Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chhatrapati Sambhajinagar431001
ATS ने 9 साल से अवैध रूप से ठिकाने पर रहे येमनी नागरिक को संभाजीनगर में गिरफ्तार
VKVISHAL KAROLE
Feb 13, 2026 07:04:29
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजीनगर मध्ये तब्बल नौ वर्षांपासून बेकायदा वास्तव्यास असलेल्या 39 वर्षीय येमनी नागरिकाला दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ताब्यात घेतले आहे. मोहम्मद अहमद अली बिनाशिरबकर असे त्याचे नाव असून, जयसिंगपुर परिसरातून ही कारवाई करण्यात आली. विद्यार्थी व्हिसावर 1 ऑक्टोबर 2014 रोजी भारतात आलेल्या आरोपीचा व्हिसा 17 मार्च 2017 रोजी बेंगळूर येथे बीबीएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर संपली होती. मात्र, व्हिसा मुदत संपल्यानंतरही तो परदेशी न परतता भारतातच राहत होता. डिसेंबर 2024 मध्ये तो छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाला होता. गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार एटीएसने शोधमोहीम राबवत त्याला ताब्यात घेतले असून, अधिक तपास सुरू आहे. तसेच संबंधित घरमालकाविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSATISH MOHITE
Feb 13, 2026 08:21:04
Nanded, Maharashtra:राजकीय वैमनास्यातून भावकीच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. लाठ्या काठ्यांनी एकमेकांना मारहाण करण्यात आली. यात दोन्ही गटातील पाच ते सहा जखमी झाले. नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील नरसीमध्ये काल ही घटना घडली. माजी सरपंच असलेल्या दोन कुटुंबांत ही तुफान हाणामारी झाली आहे. विशेष म्हणजे पोलिसांच्या उपस्थितीतच दोन्ही गटांनी एकमेकांवर जीवघेणा हल्ला केल्याचे मोबाईल व्हिडिओत कैद झाले आहे. या घटनेत शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रवींद्र भिलवंडे आणि काँग्रेसचे जिल्हाकार्याध्यक्ष संभाजी भिलवंडे यांच्यासह पाच ते सहा जण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू असून परस्पर विरोधी तक्रारीनंतर गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Feb 13, 2026 08:19:59
Kalyan, Maharashtra:आजही जीव मुठीत धरून डोंबिवली वर करतात जीवघेणा प्रवास.. लोकल च्या बाहेर लटकून करत आहे प्रवास व्हिडिओ वायरल. Anc.. दोन दिवसांपूर्वी मुंब्रा और कळवा दरम्यान दुर्दैवी अपघातात डोंबिवलीतील सोहम कठरे या विद्यार्थ्यांचा जीव गेल्याची घटना ताजी असतानाच आजही डोंबिवली रेल्वे स्थानकावर सकाळच्या वेळेस गाड्या वेळेवर न आल्यााने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतं आहे दोन दिवसही उलटले नसताना परिस्थितीत कोणताही बदल दिसून न आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सकाळच्या गर्दीच्या वेळी लोकल गाड्यांची संख्या कमी त्यातच अनेक लोकल गाड्या उशिराने धावतात . परिणामी प्लॅटफॉर्मवर मोठी गर्दी उसळली. प्रवाशांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागला. डब्यांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी चढल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले असून ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मध्य रेल्वे मार्गावरील रेल्वेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अजून किती बळी गेल्यावर प्रशासन जागे होणार?असा संतप्त सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे. वारंवार होणारे उशीर, तांत्रिक बिघाड आणि नियोजनाचा अभाव यामुळे कल्याण डोंबिवलीसारख्या गर्दीच्या स्थानकावर प्रवाशांचे हाल सुरूच आहेत रेल्वे प्रशासन आणखी किती बळी घेणार असा सवाल रेल्वे प्रवासी करत आहे.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Feb 13, 2026 08:03:08
