Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane410210

नवी मुंबई में भाजपा महापौर पर बेलापूर का बड़ा दावा

SNSWATI NAIK
Nov 13, 2025 13:22:10
Navi Mumbai, Maharashtra
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहोर झाली असून यामध्ये महिला राज पहायला मिळत आहे. याच पाश्वभूमीवर बेलापूर मतदार संघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी बेलापूर मतदार संघातील 51 जागांपैकी 34 ते 35 जागा भाजपा जिंकून येईल असा दावा केलाय. यासोबतच महापौर बनत असताना सर्वात मोठा वाटा बेलापूर मतदार संघाचा असे स्पष्ट केलेय.
92
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JMJAVED MULANI
Nov 13, 2025 14:46:47
Baramati, Maharashtra:बारामती_*उपमुख्यमंत्री अजित पवार भाषण पॉइंटर कार्यकर्ता मेळावा नगरपरिषद निवडणूक* प्रचाराला प्रत्येकाला कमी दिवस मिळाले आहेत. बारामती शहर माझं असल्याने मला अधिकच लक्ष देणे गरजेचे आहे. 17 नोव्हेंबर पर्यंत शेवट नामनिर्देशन दाखल करण्याची मुदत आहे. या मेळाव्यानंतर मी माळेगाव नगरपंचायतीकरता मुलाखती घेणार आहे. मला 91 साली तुम्ही मला खासदार केले त्या काळातील माझे सहकारी होते त्याची मुले मला आता मुलाखती देत होते. जवळपास दहा वर्षानंतर निवडून होत आहे माळेगांव नगरपंचायत पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. *बारामती आपल्या सर्वांचे घर असल्याने माझं होम ग्राउंड आहे* प्रत्येक नागरिक माझ्या परिवाराचा एक भाग समजतो. *ही निवडणूक केवळ नगरपालिकेची नाही तर बारामतीच्या पुढील विकासाच्या दिशेचे निवडणूक आहे* बारामती आणखी खूप काम करायचं आहे हुरळून जायचं नाही लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पुणे महानगरपालिकेत जशा सुविधा आहेत अशा प्रकारे आपण बारामती मध्ये देण्याचा प्रयत्न करत आहोत. शहरातून जाणाऱ्या निरा डाव्या कालव्याचे सुशोभीकरण करण्याचे काम सुरू केले आहे. शहरात नवीन उद्याने बागा करत आहोत. सुंदर शहरासाठी आपण प्रयत्न करत आहोत. आपलं शहर बघितल्यावर लोक आपल्या शहराची तुलना करतात. मी अनेकांना मदत केली,अनेक कार्यकर्ते तयार केले. लक्ष दिल्याशिवाय हे होत नाही. *मला तुम्हा सर्वांना सांगायच आहे बारामती नगरपालिकेचे उत्पन्न 2016 ती 2025 या दहा वर्षातलं बारामतीचं टॅक्स उत्पादन 310 कोटी होत* *3300 कोटी रुपयांची कामे गेल्या दहा वर्षात आपण बारामती मध्ये आपण केली* ही सर्व कामे टप्प्याटप्प्याने केली तुम्ही मला पाठिंबा देत गेला. *आज मला जे उमेदवारी मागत आहेत ते पहिल्यांदा निवडून गेल्यावर त्यांना घरपट्टी पाणी पडतील याची उसळी करावी लागेल* मी नेहमी सांगतो मी कामाचा माणूस आहे. *काही म्हणतात दादा आता आम्ही नवीन आहोत आम्हाला संधी द्या काही म्हणतात दादा आम्ही जुने आहोत आम्हाला शेवटची संधी द्या* हा सर्व निधी आणत असताना 269 कामे आपण पूर्णत्वास नेली आहेत, 433 कामे प्रस्तावित होती. शिवसृष्टी, करा नदीची सुशोभीकरण, निरा डाबा कालवा सुशोभीकरण ही कामे सुरू आहेत. *आज आपल्या विरोधात काही लोक सगळ्यांची एकी करून पॅनल करण्याचा प्रयत्न करत आहेत, तुम्ही मला साथ द्या.