Back
कल्याण डोंबिवली में लोकप्रतिनिधियों की राजवट: प्रभाग 8 की समस्याओं पर अधिकारी पर निशाना
ABATISH BHOIR
Feb 05, 2026 16:01:25
Kalyan, Maharashtra
कल्याण डोंबिवली महापालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट सुरू.
प्रभाग ८ मधील नागरी समस्यांवर काँग्रेस नगरसेविकेने प्रभाग अधिकाऱ्यांना धरले धारेवर
ANC - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत तब्बल सहा वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपुष्टात येत लोकप्रतिनिधींची राजवट सुरू झाली आहे. या सहा वर्षांच्या कालावधीत अधिकाऱ्यांच्या कारभारामुळे मोठ्या प्रमाणात नागरी समस्या निर्माण झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. अधिकाऱ्यांनी मनमानी पद्धतीने कारभार करत केवळ खाबूगिरी केल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केला होता. मात्र आता निवडून आलेले लोकप्रतिनिधी आपल्या आपल्या प्रभागात सक्रिय होताना दिसत आहेत.
अशातच काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी आपल्या प्रभाग क्रमांक ८ मधील गंभीर नागरी समस्यांवरून प्रभाग अधिकारी धनंजय थोरात यांना धारेवर धरले आहे. प्रभाग ८ हा मूलभूत सुविधांपासून पूर्णतः वंचित असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य पसरले असून, गेल्या तब्बल २५ वर्षांपासून या भागातील पाईपलाईन बदलण्यात आलेली नाही, अशी माहिती नगरसेविका कुलकर्णी यांनी दिली.
आज प्रभागातील समस्यांबाबत अधिकाऱ्यांची बैठक बोलावून सर्व प्रश्न शांततेने आणि स्पष्टपणे मांडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या समस्या वेळेत सोडवण्यात आल्या नाहीत, तर प्रभागातील सर्व कचरा उचलून थेट पालिका मुख्यालयात टाकणार, असा ठणकावून इशारा नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी प्रभाग अधिकाऱ्यांना दिला आहे.
लोकप्रतिनिधींची राजवट सुरू होताच अधिकाऱ्यांच्या कारभारावर थेट सवाल उपस्थित होऊ लागल्याने येत्या काळात नागरी प्रश्नांवर प्रशासनाला अधिक जबाबदार भूमिका घ्यावी लागणार असल्याचे संकेत या घटनेतून मिळत आहेत.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowFeb 06, 2026 03:17:210
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 06, 2026 03:16:490
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 06, 2026 02:47:420
Report
PNPratap Naik1
FollowFeb 06, 2026 02:46:470
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 06, 2026 02:46:170
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 06, 2026 02:45:350
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 06, 2026 02:45:190
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 06, 2026 02:32:320
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 06, 2026 02:32:070
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 06, 2026 02:30:460
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 06, 2026 02:30:140
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 06, 2026 02:17:530
Report
AKAMAR KANE
FollowFeb 06, 2026 02:17:260
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 06, 2026 02:16:490
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 06, 2026 02:16:140
Report