Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

वाशिम में लोअर हाइट सबवे का काम छह महीनों से ठप, नागरिक आंदोलन चेतावनी

GMGANESH MOHALE
Dec 08, 2025 03:49:50
Washim, Maharashtra
अँकर:वाशिम–हिंगोली मार्गावरील रेल्वे गेटजवळ सुरू असलेले लोअर हाइट सबवेचे काम गेल्या सहा महिन्यांपासून ठप्प आहे. उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतरही सबवेचे काम अचानक थांबवण्यात आल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.सुरकंडी, मोहगव्हाण, देवाळा, उकळी पेन आणि फाळेगाव या गावांतील नागरिकांना दररोज मोठा फेरा मारावा लागत आहे.त्यामुळे प्रवासाचा वेळ वाढत असून वाहतुकीतही सातत्याने अडथळे निर्माण होत आहेत. सबवेचे काम पुन्हा कधी सुरू होणार याबाबत कोणती ही अधिकृत माहिती न मिळाल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.काम तात्काळ सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला असून प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PNPratap Naik1
Dec 08, 2025 06:21:46
Kolhapur, Maharashtra:कर्नाटकातील बेळगाव मराठी भाषकांच्या महामेळाव्या प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांसह महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगाव मध्ये येण्यास बंदी घातली आहे. याच्या निषेधार्थ आज शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने महाराष्ट्रातून कर्नाटक कडे जाणाऱ्या बसेस रोखण्यात आले आहेत. कोल्हापूरच्या मध्यवर्ती बस स्थानक परिसरात हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी कर्नाटक सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला आहे. हातात भगवे झेंडे घेऊन ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार आणि सहसंपर्कप्रमुख विजय देऊ नये यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन जवळपास अर्ध्या तासाहून अधिक वेळ ही बस सेवा बंद करण्यात आली. त्यानंतर शिवसैनिकांनी कर्नाटक बसवर जय महाराष्ट्र असा बोर्ड लावला.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 08, 2025 06:02:00
80
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Dec 08, 2025 05:50:28
104
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Dec 08, 2025 05:50:14
Satara, Maharashtra:सातारा - साताऱ्यातील खटाव तालुक्यातील वडूज येथे घडलेल्या धक्कादायक प्रकारात दरोड्याची तक्रार देण्यासाठी गेलेल्या फिर्यादीलाच पोलिसांकडून मारहाण झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.7 डिसेंबर ला सागर मानसिंग कदम हे वडूज एसटी स्टँडवरील त्यांच्या कॅन्टीनमध्ये सकाळी झालेल्या दरोड्याची तक्रार पुराव्यासह देण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले. मात्र, फिर्याददार असतानाच त्यांनाच संशयित असल्याप्रमाणे वागणूक देत पोलिसांनी दमदाटी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. एवढेच नाही तर कदम यांना खोटी तक्रार देत असल्याचा संशयावरून पोलिस स्टेशनमध्ये मारहाण करण्यात आल्याचा आरोप कदम यांनी केला आहे. पोलिस स्टेशनच्या बाहेरील आवारातून ओढत आत नेऊन लाथाबुक्के, काठी आणि चामड्याच्या बेल्टने अमानुष मारहाण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हा आरोप पोलिसांवर भीषण स्वरूपाचा आहे आणि "रक्षकच झाले भक्षक" अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. संबंधित पोलिसांवर कारवाईची मागणी होते आहे
88
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 08, 2025 05:49:59
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मराठवाड्यातील 30 टक्के शेतकरी मदतीपासून अजूनही वंचित.... अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दिवाळीपूर्वी आर्थिक मदत जमा करण्याचे राज्य सरकारने जाहीर केले होते. त्यासाठी निधीही उपलब्ध करून दिला होता, परंतु महसुली यंत्रणेच्या कासवगतीमुळे अद्यापही या मदतीचे वाटप पूर्ण होऊ शकलेले नाही. सुमारे 30 टक्के शेतकऱ्यांना ही आर्थिक मदत मिळणे बाकी आहे. मराठवाड्यातील 32 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकाचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते. त्यामुळे एकूण 1 कोटी 6 लाख 45 हजार शेतकऱ्यांसाठी 8 हजार 708 कोटी रुपयांची मदत जाहीर केली. 3 डिसेंबरपर्यंत यातील 70.42% म्हणजेच एकूण 6 हजार 127 कोटी 63 लाखाची मदतच वाटप झाली आहे. एकूण 82 लाख 91 हजार 395 शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात आली आहे. राज्य सरकारने वेळोवेळी शासन निर्णय निर्गमित करून मराठवाड्यातील अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली. मदतीसाठी 3 डिसेंबर अखेर 88 लाख 30 हजार 696 शेतकऱ्यांच्या यादी अपलोड करण्यात आल्या आहेत. याद्या अपलोड करण्याची 74 टक्के काम पूर्ण झाले आहे. परंतु बहुतांशी शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेला नाही. तसेच इ- केवायसी ही केलेले नाही. ते करणे आवश्यक आहे. या अभावी अद्यापही चार लाख 3 हजार 626 शेतकऱ्यांना 235 कोटी रुपयांची अनुदान मिळाले नसल्याचे चित्र आहे.