* 322 लोकांनी उमेदवारी मागितले आहे, यातून मला फक्त 46 लोक निवडता येणार आहेत. *बारामती मध्ये एक लाख दोन हजार मतदार आहेत* हा मतदारसंघ आणि वीस प्रभागांमध्ये 41 नगरसेवक नगरसेविका निवडून देणार आहेत. *जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा गोट्याचा विचार करू नका फक्त घड्याळ पहा, हे घड्याळ त्या उमेदवाराचे घड्याळ नाही अजित पवारच घड्याळ आहे बारामतीचं हे समजून* सगळेच तोला मोलाचे आहेत. आता जी नवीन पिढी जन्माला येणार ती आता हे बघणार आहे त्या पार्श्वभूमीवर आपल्याला विकासात भर टाकावी लागणार आहे. *कृपा करून करून त्यात चुकीचं करू नका, विकृती म्हणून तोडायचं मोडायचं नट काढून घ्यायचे हे करू नका. मी त्याकरिता आता सीसीटीव्ही कॅमेरे वाढवत आहे* बारामती शहरातील वाहतुकीची कोंडी सोडवायची आहे. आपण रस्ता रुंद केल्यानंतर लोकं तिथेच गाडा लावतात तिथेच धंदा सुरू करतात. अरे बाबा मोहिते सर्व करताना तुम्ही पण ट्रॅफिकचा विचार केला पाहिजे. *परवा मी जाताना जळोची मध्ये एकाने अशी काय जोरात शायनिंग मध्ये गाडी मारली त्याने मलाच कट मारला, त्याने कट मारल्यावर माझं सटकलं. मी माझ्या ड्रायव्हरला म्हटलं चल याच्यामागे पण तो बोळीत शिरला. मी पोलिसांना सांगितले याला शोधून आणा. पोलिसांनी आज मला तो दाखवला. त्याच्याकडे लायसन नाही. मी म्हटलं का रे बाळा असं करतो तुझी चूक होती की नाही. तू म्हणाला होती. का नाही थांबला तो म्हणाला मला भीती होती पोलीस पकडून नेतील* *आज बारामती मध्ये कुठे ते सायलेन्सर वगैरे मध्ये पोलिसांनी पकडले मी पोलिसांना या सांगतो त्यांना माझी विनंती आहे तो माझ्या जवळचा असो आमचा असो नियमाच्या पलीकडे वागत असेल तर त्याला पकडायचं आणि रीतसर कारवाई करायची त्याला सोडायचं नाही* *त्याची नेहमीचीच ही प्रवृत्ती असेल तर तीन ते चार खटले भरायचे आणि पहिल्यांदा तडीपार करायचा आणि तडीपार करूनही नाही सुधारला तर मोका लावायचा त्याला पुढे तीन-चार पिढी आठवल्या पाहिजेत* *बारामती मध्ये कोणी चुकीचं करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सहन करणार नाही खपवून घेणार नाही आम्हाला कोणालाही त्रास द्यायचा नाही* चांगलं सलोख्याचं वातावरण राहो हीच आमचे भावना आहे. बारामतीत आपण आंतरक्रिया दर्जाचा जलतरण तलाव करत आहोत इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्यासाठी सीबीएससी स्कूल करत आहोत. अनेक लोक आपल्याला सीएसआर चा निधी देतात. कॅन्सर हॉस्पिटल साठी आपण गतीने पुढे चाललो आहोत. लवकरच जानेवारीत निवडणुका संपल्यानंतर बारामतीचे आयुर्वेदिक कॉलेज सुरू करायचा आहे. *उद्याच्या काळात बारामती आणि माळेगावच्या नगरपंचायत नगरपालिका या निवडणुकीमध्ये तुम्ही माझ्या विचारच्या नगरसेवक नगरसेविकांना निवडून दिले पाहिजे तर ही कामे चालू राहतील, तो हिगती चालू राहील.