Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421301

कल्याण स्टेशन पर कोयता दिखाकर दहशत फैलाने वाले दो आरोपी गिरफ्तार

ABATISH BHOIR
Nov 03, 2025 12:20:39
Kalyan, Maharashtra
कल्याण स्टेशन परिसरात हातात कोयता घेऊन मद्यधुंद दोन तरुणांनी घातला होता धिंगाणा टपरी चालकाने सिगारेट पिण्यासाठी माचिस दिली नाही म्हणून कोयता दाखवून दहशत माजविण्याचा केला प्रयत्न प्रवाशांमध्ये पसरली होती दहशत सोशल मिडियावर व्हिडिओ झाला होता व्हायरल कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी दहशत माजविणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या अटक आरोपींची नावे निलेश शेलार आणि मेघनाथ भंडारी
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
HCHEMANT CHAPUDE
Nov 03, 2025 18:17:58
Manchar, Maharashtra:मंचर/पुणे में बाईट – आशिष ठाकरे मुख्य वनसंरक्षक. 11 मागण्या लिखित स्वरूपात देण्यात येणार आहेत. त्यांची मागण्या आहेत त्या रास्त आहेत. ज्यात बिबट्याची संख्या वाढली आहे; सगळे बिबटे ऊस शेतीत राहत आहेत, जंगलात राहत नाहीत. जी संख्या वाढली आहे ती नियंत्रणात कराबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. त्या मागण्या सर्व लेखी देत आहेत. चार तालुक्यात 10 स्क्वेअर मध्ये साधारण 8 बिबटे असल्याचे WHA रिपोर्ट आहे. प्रत्येक कुटुंबाला बिबट्याची माहिती आहे त्यामुळे प्रत्येकजण बिबट्या पाहिले असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या घराजवळ बिबट्याचाω वावर आहे. प्रशासन आत्मपरीक्षण करत आहे. शेतकऱ्यांच्या वेदना प्रशासनाने समजून घेतल्या पाहिजेत. त्या आम्ही वरिष्ठांना आणि मंत्र्यांना कळविण्यात येणार आहोत. जर कोणी कर्मचारी चुकीचे काम करत असतील त्यांचा वर कारवाई करून कारवाई केली जाईल. वन विभागाचे काम आहे की पिंजरा आणि भक्षण ठेवले पाहिजे. शासकीय कर्मचाऱ्याने कार्य केले पाहिजे. सामान्य शेतकऱ्याच्या अडचणी स्वतःच्या समजून काम केले पाहिजे. उद्या मंत्रालयात बैठक आहे त्यावेळी वनमंत्री यांना येथील भूमिका आणि मागण्यांची चर्चा मांडणार आहेत. ठाणे जिल्ह्यात जर असे बिबटे सोडले तर याची माहिती घेऊ. कोणाबद्दल आरोप किंवा तक्रार असतील तर कळवावे, त्याच्यावर शहानिशा करून कारवाई करण्यात येईल. बिबट्याच्या हल्ल्या बाबत लवकरच हेल्पलाईन नंबर नागरिकांसाठी तयार करणार आणि प्रसिद्धी देण्यात येणार आहे. पिंजरे 242 आहेत, ते सगळे लावले आहेत; अजून 200 पिंजरे ऑर्डर केले आहेत, त्याला वेळ लागेल. अजून पिंजरे वाढवू. बिबट्या निवारण केंद्रात 42 बिबटे ठेवण्याचीCapacity आहे. या भागात रुग्णवाहिकेची संख्या वाढविण्यात येणार आहे. कालच्या जाळपोळ हा लोकांचा आक्रोश होता, त्याला आम्हाला सामोरे जावे लागेल, हे दुर्दैवी आहे. मला खात्री आहे पुढील 48 तासात कारवाई होणार आहे. प्रतिनिधी Hemant Chapude, Z Media, Manchar Pune.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 03, 2025 15:50:39
Kolhapur, Maharashtra:अब एक बड़ी खबर कोल्हापूर जिल्ह्यातून. उसाच्या दराबाबत कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ ठरली आहे. उद्यापासून एक देखील साखर कारखाना चालू करू देणार नाही असा इशारा शेतकरी संघटनाच्या नेत्यांनी दिलाय. जिल्हाधिकारी येडगे यांच्यासोबत झालेल्या बैठकीवर आम्ही समाधानी नाही, त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत जाब विचारणार असा इशारा यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे. कोल्हापूरच्या जिल्हाधिकार्‍यानी बोलवलेल्या बैठकीत कोणताच तोडगा न निघाल्याने कोल्हापूर जिल्ह्यात ऊस दराचा संघर्ष वाढणार आहे... त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊसाला तोडी घेऊ नयेत अस अहवान देखील राजू शेट्टी यांनी केले आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 03, 2025 13:31:04