146
comment0
Report
KJKunal Jamdade
Dec 08, 2025 05:48:06
Shirdi, Maharashtra:आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या तपोवन मधील घनदाट झाडी तोडण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे.. मात्र याला पर्यावरण प्रेमी नागरिकांसह अनेकांनी विरोध दर्शवला.. एक झाड तोडले तर दहा झाडे अन्यत्र लावू असं वक्तव्य देखील मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी केलं... मात्र सरकारच्या हे आश्वासन फसवा असल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांनी दिलिय.. 2013 मध्ये नाशिक पुणे महामार्ग चौपदरीकरण कामासाठी संगमनेर तालुक्यातील अनेक मोठी झाडं तोडण्यात आली.. मात्र त्यावेळी देखील एका.झाडामागे दहा झाडे लावण्याचे आश्वासन देण्यात आल होत.. मात्र 2019 पर्यंत तोडलेल्या 2373 पैकी अवघे 363 झाड लावण्यात आल्याचं समोर.आलं.. त्यानंतर गणेश बोऱ्हाडे यांनी थेट राष्ट्रीय हरित लवादात याचिका दाखल केली.. पाच वर्ष भांडल्यानंतर नियमाप्रमाणे झाडे लावण्याचा आदेश 2024 मध्ये दिला गेला.. मात्र अद्यापही पूर्ण झाडे लावली की नाही याची मोजणी बाकी असल्याचे वास्तव सामाजिक कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांनी मांडलय...
108
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 08, 2025 04:02:44
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:ANCHOR : छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट आणि शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यातील वाद आता टोकाला पोहोचला आहे. जंजाळ हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या देखील चर्चा आहे. अशात आता या वादावर थेट नागपूरात तोडगा निघणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तोडगा काढणार आहेत. यापूर्वी श्रीकांत शिंदे यांच्यासोबत जंजाळ यांनी भेट घेतली होती. मात्र, खासदार शिंदे लोकसभा अधिवेशनासाठी दिल्लीत आहेत. त्यामुळे नागपूरमध्ये पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संभाजीनगरची बैठक आयोजित केल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. तसेच याच बैठकित जंजाळ यांच्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
220
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 08, 2025 04:02:29
Nagpur, Maharashtra:
158
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Dec 08, 2025 03:50:27
Beed, Maharashtra:बीड ते वडवणी रेल्वे लोहमार्गावर पहिली इंजन चाचणी पार पडली. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर 10 आणि 11 डिसेंबर रोजी CRS तपासणी आणि स्पीड रेल्वे चाचणी केली जाणार आहे. पहिल्यांदाच या रेल्वे मार्गावर रेल्वे इंजिन धावला आहे. बीड जिल्हा वासियांसाठी रेल्वेचा प्रश्न अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. बीड ते अहिल्यानगर रेल्वे मार्गावर रेल्वे धावल्यानंतर आता बीड परळी या रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. बीड पासून वडवणी हे 30 किलोमीटर अंतराचे काम पूर्ण झाले असून रेल्वे विभागाकडून या मार्गावर चाचण्या केल्या जात आहेत. या मार्गावर कालच रेल्वे इंजिन चाचणी केली जाणार होती मात्र काही तांत्रिक बाबीमुळे इंजिन चाचणी होऊ शकली नाही. मात्र आज या रेल्वे मार्गावर रेल्वे इंजिन धावले..
94
comment0
Report
Advertisement
Back to top