* मी पिंपरी चिंचवड का बदललं, कारण सगळे माझे विचारायचे असायचे. त्यांना मंजुरीत असतात माझ्या विचाराचे लोक तिचा नसतो आणि त्यांनी अडमुठे करायचे धोरण स्वीकारली तर कामाला ब्रेक बसेल. तुमच्या हातात आहे, हा विकासाचा रस पुढे चालला आहे , गोविंद घेतला आहे त्याला कुठे खंड पडून द्यायचा की त्याला अधिक वेगाने पुढे न्यायचे. नगराध्यक्ष पदासाठी अनेकांनी नावे सुचवली बळजबरी करत नाही. कारण मुळात त्याच्यात आवड असावी लागते. *तुम्हाला माहित आहे कोणावर अन्याय होऊ देणार नाही आणि तशा पद्धतीने तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहतात तुम्ही इतर शहराची प्रगती बघा आणि आपली बघा* हीच गोष्ट माळेगाव मध्ये करायची आहे, माळेगावकरांनी मला साथ दिली पाहिजे. माळेगांव ग्रामपंचायत असताना बजेट होते पाच कोटी तेरा लाख रुपये. 2025 26 ला बजेट 189 कोटी रुपये झाले. यात १८४ कोटी रुपये वेगवेगळे योजनेतून दिले. नगरपंचायत झाल्यापासून गेल्या पाच वर्षात माळेगाव बुद्रुक या ठिकाणी नगरपंचायतीला 234 कोटी दिले. 350 कोटी रुपयाची कामे चालू आहेत. *माझ्या विचाराची नगरपंचायत माळेगावकरांनी द्यावी लागेल* माळेगाव मध्ये आपण चांगले पद्धतीची पोलीस स्टेशन इमारत बांधली. *मी निधी आणेल परंतु मी तुमचं कधी ऐकल तुम्ही माझं ऐकलं आपली देवाणघेवाण आहे.* *तुम्ही घड्याळाच्या पाठीशी उभे रहा मी तुम्हाला मदत करेल* आपल्याला विकास करायचा आहे की आपल्याला गटातटाचे राजकारण करायचे आहे याचा माळेगावकरांनी ठेवा. जग फार पुढे चालले आहे. *आज पण काही जणांनी मला निवेदनातील मला शंका आली की हे ड्राफ्टिंग त्याचा नाही मी विचारलं खरं सांगायचं तो मनाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या माध्यमातून केल आहे.* माळेगाव कारखान्याचे डायरेक बोलू तुम्हाला मदत करत आहे माझं त्यात बारगाईने लक्ष आहे. तुम्ही फक्त साथ द्या, काळजी करू नका. *आता मुलाखतीला बोलावल्यानंतर काही म्हणाले दादा लहानाची मोठी मी इथेच झाले पण तुमच्यापुढे कधी मुलाखत दिली नव्हती म्हणून ती देण्यासाठी आले.* मी कामाचा माणूस आहे, नुसते पैसे दिले म्हणजे हे सर्व उभा राहत नाही. *अनेक जणांचे मतदार संघ आहेत अनेक जण पैसे देतात परंतु त्या पैशाचा विनियोग कामासाठी होतो का नाही. एवढं आम्ही घरच्या पेक्षा सामाजिक कामात बघत असतो. 40 40 50 50 वेळा कामाच्या साईटवर आणि जात असतो.* तुमच्यास जसे संस्कार कराल तसे ते तयार होत असते. *मी सारखं सांगत असतो मी कामाचा माणूस आहे विकासाचा भोक्ता आहे* त्यामुळे ही दोन्ही शहर आपल्या विचाराच्या आली पाहिजेत. *काहीजण बारामतीच्या बाहेरचे असले तरी तुम्हाला वेगवेगळ्या पदवी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मिळाली आहेत, त्यामुळे इथला उमेदवार निवडून येण्यासाठी मदतीने काम करा* *हे काय अजित पवार च्या घरचे लग्न आहे आपली सर्वांची जबाबदारी आहे* चित्र स्पष्ट झालं की प्रचाराचा नारळ फोडेल, काही सांगायचे ते माळेगावकर आणि बारामतीकरांना सांगेन. *त्यानंतर हेवे दावे गट, काहीजण एवढं उथमातपणे बोलत आहेत, घमंड करत आहेत. त्यांचं त्यांना लखलाभ.* *आता लोकसभेला असं झालं तसं झालं हे सांगत बसू नका, एका बाजूला पवार साहेब एका बाजूला मी होतो, परंतु मी जी काही राजकीय भूमिका घेतली.पण आता जरा दिलदारपणा वाढवा.