Akola, Maharashtra:निराधार योजना व श्रावणबाळ योजनाच्या लाभार्थ्यांना अनेक महिन्यांपासून आर्थिक मदत मिळत नसल्याच्या निषेधार्थ शिवसेना (एकनाथ शिंदे गट) तर्फे तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन छेडण्यात आले. तहसील कार्यालयातील गलथान कारभारामुळे लाभार्थ्यांच्या खात्यात शासकीय मदत जमा होत नसल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला. या आंदोलनात अनेक वृद्ध महिला व लाभापासून वंचित असलेले अर्जदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अनेकांनी डोळ्यांत पाणी आणून आपली व्यथा व्यक्त केली. सरकारने ज्या योजना गरजूंना आधार देण्यासाठी लागू केल्या, त्या योजना प्रत्यक्षात अंमलात येत नसल्याने लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. आक्रमक शिवसैनिकांनी तहसीलदारांच्या कक्षात ठिय्या देत तातडीने कारवाईची मागणी केली. परिस्थितीची दखल घेत तहसीलदारांनी लाभप्राप्तीमध्ये येत असलेल्या अडचणी त्वरित दूर करण्याचे आश्वासन दिले तसेच संबंधित लाभार्थ्यांना मदत करण्यात येईल असेही स्पष्ट केले. तहसीलदारांकडून आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, यापुढेही पैसे न मिळाल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशाराही शिवसैनिकांनी दिला आहे.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Nov 03, 2025 13:21:28
Manchar, Maharashtra:खासदार डॉ अमोल कोल्हे बाईट.... स्वतः वनमत्री यांनी येथे येऊन पाहणी करावी येथे एकूण 56 बळी बिबट्याच्या हल्ल्यात झाल्यात नागरिकांची परीक्षा पाहिली जाते का मुख्यमंत्र्यांना कबुतरासाठी बैठक घेता येते मात्र बिबट्या साठी बैठक घेण्यासाठी त्यांना वेळ नाही ज्या बालकाचा मृत्यू झाला त्याच्या नातेवाईंनी अंत्यसंस्कार करणार नसल्यावर ठाम आहे सरकार आमचा अंत पाहणार असेल तर अजून आंदोलन तीव्र करण्यातं येईल पालकमंत्री म्हणून अजित दादानी लक्ष घातले पाहिजे नरभक्षण बिबट्याला शूट केले पाहिजे बिबट्याची नसबंदी केली पाहिजे नसबंदी बरोबर राज्य आपत्ती घोषित करण्यात यावी तरच उपाययोजना होईल दुर्दैवाने अधिकारी यांनी वनमंत्र्यांना माहिती देत नाही म्हणून वनमंत्रानी यांनी सांगितले की जुन्नरचे बिबटे आमच्या जिल्ह्यात सोडले आहे वनमंत्र्यांची येथे यावे ग्रामस्थांचं म्हणणं ऐकून घ्यावं जेणेकरून त्यांचे अधिकारी त्यांना जे काही भ्रीप करतात आणि जी वस्तुस्थिती काय आहे ती त्यांना समजेल ग्रामस्थांचा रोष कमी होत नाही तो पर्यंत आंदोलन सुरूच राहणार प्राणीमित्र काहीतरी सूर लावतील मात्र बिबट्या ची संख्या मोठी आहे एक मादी चार पिल्लांना जन्म देते त्यामुळे बिबट्याची संख्या वाढत आहे कुत्र्यांपेक्षा बिबट्याची संख्या जास्त झाली आहे काही वर्षापूर्वी आम्ही खांद्यावर खेळवल्याला बिबट्या आता आमच्या जीवावर उठला वेळ प्रसंगी आम्हाला वर्षा बंगल्यावर आंदोलन करावे लागेल
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 03, 2025 13:20:43
