Back
बारामती में अजित पवार का विकास मॉडल: नगरपंचायत के लिए 2025 का रोडमैप
JMJAVED MULANI
Nov 13, 2025 14:46:47
Baramati, Maharashtra
बारामती_*उपमुख्यमंत्री अजित पवार भाषण पॉइंटर कार्यकर्ता मेळावा नगरपरिषद निवडणूक* प्रचाराला प्रत्येकाला कमी दिवस मिळाले आहेत. बारामती शहर माझं असल्याने मला अधिकच लक्ष देणे गरजेचे आहे. 17 नोव्हेंबर पर्यंत शेवट नामनिर्देशन दाखल करण्याची मुदत आहे. या मेळाव्यानंतर मी माळेगाव नगरपंचायतीकरता मुलाखती घेणार आहे. मला 91 साली तुम्ही मला खासदार केले त्या काळातील माझे सहकारी होते त्याची मुले मला आता मुलाखती देत होते. जवळपास दहा वर्षानंतर निवडून होत आहे माळेगांव नगरपंचायत पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. *बारामती आपल्या सर्वांचे घर असल्याने माझं होम ग्राउंड आहे* प्रत्येक नागरिक माझ्या परिवाराचा एक भाग समजतो. *ही निवडणूक केवळ नगरपालिकेची नाही तर बारामतीच्या पुढील विकासाच्या दिशेचे निवडणूक आहे* बारामती आणखी खूप काम करायचं आहे हुरळून जायचं नाही लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पुणे महानगरपालिकेत जशा सुविधा आहेत अशा प्रकारे आपण बारामती मध्ये देण्याचा प्रयत्न करत आहोत. शहरातून जाणाऱ्या निरा डाव्या कालव्याचे सुशोभीकरण करण्याचे काम सुरू केले आहे. शहरात नवीन उद्याने बागा करत आहोत. सुंदर शहरासाठी आपण प्रयत्न करत आहोत. आपलं शहर बघितल्यावर लोक आपल्या शहराची तुलना करतात. मी अनेकांना मदत केली,अनेक कार्यकर्ते तयार केले. लक्ष दिल्याशिवाय हे होत नाही. *मला तुम्हा सर्वांना सांगायच आहे बारामती नगरपालिकेचे उत्पन्न 2016 ती 2025 या दहा वर्षातलं बारामतीचं टॅक्स उत्पादन 310 कोटी होत* *3300 कोटी रुपयांची कामे गेल्या दहा वर्षात आपण बारामती मध्ये आपण केली* ही सर्व कामे टप्प्याटप्प्याने केली तुम्ही मला पाठिंबा देत गेला. *आज मला जे उमेदवारी मागत आहेत ते पहिल्यांदा निवडून गेल्यावर त्यांना घरपट्टी पाणी पडतील याची उसळी करावी लागेल* मी नेहमी सांगतो मी कामाचा माणूस आहे. *काही म्हणतात दादा आता आम्ही नवीन आहोत आम्हाला संधी द्या काही म्हणतात दादा आम्ही जुने आहोत आम्हाला शेवटची संधी द्या* हा सर्व निधी आणत असताना 269 कामे आपण पूर्णत्वास नेली आहेत, 433 कामे प्रस्तावित होती. शिवसृष्टी, करा नदीची सुशोभीकरण, निरा डाबा कालवा सुशोभीकरण ही कामे सुरू आहेत. *आज आपल्या विरोधात काही लोक सगळ्यांची एकी करून पॅनल करण्याचा प्रयत्न करत आहेत, तुम्ही मला साथ द्या.* 322 लोकांनी उमेदवारी मागितले आहे, यातून मला फक्त 46 लोक निवडता येणार आहेत. *बारामती मध्ये एक लाख दोन हजार मतदार आहेत* हा मतदारसंघ आणि वीस प्रभागांमध्ये 41 नगरसेवक नगरसेविका निवडून देणार आहेत. *जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा गोट्याचा विचार करू नका फक्त घड्याळ पहा, हे घड्याळ त्या उमेदवाराचे घड्याळ नाही अजित पवारच घड्याळ आहे बारामतीचं हे समजून* सगळेच तोला मोलाचे आहेत. आता जी नवीन पिढी जन्माला येणार ती आता हे बघणार आहे त्या पार्श्वभूमीवर आपल्याला विकासात भर टाकावी लागणार आहे. *कृपा करून करून त्यात चुकीचं करू नका, विकृती म्हणून तोडायचं मोडायचं नट काढून घ्यायचे हे करू नका. मी त्याकरिता आता सीसीटीव्ही