Back
अन...बुद्धम् शरणम् गच्छामी चा नारा राम कथेत गुंजला
Yavatmal, Maharashtra
यवतमाळ येथील चिंतामणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात सुरु असलेल्या रामकथेत आज तिसऱ्या दिवशी राष्ट्रसंत मोरारी बापूंच्या मुखातून उमटलेला “बुद्धम् शरणम् गच्छामि” हा नारा संपूर्ण परिसरात गुंजला. रामकथेच्या माध्यमातून बापू समाजाला सद्भावना, शांतता व मानवतेचा संदेश देत आहेत.
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSudarshan Khillare
FollowSept 08, 2025 12:34:55Yeola, Maharashtra:
अँकर:-
ईद-ए-मिलादनिमित्त येवला शहरात मुस्लिम बांधवांच्या वतीने शहरातील मुख्य रस्त्यावरून मिरवणूक काढण्यात आली. मोहम्मद पैगंबरांच्या जन्मदिनानिमित्त शहरात धार्मिक उत्साह, भाईचारा आणि एकतेचं दर्शन घडवणारी ही मिरवणूक सर्वांचे लक्ष वेधून घेतले.मिरवणुकीची सुरुवात आयना मशिदीपासून करण्यात येऊन हातात झेंडे, पैगंबरांविषयी घोषणाबाजी करत मुस्लिम बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला .
बाईट: सलीमोद्दीन मिसबाही - शहर काझी
0
Report
SNSWATI NAIK
FollowSept 08, 2025 12:34:35Navi Mumbai, Maharashtra:
story slug -: वनमंत्री गणेश नाईकांनी अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल.
महाराष्ट्र के वनमंत्री ने अधिकारियो को सुनाये बोल
ftp slug - nm bjp ganesh naik
shots-
reporter- swati naik
navi mumbai
Anchor -: धरण क्षेत्रात असलेल्या बंगल्यानमुळे धरणाचे पाणी अशुद्ध होत असून यावरून वनमंत्री गणेश नाईक यांनी अधिकाऱ्याला थेट केस करण्याची धमकी दिलेय. माथेरान माचीप्रबळ या दोन डोंगराच्या मध्ये वसलेले हे मोरबे धरण शुद्ध पाण्याचं म्हणता लाज वाटली पाहिजे आपल्याला अश्या शब्दात अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढलेय. गेल्यावर्षी बोललो होतो तुम्ही फक्त नोटीसा दिल्या. कायदा आणि नियमांचे पालन नाही केलं तर भोगावं लागतं. या बाबतीत मी तुमच्यावर केस टाकेन आणि जनतेला सांगेल हे तुम्हाला खोटं सांगतात शुद्ध पाणी आहे म्हणून. आमच्या तलावात वस्ती करुन राहणाऱ्यांच मलमूत्र पाण्यात येतं याची आपल्याला शरम वाटली पाहिजे आणि या शहराचा नागरिक म्हणून मलाही लाज वाटते अशी सडकून टीका वनमंत्री गणेश नाईक यांनी केलेय.
Sound byte गणेश नाईक वनमंत्री
0
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 08, 2025 12:33:01Jalna, Maharashtra:
FEED NAME | 0809ZT_JALNA_LAKHE_BYTE(3 FILES)
जालना : ज्याला घटना कळते त्यालाच शासन आदेशाचा अर्थ कळतो,ज्याला घटना कळत नाही ते अंगावर गुलाल उधळून घेतात-संजय लाखे यांची जरांगे यांच्यावर टिका
गुलाल अंगावर उधळून घेतल्यानं सत्य बदलत नाही,सत्य म्हणजे घटना
आपण कोणत्या मार्गाने चाललो हे समाजाला कळत नाही
नवीन जीआर नुसार मराठवाड्यातील एकही मराठा अर्ज करण्यासाठी पात्र नाही
प्रत्येक माणूस 5-50 हजारांना खपण्याची व्यवस्था राधाकृष्ण विखे पाटलांनी केलीय,यातील काही हिस्सा त्यांना मिळणार आहे
अँकर :ज्याला घटना कळते त्यालाच शासन आदेशाचा अर्थ कळतो,ज्याला घटना कळत नाही ते अंगावर गुलाल उधळून घेतात अशी टिका मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक संजय लाखे यांनी जरांगे यांच्यावर केलीय.जेसीबीने गुलाल अंगावर उधळून घेतल्यानं सत्य बदलत नाही,सत्य म्हणजे घटना असंही लाखे यांनी म्हटलंय.आपण कोणत्या मार्गाने चाललो हे समाजाला कळत नाही.नवीन जीआर नुसार मराठवाड्यातील एकही मराठा अर्ज करण्यासाठी पात्र नसल्याचं लाखे म्हणालेत.प्रत्येक माणूस 5-50 हजारांना खपण्याची व्यवस्था राधाकृष्ण विखे पाटलांनी केली असून यातील काही हिस्सा त्यांना मिळणार असल्याची टीका लाखे यांनी विखे पाटलांवर केलीय.
