445001
गणेशोत्सवात डीजेवर बंदी, नियमांचे पालन करा – पोलीस अधीक्षकांचे आवाहन
Waghapur, Maharashtra:यवतमाळ :गणेशोत्सव काळात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डीजे वापरावर बंदी घालण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी नागरिक व गणेश मंडळांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. सध्या जिल्हा पोलीस दलातर्फे ऑपरेशन प्रस्थान राबविले जात असून आदर्श गणेश मंडळांना बक्षिसे देण्यात येणार आहेत.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
अकोला में महिला कांग्रेस ने महंगाई-गैस दाम के विरोध में प्रदर्शन किया
Akola, Maharashtra:वाढत्या महागाई आणि इंधन दरवाढीच्या विरोधात देशभरात विरोधकांकडून आंदोलन करण्यात येत आहे. अकोल्यातही आज राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात महिला काँग्रेसच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले. वाढत्या महागाईचा सर्वाधिक फटका महिलांना बसत असल्याचे सांगत महिलांनी हातात प्रतीकात्मक गॅस सिलेंडर घेऊन सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी लाडकी बहीण योजनेत सरकारने घातलेली नवीन अट तात्काळ रद्द करून सर्व पात्र महिलांना योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली. तसेच वाढती महागाई आणि इंधन दरवाढ त्वरित कमी न केल्यास तीव्र आंदोलन छेडत अकोला जिल्हा बंदचा इशारा काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी दिला आहे.0
0
Report
चंद्रपूर में ट्रैफिक व्यवस्थे के लिए 100 गृहरक्षा दल के जवान तैनात; दुर्घटनाओं को रोकने का निर्णय
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर शहरातील वाहतूक व्यवस्थेच्या नियमनासाठी 100 गृहरक्षक दलाचे जवान झाले तैनात, दररोज एक या गतीने होणाऱ्या जिल्ह्यातील अपघात मृत्यूचे आकडे कमी करण्यासाठी पोलीस अधीक्षकांचा निर्णय. दररोज होणारी वाहतूक कोंडी ,बेशिस्त वाहन चालवणे याबाबत चंद्रपूर शहरातील वाहतूक व्यवस्थेच्या नियमनासाठी 100 गृहरक्षक दलाचे जवान तैनात झाले आहेत. दररोज एक या गतीने होणाऱ्या जिल्ह्यातील अपघात मृत्यूचे आकडे कमी करण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी हा निर्णय घेतला आहे. पुढील दोन महिने हा प्रकल्प शहरात राबविला जाणार आहे. गृहरक्षक दलाचे जवान जुजबी प्रशिक्षणानंतर चौकाचौकात कर्तव्य बजावत आहेत. बेशिस्त वाहन चालवणे , पार्किंग, रॉंग साईड वाहन चालवणे, यााबाबत गृहरक्षक दलाचे जवान वाहतूक पोलिसांना कारवाईत मदत करणार आहेत. गृहरक्षक दलाच्या जवानांना सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे. याशिवाय या औद्योगिक जिल्ह्यात महामार्गांवर अवजड वाहनांबाबत पोलीस आणखी सातर्कतेने कारवाई करून बेशिस्त वाहना विरोधात धडक कारवाई करत आहेत. या नव्या प्रकल्पाचे नक्की नियमनात काय होते याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे0
0
Report
विदर्भ में गर्मी से अलर्ट: 47°C तक ताप, तैयार रहें नागरिक
Chandrapur, Maharashtra:विदर्भातील मोबाईलवर आज मंत्रालयातील अलर्ट मेसेज धडकला. लाखो मोबाईलवर अति उष्ण तापमानाचा फ्लॅश संदेश झळकला. पुढील काही तास दिवस आणि रात्रीचे तापमान अति उष्ण राहणार असल्याचा सावधानतेचा इशारा यात देण्यात आलाय. नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. चंद्रपूर -गडचिरोली -वर्धा- नागपूर या जिल्ह्यांबाबत मंत्रालयाने हा इशारा दिला आहे या सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमान 47 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. प्रशासनाने याबाबत सविस्तर माहिती जारी केली आहे. हवामान विभाग, प्रादेशिक केंद्र नागपूर यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार या जिल्ह्यात काही ठिकाणी उष्ण लहर ते तीव्र उष्ण लहर निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दिनांक 26 ते 27 मे 