Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

वाशीम में बारहवीं भौतिकशास्त्र पेपर में सामूहिक कॉपीिंग, 27 कर्मियों पर मामला दर्ज

GMGANESH MOHALE
Feb 19, 2026 05:15:48
Washim, Maharashtra
वाशीम जिल्ह्यात बारावीच्या भौतिकशास्त्र पेपरच्या परीक्षेदरम्यान केंद्र क्रमांक ०९०६ श्री मैनागीरी महाराज कनिष्ठ महाविद्यालय टो येथे सामूहिक कॉपीचा प्रकार उघडकीस आला. शिक्षणाधिकारी संजय ससाने यांच्या भरारी पथकाच्या तपासणी दरम्यान ५८१ विद्यार्थ्यांनी एकसारखी उत्तरे लिहिल्याचे आढळले.यानंतर विद्यार्थी मास कॉपी केलं असल्याचा अहवाल दिला होता तसेच शिक्षण अधिकारी यांनी केंद्रावरील शिक्षक यांना निलंबित केलं होतं.या गंभीर मास कॉपी प्रकरणाची शिक्षण विभागाने दखल घेतली असून गटशिक्षणाधिकारी गजानन बाजड यांच्या तक्रारीवरून परीक्षा केंद्रावरील २६ शिक्षक आणि एका शिक्षकेत्तर अशा एकूण २७ कर्मचाऱ्यांविरोधात वाशीम ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाईमुळे वाशिम जिल्ह्यात शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
HCHEMANT CHAPUDE
Feb 19, 2026 06:35:10
Junnar, Pune, Maharashtra:शिवनेरी/पुणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या जीवनातील आनंदाचा एक दिवस आहे अखंड महाराष्ट्राचा अभिमान म्हणजे शिव छत्रपती. या शिवनेरी गडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला .. येथे आल्यानंतर एक नवीन प्रेरणा मिळते संपूर्ण देशात शिवजयंती साजरी केली जात असल्याचे राज्यकर्ते ज्या विकासाचा विचार आता करतात तो विचार छत्रपती शिवाजी महाराज यांनी 400 वर्षाचि केल्या होता महाराजांची जन्मभूमी आणि तालुक्याचा विकास हा सरकार करण्यास कटीबध्द आहे. छत्रपती शिवाजी महाराज काळाच्या पुढचा विचार करणारे युगपुरुष होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्शच्या वाटेने सरकार साडेतीन वर्षे काम करत आहे
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 19, 2026 06:32:27
Kolhapur, Maharashtra: Anc:- छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांच्या आपलं काम करायचं ठरवलं असेल असं विधान काँग्रेस खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी केलं आहे. त्याचवेळी आपण ब्रिटिशांच्या विरोधात लढत असताना ब्रिटिशांना कोणी कोणी मदत केली हे देखील पाहण्याची गरज आहे असं सुद्धा नमूद केलं. खरतर प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि आचार आपण लक्षात घेतले पाहिजे, जनतेसाठी काय करावं लागेल हे त्यातून लक्षात येऊ शकतं असं देखील शाहू महाराज म्हणालेत. कोल्हापुरातील नर्सरी बागेत शिवछत्रपती यांच्या जयंती निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभाग नोंदवल्यानंतर शाहू महाराज यांनी पत्रकारांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Feb 19, 2026 06:18:07
Junnar, Pune, Maharashtra:उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळावर उपस्थित राहण्याचे भाग्य मिळाले. आजचा दिवस वेगळा आणि जाणीव करून देणारा. ज्यावेळी मी उपमख्यनत्री पदाची शप्पत घेतली त्यावेळी माझ्यासमोर जिजाबाई यांचे चित्र समोर आले. त्यांनी केलेला संघर्ष समोर आला. दादानी आयुष्यभर जी वाटचाल केली तो वारसा मी सोडणार नाही. त्याच्यासाठी ऐतिहासिक स्थळ नाहीच तर त्यांच्यासाठी विचाराचे कार्याचे प्रेरणास्थान होते. या ठिकाणी शिवनेर विकास माध्यमातून विकास दादानी केला. दादा सर्व कामात जातीने लक्ष देत असत. महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे आणि राहील.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Feb 19, 2026 06:03:08
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची 396 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे,जिल्हा प्रशासनाकडुन शिवजयंती निमित्ताने सांगली शहरात मेगा पदयात्रा काढण्यात आली. जिल्हा परिषदेपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत भव्य मिरवणूक निघाली,ज्यामध्ये पारंपारिक वेशभूषा आणि वाद्यांच्या गजरात निघालेल्या मेगा पदयात्रेत जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्यासह जिल्हा पोलीस प्रमुख,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पदाधिकाऱ्यांसह शासकीय कर्मचारी आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने यावेळी सांगली नगरी दुमदुमून गेली होती
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Feb 19, 2026 06:02:36
Washim, Maharashtra:वाशिम: रिसोड ते साखरा हा विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारा महत्त्वाचा रस्ता सध्या पूर्णतः खड्डेमय झाला असून रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. मागील अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही,त्यामुळे आगरवाडी, चिंचाबाभर परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.हा रस्ता वाशिम आणि परभणी जिल्ह्यांना जोडणारा असल्याने येथे कायम मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. मात्र रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांचे नुकसान होत असून अपघाताचा धोका वाढला आहे.त्यामुळे या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी बांधकाम विभागाकडे केली आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Feb 19, 2026 05:50:42