बाईट : संजय लाखे पाटील
0
Report
UJUmesh Jadhav
FollowSept 08, 2025 12:32:39Thane, Maharashtra:
भिवंडी..
ईद-ए-मिलादुन्नबी मिरवणुक उत्साहात...
ॲंकर...
मोहम्मद पैगंबर यांच्या १५०० व्या पुण्यतिथी आणि जयंती निमित्त भिवंडी शहरात आज पारंपरिक पद्धतीने ईद-ए-मिलादुन्नबी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
सालाबाद प्रमाणे ह्या वर्षी शहरातील सर्व मुस्लिम बांधव आपल्या-आपल्या परिसरातून मिरवणुका काढून कोटर गेट मशीद येथे एकत्र आले. त्यानंतर येथून सामूहिक मिरवणूक काढून मामा-भांजा दर्गा येथे रात्री उशिरा विसर्जित होणार आहे. विशेष म्हणजे यंदा गणेश विसर्जन आणि ईद-ए-मिलाद या दोन मोठ्या उत्सवांच्या पार्श्वभूमीवर धार्मिक सलोखा टिकून राहावे. यासाठी मुस्लिम बांधवांनी दोन दिवस उशिराने ही मिरवणूकचे आयोजन केले आहे. या मिरवणुकीत शहरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले असून, भिवंडी पोलिस परिमंडळ दोनच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
0
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 08, 2025 12:05:11Pandharpur, Maharashtra:
08092025
slug - PPR_MAHUD_EID
file 01
----
Anchor - मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्ताने सांगोला तालुक्यातील महूद येथील मुस्लिम समाजाच्या वतीने भव्य जुलूस काढण्यात आला. यावेळी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं . मुस्लिम समाज आणि रजा ग्रुपच्या वतीने मुख्य चौकात सर्व नागरिकांना मिठाईचे वाटप करण्यात आले. महूद मध्ये काढण्यात आलेल्या जुलूस मध्ये उंट घोडेस्वार सहभागी झाले होते.यावेळी मोठी पुष्पवृष्टी करत नागरिकांनी या जुलूसचे स्वागत केलं
0
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 08, 2025 12:04:09Beed, Maharashtra:
बीड : आमदार धनंजय मुंडेंकडून सुगावच्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाला आधार, मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
Anc : मराठा आरक्षणाच्या चळवळीत बीडच्या अंबाजोगाई येथील नितीन चव्हाण या तरुणाने समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचललं होतं. आज त्याच कुटुंबाला धीर देण्यासाठी आमदार धनंजय मुंडे स्वतः आत्महत्याग्रस्त कुटूंबाच्या घरी गेले. मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने एक लाख रुपयांची मदत देत, नितीन चव्हाण यांच्या दोन्हीही लहान मुलींच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी धनंजय मुंडेंनी स्वीकारत कुटुंबियांना मोठा आधार दिला आहे.