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - रूपाली चाकणकरांनी त्या डॉक्टर महिलेच चारित्र्यहनन केल तरी अजित पवार अजूनही गप्प का?- प्रकाश महाजन ज्वाला महाजन बाईट पॉईंटर कोण तो उपटसुंबा? पाशा पटेल इतका मतलबी आणि संधी साधू मतलबी सापडणार नाही. ज्यावेळेस गोपीनाथ मुंडे यांचे निधन झालं आणि त्यांचं पार्थिव परळीत आलं, तेव्हा धनंजय मुंडेनीं अंत्यसंस्कार करावे असं म्हणणारा पाशा पटेल होता. त्यानां माहिती नाही का गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्याविषयी धनंजय मुंडे यांनी काय उद्गार काढले होते. त्यामुळे तो कसं काय वारस होऊ शकतो. पाशा पटेल यांना त्यांची मुलं वारस ठरवतील का हे बघा. *गोपीनाथ मुंडे यांचा वारसा फक्त पंकजा मुंडे दुसरं कोणी नाही* गोपीनाथ मुंडे यांचा वारसा ठरवण्याचा हक्क मुंडेंवर प्रेम करणारे आणि ओबीसी वर्गांना आहे. ऑन निवडणूक आयोग भाजप मला पण कळलं नाही भाजप निवडणूक आयोगाची बाण आपल्या अंगावर का घेतो. यातून कुठेतरी त्यांची अपराधाची भावना असेल. भाजपमध्ये पगारी प्रवक्ते झाले आहेत. एक पगारी प्रवक्ता फलटण प्रकरणाविषयी काय बोलला होता ही संताप आनणारी गोष्ट आहे. ऑन फलटण प्रकरण ती डॉक्टर बीड जिल्ह्यातील असल्याने आमचे भावनात्मक नाते आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष अजूनही पदावर कशा आहेत हेच आम्हाला कळत नाही. आयोगाच्या अध्यक्षांनी महिलाचे चारित्र्यहनन केले. *रूपाली चाकणकरांनी त्या डॉक्टर महिलेच चारित्र्यहनन केल तरी अजित पवार अजूनही गप्प का?* मुख्यमंत्रि रणजीत सिंह निंबाळकर यांना कशी काय क्लीनचीट देऊ शकतात. यासाठीच्या चौकशीत ते जर निर्दोष असतील तर हरकत नाही. अशा प्रकारची माणसं तुमच्याभोवती गोळा होत असतील तर पक्ष बदनाम होणारच. ऑन जयकुमार गोरे आणि रूपाली चाकणकर वक्तव्य जयकुमार गोरे यांचा लोकांनी काय काय नाही दाखवल. ज्या महिलेला कोटी रुपये देताना ट्रॅप केलं. त्यांना ईडीने विचारलं 1 कोटी रुपये कुठून आले. त्यांच्या दृष्टीने स्त्री जर फक्त उपभोगाची वस्तू असेल तर त्यांच्या तोंडून हे वक्तव्य येणार. हे कोणीही मूळ भाजपाचे नाहीत. ते बाहेरून आले आहेत त्यांचे लोक घेऊन आले आहेत. असं कसं काय एक कॅबिनेट मंत्री बोलू शकतो. समजा त्यांची चॅटिंग असेल तर काय म्हणणं आहे तुमचं. चॅटींग असतील म्हणून काय आत्महत्या करायला लावायचे का? वेश्यांना सुद्धा सन्मान असतो. कोणत्या तरी मजबूरतून ते काम करत असतात. त्यातून तुम्ही सांगणार का त्या वेश्याला काय सन्मान नाही. आज कालचे राजकारणी वर्तमानपत्र आणि पुस्तके वाचत नाहीत त्यामुळे त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार. *अजित पवारांनी पीडितांच्या घरच्यांना बोलले मात्र तुम्ही चाकणकर बाईंना घरी का पाठवलं नाही.?* *अश्या कोणत्या रूपात अडकले आहेत अजित पवार. घरी पाठवायला पाहिजे* ती डॉक्टर तिच्या जिवानिशी गेली पण त्याचं आता सगळे राजकारण करत आहेत. ऑन सुप्रिया सुळे महादेव मुंडे कुटुंबीय भेट आख्या महाराष्ट्रात गुंडांना पुसणारा पक्ष कोण होता. आता वेगळी झाली म्हणून काय झालं ते गुंड होते. आता इकडे गेले तिकडे गेले एवढेच झालं. *आख्या महाराष्ट्राचा आणि बीडचा राजकारण यांनी नासवलं आहे* ( सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता टीका) सहानुभूती म्हणून भेटायला गेले असतील. बाईट- प्रकाश महाजन, सामाजिक कार्यकर्ते
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Nov 03, 2025 12:48:41
