Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

कामरगाव में शंकरपट स्पर्धा शुरू, चार लाख इनाम के साथ उत्साह का मेला

GMGANESH MOHALE
Dec 27, 2025 04:50:12
Washim, Maharashtra
अँकर:वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथे एकता शंकरपट मंडळाच्या वतीने आजपासून भव्य शंकरपट स्पर्धेला सुरुवात झाली आहे.या स्पर्धेत राज्यभरातून मोठ्या संख्येने बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदवला असून, परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.या स्पर्धेत विजेत्यांना तब्बल चार लाख रुपयांच्या आकर्षक बक्षिसांचे वितरण करण्यात येणार आहे.त्यामुळे शंकरपट शौकिनांसह बैलगाडा मालकांमध्येही प्रचंड उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.परंपरा,थरार आणि स्पर्धेचा रोमांच अनुभवण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली असून,कामरगाव हे ठिकाण शंकरपट प्रेमींच्या गर्दीने फुलून गेले आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JJJAYESH JAGAD
Dec 27, 2025 06:16:55
Akola, Maharashtra:ایکिकडे अकोला महानगरपालिका निवडणूक महायुतीतच लढवण्याची घोषणा भाजपकडून करण्यात आली असून, त्यानुषंगाने जागावाटपाचा फार्म्युलाही जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जात आहे. मात्र, या जागावाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नाराज असल्याचं चित्र समोर आलं आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर ट्विट करत आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. या ट्विटमधून त्यांनी भाजपला सूचक इशाराही दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्यामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले असून, अकोला महापालिका निवडणुकीआधीच जागावाटपाचा मुद्दा तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 27, 2025 06:16:25
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Dec 27, 2025 05:04:47
Malegaon, Maharashtra:नाशिकच्या सटाणा शहरात नाशिक नाका परिसरात भीषण अपघाताची घटना घडली. खडी भरलेला भरधाव ट्रक अचानक नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगत असलेल्या एका मार्बल दुकानात घुसला. हा अपघात मध्य रात्रिच्या आसपास घडल्याने मोठा अनर्थ टळला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. राजस्थान पासिंग असलेला हा ट्रक खडीने भरलेला आहे. साक्री शिर्डी महामार्गवरील नाशिक नाका येथे वेगात येत असताना चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला आणि तो थेट दुकानात घुसला. धडकेचा आवाज इतका भीषण होता की परिसरातील नागरिक दचकून बाहेर आले. या अपघातात संबंधित मार्बल दुकानाचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. दुकानातील महागडे मार्बल स्लॅब, काच, फर्निचर तसेच अंतर्गत रचना पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून नुकसानाचा अंदाज लाखोंच्या घरात व्यक्त करण्यात येत आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 27, 2025 04:47:46
Akola, Maharashtra:आज अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. विदर्भातील चार महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागपूर येथे महायुतीची एक महत्त्वपूर्ण मंथन बैठक पार पडली होती. या बैठकीत अकोला महानगरपालिका निवडणूक भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस या तीन मित्र पक्षांच्या महायुतीतूनच लढवण्याचा निर्णय झाला आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने आज अकोल्यात जागा वाटपाची अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. काल एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची भाजपाचे नेते विजय अग्रवाल यांच्यासोबत बैठक पार पडली. तर आज राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्यासोबत महत्त्वाची बैठक होणार आहे.या बैठकीनंतर महايوतीतील तिन्ही मित्र पक्ष एकत्र येत अकोला महानगरपालिकेसाठी जागा वाटपा संदर्भात घोषणा करणार आहेत.जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला असून, भाजप ५५ जागांवर, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) १५ जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) १० जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Dec 27, 2025 04:47:22
Dhule, Maharashtra:शहादा डम्पिंग ग्राउंड च्या प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शेतालगत कचऱ्या टाकल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. शहराच्या दोंडाईचा रस्त्यावरील डम्पिंग ग्राउंड परिसरात पालिकेने टाकलेल्या कचऱ्यामुळे शेती पिकांचा मोठा नुकसान होत असून, पाण्याची गुणवत्ता ही खालावली असल्याचं शेतकऱ्यांनी आरोप केलेला आहे. वारंवार नगरपालिकेला याबाबत अर्ज विनवण्या करूनही पालिका प्रशासन या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे. या कचरा डेपोचा प्रश्न सोडवला नाही तर सर्व कचरा शेतकरी स्वखर्चाने नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर टाकतील असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. शेतकऱ्यांच्या शेतात जाणाऱ्या पायवाटेवर मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने स्थानिक परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. शहादा पालिकेचे मुख्याधिकारी यांचे दोन दिवसांत साफसफाई करण्याचे शेतकऱ्यांना आश्वासन दिले आहे. दोन दिवसांत पालिकेने परिसर स्वच्छ न केलास डम्पिंग ग्राउंड परिसरातील शेतकऱ्यांनी स्वखर्चाने कचरा उचलून पालिकेच्या प्रवेशद्वारा जवळ टाकण्याच्या शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे.