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Feb 19, 2026 05:35:59
Amravati, Maharashtra:तीन फाईल आहे बडनेऱ्यात बोगस डॉक्टरवर अमरावती मनपाची कारवाई; मनपा कडून गुन्हा दाखल, खोटी डिग्री लावून करत होता उपचार बडनेरा परिसरातील एका कथित बोगस डॉक्टरवर धडक कारवाई केली. बोगस डिग्री लावून बडबेरा शहरातील नगीना मशिदीजवळील आठवडी बाजार परिसरात गेल्या १२-१५ वर्षांपासून डॉ. इंद्रजीत श्रीराम सरकार हे मुळव्याध व भंगदर तज्ज्ञ असल्याचा दावा करून उपचार करत होते. ते आयुर्वेद, होमिओपॅथी तसेच अ‍ॅलोपॅथी औषधांचा वापर करत असल्याची तक्रार प्रशासनाला प्राप्त झाली होती. त्यानुसार डॉ. रुपेश खडसे व डॉ. इमरान शहा यांच्या पथकाने बनावट रुग्ण पाठवून स्टिंग ऑपरेशन केले. तपासणीनंतर संबंधिताकडे कोणतेही वैद्यकीय पदवी प्रमाणपत्र आढळले नाही. २४ तासांची मुदत देऊनही कागदपत्रे सादर न केल्याने बडनेरा पोलिसांच्या मदतीने दवाखान्यावर छापा टाकण्यात आला. विविध औषधे व शस्त्रक्रियेचे साहित्य जप्त करण्यात आले. बडनेरा पोलीस स्टेशन येथे वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून शहरात बोगस डॉक्टरांना थारा दिला जाणार नाही असा इशारा मनपेकडून देण्यात आला.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Feb 19, 2026 05:17:21
Nashik, Maharashtra:तरुणीवर लैंगिक अत्याचार करून लग्नास नकार देणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल .... लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार करून लग्नास नकार देणाऱ्या तरुणा विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखलण्यात आला आहे. आरोपी मेघराज कुंदन गवळी याने तरुणीशी ओळख निर्माण केली. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार माळेगाव एमआयडीसीतील वेदांत लॉज येथे नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध केले. पीडित तरुणीने संशयित गवळी याला लग्नाबाबत विचारले असता त्याने लग्न करण्यास टाळाटाळ करून काही दिवसांनी नकार दिला, तसेच शिवीगाळ करून मारहाण केली. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मेघराज गवळी याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला....
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Feb 19, 2026 05:17:08
Dharashiv, Maharashtra:धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या वादात आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची एन्ट्री. “श्रद्धांजली म्हणून अध्यक्ष राष्ट्रवादीचा करा” अशी कार्यकर्त्यांची मागणी. भाजप–शिवसेना संघर्षात नवा ट्विस्ट. शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या संघर्षात आता राष्ट्रवादी काँग्रेसने उडी घेतली आहे. अजित पवारांनी सर्वांना भरभरून दिलं, त्यामुळे त्यांना श्रद्धांजली म्हणून धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा करावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. ही मागणी थेट शिवसेना आणि भाजपाकडे करण्यात आली. आधीच मॅजिक फिगरवरून दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरू असताना राष्ट्रवादीच्या या भूमिकेमुळे समीकरणे आणखी गुंतागुंतीची होण्याची शक्यता.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Feb 19, 2026 05:02:58
Beed, Maharashtra:बीड मधील शिवजयंतीचा उत्साह खास ड्रोन मधून बीडमध्ये मध्यरात्रीपासून शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय. सकाळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत आणि आमदार संदीप क्षीरसागर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात शासकीय महापूजा संपन्न झाली. तर शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच शिवप्रेमींची गर्दी आहे. शहरातील प्रमुख असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील ही खास ड्रोन दृश्य टिपली आहे ड्रोन पायलेट सुशांत काशीद यांनी.. आज शिवजयंती निमित्त विविध पारंपारिक मर्दानी खेळाचे आयोजन आहे. बीड शहरात पाच तर जिल्हाभرامध्ये 64 ठिकाणी मिरवणुकीला परवानगी असेल. मात्र ही शिवजयंती डीजे मुक्त करण्यावर प्रशासनाचा भर आहे. कोणत्याही परिसरात डीजेचा दणदणाट आढळून आल्यास थेट कारवाईचे संकेत प्रशासनाकडून आहेत. सायंकाळी छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर चित्त थरारक प्रात्यक्षिक होणार असून यासाठी मनोज जरांगे पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार है.
0
comment0
Report
Advertisement
Back to top