444505
वाशिम: जिल्हा अध्यक्ष दत्तराव गोटे भाजपमध्ये प्रवेश, वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का
Washim, Maharashtra:वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला आहे. वाशिम जिल्हाध्यक्ष दत्तराव गोटे यांनी काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत थेट भाजपमध्ये प्रवेश केला. निवडणुका अगदी तोंडावर असताना गोटे यांनी पक्षाचा निरोप घेतल्याने नगरपरिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकांत वंचित बहुजन आघाडीला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. "मला कुणावरही नाराजी नाही. मात्र जिल्ह्यातील बदललेल्या राजकीय परिस्थिती मुळे हा निर्णय घेतला," असे दत्तराव गोटे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीने दत्तराव गोटे पक्षातून हकालपट्टी केली आहे.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
लासलगांव प्याज कीमतों में रिकॉर्ड गिरावट; कर्नाटक-एमपी प्याज आपूर्ति ने बाज़ार बदला
Lasalgaon, Maharashtra:कर्नाटकात नवीन लाल कांद्याची तर मध्य प्रदेशात जुन्या उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक दाखल होत असल्याने त्याचा परिणाम कांद्याची अग्रेसर बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा दरावर झाला गेल्या शुक्रवारच्या तुलनेत मंगळवारी कांद्याच्या जास्तीतजास्त दरात तब्बल ७०० रुपये, तर सरासरी दरात ४०० रुपये प्रतिक्विंटलची घसरण झाली शुक्रवारी ५१२८ रुपये असलेला जास्तीतजास्त दर आज ४४५१ रुपयांवर आले तर सरासरी दर ४३०० वरून ३९०० रुपयांपर्यंत आले खाली आल्यामुळे आधीच दुष्काळाच्या संकटात असलेला कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा आर्थिक अडचणीत सापडला आहे0
0
Report
नागपुर गौ विज्ञान केंद्र को 'गो टूरिज्म' का दर्जा, मोहन भागवत ने प्रमाणपत्र सौंपा
Nagpur, Maharashtra:विश्व हिंदू परिषदेच्या नागपुरातील गौ विज्ञान केंद्राला ‘गौ टुरिझम’चा दर्जा देण्यात आला. या दर्जाचे प्रमाणपत्र सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते केंद्राचे पद्मेश गुप्ता यांना प्रदान करण्यात आले.विश्व हिंदू परिषदेचे अशोक सिंघल यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या शुभारंभाच्या निमित्ताने आज नागपूरच्या गोविज्ञान अनुसंधान केंद्र - गोतीर्थ, देवलापार येथे विविध नवीन प्रकल्पांचे शुभारंभ व लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं0
0
Report
युवाओं के सपने चुराने के खिलाफ सांसद कोल्हे का सरकार पर तीखा हमला
Shirur, Maharashtra:सध्या आमदार, खासदार आणि पक्ष पळवण्याचं पेव फुटलं असलं, तरी तरुणांच्या स्वप्नांची चोरी होणं ही त्याहूनही गंभीर बाब आहे, असा थेट घणाघात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला आहे. पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर बोलताना त्यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. गावाकडे बसलेल्या आई-वडिलांच्या त्यागाचा उल्लेख करत त्यांनी सांगितलं की, पोरगा पुण्यात शिकून अधिकारी होईल या आशेने आईने दागिने गहाण ठेवले आणि बापाने वर्षभर अंगावर नवीन कपडा घेतला नाही. पण आज याच तरुणांच्या आशेवर दरोडा टाकला जातोय, अशा भावनिक शब्दांत त्यांनी विद्यार्थ्यांची व्यथा मांडली.0
0
Report
Advertisement
