Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune411018

आकुर्डी में मोबाइल टॉवर पर भीषण आग, फायर ब्रिगेड ने आग पर काबू पाया

KPKAILAS PURI
Mar 10, 2026 03:16:26
Pimpri-Chinchwad, Maharashtra
पिंपरी चिंचवड के आकुर्डी इलाके में मोबाईल टॉवर पर भीषण आग लग गई. आग बुझाने के लिए अग्निशमन दल की तीन गाड़ियाँ घटनास्थल पर पहुंचीं और उन्होंने आग पर काबू पाया. बढ़ते तापमान के कारण टॉवर अधिक गर्म हो गया था और यही आग लगने का अनुमान लगाया गया है. सौभाग्य से इस आग में कोई जानी नुकसान नहीं हुआ. अग्निशमन दल आगे की जांच कर रहा है.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GMGANESH MOHALE
Mar 10, 2026 04:47:25
Washim, Maharashtra:वाशिम : अँकर : शिक्षणाला वयाची मर्यादा नसते, हे पुन्हा एकदा सिद्ध करत वाशिमच्या रिसोड येथील ४७ वर्षीय जमील नूर मोहम्मद यांनी तब्बल ३१ वर्षांनंतर पुन्हा परीक्षा केंद्रावर जाऊन दहावीची परीक्षा दिली. रिसोड येथील जमील नूर मोहम्मद यांनी १९९५ साली दहावीची परीक्षा दिली होती,मात्र त्यावेळी नापास झाल्यामुळे त्यांना आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागले. मात्र शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा कायम असल्याने त्यांनी पुन्हा अभ्यास सुरू केला आणि यावर्षी दहावीच्या परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला.३१ वर्षांनंतर परीक्षा केंद्रावर पोहोचताना त्यांच्यात उत्साह आणि आत्मविश्वास दिसून आला. आपल्या मुलांच्या वयाच्या विद्यार्थ्यांसोबत परीक्षा देताना त्यांनी कोणताही संकोच न बाळगता पेपर दिला. त्यांच्या या निर्णयाचे अनेकांनी कौतुक केले असून “शिकण्याला वय नसते” असा प्रेरणादायी संदेश त्यांनी समाजाला दिला आहे. बाईट:जमील नूर मोहम्मद, परीक्षार्थी
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 10, 2026 04:32:45
0
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 10, 2026 04:32:18
Nagpur, Maharashtra:शहरातील मोकाट प्राण्यांच्या प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चाललाय .. शहरातील प्राण्यांचे गोठे,मोकाट कुत्रे यामुळे नागरिक अक्षरशा जीव मुठीत घेऊन रस्त्यांवर फिरावे लागत आहे.. नागपुरात काल बेभान व आक्रमक म्हशीच्या (म्हैस) हल्ल्यात 80 वर्षीय वृद्ध लक्ष्मण कुंभारे यांच्या मृत्यू महाल परिसरात झाला... त्यानंतर नागरिकांनी मोकाट जनावरांबाबत महापालिकेने कठोर पाऊल उचलण्याची मागणी हॊतेय. दरम्यान त्या म्हशीला आठ ते दहा दिवसांपूर्वी कुत्रा चावला होता, त्यानंतर ती आक्रमक झाली होती, त्यामुळे तिला रॅबिजची लागण झाली असावी असा संशय ही स्थानिक नागरिक आणि नगरसेवकांनी व्यक्त केला आहे... --- काल सकाळी महालातील टिळक पुतळा नजिक जुना हिस्लॉप कॉलेज गल्ली , छत्रपती शिवाजी महाराज चौक, दसरा रोड या भागात आक्रमक झालेल्या म्हशीने अनेकांना जखमी केले होते... * आक्रमक झालेली म्हैस सकाळच्या वेळेस रस्त्यांवर मोकाट सैरावैरा धावत असल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती... * त्याच वेळेस महाल परिसरातील बँक ऑफ बडोदा जवळ या म्हशीने लक्ष्मण कुंभारे या ज्येष्ठ नागरिकालाही जमिनीवर पाडले .. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन लक्ष्मण कुंभारे जखमी झाले होते... काल उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय.. * त्या आक्रमक म्हशीला कुत्रा चावल्यामुळे तिला रॅबिजची लागण झाली असावी असा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे.. त्यामुळे महापालिकेने योग्य ती काळजी घ्यावी आणि कारवाई करावी अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे... * नागपूरात मोकाट वळूने वंदना देवीकर या ज्येष्ठ महिलेसह अनेकांना गंभीर जखमी केल्याच्या प्रकरणानंतर काल महाल परिसरात मोकाट आणि आक्रमक झालेल्या म्हाशीने अनेकांना जखमी करत एका वृद्धाचा जीव घेतल्याच्या घटनेनंतर महापालिकेच्या मोकाट प्राण्यांच्या संदर्भातील कामगिरीबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत....