2026 दरम्यान जिल्ह्यात काही भागांत उष्ण लहरसोबतच उष्ण रात्रींचीही परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत करण्यात आले आहे. प्रशासनाने नागरिकांना पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला दिला असून तहान लागली नसली तरी नियमित अंतराने पाणी पिण्याचे आवाहन करण्यात आले आहे. घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री, टोपी किंवा ओल्या कपड्याचा वापर करावा. दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे. हलकी, सैल व सुताची कपडे वापरावीत तसेच प्रवासादरम्यान पिण्याचे पाणी सोबत ठेवावे, असेही सांगण्यात आले आहे. उन्हात काम करणाऱ्या मजुरांनी किंवा नागरिकांनी मध्ये-मध्ये विश्रांती घ्यावी, शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी ORS, लिंबूपाणी, ताक, लस्सी, कैरीचे पन्हे यांसारख्या पेयांचा वापर करावा. अशक्तपणा, चक्कर येणे, डोकेदुखी, जास्त घाम येणे यांसारखी लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले तसेच आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याबावी. पाळीव प्राणी व गुरांना सावलीत ठेवून पुरेसे पाणी उपलब्ध करून द्यावे. घर थंड राहण्यासाठी पडदे, शटर, सनशेड यांचा वापर करावा तसेच रात्रीच्या वेळी खिडक्या उघड्या ठेवाव्यात, असेही प्रशासनाने म्हटले आहे. तसंही नागरिकांनी दारू, चहा, कॉफी व कार्बोनेटेड थंड पेयांचे सेवन टाळावे. जड व गडद रंगाचे कपडे वापरू नयेत. अतिश्रमाची कामे शक्यतो टाळावीत तसेच लहान मुल किंवा पाळीव प्राण्यांना बंद वाहनात ठेवू नये, असेही सूचित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष देऊन आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि उष्मालाटेपासून स्वतःचा व कुटुंबाचा बचाव करावा, असे आवाहन करण्यात आले आहे。0
0
Report
Advertisement
परळी में शिवाजी शिंदे पर धारदार हमला, अस्पताल में भर्ती; पुलिस जांच जारी
Beed, Maharashtra:परळी शहर में शिवाजी शिंदे वरिष्ठ नेता पर धारदार हथियार से हमला हुआ। हमले में वे गंभीर रूप से घायल हैं और स्व. रा.ती रुग्णालय अंबाजोगाई में उपचार हेतु स्थानांतरित किए गए हैं। इस प्रकरण की परळी संभाजीनगर पुलिस जांच कर रही है।0
0
Report
वाशीम में गर्मी से तंग उमस के बीच अचानक मूसलाधार बारिश, किसानों को राहत
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यात तापमान ४२ अंशांच्या पार गेले असताना,दुपारनंतर रिसोड शहरासह परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते.मात्र, अचानक झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.या पावसामुळे खरीप हंगामाच्या पूर्व मशागतीच्या कामांना वेग येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.0
0
Report
ऑनलाइन प्रेमजाल में 140 युवतियों से धोखाधड़ी: आरोपी आदर्श म्हात्रे गिरफ्तार
Kalyan, Maharashtra:आधी ओळख नंतर प्रेमाच्या जाळ्यात अडकून तरुणीची फसवणूक. 140 तरुणीची फसवणूक... भामट्याला मानपाडा पोलिसांच्या ताब्यात प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तरुणींशी संबंध प्रस्थापित करणे, त्यांचा विश्वास संपादन करणे आणि नंतर त्यांच्या नावावर लाखो रुपयांची कर्जे काढून फसवणूक करणाऱ्या भामट्याला डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीचे नाव आदर्श म्हात्रे असे असून यापूर्वी त्याला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. पनवेल रसायनी येथील परिसरात राहणारा आदर्श म्हात्रे सोशल मीडियाच्या सुरुवातीला तरुणी सोबत मैत्री करून तो त्यांचा विश्वास संपादन करायचा. त्यानंतर प्रेमसंबंध निर्माण करून संबंधित तरुणींच्या नावावर विविध बँकांमधून कर्जे काढल्याचा आरोप आहे. तपासात आतापर्यंत 140 हून अधिक तरुणींना त्याने आपल्या जाळ्यात ओढल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी 11 तरुणींनी पुढे येऊन अधिकृत तक्रारी दाखल केल्या