icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
421301
ABATISH BHOIR18 Feb 2026, 05:02 am

कल्याण स्टेशन: क्लास डब में चढ़ते वक्त प्रवासी पर दंड चबा लिया, हाथ घायल

Kalyan, Maharashtra:कल्याण रेल्वे स्थानक येथे मंगळवारी सकाळी मुंबई सीएसएमटीकडे जाणाऱ्या जलद लोकलमध्ये हा प्रकार घडला. तक्रारदार प्रियंका थोरात या कल्याण येथे रहाते अंधेरी येथे नोकरी करतात. दररोजप्रमाणे त्या सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास फलाट क्रमांक सहावरून प्रथम श्रेणी डब्यात चढण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यावेळी लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. काही महिला उतरत होत्या, तर काहीजणी चढण्याचा प्रयत्न करत होत्या. या गोंधळात डब्यातून उतरणाऱ्या एका अनोळखी महिलेने प्रियंका यांना चढण्यास मज्जाव केला. स्वतःही नीट उतरत नसताना तिने प्रियंका यांना दरवाजातून बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला. झटापटीदरम्यान संबंधित महिलेने प्रियंका यांच्या हाताला धरून त्यांच्या दंडाला जोरात चावा घेतला आणि बोट पिरगळले. या प्रकारातPriyanka यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर कल्याण लोहमार्ग पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली. रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून अज्ञात महिलेचा शोध सुरू आहे.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

चारणा नदी में प्रदूषण से पानी और स्वास्थ्य पर खतरा, प्रशासन से तत्काल उपायों की मांग

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:ANC : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेल्या सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा गावातून वाहणाऱ्या चारणा नदीमध्ये गावचे सांडपाणी थेट सोडले जात असल्याने riverला अक्षरशः कचरा डेपोचे स्वरूप प्राप्त झाले आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या नदीवर पुढे चारणेर येथे लघु प्रकल्प उभारण्यात आला असून या प्रकल्पामुळे परिसरातील १५ ते २० गावांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागला आहे. मात्र घाटनांद्रा येथे होत असलेल्या प्रदूषणामुळे या प्रकल्पाचे पाणी दूषित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे भविष्यात पाण्याद्वारे रोगराई पसरून आरोग्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच नदीलगतच्या विहिरींमध्येही सांडपाण्यामुळे दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. चारणा नदीतील वाढते प्रदूषण आणि त्याचा पिण्याच्या पाण्यावर होणारा संभाव्य परिणाम लक्षात घेता प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
0
0
Report
Advertisement

मान्याचीवाडी में पशुओं के लिए ब्यूटी पार्लर शुरू, पर्यावरण संरक्षण का नया कदम

Satara, Maharashtra:सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी ग्रामपंचायत महाराष्ट्रासह देशभरातून तब्बल ८२ पुरस्कार मिळवलेलं हे गाव… आता पुन्हा एकदा नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे चर्चेत आलं आहे..मान्याचीवाडी ग्रामपंचायतीने लोकसभागातून महाराष्ट्रा पहिल्यांदाच जनावरांसाठी ‘ब्युटी पार्लर’ म्हणजेच अत्याधुनिक स्नानगृह सुरू केलं आहे…गावातील पाळीव जनावरांमुळे नदी-ओढ्यांमध्ये होणारं प्रदूषण रोखण्यासाठी हा अभिनव प्रयोग राबवण्यात आलाय…या स्नानगृहात शॉवर, स्वच्छ पाणी, घनकचरा व्यवस्थापन आणि सांडपाण्यावर प्रक्रिया अशा सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत…विशेष म्हणजे, आंघोळीनंतर निघणारं पाणी प्रक्रिया करून परसबागेसाठी वापरलं जातं…यामुळे जनावरांचं आरोग्य सुधारत असताना पर्यावरण संरक्षणालाही मोठी चालना मिळतेय…मान्याचीवाडीचा हा उपक्रम सध्या सर्वत्र कौतुकास्पद ठरत असून राज्यातील इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे…बाईट : मान्याचीवाडी सरपंच रवींद्र माने मान्याचीवाडी..
0
0
Report