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Dec 27, 2025 04:46:07
Parbhani, Maharashtra:अँकर- परभणी मनपा निवडणुकीच्या निमित्ताने युती आघाडी होणार की नाही होणार याकडे परभणीकरांचे लक्ष लागले आहे. पण शिवसेना आणि भाजपची युती होणार असल्याचे संकेत मिळत असून त्यांची प्राथमिक बैठक पार पडलीय. यामध्ये शिवसेनेने भाजपकडे फिफ्टी फिफ्टीचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती आहे,पण भाजप हा मोठा भाऊ असल्याने 65 पैकी 35 पेक्षा अधिक जागा मिळाव्या यासाठी आग्रही भूमिकेत असल्याची माहिती पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी संभाजीनगर येथे पत्रकारांशी बोलतांना दिलीय. युती करतांना तानातानी न करतांना सामंजस्याने युती होणार असल्याचे ही पालकमंत्री बोर्डीकर म्हणाल्या. त्यामुळे आता युतीची बोलणी अंतिम टप्यात आली असून सत्तेत असलेली राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेते आणि आघाडीच काय ठरते याकडे सर्वांचे लक्ष लागलय आहे.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Dec 27, 2025 04:45:16
Lasalgaon, Maharashtra:राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघातील लासलगाव येथील एसटी बस स्थानकाच्या नूतन इमारतीसह विविध विकासकामांसाठी आमदार निधीतून साडेसहा कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात ठेकेदाराकडून काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे गेल्या उन्हाळ्यात तब्बल 44 अंश सेल्सिअस तापमानात प्रवाशांना उघड्यावर बसांची वाट पाहावी लागली होती सावलीत बसण्याची योग्य व्यवस्था नसल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला व विद्यार्थी प्रवाशांचे मोठे हाल झाले तसेच पावसाळ्यातही अशाच प्रकारे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला बस स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम लवकर पूर्ण होईल, अशी अपेक्षा प्रवाशांना होती. मात्र निधी मंजूर होऊनही कामात दिरंगाई होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे येत्या उन्हाळ्यात पुन्हा प्रवाशांचे हाल होऊ नयेत यासाठी संबंधित ठेकेदाराने तातडीने कामाला गती द्यावी, अशी मागणी विद्यार्थी, नियमित प्रवासी तसेच स्थानिक नेते आणि नागरिकांकडून करण्यात येत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व परिवहन मंत्री यांच्याकडे ठेकेदाराबाबत तक्रार करण्याचा इशारा देण्यात आला
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Dec 27, 2025 04:32:06
Nashik, Maharashtra:नाशिकच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने दाढेगाव शिवारात सुरू असलेला अवैध सुगंधित पान मसाल्याचा कारखाना उध्वस्त केला आहे. वालदेवी नदीलगत पिंपळगाव खांब रोड परिसरात पत्र्याच्या शेडमध्ये अगरबत्ती कारखान्याच्या नावाखाली NAMAKIYA कंपनीचा बनावट सुगंधित पान मसाला कोणताही परवाना नसताना तयार केला जात होता. अमली पथकाने अन्न व प्रशासन विभागासह छापा टाकला. छाप्यात दोन मशिनच्या सहाय्याने प्रीमियम राज निवास नावाचा सुगंधित पान मसाला तयार करत असल्याचे आढळून आले. या ठिकाणी रामअवतार सीपू देवी दांदल हा इसम मिळून आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. कारवाईदरम्यान अवैध सुगंधित पान मसाला, कच्चा माल, मशिनरी आणि इतर साहित्य असा एकूण ७ लाख २९ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपी आर्थिक फायद्यासाठी प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन व विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले असून, त्याच्याविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून सुरू आहे.