नागपुर में अशोक सिंघल के जन्मशताब्दी पर गौ-विज्ञान केंद्र सहित कई प्रकल्पों का लोकार्पण
Nagpur, Maharashtra:नागपूर विश्व हिंदू परिषदेचे अशोक सिंघल यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या शुभारंभाच्या निमित्ताने आज नागपूरच्या गोविज्ञान अनुसंधान केंद्र - गोतीर्थ, देवलापार येथे विविध नवीन प्रकल्पांचे शुभारम्भ व लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. नागपूरच्या देवलापार येथील विश्व हिंदू परिषदेच्या गौ-विज्ञान अनुसंधान केंद्रातील अशोकजी सिंघल पंचगव्य भवन, राणी दुर्गावती ग्रामीण हाट, समृद्धी जैविक खत उत्पादन प्रकल्प यांचे लोकार्पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष आलोक कुमार, राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत पार पडत आहे.0
0
Report
खेड में ग्राम महसूल अधिकारी पर हमला, तात्कालिक कार्रवाई की मांग
Shirur, Maharashtra:खेड/पुणे दुष्काळी पंचनामे करताना ग्राम महसूल अधिकाऱ्यावर हल्ला;; मरकळमध्ये संताप ANC :खेड तालुक्यातील मरकळ ग्रामपंचायत कार्यालयात कर्तव्य बजावत असलेल्या ग्राम महसूल अधिकाऱ्यावर मारहाण झाल्याची घटना समोर आलीय. या घटनेत ग्राम महसूल अधिकारी बाळासाहेब जाधव यांना दुखापत झाली आहे. VO :राज्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागाकडून पंचनाम्याचं काम सुरू आहे. याच कामासाठी मरकळ ग्रामपंचायत कार्यालयात ग्राम महसूल अधिकारी बाळासाहेब जाधव हे शासकीय कामकाज करत होते. यावेळी प्रशांत देविदास लोखंडे याने शासकीय कामात अडथळा आणत जाधव यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत जाधव yांना दुखापत झाली आहे. घटनेनंतर ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी संघटना आक्रमक झाली असून, आरोपीवर कठोर कारवाई आणि तात्काळ अटकेची मागणी करण्यात आली आहे. कारवाई न झाल्याने संघटनेने खेड तहसीलदार यांना निवेदन देत आंदोलन केले0
0
Report
मोदी की 25वीं राजनैतिक वर्षगाँठ पर सेवा ज्योति यात्रा, बीजेपी ने रैली निकाली
Yeola, Maharashtra:देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय काराकीर्तीला पंचवीस वर्षे पूर्ण झाले असून यानिमित्ताने भारतीय जनता पार्टी तर्फे देशभरामध्ये सेवा ज्योती यात्रा आयोजित करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर येवला तालुका भारतीय जनता पार्टी तर्फे अहिल्याबाई होळकर घाट ते येवला मर्चंट बँक हॉल पर्यंत बाईक रॅली काढण्यात आली होती या रॅलीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवत घोषणाबाजी केली0
0
Report
Advertisement
चंद्रपुर कृषि बाजार में सोयाबीन आवक शुरू, शुरुआती भाव 6075 रु से ऊपर
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर कृषि उत्पन्न बाजार समिति में सोयाबीन की आवक शुरू हो चुकी है; पहले दिन भाव 6075 रुपये से अधिक रहा. दिवाली के अवसर पर नकदी फसल माने जाने वाले सोयाबीन किसानों की मदद के लिए अहम है. चंद्रपुर जिले में खरीप फसलों में सोयाबीन, धान, तूर और कपास प्रमुख हैं. सोयाबीन की मौजूदा आवक और भावों से किसानों को राहत मिली है, जबकि येलो मोझैक रोग से उत्पादन पर असर की आशंका बनी है. पिछले वर्ष शुरुआती भाव केवल 3000 रुपये थे. अध्यक्ष: गंगाधर राव वैद्य, चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समिति.0
0
Report