MIDC में आरापूर के विवाद के बावजूद उद्योगों के लिए जगह बनाने की तैयारी

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:एकीकडे छत्रपती संभाजीनगर शहरात उद्योग थाटण्यासाठी नवीन उद्योजक मोठ्या प्रमाणावर उत्सुक आहेत. त्यांना जमिनी मिळत नाहीत. दुसरीकडे सटाणा आणि आरापूरसारख्या गावांमध्ये एमआयडीसी जाहीर होऊनही केवळ प्रशासकीय दिरंगाईमुळे या वसाहतींना आकार घेण्यास विलंब लागत आहे. विशेष म्हणजे, सटाणा येथील भूसंपादनासाठी दर निश्चित होऊनही गेल्या सहा महिन्यांपासून हा प्रस्ताव एमआयडीसीच्या हायपॉवर कमिटीकडे मंजুরিसाठी पडून आहे. त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. वाळूज एमआयडीसी सध्या पूर्णपणे भरलेली आहे. यावर पर्याय म्हणून आरापूर येथे सुमारे ७६२ हेक्टर जमिनीवर 'अतिरिक्त वळूज' वसाहत उभारली जात आहे. आरापूरसह तीन गावांतील जमीन एमआयडीसी प्रशासन संपादित करणार आहे. वाटाघाटीपूर्वीची प्राथमिक बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. मात्र शेतकरी आणि लोकप्रतिनिधींसोबतची प्रत्यक्ष वाटाघाटीची बैठक अद्याप झालेली नाही. यापूर्वी महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे या वाटाघाटी लांबणीवर पडल्या होत्या. ही वसाहत झाल्यास वाळूजमध्ये जागा शोधणाऱ्या सुमारे २५०० पेक्षा जास्त लघु आणि मध्यम उद्योगांना हक्काची जागा मिळेल.
0
0
Report

बार्शी में भगवंत महोत्सव: 20–28 अप्रैल तक रंगारंग कार्यक्रम, मुख्यमंत्री पहुँचेंगे

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : बार्शीचे ग्रामदैवत श्री भगवंतांच्या प्रकट दिनानिमित्त भगवंत महोत्सवाचे आयोजन - बार्शीचे ग्रामदैवत श्री. भगवंताच्या प्रकटदिनानिमित्त भव्य महोत्सवाचे आयोजन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नीक 28 एप्रिलला बार्शीला येणार - बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांची माहिती - हा भगवंत महोत्सव 20 ते 28 एप्रिल पर्यंत असून देशातील नामांकित नाट्य, संगीताच्या सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे. - या भगवंत महोत्सवाच्या रंगमंचाचे पूजन झेडपी अध्यक्ष दिपक वैद्य आणि माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.
0
0
Report
Advertisement

जी. श्रीकांत की बदली: मराठवाडा आयुक्त से जलजीवन मिशन तक बदली

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तपदी जी. श्रीकांत यांची शासनाने बदली केली आहे. गुरुवारी सायंकाळी त्यांच्या बदलीचे आदेश आले. विद्यमान आयुक्त जितेंद्र पापळकर यांची मुंबईत जीएसटी सहआयुक्त पदावर बदली झाली. जी. श्रीकांत यांची २ एप्रिलला मनपा आयुक्तपदावरून जलजीवन मिशन संचालक पदावर बदली केली होती. अवघ्या १४ दिवसांत त्यांची मराठवाडा विभागीय आयुक्तपदावर बदली झाली. पालकमंत्री संजय शिरसाट आणि ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे यांनी जी. श्रीकांत यांच्या मनपा आयुक्तपदाच्या बदलीला विरोध करत शासनाकडे पाणीपुरवठा योजनेजचे काम पूर्ण होईपर्यंत त्यांना येथेच ठेवण्याची मागणी केली होती. दोन आठवड्यांतच शासनाने जी. श्रीकांत यांची येथेच बदली केल्यामुळे दोन्ही मंत्र्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे。
0
0
Report

वकील की हत्या: पैसे के विवाद में तृतीयपंथी से भिड़ंत, तीन गिरफ्तार

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरच्या गांधेली फाटा परिसरात बुधवारी रात्री वकिलाचा मृतदेह आढळून आला होता. तृतीयपंथीयांशी झालेल्या वादातूनच त्यांची हत्या झाल्याचे आता उघड झाले. या प्रकरणी पोलिसांच्या पथकाने तिघांना अटक केली. वकील मिथुन पुंडलिक भास्कर सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घरातून बाहेर पडले होते. तेथून ते गांधेली फाटा येथे गेले. त्या ठिकाणी असलेला तृतीयपंथी सादिक यास भेटायला गेले होते. त्या वेळी त्यांच्या पैशांच्या देवाणघेवाणीवरून वाद झाला. यातून त्यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. यात मिथुन वरचढ ठरू लागल्याने त्यांनी साडीतील चाकू काढून त्यांच्या मांडीवर मारला. झुडपातून जोराने आवाज येत असल्याने व टाळ्यांच्या आवाजाचे सिग्नल ऐकून दोन साथीदार आत गेले. मिथुन मोठ्याने ओरडत असल्याने व त्यांच्या मांडीतून अधिकचा रक्तस्राव सुरू असल्याने तिघांनी मिळून त्यांना तेथेच दाबून धरले. त्यानंतर काही वेळाने त्यांना अतिरिक्त रक्तस्राव झाल्याने भोवळ आल्यावर रस्त्याच्या कडेला टाकून तिघांनी पळ काढला. रात्री अकरा वाजेच्या सुमारास काही नागरिकांना रस्त्याच्या कडेला मृतदेह दिसल्याने त्यांनी पोलिसांना कळवल्याने त्यांनी घाटीत हलवण्यात आले. त्या वेळी डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
0
0
Report
Advertisement