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 10, 2026 04:31:23
Washim, Maharashtra:आरटीई अंतर्गत दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाचा हक्क देण्यात आला असला तरी प्रत्यक्षात अनेक अडचणी समोर येत आहेत. २०२६–२७ या शैक्षणिक वर्षासाठी १७ फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. आरटीई प्रवेशासाठी जिल्ह्यात आतापर्यंत १४५० ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यातील ९५ खासगी शाळांमध्ये १००७ जागा मोफत प्रवेशासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. मात्र एक किलोमीटर अंतराची अट असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक गावांमध्ये एक किलोमीटरच्या परिसरात इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळा नसल्याने ग्रामीण विद्यार्थ्यांना आरटीईच्या मोफत शिक्षणापासून वंचित राहण्याची also भीती व्यक्त केली जात आहे.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Mar 10, 2026 04:17:22
Beed, Maharashtra:ANC - बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात किरकोळ कारणावरून हॉटेल चालकाला लोखंडी रॉड व काठीने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात दोन जणांनी हल्ला केल्यानंतर आणखी काही जणांना सोबत घेऊन हॉटेलमध्ये घुसत तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. अविनाश मेहता असे मारहाण झालेल्या हॉटेल चालकाचे नाव आहे. किरकोळ वादातून राहुल भारत ईदगले, पवार आणि त्यांच्या इतर दोन साथीदारांनी मेहता यांच्यावर लोखंडी रॉड व काठीने हल्ला केला. या हल्ल्यात मेहता जखमी झाले असून परिसरातील नागरिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मारहाणीनंतर संबंधित आरोपींनी आणखी काही जणांना सोबत घेत मेहता यांच्या हॉटेलमध्ये घुसून तोडफोड केली. तसेच पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. हॉटेलमध्ये झालेला हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेप्रकरणी अविनाश मेहता यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात राहुल भारत ईदगले, पवार आणि इतर दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Mar 10, 2026 04:17:09
Chendhare, Maharashtra:स्लग - हिंदी भाषेतील फलकावर मनसेचा आक्षेप ....... फलक तातडीने बदलण्याची मागणी ...... किल्ले रायगडाकडे जाणाऱ्या मार्गावर हिंदी भाषेत मार्गदर्शक फलक ......... अँकर - किल्ले रायगडाकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या हिंदी भाषेतील फलकावर मनसेने आक्षेप घेतलाय. इथं काय भय्ये येणार आहेत काय वाचायला असा सवाल करीत हा फलक तातडीने बदलण्याची मागणी मनसेनं जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. रायगडाकडे जाणाऱ्या रस्त्यांची कामं सध्या युद्ध पातळीवर सुरू आहेत. अशावेळी ठिकठिकाणी वाहन चालकांना मार्गदर्शन करणारे फलक लावण्यात आले आहेत. मात्र ते हिंदी भाषेत असल्याने मनसेनं नाराजी व्यक्त केली आहे. सोमवारी मनसेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी रायगडावर आलेले वाहतूक सेनेचे प्रदीप वाघमारे यांनी या संदर्भात एक व्हिडिओ करून सोशल मीडियावर पोस्ट केलाय. हा फलक बदलला नाही तर जिल्हाधिकारी यांना कार्यालयात जावून जाब विचारू असा इशाराही त्यांनी दिलाय.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 10, 2026 04:16:51