मोऱणा में चोरों ने दो घरों में तोड़फोड़ कर एक घर जला दिया, माहौल गरम
Satara, Maharashtra:सातारा - सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मोरणा विभागातील माणगाव येथे चोरट्यांनी दोन घरफोड्या करत एक घर पेटवून दिल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या दरोड्यादरम्यान चोरट्यांनी अलका शिवाजी जानुगडे या वृद्ध महिलेच्या घरातून 5 तोळे सोन्यासह 25 हजारांची रोख रक्कम लांबवली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने किंवा संतापातून चोरट्यांनी घर पेटवून दिले, ज्यामध्ये घरातील दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. याच परिसतात चोरट्यांनी आणखी एका पाणी व्यावसायिकाच्या प्लांटमधील 3 ते 4 मोटारी देखील चोरून नेल्या आहेत. या घटनेमुळे मोरणा भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून ग्रामस्थांनी या प्रकाराबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.0
0
Report
डॉ अमोल कोल्हे ने सरकार पर तंज कसते कहा, MPSC विद्यार्थी आंदोलन तेज
Shirur, Maharashtra:पुण्यात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसत आहे. विद्यार्थ्यांच्या या हक्काच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी थेट आंदोलनस्थळी धाव घेत सरकारवर तोफ डागली आहे. ज्याप्रमाणे आदिलशहाच्या आदेशाने पुण्यात नांगर फिरवून वेशीवर पहार ठोकण्यात आली होती, तसाच नांगर आजचं सरकार विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर आणि अपेक्षांवर फिरवतंय, असा घणाघाती आरोप डॉ. कोल्ह्यांनी केला. एवढंच नाही, तर महात्मा फुल्यांप्रमाणेच या मस्तवाल व्यवस्थेची पाठ फोडण्यासाठी आता पुन्हा आसूड उगारण्याची वेळ आली आहे, असा थेट इशाराही त्यांनी दिला आहे. नेमकं काय म्हणाले डॉ. अमोल कोल्हे, पाहुयात या सविस्तर बातमीतून...0
0
Report
Advertisement
राहुल गांधी के आंदोलन पर राजनीतिक टकराव, रोहित पवार और बीजेपी में बयानबाजी
Nagpur, Maharashtra:नागपूर परिणय फुके, भाजप नेते राहुल गांधी यांच्या आंदोलन देशाला बदनाम करणार.. कोणतीही चर्चा नाही.. पुरावे दिले नाही 3 कोटी लोक जे अनुपस्थित आहे ते बांगलादेशी रोहिंग्या आहे त्यांना पुन्हा मतदार यादीत टाकण्याकरता राहुल गांधी यांच्या आंदोलन राहुल गांधी यांच्या मागे ब्रेन अर्बन अर्बन नक्षल माईंडसेट रोहित पवार मुंबई कडे जात त्याच्यामध्ये धमक नाही पुणे बंद करण्याची पुणे के नागरिक सुज्ञ आहे. त्याच्यामागे जाणार नाही विद्यार्थ्यांच्या 13 पैकी 12 मागण्या अगोदरच पूर्ण झाले आहे.. हे आंदोलन म्हणजे रोहित पवार राहुल गांधी यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न... या दिवशी राहुल गांधी आंदोलन स्थळी पोहोचतील त्यांच्या दुसऱ्या दिवशी आंदोलन गुंडाळून ठेवण्यात येईल या पद्धतीने रोहित पवार आणि सुप्रियाताई मध्ये शीतयुद्ध आहे. रोहित पवार काँग्रेसच्या वाटेला आहे. त्याकरता ते राहुल गांधींना मार्क वाढवण्याचा सतत प्रयत्न आहे ( राष्ट्रवादी अजित पवार पक्ष वाद ) तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे ( भाजपा बंडखोरी ) (बाईट फ्रेम ) अनिल सोले सच्चे कार्यकर्ते आहे... 100 टक्के अर्ज मागे घेतीला.. गडकरी आणि फडणवीस त्यांची मनधरणी करण्यात यशस्वी होती रोहित पवार बाईट फ्रेम राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात वर्चस्वाची लढाई आहे.... रोहित पवार दुखावल्या गेले आहे... त्यामुळे हे राहुल गांधींची चमकोगिरी करत आहे... रोहित पवार पुढील सहा महिन्यात काँग्रेसमध्ये प्रवेश करणार0