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Dec 27, 2025 04:20:33
Nashik, Maharashtra:नाशिक ब्रेकिंग सिडकोत मध्यरात्री कोयता गँगचा उच्छाद....राजरत्ननगरात कोयत्याने जिवघेणा हल्ला....दहशत माजवणाऱ्या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल...तीन आरोपी ताब्यात तिघांचा पोलिसांकडून शोध.... अँकर नाशिकच्या सिडको परिसरात पुन्हा एकदा कोयता गँगने दहशत निर्माण केली आहे.नवीन नाशिकमधील राजरत्ननगर भागात मध्यरात्री कोयते, लोखंडी रॉड आणि बॅट घेऊन सहा तरुणांनी धिंगाणा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.या प्रकरणी अमोल हरी खडके यांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.बुधवारी रात्री एक ते दीad वाजेच्या सुमारास घराबाहेर आरडाओरड ऐकू आल्यानंतर बाहेर पडताच रस्त्यावर पाच ते सहा तरुण गोंधळ घालत असल्याचे दिसून आले.यातील वेदांत गिरी याने हातातील कोयत्याने रस्त्याच्या कडेला उभी असलेली दुचाकी फोडत, कोणी मध्ये पडल्यास कापून टाकण्याची धमकी दिली.समजावण्याचा प्रयत्न केला असता वेदांत गिरी याने थेट फिर्यादीच्या गळ्यावर कोयत्याने वार करत जिवे मारण्याचा प्रयत्न केला.दरम्यान, इतर आरोपी वेदांत सोनवणे, यश अहिरे, हेमंत निकुंभ, आदित्य तायडे आणि प्रशांत पाटील हे धारदार शस्त्रे घेऊन नागरिकांना धमकावत होते.घरांच्या दरवाज्यांवर शस्त्रांनी मारत संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण करण्यात आले.या घटनेनंतर अंबड पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, üç आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.उर्वरित तीन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे... पकडलेल्या संशयतांची सिडको परिसरातून काढण्यात आली...
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Dec 27, 2025 04:16:34
Nashik, Maharashtra:अंजली आंबेडकर @ नाशिक (राष्ट्रीय नेत्या -वंचित बहुजन आघाडी) गेलے काही वर्ष स्थानिक स्वराज्याचा निवडणुका पुढे ढकलून भाजप सरकारने सर्व ठिकाणी प्रशासक बसवला होता लोकांचा जो विकासाचा हक्क आहे तो भाजपाने हिरावून घेतला था नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकां आम्ही स्वबळावर लढवणार आहोत 68 नगरसेवक आणि 2 नगराध्यक्ष आम्ही स्वबळावर निवडून आणलेले आहेत कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास निश्चित वाढलेला आहे महाविकास आघाडी बरोबर कोणतीही चर्चा चालू नव्हती भाजपाला हारवणे ही केवळ वंचित समूहाची जबाबदारी नाही आहे तर ती इथल्या प्रस्थापित समाजाची जबाबदारी आहे जोपर्यंत प्रस्थापित समाज आपली मतं वंचितांच्या मागे उभी करत नाही तोपर्यंत भाजपालाई हरवलं कठीण आहे आमच्या समूहाला न्याय देण्यासाठी आम्ही संघर्ष करत राहू
0
comment0
Report
Advertisement
Back to top