Washim, Maharashtra:वाशीम: गेहूं की विक्रम आवक हुई है। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सुमारे 10 हजार क्विंटल गेहूंाची आवक झाली. कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीत गेहूंच्या दरात घसरण असतानाही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गेहूं विक्रीसाठी आणला. काल बाजार समितीत 10 हजार क्विंटल गेहूंाची आवक झाली. गेहूंाला कमाल 2 हजार 235 रुपये तर सरासरी 2 हजार 205 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत गेहूंचे दर 300 ते 400 रुपयांनी घसरल्याचे दिसून आले. चांगले दर मिळतील या अपेक्षेने शेतकरी मोठ्या संख्येने बाजार समितीत आले होते, मात्र घसरलेल्या दरामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळाले。
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 10, 2026 04:16:26
Bhandara, Maharashtra:मद्यधुंद तरुणाने स्वतःचेच घर पेटवले... आष्टी येथील खळबळजनक घटना भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही जवळील आष्टी येथे एका मद्यधुंद तरुणाने स्वतःच्या राहत्या घराला आग लावल्याची धक्कादायक घटना घडली असून, यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आष्टी येथील रहिवासी घनश्याम केवट (वय ३५) याने काल रात्री अतिप्रमाणात मद्यप्राशन केले होते. रागाच्या भरात स्वतःच्याच घराला आग लावून दिली. आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले, ज्यामुळे आसपासच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. आग इतकी भीषण होती की ती विझवणे स्थानिक रहिवाशांच्या आवाक्याबाहेर होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले आणि मोठी हानी टळली. मात्र, या आगीत घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. घराला आग लावल्यानंतर आरोपी घनश्याम केवट घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच गोबरवाही पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलीसानी आरोपीला उशिरा रात्री अटक केली आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 10, 2026 04:03:22
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 10, 2026 03:34:58
Chandrapur, Maharashtra:टायटल: चंद्रपूरात अन्नत्याग सत्याग्रहावर बसलेले राज्यातील पर्यावरणवादी कार्यकर्ते बंडू धोत्रे यांना पोलिसांनी ताब्यात घेत जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलं. अँकर: अन्नत्याग सत्याग्रहावरोर बसलेले राज्यातील पर्यावरणवादी कार्यकर्ते बंडू धोत्रे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. गेल्या पाच दिवसांपासून बंडू धोत्रे यांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग सत्याग्रह सुरू होता. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातल्या प्रस्तावित लोहारडोंगरी लोह खाणीची मान्यता रद्द करावी या प्रमुख मागणीसाठी बंडू धोत्रेंचं अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन सुरू होते. जिल्ह्यातील विविध पर्यावरण विषयक संघटना, सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांचे कार्यकर्ते या उपोषण मंडपाला भेट देत या अन्नत्याग सत्याग्रहाला आपला पाठिंबा देत होते. या आंदोलनाला वाढता पाठिंबा लक्षात घेता पोलिसांनी बंडू धोत्रे यांना वैद्यकीय कारणामुळे ताब्यात घेत हॉस्पिटलमध्ये दाखल केलं असे म्हटलं जाते. पोलिसांनी जबरदस्ती ताब्यात घेतल्या बाबत बंडू धोत्रे यांनी आपली नाराजी व्यक्त केली. माझी तब्येत ठीक असल्याचा दावा देखील बंडू धोत्रे यांनी केला.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 10, 2026 03:30:37
0
comment0
Report
Advertisement
Back to top