* *मला निवडून द्यायला पवार साहेबच कारणीभूत आहेत ना ? मी काय वरण पडलो का. ही कसे विसरता येईल* मला खासदारकीला ४८ हजार मते कमी पडली मी मान्य केला नाही. मग विधानसभेला एक लाख मते कुठून आली झालं गेलं गंगेला मिळालं. काही गोष्टी सोडायचे असतात. करा नदीला मिळालं सोनगाव वरून चंद्रभागेला मिळालं। बारामतीचे नगराध्यक्ष धरून सर्व नगरपाशी निवडून येतील हे आपण बघुना. *आपली एवढी धमक आहे आपण जे बोलतो ते करतो. आपल्या मनगटांमध्ये ती ताकद आहे करायची, मी त्या उद्योगपतींना सांगू शकतो आता देखील मी सीएसआरचा निधी आणला आहे.* *एक नाही आणि अर्ध नाही किंवा पाव देखील नाही, घड्याळ बघायचं आणि बटन दाबायचं* *तुम्ही जेवढे मला बारामतीला निवडून द्याल तेवढी माझी जिल्ह्यात मान वाढणार आहे* जो काम करतो तो सुधारणा करणार आहे. माळेगाव ला सुद्धा एक रोल मॉडेल नगरपंचायत कशी असू शकते अशा पद्धतीने माळेगाव नगरपंचायतीचा चेहरा मोहरा राज्यात बदलायचा आहे. आता काही झाले तरी माळेगावकरांच्या कार्यकर्त्यांच्या नागरिकांच्या मदतीने आपण माळेगावला उद्याच्या पाच वर्षात रोल मॉडेल नगरपंचायत बनवायचं. कोणतेही काम करताना इच्छाशक्ती फार महत्त्वाचे असते. आपल्याला राजकारण बाजूला ठेवून एकत्र राहायचं आहे विकासाचा राजकारण करायचे आहे. कामे चांगली केली तर लोकांचे मत परिवर्तन होतं. राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या चांगल्या योजना येत आहेत. पंतप्रधान असतील नितीन गडकरी असतील अमित शहा असतील विविध प्रकार चा निधी आणेल. *मला अनेक कार्यकर्ते सांगत असतात दादा चांगला द्या.अरे मला कळत नाही का ? मी 35 वर्षे घासली ना इथे. पाक केस गेली* मी शिव शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोडणार नाही. कोणावर ही अन्याय होणार नाही महिलांचा समाजात मान ठेवला जाईल संरक्षण आणि सुरक्षितता मिळेल अशा पद्धतीने आपल्याला कामाला लागायचं आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कमी पडता कामा नये. *ही निवडणुक keval मतांची लढाई नाही ही दोन्ही शहराच्या विकासाची चाचणी आहे* राज्यात 288 ठिकाणी नगराध्यक्ष थेट निवडला जाणार आहे,रुसवे फुगवे गट तट बाजूला ठेवा. मी जो नगराध्यक्ष तो आपल्याला निवडून आणायचा आहे. *आपण जेव्हा एक दिलाने निवडणुकीला उभा राहतो तेव्हा आपल्याला कोणतीही ताकद हरवू शकत नाही, कोण माईचा लाल हरवू शकत नाही* आपणात जर कुठे गडबड झाली तर अडचण येते. *आता निवडणुकीच्या निमित्ताने अनेकजण बोलणारे येथील पण काम करणारा फक्त अजितदादा असतो* *मी काम करतोय माझं काम बोलतोय, काही लोक चुकीच्या गोष्टी करायला लागली की मी विचार करतो एवढं काम दुसरा कुठल्या तालुक्यात केलं असतं तर डोक्यांवर उचलून घेतलं.* *पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसं काही जण निवडणुकीत उगवतात, निवडणूक झाल्यावरती बाहेर दिसतात का ? कधी तुमच्या सुख दुखात आली का? याचा विचार करा* माझ्यावर टाकलेल्या विश्वास कधीही खोटा ठरवू शकणार नाही. अशा प्रकारचा शब्द या मेळाव्याच्या निमित्ताने देतो. विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत याची ग्वाही देतो.