कॅमेरे वाढवत आहे* बारामती शहरातील वाहतुकीची कोंडी सोडवायची आहे. आपण रस्ता रुंद केल्यानंतर लोकं तिथेच गाडा लावतात तिथेच धंदा सुरू करतात. अरे बाबा मोहिते सर्व करताना तुम्ही पण ट्रॅफिकचा विचार केला पाहिजे. *परवा मी जाताना जळोची मध्ये एकाने अशी काय जोरात शायनिंग मध्ये गाडी मारली त्याने मलाच कट मारला, त्याने कट मारल्यावर माझं सटकलं. मी माझ्या ड्रायव्हरला म्हटलं चल याच्यामागे पण तो बोळीत शिरला. मी पोलिसांना सांगितले याला शोधून आणा. पोलिसांनी आज मला तो दाखवला. त्याच्याकडे लायसन नाही. मी म्हटलं का रे बाळा असं करतो तुझी चूक होती की नाही. तू म्हणाला होती. का नाही थांबला तो म्हणाला मला भीती होती पोलीस पकडून नेतील* *आज बारामती मध्ये कुठे ते सायलेन्सर वगैरे मध्ये पोलिसांनी पकडले मी पोलिसांना या सांगतो त्यांना माझी विनंती आहे तो माझ्या जवळचा असो आमचा असो नियमाच्या पलीकडे वागत असेल तर त्याला पकडायचं आणि रीतसर कारवाई करायची त्याला सोडायचं नाही* *त्याची नेहमीचीच ही प्रवृत्ती असेल तर तीन ते चार खटले भरायचे आणि पहिल्यांदा तडीपार करायचा आणि तडीपार करूनही नाही सुधारला तर मोका लावायचा त्याला पुढे तीन-चार पिढी आठवल्या पाहिजेत* *बारामती मध्ये कोणी चुकीचं करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सहन करणार नाही खपवून घेणार नाही आम्हाला कोणालाही त्रास द्यायचा नाही* चांगलं सलोख्याचं वातावरण राहो हीच आमचे भावना आहे. बारामतीत आपण आंतरक्रिया दर्जाचा जलतरण तलाव करत आहोत इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्यासाठी सीबीएससी स्कूल करत आहोत. अनेक लोक आपल्याला सीएसआर चा निधी देतात. कॅन्सर हॉस्पिटल साठी आपण गतीने पुढे चाललो आहोत. लवकरच जानेवारीत निवडणुका संपल्यानंतर बारामतीचे आयुर्वेदिक कॉलेज सुरू करायचा आहे. *उद्याच्या काळात बारामती आणि माळेगावच्या नगरपंचायत नगरपालिका या निवडणुकीमध्ये तुम्ही माझ्या विचारच्या नगरसेवक नगरसेविकांना निवडून दिले पाहिजे तर ही कामे चालू राहतील, तो हिगती चालू राहील.* मी पिंपरी चिंचवड का बदललं, कारण सगळे माझे विचारायचे असायचे. त्यांना मंजुरीत असतात माझ्या विचाराचे लोक तिचा नसतो आणि त्यांनी अडमुठे करायचे धोरण स्वीकारली तर कामाला ब्रेक बसेल. तुमच्या हातात आहे, हा विकासाचा रस पुढे चालला आहे , गोविंद घेतला आहे त्याला कुठे खंड पडून द्यायचा की त्याला अधिक वेगाने पुढे न्यायचे. नगराध्यक्ष पदासाठी अनेकांनी नावे सुचवली बळजबरी करत नाही. कारण मुळात त्याच्यात आवड असावी लागते. *तुम्हाला माहित आहे कोणावर अन्याय होऊ देणार नाही आणि तशा पद्धतीने तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहतात तुम्ही इतर शहराची प्रगती बघा आणि आपली बघा* हीच गोष्ट माळेगाव मध्ये करायची आहे, माळेगावकरांनी मला साथ दिली पाहिजे. माळेगांव ग्रामपंचायत असताना बजेट होते पाच कोटी तेरा लाख रुपये. 2025 26 ला बजेट 189 कोटी रुपये झाले. यात १८४ कोटी रुपये वेगवेगळे योजनेतून दिले. नगरपंचायत झाल्यापासून गेल्या पाच वर्षात माळेगाव बुद्रुक या ठिकाणी नगरपंचायतीला 234 कोटी दिले. 350 कोटी रुपयाची कामे चालू आहेत. *माझ्या विचाराची नगरपंचायत माळेगावकरांनी द्यावी लागेल* माळेगाव मध्ये आपण चांगले पद्धतीची पोलीस स्टेशन इमारत बांधली. *मी निधी आणेल परंतु मी तुमचं कधी ऐकल तुम्ही माझं ऐकलं आपली देवाणघेवाण आहे.