0
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 08, 2025 12:01:11Sinnar, Maharashtra:
अँकर :-
गेल्या काही दिवसापासून सिन्नर, तालुक्यातील मनेगाव ,दोडी दुशिंगवाडी, वावी परिसरात मेंढपाळ व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेळ्या मेंढ्या चोरी जात होत्या या पार्श्वभूमीवर सिन्नर, वावी तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते
दरम्यान
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कसून तपास करत राजस्थान राज्यातील रावल उर्फ राहुल बंजारा, या मुख्य आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्यासोबत आणखी सहा साथीदार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे यासह एक मारुती इको कार देखील पोलिसांनी जप्त केली असून पुढील तपास नाशिक ग्रामीण पोलीस करत आहेत
0
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 08, 2025 10:17:47Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
5 FILES
SLUG NAME -SAT_OBC_AGITATION
*सातारा*
सातारा - राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसी मधून मिळालेल्या आरक्षणाचा जीआर रद्द करावा या प्रमुख मागणीसाठी ओबीसी समाजाचा भव्य मोर्चा काढण्यात आला.. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून ओबीसी समाजाच्या वतीने शिवतीर्थ ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढून मराठा समाजाला काढलेल्या जीआर फाडून निषेध करण्यात आली. यावेळी राज्य शासनाचा ओबीसी समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला.
बाईट - ॲड .महेश गोरे ओबीसी जिल्हाध्यक्ष
0
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 08, 2025 08:26:50Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0809ZT_WSM_JALJEEVAN_MISSION_WORK
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर: जलजीवन मिशन अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी काही महिन्यांपूर्वी कामांना सुरुवात झाली होती.मात्र मागील चार-पाच महिन्यांपासून निधीअभावी ही कामे अर्धवट अवस्थेत थांबली आहेत. निधीअभावामुळे अपेक्षित पाणीपुरवठा सुरू न झाल्याने ग्रामस्थ पुन्हा पारंपरिक विहिरी,हांडे आणि टाक्यांवर अवलंबून राहण्यास बाध्य झाले आहेत.काही गावांत पाइपलाइनचे काम अपूर्ण राहिले आहे, तर अनेक ठिकाणी पंपिंग युनिटसाठी आवश्यक यंत्रणा अद्याप बसवण्यात आलेली नाही.रखडलेल्या निधीची उपलब्धता कधी होणार आणि थांबलेली कामे पुन्हा सुरू होणार कधी,याबाबत ग्रामस्थांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून ही रखडलेली कामं पूर्ण करण्याची मागणी केली जातं आहे.
14
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 08, 2025 07:47:29Nashik, Maharashtra:
Nsk_drtheftpkg
Feed by 2C
Anchor कोरोनामध्ये वडिलांचा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि तरीही खूप फिज द्यावी लागली. या रागातून नाशिकमध्ये पकडण्यात आलेला जळगावचा तरुण गुन्हेगार बनलाय. बघू या काय घडले ते
Vo 1 नाशिक शहरापासून जवळच असलेला राधानगरी हा परिसर ....या परिसरात महिनाभरापूर्वी एक दोन नव्हे तर अनेक घरांमध्ये घरफोड्या करण्यात आल्या. नाशिक शहरात चार डॉक्टर यांची घरे सुद्धा यामध्ये होती...पोलिसांनी परिसरातील सर्व घरफोडींच्या गुन्ह्याच्या ठिकाणांवरील आणि रत्यांवरील सीसीटीव्हींची तपासणी करण्यात आली. चार ठिकाणी झालेल्या घरफोडीत एकच संशयिताचे वर्णन जुळले. त्यात जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील फारुख रज्जाक काकर या तरुण गुन्हेगाराला पकडण्यात आलेय . पोलिसांना आपल्या गुन्ह्यांची कबुली देताना त्याने कोरोनामध्ये डॉक्टर यांच्या अवाजवी फीज देऊनही वडील वारले. त्यामुळे लाखोंची कमाई करणाऱ्या चार डॉक्टर यांना लक्ष्य केल्याच कबूल केले आहे.
Byte मोनिका राऊत डीएसपी झोन 1
Vo 2 या गुन्हेगाराने केलेल्या गुन्ह्यात १० घरफोडीचे गुन्हे उघड झाले आहेत. यात पंचवटी पोलिस ठाणे ९, म्हसरुळ १ अशा १० ठिकाणी घरफोडी उघड झालिये. यात ११ तोळे सोने, १ किलो ५२ ग्रॅम चांदी असे १३ लाख ६ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने पोलिसांनी जप्त केलेत.