91
comment0
Report
UPUmesh Parab
Nov 13, 2025 14:20:46
Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग माजी खासदार विनायक राऊत ऑन सिंधुदुर्ग जिल्हा महाविकास आघाडी --- दुर्दैवाने काँग्रेस ने स्वबळाचा सूर आळवलाय, मात्र महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवावी हा पक्ष आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. जिल्ह्यात राजकीय स्वैराचार सुरू आहे. हैदोस घातला जात आहे. त्या विरोधात एकत्रित येणं आवश्यक आहे. ऑन शहर विकास आघाडी --- सर्व कणकवली प्रेमी एकत्रित येऊन शहर विकास आघाडी स्थापन करत आहेत. कणकवलीत भ्रष्टाचार माजला आहे त्याच्या विरोधात शहर विकास आघाडी होत असेल तर आम्हाला अडचण नाही. पण भाजपा आणि गद्दार गट ह्यांना थारा देऊ नये.. ऑन राणे चव्हाण संभ्रम --- ह्यांच्यात संभ्रम आहे *नारायण राणे रवींद्र चव्हाण यांना संपवायला निघाले आहेत. रवींद्र चव्हाण शिंदे गटाला संपवायला निघाले आहेत. पालकमंत्री नितेश rाणे निलेश राणे यांना संपवायला चालले आहेत. आणि निलेश राणे नितेश राणेंना संपवायला चाललेले आहेत* ऑन विशाल परब ऑफर --- विशाल परब सारखा संस्कृत कार्यकर्ता भरकटला जाऊ नये त्याचा राजकीय अस्त होऊ नये या प्रामाणिक हेतूने त्यांना आम्ही ऑफर दिली. त्याला रवींद्र चव्हाण यांनी आधार दिला तर नारायण राणे आव्हान देत आहेत. हा राणे आणि चव्हाण यांच्यातला कलगीतुरा आहे.
69
comment0
Report
JMJAVED MULANI
Nov 13, 2025 14:16:19
Baramati, Maharashtra:बारामतीकरांनो अब दिलदारपणा बढ़ाओ... माला सुरुवातीला निवडून द्यायला पवार साहेबच कारणीभूत... मी वेगळी राजकीय भूमिका घेतल्याने बारीक बघू नका: अजित पवार. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते. अजित पवारांनी बारामती मध्ये बारामती नगरपरिषद आणि माळेगाव नगरपंचायतीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या यानंतर कार्यकर्ता मेळावा झाला. या मेळाव्यात अजित पवारांनी लोकसभेसारखं बारीक बघू नका! आपण कालपर्यंत एकत्र होतो ना? मला सुरुवातीला निवडून द्यायला पवार साहेबच कारणीभूत आहेत ना? मी काय वरून टपकलो व्हय... हे कसं आपल्याला विसरता येईल. असं म्हणत नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत बारामतीकरांना पाठीशी उभ राहण्याच आवाहन केलेय... आत्ता लोकसभेला असं झालं तसं झालं हे सांगत बसू नका, शेवटी हे सगळे आपलेच मतदार आहेत. एका बाजूला पवार साहेब एका बाजूला मी होतो बारामतीकरांच्या पुढे प्रश्न राहणारच ना,का काहींचं प्रेम साहेबांवर नसावं? असलं पाहिजे माझही प्रेम आहेच ना! पण मी काही राजकीय भूमिका घेतली त्यामुळे इतकं बारीक बघणं फार चुकीचं आहे. अरे जरा दिलदार पणा वाढवा ना! मोठेपणा वाढवा,मनाचा मोठेपणा करा. आपण कालपर्यंत एकत्र होतो ना? मला सुरुवातीला निवडून द्यायला पवार साहेबच कारणीभूत आहेत ना? काय वरून टपकलो व्हय... हे कसं आपल्याला विसरता येईल. असं म्हणत अजित पवारांनी या निवडणुकीत बारामतीकरांना पाठीशी राहण्याचे आवाहन केलंय....
