Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

Washim–Pusad मार्ग पर एसटी बस पलटी, 37 यात्री सुरक्षित; कोई बड़ी घटना नहीं

GMGANESH MOHALE
Feb 11, 2026 11:37:24
Washim, Maharashtra
अँकर: वाशिम जिल्ह्यातील वाशिम–पुसद मार्गावरील सापळी फाटा येथे आज शेगाव ते उमरखेड जाणारी एसटी बस पलटी होऊन अपघात झाल्याची घटना घडली. या बसमध्ये एकूण 37 प्रवासी प्रवास करत होते. MH 14 BT 4362 क्रमांकाची बस वाशिम बसस्थानकातून निघाल्यानंतर उमरखेड कडे जात असताना एका बाईक चालकाने अचानक बससमोर बाईक आडवी आणल्याने बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटल्यामुळे बस रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली. अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले असून, सुदैवाने कोणत्याही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. जखमींना तात्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले तर उर्वरित प्रवाशांना दुसऱ्या बसने पुढील प्रवासासाठी मार्गस्थ करण्यात आले आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PNPratap Naik1
Mar 07, 2026 02:31:09
Kolhapur, Maharashtra:कोल्हापुर शहर में धक्कादायक मामला सामने आया है। शहर के यादव नगर क्षेत्र के एक बाल सुधार गृह से मुक्त होकर आये दो विधी संघर्षग्रस्त नाबालिगों का वीडियो सोशल मीडिया पर वायरल हो रहा है। इनको हत्या के आरोप में गिरफ्तार कर बाल सुधार गृह भेजा गया था, लेकिन न्यायालय के आदेश के बाद उनकी मुक्तता हो गई। उनके साथी उनकी वापसी पर उनके साथ वीडियो बना रहे थे और वीडियो में कहा गया कि 'किंग इज बैक' जब तक तोड़ेंगे नहीं तब तक रुकेंगे नहीं। यह वीडियो अब सोशल मीडिया पर बड़े पैमाने पर वायरल हो रहा है। जानकारी के अनुसार ये दोनों नाबालिग यादव नगर के ही हैं और कथित तौर पर 'रावण ग्रुप' के सदस्य बताए जा रहे हैं। समूह के हर सदस्य के हाथ पर एक जैसे टैटू दिखने की भी सूचना है। इस वायरल वीडियो के कारण शहर में फिर से बाल अपराध का मुद्दा चर्चा का केंद्र बना हुआ है।
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 07, 2026 02:30:34
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 07, 2026 02:30:16
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 07, 2026 02:01:07
Bhandara, Maharashtra:शासकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात उंदीरांचा मुक्त संचार सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीने गंभीर असलेल्या या प्रकारामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. भंडारा येथील शासकीय महाविद्यालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात उंदीर मोकाट फिरताना दिसत आहेत. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांच्या बेडजवळ उंदीर फिरत असल्याचे समोर आले आहे. स्वच्छतेचा अभाव आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे ही समस्या वाढत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. या प्रकारामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र रुग्णालय प्रशासनाने रुग्णांच्या नातेवाईकांना दोषी ठरवत कुठेही अन्न फेकत असल्याने रूग्णालयात उंदीर मोठ्या प्रमाणात आहे असे सांगितले. तर दुसरीकडे उंदीर मारण्यासाठी वड्या ठेवल्या जातात असे सांगितले आहे... संवेदनशील ठिकाणी उंदरांचा मुक्त संचार होत असल्याने प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन स्वच्छता आणि नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 07, 2026 02:00:47
Bhandara, Maharashtra:बाळ विक्री प्रकरणात डॉक्टर नितेश वाजपेयी यांच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. अल्पवयीन मुलीची प्रसुती करून बाळ विक्री केल्याच्या प्रकाराने पोलिसांना गुन्हेगळे उघड झाले. गोंदिया येथील डॉक्टर नितेश वाजपेयी यांनी नवजात बाळ भंडारा येथील पांढराबोडी येथे अडीच लाखात विक्री केला होता. हा प्रकार उघडकीस आल्यावर पोलिसांनी डॉक्टर सह 6 आरोपींना अटक केली. या प्रकरणात तपास वाढविला असता आणखी एक बाळ डॉक्टरने विक्री केला असल्याचं उघड झालं. त्या बाळाची आई ही अल्पवयीन मुलगी होती. पीडित मुलगी परराज्यातील असून ती उपचारासाठी गोंदिया येथे आली होती. मुलगी प्रसूतीसाठी बालाजी डॉस्पिटल येथे आली असताना डॉक्टर नितेश वाजपेयी यांनी याची माहिती पोलिसांना न देता प्रसूती करून बाळ विक्री केला. या प्रकरणी भंडारा पोलिसांनी गोंदिया येथील रामनगर पोलिस स्टेशनमध्ये पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे डॉक्टर नितेश वाजपेयी यांचे पाय आणखी खोलात जात असल्याचं दिसून येत आहे...