असून आणखी काही पीडित महिला तक्रार देण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. विशेष बाब म्हणजे फसवणुकीला बळी पडलेल्या अनेक महिला उच्चशिक्षित असून विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. आर्थिक क्षेत्र, कॉर्पोरेट आणि व्यावसायिक क्षेत्रातील महिलांची संख्या यामध्ये लक्षणीय असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. नवी मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर डोंबिवलीतील एका तरुणीनेही फसवणुकीची तक्रार दिल्याने मानपाडा पोलिसांनी आदर्श म्हात्रेला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरोधातील गुन्ह्यांचा तपास सुरू असून आणखी पीडित महिला पुढे येण्याची शक्यता असल्याने फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणामुळे सोशल मीडियावरील ओळखी आणि ऑनलाइन नातेसंबंधांच्या माध्यमातून होणाऱ्या आर्थिक फसवणुकीचा गंभीर मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे.0
0
Report
Advertisement
यवतमाळ में ईंधन संकट से किसान परेशान, कांग्रेस का बड़ा ट्रैक्टर-डबकी मोर्चा सरकार पर हमला
Yavatmal, Maharashtra:यवतमाळमध्ये इंधनाचा तुटवडा, डीएपी-युरिया टंचाई, पिक विमा व खंडित वीज पुरवठ्याच्या प्रश्नांवर आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या नेतृत्वात काँग्रेसने भव्य ट्रॅक्टर-डबकी मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांसमोर उभ्या ठाकलेल्या डीएपी व युरिया खतांच्या कृत्रिम टंचाई, बोगस खते-बियाणे-कीटकनाशकांचा वाढता सुळसुळाट, रखडलेला पिक विमा, वाढते पेट्रोल-डिझेल दर तसेच अपुरा व विस्कळीत वीजपुरवठा यामुळे शेतकरी हैराण झाले असून शासन प्रशासनाने त्यांना वाऱ्यावर सोडले आहे असा आरोप आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी केला. मोर्चामध्ये माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांचे सह काँग्रेस कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.0
0
Report
चंपक मैदान में बकरी ईद को लेकर बकरों की भारी बिक्री शुरू
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. चंपक मैदानात बकऱ्यांच्या खरेदीची झुंबड.. बकरी ईद अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे.त्याच्या पार्श्वभूमीवर शिरगाव येथील प्रसिद्ध चंपक मैदान येथे बकऱ्यांचा भव्य बाजार भरला आहे.खरेदीसाठी व ग्राहकांची झुंबड उडत आहे. यंदाच्या बाजारात 20 हजार रुपयांपासून थेट 1 लाख 20 हजार रुपयांपर्यंतचे डौलदार आणि देखणे बकरे विक्रीसाठी दाखल झाले आहेत.. खरेदीदारांसोबतच बच्चे कंपनी आणि सर्वसामान्यांची मोठी गर्दी होत आहे.. गल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा बाजारात बकऱ्यांचे आवक उत्तम झाली आहे.. महागाईचा किंचित परिणाम जाणवत असला तरी सणाचा आनंद साजरा करण्याच्या उत्साहात कुठेही कमतरता दिसत नाही.. बकरी ईद निमित्त मुस्लिम बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे..0
0
Report
रत्नागिरी में पानी की किल्लत: 133 गाँव में 43 हजार लोग टैंकरों पर निर्भर
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. जिल्ह्यातील 133 वाड्यांत 18 ट्रॅक्टर पाणीपुरवठा.. लांजा राजापूर तालुक्यात पाणीटंचाई असूनही अद्याप टँकर सुरूच नाही.. अँकर रत्नागिरी जिल्ह्यात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत चालल्यामुळे पाण्याची दाहकताही वाढली आहे.. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील 57 गावातील 133 वाड्यात 43 हजार 159 टंचाईग्रस्तांना 18 ट्रॅन्करने पाणीपुरवठा सुरू आहे.. सात तालुक्यात पाणी टँकरने सुरू आहे..मात्र लांजा,राजापूर या दोन तालुक्यात पाणीटंचाई असून सुद्धा अद्याप ट्रंकरने पाणीपुरवठा सुरू झाला नाही..0
0
Report
Advertisement
रत्नागिरी में भीषण गर्मी से नागरिक परेशान, जिले के कई हिस्सों में तापमान बढ़ा