0
Report
इंदुरीकर महाराज ने प्रेमप्रकरण में लड़कियों के भागने पर नया बयान दिया
Pandharpur, Maharashtra:कीर्तनकार इंदुरीकर महाराजांनी प्रेम प्रकरणातून पळून जाणाऱ्या मुली बद्दल पुन्हा भाष्य केले आहे. माढा तालुक्यातील अंजनगाव येथील किर्तनदरम्यान केल आहे. राज्यभरात मुली पळून जाण्याचे प्रमाण वाढलं असून प्रेमाच्या जाळ्यात मुली अडकत आहेत. मुलींच्या प्रेम प्रकरणामुळे मुलीच्या पालकांची वाईट अवस्था होते. यासोबत राजकारणी लोकांच्या वयावर ही इंदुरीकरांनी भाष्य केले आहे. साठ वर्षानंतर थांबायला हवे त्यांनी राजीनामाच द्यायला हवा वय वाढेल तशी बौद्धिक पातळी कमी होत असते. पुढाऱ्यांचे वय वाढले की ते वेड्यासारखा वागतात अशा पद्धतीचे वक्तव्य त्यांनी केला आहे0
0
Report
राहुल मिश्रा लापता: डोंगर पर खोज में ड्रोन और टीम लगी
Chendhare, Maharashtra:मिसिंग लिंकच्या डोंगरमाथ्यावरून तरुण बेपत्ता गारमाळवाडी रस्त्यावर बाईक, हेल्मेट अन् बॅग सापडली खोपोली पोलीसांकडून तरुणाचा शोध सुरू ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने डोंगर परिसरात शोधमोहीम अँकर - रायगडच्या खोपोली हद्दीत मिसिंग लिंकच्या वरील डोंगरमाथ्यावरून एक तरुण बेप्ता झाल्याची घटना समोर आली आहे. गारमाळवाडीच्या रस्त्यालगत त्याची मोटारसायकल आणि हेल्मेट आढळून आल्यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर खोपोली पोलीस आणि हेल्प फाउंडेशनच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली आहे. बेपत्ता तरुणाच्या शोधासाठी ड्रोन कॅमेऱ्याचीही मदत घेतली जात आहे. मोटारसायकळीजवळील बॅगेत पैशांचे पाकीट, एटीएम कार्ड आणि मोबाईल फोन आढळून आला आहे. बेपत्ता तरुणाचे नाव राहुल सुमित मिश्रा असून तो कॉग्निझंट कंपनीत कर्मचारी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.0
0
Report
Advertisement
सूखा पिकेही नाही, शेतकरी गोपाळ मगदूमचे सपने राख झाले
Sangli, Maharashtra:स्लग - दुष्काळाने पिकेचं नव्हे,शेतकरयाची स्वप्नांचीही राख.. अँकर - मणी मंगळसूत्र गहाण ठेवलं,शेतात पैसा ओतला,दिवाळीच्या स्वप्नांची पेरणी केली,पण आभाळानेच साथ सोडली. निसर्गाच्या अवकृपेने उभं पीक करपलं... आणि पिकासोबत एका शेतकरी कुटुंबाची स्वप्नंही जळून खाक झाली...ही कहाणी नाही,हे वास्तव आहे,सांगलीच्या गोपाळ मगदूम या शेतकरयाचं..कारण दुष्काळाने त्यांच्या शेतातलं पीकेचं नव्हे,तर त्यांची स्वप्नं ही हिरावून घेतलंय... यंदाही त्यांनी सहा एकरात सोयाबीन, मूग आणि उडीद पेरलं,कमी कालावधीचं पीक, लवकर उत्पन्न आणि दिवाळीच्या सणाला घरात आनंद,या छोट्याशा आशेवर त्यांनी पुन्हा एकदा मातीत स्वप्नं पेरली. पण पावसानेही मगदूम यांच्या आशां-आकांशावर पाणी फेरलं,आभाळाकडे डोळे लावून दिवस सरत गेले,पाऊस आला नाही..आणि हळूहळू हिरवं शिवार पिवळं पडलं,पिकांनी माना टाकल्या आणि डोळ्यादेखत उभं स्वप्न करपून गेलं. डोळ्यांदेखील पीक गेल्याने स्वप्नांचा तर चुराडा झालाच शिवाय गोपाळ मगदूमन च्या समोर पत्नीचे मणी मंगळसूत्र कसे सोडवू आणायचं घर कसं चालवायचं दिवाळीचा सण कसा साजरा करायचा असे एक ना एक प्रश्न निर्माण होत आले आणि त्यांच्या मनात आपसूकच आत्महत्या करायचा विचार देखील वादळासारखा घोंगावत होता.. गोपाळ मगदूम यांचा संपूर्ण संसार शेतीवर अवलंबून..