72
comment0
Report
SMSATISH MOHITE
Nov 13, 2025 14:01:04
Nanded, Maharashtra:धबधब्याच्या प्रवाहात अडकलेल्या 7 जणांची सुखरूप सुटका करण्यात यश आले. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातल्या सहस्त्रकुंड येथे धबधब्यात सात जण अडकले होते. तीन महीला, दोन तरुणी , एक पाच वर्षाची मुलगी आणि आठ वर्षाचा बालक असे सात जण अडकले होते. हे सर्व जण यवतमाळ जिल्ह्यातील एकंबा या गावातील रहिवासी असुन सर्वजण मजूर आहेत. कापूस वेचणीसाठी ते तेलंगणा राज्यातील आदिलाबादला येथे गेले होते. दुपारी तीनच्या रेल्वे गाडीने हिमायतनगरला आले. सहस्त्रकुंड धबधबा हा नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर आहे. पैनगंगा नदीला पाणी कमी असल्याने हे सर्वजण नदी ओलांडून आपल्या गावाकडे जात होते. नदिपात्राच्या मधोमध आल्यानंतर पाण्याचा प्रवाह वाढला. वरील बंधाऱ्यातून पाणी सोडण्यात आल्याने पाणी वाढले आणि सर्वजण अडकून पडले. एकमेकांना धरून सर्वजण एका खडकावर जीव मुठीत धरून उभे होते. स्थानिक मच्छीमारांनी तराफ्याला दोरी बांधून सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. दरम्यान महीला अडकल्याने बंधाऱ्यातून सोडण्यात आलेले पाणी बंद करण्यात आले. त्यामूळे नदीला पाणी कमी होऊन बचाव कार्यात मदत झाली.
49
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 13, 2025 13:17:13
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : मोहोळ नगर परिषदेमध्ये शिवसेना शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांची एकमेकांवर टीका शरद पवार गटाचे माजी आमदार रमेश कदम यांची शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांच्यावर सडकून टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ खासदार आहेत त्यामुळे त्या पक्षाला कोणाची बी टीम म्हणणाऱ्या त्या मूर्खाच्या बुद्धीची कीव करायला पाहिजे तर विधानसभेवेळी माजी आमदार रमेश कदम यांनी कोणाचे काम केले हे मोहोळच्या जनतेला माहिती लोकसभेवेळी मोहिते पाटील आणि रमेश कदम हे अनगरकरांकडे राम सातपुते यांना पाडण्यासाठी जात होते - त्यामुळे माजी आमदार रमेश कदम हे राजन पाटील यांची बी टीम आहेत बारसकर ऑन अल्पसंख्यांक समाजाला दम: माजी आमदार रमेश कदम यांच्या आरोपांमध्ये तथ्य आहे. काही प्रस्थापित नेते अल्पसंख्यांक समाजाला धमकावत आहेत अल्पसंख्याक समाजाने इतर कोणत्याही पक्षातून निवडणूकीला उभे राहू नये म्हणून त्यांना दम दिला जात आहे.
110
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 13, 2025 12:59:30
4
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 13, 2025 12:54:36
Akola, Maharashtra:राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अकोला दौऱ्यात एक वेगळीच घटना घडली. शेतकरी संवाद कार्यक्रमादरम्यान अकोल्यातील एका तरुणाने “माझं लग्न करून द्या” अशी मागणी करत थेट पवार साहेबांना एक भावनिक पत्र दिलं. या पत्रात या युवकाने आपली व्यथा मांडली आहे: “मी वयाने मोठा झालो, पर अजून लग्न जमत नाही. कोणी बघत नाही, समजून घेत नाही. साहेब, तुम्ही काहीतरी करा.” दुसरीकडे या युवकाच्या एकटेपणाची भावना अनेकांच्या मनाला स्पर्शून गेली. या घटनेनंतर एकच प्रश्न सर्वांना पडला — “हा युवक कोण?” तर हा युवक अकोल्यातीलच असून, त्याने आपल्या आयुष्यातील एक अनोखा प्रसंग निर्माण केला आहे.
