Back
CRS लॉगिन में 27,398 जन्म रिकॉर्ड सामने, SIT गठित कर साइबर फ्रॉड की जांच
SRSHRIKANT RAUT
Dec 25, 2025 04:37:29
Yavatmal, Maharashtra
मराठी आणि हिंदी स्क्रिप्ट आणि बाईट आहे.
----------------
यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील
शेंदूरसनी ग्रामपंचायतीत लोकसंख्या दीड हजार तर
सी.आर.एस. सॉफ्टवेअरच्या लॉगीनमध्ये
जन्माच्या २७ हजार ३९८ नोंदी आढळून आल्यानंतर, आता या प्रकरणात सायबर गैरप्रकार झाल्याची शक्यता लक्षात घेता अपर पोलिस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली 'विशेष तपास समिती' स्थापन करण्यात आली आहे. याबाबत गृह विभागाचा आदेश जिल्हा परिषदेत धडकला. यापूर्वी अज्ञात आरोपीविरुद्ध यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अवैध विलंबित जन्म-मृत्यू नोंदी रद्द करण्याची कार्यवाही शासनाच्या नियमानुसार सुरू असताना शेंदूरसनी गावात मोठ्या प्रमाणात जन्म-मृत्यू नोंदी आढळून येताच मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी एका समितीची नेमणूक केली. सीआरएस लॉगीनमध्ये २७ हजार ३९७ जन्म व सात मृत्यू नोंदी दिसल्या. या नोंदी या ग्रामपंचायत क्षेत्रातील नसल्याने संशय आणखीच बळावला. या प्रकरणाच्या तांत्रिक तपासासाठी दिल्ली येथील अतिरिक्त रजिस्ट्रार जनरल आणि राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र दिल्ली यांच्याकडे माहिती दिली. त्यांनी या नोंदी सायबर फ्रॉड असल्याचे स्पष्ट केले. आता स्थापन झालेल्या एसआयटीमध्ये अध्यक्ष अतिरिक्त पोलिस महासंचालक यशस्वी यादव, सदस्य आरोग्य सेवा, राज्य माहिती व आकडेवारीच्या उपसंचालक बबिता कामलापूरकर, तर सदस्य सचिव जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष ढोले आहेत.
त्यामुळे या नोंदी करणाऱ्यांचा नेमका हेतू काहीच आता स्पष्ट होऊ शकणार आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
TTTUSHAR TAPASE
FollowDec 25, 2025 06:05:530
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowDec 25, 2025 06:05:340
Report
MNMAYUR NIKAM
FollowDec 25, 2025 06:01:590
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 25, 2025 05:49:590
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 25, 2025 05:47:490
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 25, 2025 05:35:320
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowDec 25, 2025 05:03:020
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowDec 25, 2025 04:50:150
Report
SNSWATI NAIK
FollowDec 25, 2025 04:45:320
Report
KJKunal Jamdade
FollowDec 25, 2025 04:17:590
Report
AKAMAR KANE
FollowDec 25, 2025 04:17:470
Report
AKAMAR KANE
FollowDec 25, 2025 04:17:320
Report
SGSagar Gaikwad
FollowDec 25, 2025 04:00:300
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 25, 2025 04:00:110
Report