Washim में अवैध सावकारी के खिलाफ सहकार विभाग का बड़ा छापा

Washim, Maharashtra:अवैध सावकारी व्यवहारांबाबत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने वाशिम शहरातील सुशील बेदरकर यांच्या रुख्मणी ज्वेलर्सवर सहकार विभागाने धाड टाकून मोठी कारवाई करत संबंधित ठिकाणाहून पुढील चौकशीसाठी महत्त्वाचे दस्तऐवज ताब्यात घेण्यात आले आहेत.ही कारवाई सहकार व पोलिस विभागाच्या संयुक्त पथकाने पार पाडली.ही कारवाई जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, पोलिस अधीक्षक अनुज तारे तसेच विभागीय सहनिबंधक गौतम वर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था,गितेशचंद्र साबळे यांच्या नियंत्रणाखाली संपूर्ण कार्यवाही करण्यात आली.
0
0
Report

छत्रपती संभाजीनगर में ईंधन टँकर देर, पंपों पर भारी भीड़ और दरों की चिंता

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यात काही प्रमाणात घट झाल्याने इंधनटंचाई निर्माण झाली आहे. साठा पूर्णपणे संपल्यामुळे शहरातील काही पेट्रोल पंप ड्राय झाले, ऐन कामाच्या दिवसांत इंधन मिळत नसल्याने वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. तर पेट्रोल डिझेलचे भाव वाढ होणार असल्याच्या भीतीपोटी देखील अनेकांनी साठा करून ठेवण्यास सुरुवात केली आहे. मागील आठवड्यात सलग आलेल्या सुट्यांमुळे इंधनाची वाहतूक विस्कळीत झाली. परिणामी, इंधनाचे टँकर वेळेवर शहरात पोहोचू शकले नाहीत आणि ही टंचाई उद्भवली आहे. दरम्यान, इंधन संपत असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी शहरात सुरू असलेल्या मोजक्या पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी केली. दरम्यान आज पुरवठा सुरळीत होईल असे पेट्रोल पंप असोसिएशन आणि प्रशासनाने सांगितले आहे…
0
0
Report

अकोला के अकोट में नगरसेविका के पति व भतीजे पर हमला, अस्पताल में दोनों घायल

Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील अकोट शहरातून एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेविकेच्या पतीवर आणि त्यांच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला झाल्याने परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अकोटमधील इंदिरानगर परिसरात ही घटना घडली असून, नगरसेविकेचे पती इमरान खान आणि त्यांच्या पुतण्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी अचानक हल्ला चढवला..या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत...दरम्यान, हा हल्ला जुन्या राजकीय वादातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे...
0
0
Report
Advertisement

यवतमाळ के नमो उद्यान उद्घाटन विवाद: शिवसेना-भाजपा के बीच हंगामा

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या वणी शहरातील "नमो उद्यान" च्या फलकावरून आजी माजी आमदारामध्ये वाद निर्माण झाला आहे. येथील फलकावर शिवसेना उबाठाचे आमदार संजय देरकर यांचे नाव वगळून व त्यांना माहिती न देता नगर परिषद प्रशासनाने उदघाटन उरकले, फलकावर भाजपचे माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे नाव लिहून त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे झालेल्या प्रकाराचा निषेध नोंदवित आमदार संजय देरकर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी नमो उद्यानाचा नवा फलक तयार करून उद्घाटन केले. पालिका प्रशासन प्रोटोकॉल तोडून अनधिकृत कामे करत असतील तर त्यांना झोडून काढू असा इशारा उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी दिला.
0
0
Report
0
0
Report

वाशिम के किसानों का आमरण उपवास: सरकार से स्पष्ट जवाब की उम्मीद

Washim, Maharashtra:वाशिम: अँकर :शेतकऱ्यांची विना अट सरसकट कर्जमाफी करावी यासाठी वाशिम जिल्ह्यातील अडोळी गावातील शेतकऱ्यांनी गाव विक्रीसाठी काढलं होतं आणि ठिय्या आंदोलनही सुरू केलं होतं. मात्र हे ठिय्या आंदोलन सलग ११ दिवस चालल्या नंतरही प्रशासनानं याची दाखल नं घेतल्यानं शेतकरी सतीश इढोळे यांनी ११ एप्रिलपासून आमरण उपोषण सुरु केलं होतं. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आंदोलनाला भेट देऊन आमरण उपोषण सोडवलं आणि मागण्या मान्य करण्यासाठी सरकार आठ दिवसांची मुदत देत मागण्या मान्य नं झाल्यास राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा दिला.दरम्यान, या आंदोलनामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठी चर्चा सुरू असून,आता सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बाईट:रविकांत तुपकर,अध्यक्ष क्रांतिकारी शेतकरी संघटना.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top