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. जिल्ह्यात पुन्हा उकाडा वाढला.. रत्नागिरीकरणसह पर्यटक हैराण.. अँकर रत्नागिरी जिल्ह्यात वाढत्या उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहेत..गेले काही दिवस मानसूनपूर्व पावसाच्या सरी पडल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता.मात्र त्यानंतर जिल्ह्यात पुन्हा उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत..घामाने अंगाची लाईव्ह होत आहे..तापमानाचा पारा चढत असल्याने रत्नागिरीसह लांजा,चिपळूण,राजापूर,गुहागर संगमेश्वर,गणपतीपुळे या सर्व विविध ठिकाणी उकाडा वाढला आहे..0
0
Report
उजनी के पानी छोड़ने की मांग पर किसान उग्र, भीमा पाटबंधारे कार्यालय में ठिय्या प्रदर्शन
Pandharpur, Maharashtra:उजनी उजव्या कालव्यातून माण नदीत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक. उभी पिकं पाण्यावाचून जळत असताना अधिकारी उडवा उडवीची उत्तर देत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज भीमा पाटबंधारे कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. वारंवार मागणी करून देखील पाणी सोडले जात नाही. उद्यापर्यंत पाणी न सोडल्यास अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयातच फोडण्याचा इशारा यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे.0
0
Report
रायगड़ में शिवसेना आक्रामक, कोकण सीट पर विकास गोगावले ही उम्मीदवार होंगे
Chendhare, Maharashtra:कोकणच्या जागेवरून रायगडमध्ये शिवसैनिक आक्रमक...... कोकणची जागा शिवसेनेचीच आणि विकास गोगावले लढणार ..... मंत्री भरत गागावले समर्थक विकास गोगावले यांच्याकरिता आग्रही... महाडमध्ये शिवसैनिकांची बैठक.... अनिकेत तटकरेंच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा विरोध राज्यात विधानपरिषद निवडणुकीकरिता सर्वपक्षीय नेतेमंडळी आपापल्या उमेदवारांना संधी मिळण्याकरिता वरिष्ठांकडे कंबर कसताना पाहायला मिळत आहे. अशातच आता कोकणची एकमेव असलेली जागा आपल्याला मिळावी याकरिता शिवसेना आक्रमक झाली आहे. रायगड मध्ये मंत्री भरत गोगावले यांच्या महाड मधील निवासस्थानी शिवसैनिकांनी बैठक घेत कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेवर विकास गोगावलेच लढतील असा आग्रह धरलाय. राष्ट्रवादीच्या अनिकेत तटकरे यांना शिवसैनिकांनी विरोध दर्शवत सुनील तटकरे नेहमीच खोडा घालतात असा घणाघात शिवसैनिकांनी तटकरेंवर केलाय. शिवसेनेकडे सर्वाधिक ३३४ असून या जागेवर शिवसेनेचाच अधिकार असल्याचं म्हणत विकास गोगावलेच या जागेवर उमेदवार असतील. असं न झाल्यास महायुती मध्ये आम्ही मैत्रीपूर्ण लढू अशी तयारीदेखील शिवसैनिकांनी दाखवली आहे. तसं झाल्यास कोकणात महायुती तुटण्याची शक्यता आहे. याबाबत आता वरिष्ठ कोणता निर्णय घेतील आणि कोणाला उमेदवारी मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.0
0
Report
Advertisement
ज्ञानेश्वर मंदिर के सेवक ने दानपेटी से लाखों की चोरी की
Pimpri-Chinchwad, Maharashtra:Anchor - ....संत ज्ञानेश्वर मंदिरात सेवेकऱ्यांन दानपेटीवर डल्ला मारल्यानंतर मंदिर विश्वस्त समितीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय..गेल्या काही महिन्यांपासून सेवेकरी दानपेटी तून चोरी करत होता अखेर तो पकडला गेल्यानंतर मंदिर समितीने अशा घटना घडू नयेत या साठी उपाय योजना सुरू केल्या आहेत... पाहुयात एक रिपोर्ट....! वि ओ - अवघ्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरात सेवेकरी म्हणून काम करत असलेल्या विशाल वारुळे याने थेट माऊलींच्या दानपेटीवरच डल्ला मारल्याची धक्कादायक घटना उघड झाल्यानंतर एकच खळबळ उडालीय..! विशाल वारुळे अस चोरी केलेल्या सेवेकराचे नाव आहे...! विशाल वारुळेच्या घरात रोकड सापडलीये. 