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 07, 2026 02:00:18
Bhandara, Maharashtra:ड्रग्स तस्कर धोकादायक गुंड साद जाहीद जामा कुरेशी, याला अटक करत एम.पी.डी.ए. कायद्यान्वये मध्यवर्ती कारागृह अमरावती येथे केली रवानगी. भंडारा शहरात दहशत माजवून तसेच ड्रग्स विक्री प्रकरणातील आरोपी साद जाहीद (बबलु) जामा कुरेशी, हा पोलीस स्टेशन भंडारा परीसरातील अंबिका नगर भोजापुर येथील रहिवासी असुन तो ड्रग्स तस्का व धमकदायक गुंड, खुनसी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. साद जामा कुरेशी हा सन 2020 पासुन विविध गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय असुन त्याच्या वर प्राणघातक हत्त्याराणीशी गंभीर दुखापत करणे, जावुन साक्षीदारांना धमकावून शिवीगाळ करून हातात चाकू घेऊन मारण्यास धावणे, व्यवसायिक दुकानदारांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्या दुकानातून वस्तु घेऊन त्या वस्तुचे पैसे न देता मारहान करणे, उलट त्यांच्या दुकानातील गळ्यातून जबरीने पैसे हिस्कावून घेणे, अंमली पदार्थ गांजा सेवन करणे, तसेच ड्रग्स सोबत बाळगुन नागपुरवरून इतर ठिकाणी ड्रग्स व गांजाची तस्करी करणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. भंडारा पोलिसांनी त्याला अटक करत एम.पी.डी.ए कायद्यान्वये कारवाई केली आहे.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Mar 07, 2026 01:18:40
Latur, Maharashtra:लातूर जिल्ह्यातील औसा–तुळजापूर महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या बीएमड्ले कारने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या लाकडाची वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पोला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात बीएमड्ळमधील सहा जणांपैक चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी औसा आणि लातूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये औसा तालुक्यातील बोरगाव येथील तिघांचा आणि सांगली येथील एकाचा समावेश आहे. धडक इतकी जोरदार होती की आयशर टेम्पो उलटला असून बीएमड्ळ कारचेही पूर्ण टप उडून गेले आहे. ही दुर्घटना काल रात्री उशिरा घडली असून परिसरात हार्दिक शोक व्यक्त केला जात आहे.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 07, 2026 01:18:15
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली जिल्हा परिषदेत मध्ये सत्तेत महायुती की महाविकास आघाडी याचा तिढा सुटलेला नाही. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या भूमिकेवर सत्ता कोणाची येणार हे ठरणार आहे. सत्तेच्या गणितासाठी असणारा व्हीप कोण बजावणार यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये दोन मतप्रवाह निर्माण झाली आहेत. जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या ऐवजी जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या गटनेत्या राजेश्वरी नाईक यांच्याकडे व्हीप बजावण्याचा अधिकार देण्यात आले होते, मात्र ते अधिकार माजी आमदार विलासराव जगताप यांच्याकडे देण्याची भूमिका माजी खासदार संजयकाका पाटील, माजी मंत्री अजित घोरपडे व माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख , माजी सभापती तमनगौडा रवी पाटील यांच्याकडून घेण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील आणि माजी आमदार शिवाजीराव नाईक यांनी महायुतीच्या बाजूने जाण्याची भूमिका घेतली आहे, तर संजयकाका पाटील गटाने महाविकास आघाडीबरोबर जाण्याची भूमिका घेतल्याचे सूत्रांकडुन सांगण्यात येत आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादीचे व्हीप मोडल्यास कायदेशीर कारवाई होणार असा इशारा दिला होता, त्यामुळे व्हीप कोण बजावणार यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटात अंतर्गत संघर्ष सुरू झाला आहे.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 07, 2026 01:17:20