* *तुम्ही घड्याळाच्या पाठीशी उभे रहा मी तुम्हाला मदत करेल* आपल्याला विकास करायचा आहे की आपल्याला गटातटाचे राजकारण करायचे आहे याचा माळेगावकरांनी ठेवा. जग फार पुढे चालले आहे. *आज पण काही जणांनी मला निवेदनातील मला शंका आली की हे ड्राफ्टिंग त्याचा नाही मी विचारलं खरं सांगायचं तो मनाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या माध्यमातून केल आहे.* माळेगाव कारखान्याचे डायरेक बोलू तुम्हाला मदत करत आहे माझं त्यात बारगाईने लक्ष आहे. तुम्ही फक्त साथ द्या, काळजी करू नका. *आता मुलाखतीला बोलावल्यानंतर काही म्हणाले दादा लहानाची मोठी मी इथेच झाले पण तुमच्यापुढे कधी मुलाखत दिली नव्हती म्हणून ती देण्यासाठी आले.* मी कामाचा माणूस आहे, नुसते पैसे दिले म्हणजे हे सर्व उभा राहत नाही. *अनेक जणांचे मतदार संघ आहेत अनेक जण पैसे देतात परंतु त्या पैशाचा विनियोग कामासाठी होतो का नाही. एवढं आम्ही घरच्या पेक्षा सामाजिक कामात बघत असतो. 40 40 50 50 वेळा कामाच्या साईटवर आणि जात असतो.* तुमच्यास जसे संस्कार कराल तसे ते तयार होत असते. *मी सारखं सांगत असतो मी कामाचा माणूस आहे विकासाचा भोक्ता आहे* त्यामुळे ही दोन्ही शहर आपल्या विचाराच्या आली पाहिजेत. *काहीजण बारामतीच्या बाहेरचे असले तरी तुम्हाला वेगवेगळ्या पदवी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मिळाली आहेत, त्यामुळे इथला उमेदवार निवडून येण्यासाठी मदतीने काम करा* *हे काय अजित पवार च्या घरचे लग्न आहे आपली सर्वांची जबाबदारी आहे* चित्र स्पष्ट झालं की प्रचाराचा नारळ फोडेल, काही सांगायचे ते माळेगावकर आणि बारामतीकरांना सांगेन. *त्यानंतर हेवे दावे गट, काहीजण एवढं उथमातपणे बोलत आहेत, घमंड करत आहेत. त्यांचं त्यांना लखलाभ.* *आता लोकसभेला असं झालं तसं झालं हे सांगत बसू नका, एका बाजूला पवार साहेब एका बाजूला मी होतो, परंतु मी जी काही राजकीय भूमिका घेतली.पण आता जरा दिलदारपणा वाढवा.* *मला निवडून द्यायला पवार साहेबच कारणीभूत आहेत ना ? मी काय वरण पडलो का. ही कसे विसरता येईल* मला खासदारकीला ४८ हजार मते कमी पडली मी मान्य केला नाही. मग विधानसभेला एक लाख मते कुठून आली झालं गेलं गंगेला मिळालं. काही गोष्टी सोडायचे असतात. करा नदीला मिळालं सोनगाव वरून चंद्रभागेला मिळालं। बारामतीचे नगराध्यक्ष धरून सर्व नगरपाशी निवडून येतील हे आपण बघुना. *आपली एवढी धमक आहे आपण जे बोलतो ते करतो. आपल्या मनगटांमध्ये ती ताकद आहे करायची, मी त्या उद्योगपतींना सांगू शकतो आता देखील मी सीएसआरचा निधी आणला आहे.* *एक नाही आणि अर्ध नाही किंवा पाव देखील नाही, घड्याळ बघायचं आणि बटन दाबायचं* *तुम्ही जेवढे मला बारामतीला निवडून द्याल तेवढी माझी जिल्ह्यात मान वाढणार आहे* जो काम करतो तो सुधारणा करणार आहे. माळेगाव ला सुद्धा एक रोल मॉडेल नगरपंचायत कशी असू शकते अशा पद्धतीने माळेगाव नगरपंचायतीचा चेहरा मोहरा राज्यात बदलायचा आहे. आता काही झाले तरी माळेगावकरांच्या कार्यकर्त्यांच्या नागरिकांच्या मदतीने आपण माळेगावला उद्याच्या पाच वर्षात रोल मॉडेल नगरपंचायत बनवायचं. कोणतेही काम करताना इच्छाशक्ती फार महत्त्वाचे असते. आपल्याला राजकारण बाजूला ठेवून एकत्र राहायचं आहे विकासाचा राजकारण करायचे आहे. कामे चांगली केली तर लोकांचे मत परिवर्तन होतं. राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या चांगल्या योजना येत आहेत. पंतप्रधान असतील नितीन गडकरी असतील अमित शहा असतील विविध प्रकार चा निधी आणेल. *मला अनेक कार्यकर्ते सांगत असतात दादा चांगला द्या.