Byte मोनिका राऊत डीएसपी झोन 1
Vo 3 गुन्हेगार होण्यासाठी गुन्हेगाराची स्थानिक पार्श्वभूमी कारणीभूत ठरते असे म्हटले जाते. मात्र या घटनेने मूलभूत गरज असलेल्या वाढत्या महागड्या वैद्यकीय उपचाराबाबतची समजात निर्माण होणारी चीड समोर आलीय
0
Report
AKAMAR KANE
FollowSept 08, 2025 07:32:36kolhapur, Maharashtra:
Ngp Bawankule byte
live u ने feed पाठवले
------------
नागपूर -
बाईट - चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री -
On रोहित पवार -
- रोहित पवारांनी काल मी एका कंपनीला 90 कोटी रुपयांचा दंड माफ केला आहे असा आरोप लावला होता, मी आज सांगितलं की रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा किंवा राजकीय संन्यास घ्यावा, आता ते म्हणत आहेत की विधिमंडळामध्ये हा प्रश्न उपस्थित झाला होता, खरंतर माननीय पूर्व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जे रोहित पवार म्हणत आहेत त्या प्रकरणाला फक्त स्थगिती दिली होती, कुठलाही दंड माफ केला नाही
- म्हणून मी म्हटले आहे की राजकीय संन्यास घ्यावा, प्रसिद्धीच्याच झोतात राहण्याकरिता रोहित पवारांनी अशा प्रकारचे आरोप लावून त्यांची प्रसिद्धी जी आहे यातून मिळू पाहत आहेत
- खोट्या आरोपातून कधीही प्रसिद्धी मिळत नाही, राजकीय आरोप करताना उठसुट आरोप करून राजकीय उंची आहे ती कमी करण्याचा त्यांचा अनेक प्रयत्न करत आहेत, त्यांनी हा प्रयत्न केला आहे अपरिपक्वतेचे लक्षण रोहित पवारांचं आहे
- राजकारणात ते नवीन आहेत,आधी अभ्यास करावा आणि मगच त्यांनी कुठलाही आरोप लावावा
- 11 जुलैला जो विधिमंडळात प्रश्न होता तो मागच्या काळात झालेल्या प्रश्न बाबत होता, राधाकृष्ण विखे पाटील यांनी सध्या दिलेला आहे एका उत्खनच्या प्रकरणात कुठलाही दंड तेव्हाही माफ केलेला नव्हता आताही दंड माफ केलेला नाही
- रोहित पवार यांना प्रसिद्धीच्या झोतात राहायचे आहे, त्यांना विरोधी पक्षात मी एकटाच लढवय्या आहे असं दाखवायचं आहे, म्हणून जरा अभ्यास केला पाहिजे तेव्हाचेही महसूलमंत्र्यांनी केवळ स्थगिती दिली होती आणि माझ्या कार्यकाळात कधीही कुठलाही दंड माफ केला गेला नाही
- रोहित पवारांनी ने माफ केलेला दंड हा सिद्ध करावा नाहीतर राजकीय संन्यास घ्यावा, लोणीकर या प्रकरणातही कुठला दंड माफ केलेला नाही
On ओबीसी -
- मुख्यमंत्री फडणवीस यांनी 14 ते 19 आणि नंतराचाही काळातही ओबीसींचा नुकसान होईल असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही, उलट या राज्यात ओबीसी मंत्रालय जे काँग्रेसने कधीही चाळीस वर्षात घेतला नाही ते ओबीसी मंत्रालय गठीत करण्याचा आणि राज्यात ओबीसीला मंत्री दिला पाहिजे अस काम केलं आहे
- सर्व ओबीसी समाजाला न्याय देण्याचा काम फडणवीस यांनी केलं
- बबनराव तायवाडे काय बोलताहेत याचा प्रशिक्षण वडेट्टीवारांनी घेतलं पाहिजे, एकदा वडेटीवारांनी हे सांगितलं पाहिजे की कुठल्या शब्दाने, कुठल्या वाक्याने ओबीसींवर अन्याय होत आहे आणि सरकार ऐकून घ्यायला तयार आहे