10, 20, 50 आणि शंप्रत रुपयांच्या नोटांनी भरलेल्या पिशव्यांमध्ये तब्बल पावणे चार लाख रुपये पोलिसांनी जप्त केलेत. दानपेटीतील रक्कम जमा करताना विशाल हातचलाखी करायचा आणि एका पिशवीमध्ये नोटा भरायचा. गेल्या तीन महिन्यांपासून त्याचा हा उद्योग सुरु होता, असा अंदाज वर्तवला जातो. ज्या दिवशी नोटांनी भरलेली पिशवी घर घ्याण्यासाठी घेऊन जायचा, त्या दिवशी विशाल मंदिरातील काही हार घरात घेऊन जातो. असं म्हणायचा आणि पिशवीत हार दिसतील असे ठेवायचा, खाली मात्र रोकड असायची. घरी आल्यावर रोकड मोजायचा आणि नंतर ती पिशवी आहे तशी बेडमध्ये ठेऊन द्यायचा. त्याचं पिशव्यांमध्ये पावणे चार लाखांची ही रोकड आढळली. तो दानपेटीतील रक्कम जमा करणे आणि ती मोजून ठेवणे, हे काम करत होता... सी सी टी व्ही मध्ये संशयास्पद हालचाली आढळल्यानंतर त्याच भिंग फुटले...! बाईट-भीमा नरके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आळंदी वि ओ - .....या घटनेनंतर विशाल वारुळे याला अटक केले असले तरी घटनेनंतर मंदिर विश्वस्त समितीच्या कामकाजावर ही अनेक प्रश्न उपस्थित झालेत...! दानपेटी मधील पैसे हाथालण्याचे महत्वाचे काम या सेवेकराला कशाच्या आधारे दिले....? एवढे महिने तो पैसे चोरत होता तर सी सी टी व्ही मध्ये ते का तपासले गेले नाही...? तो कुणाच्या जवळचा होता का...? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असताना विश्वस्त समितीने मात्र त्याने मंदिरात सेवा देत विश्वास संपादन केला , खासकरून मंदिराचे रोखपाल महेश गोखले यांचा विश्वास संपादन केल्याचं समितीने स्पष्ट केले आहे...! बाईट - राजेंद्र उमाप, विश्वस्त वि ओ - ....या घटनेनंतर विश्वस्त समितीने मंदिरात कर्मचाऱ्यांसाठी नियम बदलले आहेत. सॉफ्टवेअर ची मदत घेऊन कर्मचाऱ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जाणार आहे...मंदिरातून जाताना येताना कर्मचाऱ्यांकडे कोणत्याही स्वरूपाची पिशवी असणार नाही, आणि सर्व कर्मचाऱ्यांना हनुमान मंदिरातूनच प्रवेश दिला जाणार आहे. वायओ - ....चोरीच्या घटनेनंतर मंदिर विश्वस्त समितीने विविध उपाय योजना सुरू केल्या आहेत. त्याचा किती फायदा होतो हे महत्वाचे ठरणार आहे. पण मुळात चोरी सारखी घटना होण्याची वाट का पहायची हा प्रश्न आहे...! कैलास पुरी झी मिडिया आळंदी पुणे0
0
Report
कुंभार्ली घाट के गड्ढों पर शिवसेना कार्यकर्ताओं का उबाठा विरोध, तात्कालिक सुधार की मांग
Ratnagiri, Maharashtra:कुंभार्ली घाटातील रस्त्यांची दुरवस्था आणि पडलेल्या मोठ्या खड्ड्यांवरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चिपळूणमधील कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झाले आहेत. पावसाळा तोंडावर आलेला असतानाही घाटातील रस्त्यांची दुरूस्ती न झाल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर उबाठा कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना थेट निवेदन सादर केले. पावसाळा सुरू होण्यापूर्वी या धोकादायक खड्ड्यांची तातडीने बुजवणूक करावी आणि घाटाची संपूर्ण डागडुजी करण्यात यावी, अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. वेळेच दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही Yाप्रसंगी देण्यात आला आहे.0
0
Report
सावंतवाड़ी रेलवे स्टेशन का नाम लोकमान्य मधु दंडवते टर्मिनल के रूप में तय
Oras Bk., Maharashtra:कोकण वासियांसाठी आनंदाची बातमी आहे. कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधू दंडवते यांचं नाव आता सावंतवाडी रेल्वे स्थानकाला देण्यात येणार आहे. आज झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून मागील अनेक वर्ष ही मागणी कोकण वासियांनी लावून धरली होती. मात्र आज पालकमंत्री नितेश राणे यांनी सदरचा विषय कॅबिनेट समोर ठेवला होता. सावंतवाडी रोड स्थानकाला आता लोकमान्य मधू दंडवते टर्मीनर्स असं नाव देण्यात येणार आहे; आज त्यामुळे कोकणवासियांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतोय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी सिंधुदुर्ग0
0
Report
Advertisement
