धर्माचे आणि पंथाचे लोक राहतात या पंचवीस हजार करोड मध्ये किती हॉस्पिटल शाळा कॉलेज बांधू शकलो असतो त्यााचा विचार केला का? - तुम्ही तर 25000 करोड रुपये कुंभमेळासाठी देत आहात तर 25 डिसेंबरला नाताळ येत आहे 1000 करोड त्यांना पण द्या , दुसऱ्या धर्माचे सण येत आहे त्यांना पण द्या, जर तुम्ही म्हणाल मी माझ्या धर्मासाठी मागत आहे , आम्ही हज यात्रेची सबसिडी मोदींना भेटून नाकारली , त्या सबसिडीच्या बदल्यात आमच्या मुस्लिम मुलांसाठी शाळा कॉलेज उघडा सांगितले , पण परंतु सबसिडी बंद केली त्यांनी शाळा कॉलेज चालू केली नाही
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Dec 14, 2025 05:52:16
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 14, 2025 05:48:29
Nagpur, Maharashtra:नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी महायुतीतील भाजप व शिंदेसेनचे प्रमुख मंत्री व आमदारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग येथील डॉ.हेडगेवार स्मृतिमंदिर परिसराला भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह वरिष्ठ मंत्री उपस्थित होते. मात्र काही सत्ताधारी मंत्री व आमदारांनी मात्र यावेळी दांडी मारली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) आमदारदेखील पोहोचले नाहीत. संघाचे हे शताब्दी वर्ष आहे. संघाकडून आमदारांसाठी दरवर्षी अधिवेशन काळात उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात येते होते. सकाळी साडेसात वाजेनंतर आमदार व मंत्री रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात पोहोचले. त्यांनी आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. दरवर्षी संघ पदाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात येत होते. मात्र यावेळी हे उद्बोधन संघाकडून टाळण्यात आले. यावेळी विधानपरिषद सभापती राम शिंदे, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रामुख्याने उपस्थित होते. संघाकडून अखिल भारतीय सह संपर्क प्रमुख सुनिल देशपांडे, ज्येष्ठ प्रचारक विकास तेलंग, महानगर कार्यवाह रविंद्र बोकारे हे उपस्थित होते. दरम्यान, रेशीमबागला भाजप व शिंदेसेनेचे काही मंत्री व आमदार पोहोचलेच नाही. ते का पोहोचले नाही याबाबत विविध चर्चांना उधाण आले होते. तसेच मागील वर्षीप्रमाणे यंदादेखील राष्ट्रवादीचे आमदार पोहोचले नाही. निमंत्रण नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी सांगितले.
0
comment0
Report
Advertisement
Back to top