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - जत तालुक्यातील प्रश्नांवर खासदार विशाल पाटलांची आमसभा, नागरिकांनी वाचला तक्रारींचा पाढा.. अँकर - सांगलीच्या जत मध्ये खासदार विशाल पाटील यांची आमसभा पार पडली. जत तालुक्यातल्या विविध प्रश्नांवर खासदार विशाल पाटील यांनी अधिकारी,नागरिक यांच्यासोबत ही आमसभा घेतली.त्यामध्ये तालुक्यातील नागरिकांनी आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, रस्ते,वीज तसेच महसूल प्रशासनातील प्रलंबित कामांबाबत अनेक तक्रारी मांडत समस्यांचा पाढाच वाचला. विविध गावांमधील अपुरी आरोग्य सेवा, पाणीटंचाई,खराब रस्ते तसेच महसूल कार्यालयातील प्रलंबित प्रकरणांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले. यावर खासदार विशाल पाटलांनी संबंधित विभाग आणि अधिकाऱ्यांना धारेवर धरत आहे.नागरिकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत तसेच प्रत्येक विभागाने आपापल्या कामांचा नियमित आढावा घेऊन समस्या सोडवाव्यात, असे निर्देश दिले.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 07, 2026 01:17:03
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगलीच्या अंकली येथील कृष्णा नदीमध्ये एका तरुणाने पुलावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. मात्र सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या एका कर्मचाऱ्याच्या तात्पुरतेने तरुणाचे जीव वाचले आहेत. सोलापूरच्या सांगोला येथील 23 वर्षीय निखिल सावंत या तरुणाने अंकली- जयसिंगपूर पुलावरून नदीत पात्रात उडी मारली. त्यानंतर आसपासच्या नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली; यादरम्यान अंकली येथे ड्युटीवर असणाऱ्या सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार रमेश पाटील यांनी कृष्णा नदीकडे धाव घेत, नदीच्या पात्रात उतरत बुडणाऱ्या निखिल सावंत याला काही तरुणांच्या मदतीने बाहेर काढत वाचवले. मात्र या घटनेमध्ये उडी मारणाऱ्या तरुणाचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले असून त्याच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत. मात्र या ठिकाणी पोलिस हवालदार रमेश पाटील यांनी दाखवलेल्या धाडसी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 06, 2026 16:45:26
Kalyan, Maharashtra:छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आणि शिवसेना शिंदे आज भव्य असे मिरवणूक करण्यात आली या मिरवणूक मध्ये हजारो शिवभक्त सामील झाले होते कल्याणच्या सिंधी गेट येथून दोन्ही मिरवणुका काढण्यात आल्या होत्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे मिरवणूक संध्याकाळी चार वाजता सुरू झाली तर शिवसेना शिंदे गटाकडून सहा वाजता मिरवणूक करण्यात आली या मिरवणूक मध्ये तारपा नृत्य, लेझीम, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरती देखावे तसेच घोड्यावरती स्वार असलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे यांची सेना मोठ्ठया आयटीत मिरवणुकीत दिसून आली. त्याच प्रमाणे उद्धव ठाकरे सेनेने एपस्टीन फाईल मधील देखावा मिरवणुकीत चर्चेचा विषय ठराला
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 06, 2026 14:47:51
Shirur, Maharashtra:शिरूर पुणे... शिरूर तालुक्यातील हिवरे कुंभार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सातवीच्या वर्गामध्ये चक्क सात विद्यार्थ्यांना शिक्षकाच्या उपस्थितीतीत अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडल्याने पालक आक्रमक होऊन पालकांनी शिक्षकाच्या बदलीची मागणी केली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सातवीच्या वर्गातील अल्पवयीन सात युवकांना वर्गातीलच एका विद्यार्थ्याने निर्दयीपणे बेदम मारहाण केल्याची घटना घडल्याने आज संतप्त पालकांनी ग्रामस्थ, पदाधिकारी व शिक्षकांच्या उपस्थितीत शाळेमध्ये बैठक घेतली, दरम्यान ग्रामस्थांच्या उपस्थितीत काही ग्रामस्थांनी सातवीच्या वर्गाची झडती घेतली असता वर्गामध्ये चक्क शितपेय, अल्कोहोल युक्त पेय, तंबाकू यांसह आदी पदार्थ मोठ्या प्रमाणात आढळून आल्याने खळबळ उडाली आणि सातवीच्या वर्गातून अधिकारी घडवायचे कि गुन्हेगार असा सवाल उपस्थित ओळखून शिक्षकांना केला, दरम्यान विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या तक्रारीचा पाढाच कथन केला, तर वर्गामध्ये एका विद्यार्थ्याची मोठी दहशत असून त्या विद्यार्थ्याला शिक्षक पाठीशी घालत असल्याचे समोर आले मात्र सदर विद्यार्थी व त्याचे पालक गैरहजर असल्याने उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली,
0
comment0
Report
Advertisement
Back to top