Beed, Maharashtra:बीड़: डॉक्टर भालचंद्र वाचनालयाच्या इमारतीला दिवंगत लोकनेते अजितदादा पवार भवन हे नाव द्या, परळीतील नागरिकांची मागणी..! Ac - बीडच्या परळीतील नगर परिषदे अंतर्गत असलेल्या डॉ. भालचंद्र वाचनालयाच्या इमारतीला दिवंगत लोकनेते अजितदादा पवार भवन हे नाव देण्यात यावे अशी मागणी परळीतील नागरिकाकडून करण्यात आली आहे.डॉ भालचंद्र वाचनालयाची नवीन अद्ययावत इमारत तयार आहे.दिवंगत अजित पवार यांचे परळीतील विकासाचे योगदान पाहता वाचनालयाच्या इमारतीला लोकनेते अजितदादा पवार भवन असे नाव देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली असून याबाबतचे निवेदन आज परळी नगर परिषद कार्यालयात देण्यात आले.यावेळी निवेदन देताना परळीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Feb 13, 2026 08:02:30
Kalyan, Maharashtra:डोंबिवलीत बसवर दगडफेक करत वाहन चालकाला शिवीगाळ करत मारण्याचा प्रयत्न; कुत्रा उडवल्याच्या संशयावरून तिघांचा अर्धा तास धिंगाणा डोंबिवलीमध्ये KDMC परिवहन सेवेच्या बसला तिघांनी अडवून गोंधळ कुत्रा उडवल्याच्या संशय घेत बस थांबवत अर्धा तास प्रवाशांना वेठीस प्रवाशांनी भरलेल्या बसवर दगडफेक; वाहनाचे नुकसान... वाहनचालकाला शिवीगाळ करत मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप डोंबिवली निवासी ते डोंबिवली रेल्वे स्थानक दरम्यान घडली घटना काल सायंकाळी ७ ते ९.३० दरम्यान घडली घटना घडलेल्या घटने नंतर बस चालक-वाहकांमध्ये भीतीचे वातावरण; गोंधळ घालणाऱ्यांवर तात्काळ कारवाईची मागणी
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Feb 13, 2026 07:04:53
Dharashiv, Maharashtra:धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीआधी राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, उबाठा गटाकडून शिवसेनेला अध्यक्षपदासाठी बाहेरून बिनशर्त पाठिंबा देण्याची तयारी सुरू आहे. भाजपाला रोखण्यासाठी दोन्ही सेनेने रणनीती आखल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक 19 जागा जिंकलेल्या भाजपाने सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. मात्र शिवसेनेकडून ‘अध्यक्ष शिवसेनेचाच’ असा ठाम दावा केला जातोय. विजयी उमेदवारांना सहलीवर पाठवत भाजपाने मॅजिक फिगर आपल्याकडे असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. दरम्यान, या घडामोडींमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सावंत ठरणार किंगमेकर का, याबत उत्सुकता वाढली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पाठिंबा देणे किंवा घेणे हा निर्णय बहुतांश वेळा स्थानिक पातळीवर घेतला जातो. कुणी आम्हाला पाठिंबा देत असेल तर त्याचे स्वागतच करू, अशी प्रतिक्रिया मंत्री संजय शिरसाट यांनी देत सकारात्मक संकेत दिले आहेत. शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हातात असल्याची चर्चा आहे. आकड्यांची जुळवाजुळे आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांसोबत बैठका सुरू असतानाच, निंबाळकर यांनी यावर सावध भूमिका घेत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपाला पाठिंबा दिल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेवर चांगलीच टीका झाली आता ते जिल्हा परिषदेच्या निमित्ताने शिवसेनेबरोबर जातील का? आणि भाजपला धाराशिव जिल्हा परिषदेच्या बाहेर ठेवण्यात यशस्वी होतील का? हे अवघ्या काही दिवसातच स्पष्ट होईल धाराशिव जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल भाजप – 19 शिवसेना – 15 उबाठा – 7 राष्ट्रवादी (अजित पवार गट) – 6 काँग्रेस – 3 अपक्ष – 4
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 13, 2026 07:04:19
0
comment0
Report
SMSamruddhi M Kolhe
Feb 13, 2026 06:51:41
Khopoli, Maharashtra:खोपोली | ब्रेकिंग न्यूज Anchor : खोपोलीत पोलिसांच्या मोठ्या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. शिळफाट्यावरील नवनाथ कॉलनी परिसरात पोलिसांनी छापा टाकत तब्बल ३ लाख २२ हजार रुपयांचा १५ किलो ४०० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. VO : या प्रकरणी श्रीपाद गणपत सूर्यवंशी, वय ६६ यांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक आरोपी हे शिंदे गटाचे नगरसेवक हरीश काळे यांचे सासरे असल्याची चर्चा खोपोली शहरात पसरल्याने प्रकरणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. हरीश काळे हे आमदार महेंद्र थोरवे यांचे निकटवर्तीय मानले जातात. सूत्रांच्या माहितीच्या आधारे मंगळवारी संध्याकाळी ५ वाजता ही कारवाई करण्यात आली आहे. छाप्यात पोलिसांनी गांजासह मोबाईल फोन आणि वजन काटा जप्त केला आहे. या प्रकरणी एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास खोपोली पोलीस करत आहेत.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 13, 2026 06:51:21