- ओबीसी करिता आमच्या सरकार कुठलीही गोष्ट कमी पडू देणार नाही, ओबीसीच्या ताटातले आरक्षण आमचं सरकार, आमचे मुख्यमंत्री कधीही होण्याचेही ताटात जाऊ देणार नाही, ओबीसीच्या ताटातला आरक्षण दुसऱ्याच्या ताटात जाणार नाही याची काळजी सरकारने घेतली आहे
- दहा तारखेला अकरा वाजता माझ्या अध्यक्षतेत भुजबळ साहेब, माझ्यासोबत आहेत पंकजा मुंडे आहेत, दत्ता भरणे गुलाबराव पाटील आहेत, आमचे सहा सात मंत्री आहोत, उपसमितीची बैठक दहा तारखेला अकरा वाजता बोलावलेली आहे
- विजय वडेट्टीवार यांना काही शंका वाटत आहे तर त्यांनी आमच्या उपसमितीला कळवावी, या ठिकाणी राजकीय फायदा किंवा सिद्धांत करून सामाजिक विषयाचा राजकीय स्टंट करून पॉलिटिकल काँग्रेस करण्याचा प्रयत्न करते आहे, हे या ठिकाणी चूक आहे,वडेट्टीवारांचे काय म्हणणं आहे ते आमच्या उपसमितीला सांगावे, उपसमिती नक्की विचार करेल आणि जर काही ओबीसीचा नुकसान होईल तर आमची उपसमिती त्यावर योग्य निर्णय घेईल
On बैठक -
- अतुल सावे यांनी सोडवलेलं उपोषण होता त्यावर बैठक आहे, ज्या काही मागण्या आहेत किंवा संशय आणि सद्दाम निर्माण झाला या संबंधित चर्चा करण्याकरित ओबीसी उपसमितीची बैठक बोलावली आहे
On आदिवासी बोगस नोकरी -
- याची आधी चौकशी होईल, या अशा विषयाला मीडियामध्ये बोलणं योग्य नाही
On ओबीसी प्रमाणपत्र -
- प्रमाणपत्र देताना आमचा जो महसूल विभाग आहे किंवा जे काही अधिकारी आहे,त प्रमाणपत्राला जे काही कागदपत्र लागतात किंवा अर्जाचा नमुना आहे,त्या अर्जाच्या नमुन्यात जे डॉक्युमेंट्स लागतात ते द्यावे लागतात तेव्हा अधिकारी प्रमाणपत्र जारी करतात
- अधिकाऱ्यांच्या मानेवर तलवार ठेवून आपण प्रमाणपत्र काढू शकत नाही
- योग्य आणि आवश्यक कागदपत्रे दिल्यावरच प्रमाणपत्र मिळेल
On रोहित पवार मुख्यमंत्री जाहिरात -
- उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये काय काय झालं ते रोहित पवारांनी चष्मा लावून बघावं, कशाकशा जाहिराती झाल्या, कशा कशा झाला आम्हाला बोलायला लावू नका, फडणवीस यांच्या प्रेमापोटी एखादी जाहिरात येणे तर यांचं पोट का दुखत आहे?
- फडणवीस यांनी खूप प्रेम कमावलं आहे, एकनाथ जी आणि अजित पवारांसोबत प्रेम कमावलेला आहे
- प्रेमापोटी एखादी जाहिरात दिली तर यांच्या पोटात का गोळा आला? छत्रपती शिवरायांच्या साक्षीने एक जाहिरात येते
- हे राज्य जनते करिता समर्पित आहे असा जाहिरातीचा भाव आहे, तुम्ही काय काय केलं सर्व आहे माझ्याकडे, पण मला त्यात जायचं नाही, एक नाही हजार जाहिरात येतील एवढं फडणवीस आणि कमावले
On भुजबळ -
- अतुल असावे यांनी बोलवलेले बैठक ही बबनराव तायवाडे यांनी केलेल्या आंदोलनाच्या संदर्भाने आहे
- परवा असलेल्या कॅबिनेटच्या उप समितीच्या बैठकीत आम्ही सगळे एकत्र आहोत
On लिंगायत -
- मला समजून घेऊन द्या, कारण लिंगायत समाज, वीरशैव समाज असेल, मी त्या ठिकाणी चर्चा करेल, त्यांच्याशी चर्चा करेल काय म्हणणं आहे ते ऐकून घेईल
-
0
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 08, 2025 07:06:13Ratnagiri, Maharashtra:
मुख्यमंत्री यांनी ओबीसी यांच्यावर अन्याय होणार नाही असं स्पष्ट केले आहे....