1
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 13, 2025 12:44:21
Solapur, Maharashtra:सोलापुर ब्रेकिंग - आईकडून दुजाभावची वागणूक मिळत असल्याचा आरोप करत सोलापुरात वकिलाची गळफास घेत आत्महत्या - सोलापुरात वकिलाने बेडरूम मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार. - आईकडून दुजाभावाची वागणूक देत असल्यामुळे आत्महत्या करत असल्याची मिळाली चिट्टी - सोलापुरातील सागर श्रीकांत मंद्रूपकर असं गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या वकिलाचे नाव - सागर मंद्रूपकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवल्याचं पोलिसांच्या तपासात आलं समोर - सागरने आपल्य संदर्भात चिट्टी लिहिताना सांगितलं, 'आईकडून होणारा सततचा दुजाभाव यामुळे मी आत्महत्या करत आहे. - माझ्या आत्महत्येला ती जबाबदार, माझ्या मृत्यूनंतर तिला कडक शिक्षा करा, ही नम्र विनंती' असल्याचे दोन पानाची चिट्ठी लिहली. - सागर आणि त्याचे आईचे मंगळवारी रात्री भांडण झाले होते. - सागर यांचे वडील सरकारी नोकरदार तर बहिण विवाहित आहे. - सोलापुरातील सिव्हील पोलीस चौकी येथे नोंद करण्यात आली आहे. - विजापूर नाका पोलीस पुढील तपास करत आहेत.
39
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Nov 13, 2025 12:05:33
Parbhani, Maharashtra:अँकर- हिंगोलीच्या वसमत येथील बस स्थानकातील डीझेल पंपावर बसमध्ये डीझेल भरतांना अचानक आग लागल्याची घटना घडलीय,यामध्ये काळे नामक हेल्पर गंभीर भाजल्या असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना नांदेड येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. एका बस मध्ये डीझेल भरण्यासाठी नोजल बसच्या टॅंकमध्ये टाकले असता नोजल मधून डीझेल ऐवजी आगीचे लोट पसरल्याची माहिती आहे, तेथील कर्मचाऱ्यांनी सिस फायरच्या सिलेंडरव्दारे आग आटोक्यात आणत जखमी महिलेला तातकाळ रुग्णालयात दाखल केले असल्याची माहिती राज्य परिवहन महामंडळाच्या परभणी विभागाचे विभाग नियंत्रक डी एस डफले यांनी दिलीय, तेथील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असून सदर डीझेल पंप कंपनीच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे...
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Nov 13, 2025 11:58:19
Nanded, Maharashtra:पाणी सोडल्यामुळे प्रवाह वाढला और नदीतून जाणाऱ्या 5 महिलाएं और 2 बच्चों पाणी के प्रवाह में फंस गए हैं। उन्होंने एक खड्क पर एक साथ पकड़ बनाए रखी और सुरक्षित रहने की कोशिश कर रहे हैं। यह घटना नांदेड जिले के प्रसिद्ध पर्यटन स्थल सहस्त्रकुण्ड के पास की है। यवतमाल जिले की इन महिलाओं को कपास की बिक्री के लिए तेलंगाना के आदिलाबाद जाना था, वे रेल से इस्लापुर पहुँची थीं। पैनगंगा नदी के सहस्त्रकुण्ड धबध्बे पर पानी कम हो जाने से नदी पार करने का प्रयास कर रहीं थीं, लेकिन इसापूर ध قب से पानी छोड़ा गया और वे उसके प्रभाव में आ गईं। सभी एक दूसरे के हाथ थामकर एक खदान पर खड़े होकर बचने की कोशिश कर रहे हैं। स्थानीय मछुआरे उन्हें बचाने का प्रयास कर रहे हैं। प्रशासन को सूचना मिली है और इन महिलाओं को सुरक्षित निकालने के लिए प्रयास जारी हैं.