Pune, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथील तनपूरे सहकारी साखर कारखान्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी गावकरी पुढे सरसावले आहे.. साखर कारखान्याचे गतवैभव पुन्हा पहायला मिळावे या भावनेतून उद्योजक विजय सेठी यांनी तब्बल एक कोटी रूपयांची मदत सुपूर्द केलीय.. हि मदत देताना विजय शेठी आणी कारखान्याचे अध्यक्ष अरूण तनपुरेही भावूक झाले होते... एकेकाळी राहुरी तालूक्याची कामधेनू असलेला सहकारी साखर कारखाना आज कर्जाच्या ओझ्यामुळे अखेरच्या घटका मोजत आहे.. उद्योजक विजय सेठी यांचे बालपण साखर कारखान्याचे वैभव बघत पार पडले मात्र आज साखर कारखान्याची अवस्था बघून आपण काहीतरी मदत करावी या भावनेतून त्यांनी तब्बल एकोटी रूपयांचा धनादेश अध्यक्षांकडे सुपूर्द केला.. मदत देताना विजय शेठी आणि अरुण तनपुरे दोघेही भाऊ झालेले पाहायला मिळाले
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Nov 03, 2025 12:33:30
Bhandara, Maharashtra:भंडाऱ्यात कुजलेले धानाचे पुंजणे घेऊन नाना पटोलेंच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांपुढे मांडल्या समस्या..... सरसकट नुकसान भरपाईची केली मागणी..... शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून धान पीक अक्षरशः जमीनदोस्त झाले असून धानाला अंकुर फुटले आहेत. अशात नाना पटोले भंडाऱ्यात एका बैठकीसाठी आले असता शेतकऱ्यांनी नाना पटोले यांना वेढा घालत समस्या त्यांना समस्या सांगितल्या. धानाला अंकुर फुटले असून अक्षरशः धान निस्तनाभुत झाल्याचे लक्षात येताच नाना पटोलेंनी उपस्थित शेतकरी व काँग्रेस कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालय गाठले व जिल्हाधिकारीांना धानाचे कुजलेले पुंजणे दाखवत शेतकऱ्यांची दयनीय अवस्था बघता सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 03, 2025 12:33:07
Kalyan, Maharashtra:कल्याण नगर मार्गावर शहाड़ उड्डाणपूल देखभाल दुरुस्तीसाठी बंद. अवजड वाहनांसाठी वीस दिवस बंद, पर्यायी रस्त्याचा वापर करण्याचे वाहतूक पोलिसांच्या सूचना. ३ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबरपर्यंत पुलाचे डांबरीकरण व सशक्तीकरण कामा साठी बंद करण्याचा निर्णय ANC - कल्याण-नगर महामार्गावरील महत्वाचा शहाड उड्डाणपूल पुन्हा एकदा अवजड वाहनांसाठी २० दिवस बंद राहणार आहे. डांबरीकरण आणि दुरुस्तीचं काम सुरू असल्याने वाहतूक पोलीस विभागानं नवीन अधिसूचना जारी केली आहे. दिवाळीनंतर पुन्हा एकदा वाहनधारकांना पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागणार आहे. कल्याण-माळशेज महामार्गावरील शहाड उड्डाणपूलाचे सशक्तीकरण आणि बेरिंग , डांबरीकरण व विविध दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे. याआधी ही २८ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या 18 दिवस देखभाल दुरुस्ती साठी या कालावधीत हा पूल अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला होता. परंतु पावसाळा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर काम पूर्ण न होऊ शकल्याने राष्ट्रीय महामार्ग विभागानं काम थांबवून वाहतुकीस तात्पुरती परवानगी दिली होती. मात्र आता पुन्हा एकदा ३ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत पुलावर डांबरीकरण आणि इतर दुरुस्तीचे काम होणार असल्याने, या काळात अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. लहान आणि हलकी वाहने मात्र एकतर्फी मार्गाने ये-जा करू शकतील. तर या कालावधी दरम्यान वाहन चालकाने पर्याय मार्ग वापरावे अशी विनंती देखील वाहतूक पोलिसांनी केली आहे. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी
0
comment0
Report
Advertisement
Back to top