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी हवालदिल ( Choupal ) - सोलापुरात कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी हवालदिल - कांद्याला केवळ सहा ते आठ रुपये प्रति किलो भाव असल्याने शेतकरी संतप्त - सरकारने शेतकऱ्यांच्या कांद्याला अनुदान देण्याची मागणी - सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती 400 कांद्यांची आवक झाली - सरकारने कांदा निर्यात सुरू केले मात्र त्याचे निर्यात शुल्क वाढवल्याने शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळत नाही. - सरकारने तात्काळ कांद्याला अनुदान द्यावे आणि शेतकऱ्यांना जगवावे अशी मागणी CHAUPAL : कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 13, 2026 06:51:07
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर *मंत्री संजय शिरसाट बाईट पॉइंटर* ऑन परभणी मुस्लिम महापौर - उबाठाचा पहिला मुस्लिम महापौर परभणीत झालाय. मुस्लिम माणसाला आमचा विरोध नाही, मात्र ज्या पद्धतीने शिवसेनेची रचना झाली होती, त्या पद्धतीने शिवसेना चालली होती. त्यांनी मूळ भागाला दिलेला हा छेद आहे. मुंबईत मराठी माणसाशिवाय कोणीही महापौर होऊ नये, हिंदी भाषिकाही नको, मुस्लिम तर दूरच.. मराठी माणसासाठी लढतो म्हणणारे हे आता गेले कुठ? यांना गुजराथी, सिंधी,हिंदी भाषिक चालत नाही आणि मुस्लिम चालतात याचा अर्थ यांनी भूमिका बदललीये, हिंदू वोट विभाजन झाल्यावर, मते वळल्यानंतर हे (मुस्लिम) वोट मिळावे म्हणून हा उबाठाचा प्रयत्न आहे. ऑन चंद्रपूर खोके वक्तव्य.. - आमच्यावर जे आरोप व्हायचं, ते आरोप आता यांच्यावर होत आहेत. (उबाठा) हे विकले गेले आहे,चंद्रपूरमधे यांनी तडजोड केलीये. अशीच तडजोड यांना महाराष्ट्रात सर्वत्र करावी लागणार आहे. ऑन धाराशिव दोन्ही शिवसेना एकत्र? - काही जिल्हा परिषद सदस्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. कुणी पाठिंबा देत असेल तर ते घेऊ नये, असे काही करार झालेले नाही. शिंदे सर्व निर्णय घेतील.महराष्ट्रात सर्वत्र महायुतीचे जिल्हा परिषद अध्यक्ष होतील. ऑन आमदार बैठक - निवडणूक नंतर सर्व मंत्री, पद्धिकारी, प्रमुखांची बैठक घ्यावी लागते. पक्षाच्या नेत्यांना बैठक घ्यावी लागते. कश्यामुळे काय घडले ते पाहावे लागते. ऑन मंत्रालय झिरवळ केबिन रेड.. - त्या रेडचा समर्थन कुणी करणारं नाही. परंतु असे प्रकार घडत असतील तर मंत्रालय देखील लाचेपासून सुरक्षित नाही. ज्या अधिकाऱ्यावर संशय आहे.असे अधिकारी मंत्रालयातून बाहेर फेकले पाहिज. धुळे आमदार आचारसंहिता. - समितीचे निर्देश पाळले पाहिज. आमदारांचे नाही मात्र प्रत्येक लोकप्रतिनिधींनी ते पाळले पाहिजे. ऑन हैदराबाद गॅझेट. - हैदराबाद गॅझेटची तपासणीची प्रक्रिया किचकट आहे. मात्र सरकारने आश्वासन दिले आहे. प्रक्रियेला विलंब जरी लागला तरी माघार घेतली जाणार नाही... ऑन संजय राऊत एकनाथ शिंदे विधान. - संजय राऊतच्या डोक्यात झालेला तो परिणाम आहे. उचलली चिब लावली दाढीला, हे आम्हला शिकवायला निघाले, तू दाढीला जिब लावून दाखव बर. बाळासाहेब असते तर तुमच्या पृष्ठभागावर लाथ मारली असती. ज्यांना शिवसेना कळली नाही. त्यांनी दलाली करण्यापेक्षा घरी बसावे. ऑन 100 कोटी वर्क ऑर्डर गैरव्यवहार. - माझ्याकडे माहिती आली वर्कऑर्डर एकाची आणि क्यूआर कोड दुसऱ्याचा हा बोगस बिलाचा प्रकार समोर आला आहे.अनेक प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न आहे. यात जो कोणी दोषी असेल त्यावर कारवाई केली जाईल. ऑन पीकविमा. - सरकारने जी मदत जाहीर केली आहे.ती सर्व देण्यात आली आहे. पीकविमा संदर्भात मुख्यमंत्री पुन्हा एकदा योग्य तो निर्णय घेतील. ऑन शिंदे भाकरी फिरवणार, मंत्री बदलणार - एकनाथ शिंदे यांचा तो अधिकार आहे. ते मुख्य नेते आहेत.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Feb 13, 2026 06:18:00
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Feb 13, 2026 06:17:42
0
comment0
Report
Advertisement
Back to top