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Nov 13, 2025 11:56:01
Ambernath, Maharashtra:बदलापूरात आठ पक्षांची महाविकास आघाडी जागावाटपात बहुजन मुक्ती पार्टी वरचढ नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीचा निर्णय गुलदस्त्यात बदलापूर नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 17 नोव्हेंबर ही अखेरची तारीख आहे. शिवसेना-भाजपने अद्याप आपले उमेदवार जाहिर केलेले नाही. मात्र महाविकास आघाडीने आठ पक्षांची मोट बांधत 45 जागांचं वाटप गेलंय. शिवसेना आणि बहुजन मुक्ती पार्टीच्या वाट्याला प्रत्येक 11 जागा आल्या असून, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला 6, काँग्रेसला 5 तर मनसेला 3 जागा देण्यात आल्या आहेत. वंचितला 5, आपला 2 आणि आरपीआय आर के गटाला 1 जागा देण्यात आली आहे. विशेष म्हणजे बहुजन मुक्ती पार्टीला स्वत:चं चिन्ह नसतानाही काँग्रेस, राष्ट्रवादीपेक्षा दुपट्टीने जागा देण्यात आल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय. मविआनं बहुजन मुक्तीला 11 जागा देत शिवसेना-भाजपला मोकळं रान करून दिलंय का अशीही चर्चा बदलापूरच्या राजकीय वर्तुळात रंगताना दिसतीय.
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Nov 13, 2025 11:32:11
Chendhare, Alibag, Maharashtra:रायगढ़ में महायुती के टूटने के संकेत सामने आते हैं। मंत्री भरत गोगावले के होम ग्राउंड महाड नगर पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र आल्यात। शिवसेना शिंदे गटाच्या विरोधात दोन्ही पक्षांनी युती केली असून जागावाटपही जाहीर झाले: १५ जागा राष्ट्रवादी काँग्रेसला आणि ५ जागा भाजपला. नगराध्यक्षपदाची लढत कोण लढवणार, याची घोषणा सुनील तटकरे करणार आहेत. अँकरने सांगितले की रायगड जिल्ह्यात नगर पालिका निवडणुकांसाठी युती आघाड्यांची चाचपणी सुरू असतानाच ही घोषणा झाली आहे. महाड नगरपालिकेची निवडणूक शिवसेना शिंदे गटाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र आल्यामुळे महायुतीच्या फुटीचा नारळ महाडमध्ये फुटला आहे. माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी या बद्दलची घोषणा केली. समाजातील शिंदे गटाला बाजूला ठेवून जागावाटप जाहीर झाले.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 13, 2025 11:29:32
Nashik, Maharashtra:नाशिकच्या कुंभमेळ्याची चर्चा होणार मागील कुंभाची दखल जगाने घेतली अमेरिकेने आपल्या क्रावूड मॅनेजमेंटबाबत चर्चा केली यावेळेसचा कुंभ वेगळा असणार आहे प्रयागराजला खूप गर्दी झाली रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली तिथं लोकं मृत्युमुखी पडले ही वस्तुस्थिती पण आपल्याकडे परिस्थिती वेगळी जागा कमी आहे कुणालाही दुखापत होणार नाही, मृत्यू होणार नाही याची काळजी घ्यायची आहे यासाठी अधिकारी रात्रीचा दिवस करत आहे कामाचा धडाका सुरू आहे मनपाच्या आयुक्त महिला आहे महिला असल्यानं झपाट्याने काम करत आहे त्यांना भान राहील नाही, जेवण करत नाही अतिशय वेगाने काम सुरू आहे कुठेही गुंडगिरी चालणार नाही आता पोलिसांच्या कामगिरीवर समाधानी आहात की नाही मुख्यमंत्री यांनी ताकीद दिली त्यामुळे कारवाई झाली काही लोकं तर पळून गेले खाते श्याम, जम्मूला निघून गेले आम्ही गुंडगिरी खपून घेणार नाही सगळ्या अधिकाऱ्यांचे स्वागत करतो टुरिझम कसे वाढेल यादृष्टीने प्रयत्न करायला हवे साधू संतही उपस्थित आहे कुंभात सगळ्यांनी सहभागी व्हावे येणाऱ्या प्रत्येक भाविकांचे स्वागत करायचे आहेत सगळ्यांनी सज्ज व्हावे
0
comment0
Report
Advertisement
Back to top