ओबीसी यांच्यावर अन्याय होतोय का? यासाठी समिती आहे... त्याचं अध्यक्ष बावनकुळे आहेत...
लाखो भाविकांच्या भावानेचा विचार व्हावा -लालबाग राजा प्रेशवर उत्तर
मुख्यमंत्री यांनी obc यांच्याबाबतीत भूमिका स्पष्ट केलीय... त्यानंतर आता मी काहीही बोलणे योग्य नाही - सामंत
उपराष्टपती पदी nda चा उमेदवार विजयी होईल - सामंत
लोकशाहीमध्ये आंदोलन करणे अधिकार... ओबीसी मोर्चा निघणार यावर सामंत यांचं उत्तर
भुजबळ यांचा गैरसमज दूर करु - सामंत
ज्यांनी पत्रकार परिषद घेतली ते समन्वय समितीत नाहीत... दरेकर यांना सामंत यांचं उत्तर... दरेकर यांनी स्थानिक स्वराज संस्था निवडणूक लडवण्याबाबतीत सामंत यांचं उत्तर
10 तारीखला महायुतीच्या समन्वय समितीची बैठक - सामंत
0
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 08, 2025 06:45:19Pandharpur, Maharashtra:
08092025
Slug - PPR_GRAMPANCHAYAT_WORKER
file 02
----
सोलापूर जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची दहा टक्के आरक्षण नुसार राखीव 86 पदे तत्काळ भरावीत अन्यथा 16 सप्टेंबर पासून पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा ग्रामपंचायत कामगार युनियने दिला आहे.
महाराष्ट्र शासनाने राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेत सेवेत वर्ग तीन व चार च्या पदावर 2005 च्या अधिनुसचने नुसार रिक्त पदांच्या दहा टक्के आरक्षण मंजूर केले आहे. सध्य स्थितीत जिल्हा परिषद प्रशासन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची फसवणूक व दिशाभूल करून 86 कर्मचाऱ्यांचे नुकसान करत आहे. सदर कर्मचाऱ्यांवर 2023 पासून हा अन्याय होत आहे. याबाबत युनियनचे अध्यक्ष दिलीप जाधव यांनी हा इशारा दिला आहे.
----
Byte - दिलीप जाधव, जिल्हाध्यक्ष , ग्रामपंचायत युनियन
0
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 08, 2025 06:34:56Yavatmal, Maharashtra:
राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या यवतमाळ येथील निवासस्थानासमोर फासेपारधी बांधवांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. श्री दादाजी आदिवासी फासेपारधी समाज संघटनाच्या नेतृत्वात अचानक फासेपारधींचा मोर्चा उईके यांच्या निवासस्थानी धडकला. फासेपारधींच्या प्रश्नाबाबत मंत्रालय स्तरीय अधिकारी उदासीन आहेत, ते संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची हेळसांड करतात असा आरोप मतीन भोसले यांनी केला आहे. फासेपारधी समाजाला इक्लास जमिनीचे पट्टे देण्यात यावे, स्वतंत्र फासेपारधी पॅकेजची निर्मिती करण्यात यावी, आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी, अमरावती येथील धारणी प्रकल्प अधिकारी येथे पारधी पॅकेजचा वितरीत न झालेला शासकीय निधी त्वरित वितरित करण्यात यावा व फासेपारधींना घरकुल देण्यात यावे अशा विविध मागण्या साठी हे ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
बाईट : मतीन भोसले : अध्यक्ष फासेपारधी समाज संघटना
0
Report