अरे मला कळत नाही का ? मी 35 वर्षे घासली ना इथे. पाक केस गेली* मी शिव शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोडणार नाही. कोणावर ही अन्याय होणार नाही महिलांचा समाजात मान ठेवला जाईल संरक्षण आणि सुरक्षितता मिळेल अशा पद्धतीने आपल्याला कामाला लागायचं आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कमी पडता कामा नये. *ही निवडणुक keval मतांची लढाई नाही ही दोन्ही शहराच्या विकासाची चाचणी आहे* राज्यात 288 ठिकाणी नगराध्यक्ष थेट निवडला जाणार आहे,रुसवे फुगवे गट तट बाजूला ठेवा. मी जो नगराध्यक्ष तो आपल्याला निवडून आणायचा आहे. *आपण जेव्हा एक दिलाने निवडणुकीला उभा राहतो तेव्हा आपल्याला कोणतीही ताकद हरवू शकत नाही, कोण माईचा लाल हरवू शकत नाही* आपणात जर कुठे गडबड झाली तर अडचण येते. *आता निवडणुकीच्या निमित्ताने अनेकजण बोलणारे येथील पण काम करणारा फक्त अजितदादा असतो* *मी काम करतोय माझं काम बोलतोय, काही लोक चुकीच्या गोष्टी करायला लागली की मी विचार करतो एवढं काम दुसरा कुठल्या तालुक्यात केलं असतं तर डोक्यांवर उचलून घेतलं.* *पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसं काही जण निवडणुकीत उगवतात, निवडणूक झाल्यावरती बाहेर दिसतात का ? कधी तुमच्या सुख दुखात आली का? याचा विचार करा* माझ्यावर टाकलेल्या विश्वास कधीही खोटा ठरवू शकणार नाही. अशा प्रकारचा शब्द या मेळाव्याच्या निमित्ताने देतो. विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत याची ग्वाही देतो.
130
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 13, 2025 16:16:280
Report
PNPratap Naik1
FollowNov 13, 2025 15:19:13161
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 13, 2025 15:18:59145
Report
UPUmesh Parab
FollowNov 13, 2025 14:20:46188
Report
JMJAVED MULANI
FollowNov 13, 2025 14:16:1997
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 13, 2025 14:09:05Junnar, Pune, Maharashtra:शिरुर लोकसभा मतदार संघात दोन राष्ट्रवादी कॉग्रेस एकत्र येणार का अशी चर्चा सुरु असताना सध्या निवडणूका या कार्यकर्त्यांच्या निवडणूका असुन कार्यकर्त्यांची मत जाणुन घेऊन लवकर निर्णय घेणार असल्याचे अमोल कोल्हेने स्पष्ट केले.
194
Report
SMSATISH MOHITE
FollowNov 13, 2025 14:01:04123
Report
SNSWATI NAIK
FollowNov 13, 2025 13:22:10105
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 13, 2025 13:17:13110
Report
ABATISH BHOIR
FollowNov 13, 2025 12:59:304
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 13, 2025 12:54:361
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 13, 2025 12:44:2139
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 13, 2025 12:05:330
Report
SMSATISH MOHITE
FollowNov 13, 2025 11:58:190
Report