मुलाचं व्हेटरनरीचं शिक्षण पूर्ण झालंय,तो वडिलांसोबत शेतात राबतो. पत्नीही शेतकामात हातभार लावते,घरखर्च असो,मुलाच्या शिक्षणाचा खर्च असो, सगळ्याचा आधार याच शेतजमिनीचा आहे, पण यंदा शेतीच करपली..त्यामुळे ज्या शेतात दिवाळीचा आनंद उगवणार होता,तिथं आता दुष्काळाने पिकांची राख बनली आहे. एका बाजूला करपलेलं शिवार, दुसऱ्या बाजूला गहाण पडलेलं मणी मंगळसूत्र,आणि समोर पुन्हा शेती उभी करण्याचं मोठं आव्हान..तरीही गोपाळ मगदूम यांची आशा संपलेली नाही. करपलेल्या मातीतून पुन्हा हिरवाई उगवावी. गहाण पडलेलं मंगळसूत्र पुन्हा पत्नीच्या गळ्यात यावं..आणि घराच्या उंबरठ्यावर पुन्हा आनंदाची दिवाळी यावी,यासाठीच शासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा,अशी त्यांची मागणी आहे...0
0
Report
लातूर के किसान ने कृषि घाटा और कर्ज के बोझ तले आत्महत्या कर ली
Latur, Maharashtra:लातूरमध्ये आणखी एक दुष्काळाचा बळी; नापिकी और कर्जबाजारीपणामुळे पळशी येथे शेतकऱ्याची आत्महत्या. कुटुंबावर दुःखाचा डोंगर... लातूर जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येची आणखी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शेतीतील नापिकी और वाढत्या कर्जबाजारीपणाच्या आर्थिक विवंचनेतून एका 60 वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. रेनापुर तालुक्यातल्या पळशी येथील जीवन गव्हाणे अस आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे, खाजगी बँकेचे 90 हजार रुपये तसेच सावकाराकडून एक लाख रुपये असा एकूण 1लाख 90 हजार रुपयांचा कर्जाचा डोंगर या शेतकऱ्याच्या अंगावर होता. दरम्यान शेतीत पिकलं नाही सावकाराचे पैसे द्यायचे कसे, या विवेचनेतून या शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.0
0
Report
_pani_ki_kami_ke_keeli_ke_pik_ke_rhotavetar_ne_kaadhi_paka_di
Pandharpur, Maharashtra:सोलापूराच्या करमाळा तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्याने विहीर व बोअरवेलचे पाणी कमी झाल्याने पांडे येथील शेतकऱ्याने केळीचे पीक जगवणे अशक्य असल्याने एक एकर केळीच्या उभ्या पिकावर रोटावेटर फिरवून केळी काढून टाकली आहे. पांडे येथील शेतकरी समद मुजावर यांनी एक एकर क्षेत्रावर केळीची रोपे लावली होती. केळी ऐन बहरात येण्याच्या मार्गावर असताना अचानक विहीर व बोअरवेलचे पाणी कमी झाल्याने केळी जगवण्यासाठी दुसरा बोअर घेतला. नवीन घेतलेल्या बोअरला सुद्धा पाणी कमी लागले. काही दिवस केळी जगण्यासाठी शेतकऱ्याने टँकरने पाणी विकत घेऊन केळी जगवली. तरीही पाणी कमी पडू लागल्याने केळी सुकू लागली. टँकरने पाणी विकत घेऊन केळी जगवली. तरीही पाणी कमी पडू लागल्याने केळी सुकू लागल्याने रोटावेटर फिरविण्याचा निर्णय. या वर्षी पाऊस कमी झाल्याने बोअरचे पाणी कमी झाले. पावसाळ्याच्या दिवसात ही उन्हाळ्यासारखे कडक ऊन पडत असल्याने टँकरने विकत घेऊन पाणी पिकांना देणे परवडत नसल्याने समद मुजावर टँकरद्वारे केळीला पाणी दिल्यामुळे खर्च वाढल्याने व केळीचे दर अचानक पडल्याने टंचाईच्या काळात आता केळीचे पीक परवडणारे नसल्याचा विचार करून समद मुजावर यांनी केळीच्या उभ्या पिकावर रोटावेटर मारण्याचे ठरवून केळी शेतातून काढून टाकली आहे.0
0
Report
Advertisement
