Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413001

सोलापुर नगरपालिका चुनाव में शहाजी बापू ने नरेटिव सेट किया; भाजपा आगे

AAABHISHEK ADEPPA
Dec 23, 2025 03:39:05
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - सांगोला नगरपरिषद निवडणुकीत शहाजी बापू नरेटिव्ह सेट करण्यात यशस्वी ठरले - मंत्री जयकुमार गोरे - बापूंनी कितीही सांगितलं तरी त्यांनी आमच्या अगोदर त्यांचे उमेदवार जाहीर केले होते - बापूंनी आम्हाला सोबत घेतलं नाही पण बापू हा नरेटीव्ह लोकांसमोर नेण्यात यशस्वी झाले - लोकांच्या भावनेसोबत जाण्यास बापू सक्सेस झाले आमची लोक सकसेस झाली नाहीत.. पण याची अडचण नाही - पण भाजपाने स्वतःचं अस्तित्व तिथं दाखवून दिलं - जो शेकापचा गड होता त्या ठिकाणी भाजपच्या कमळ चिन्हावर आम्ही मतदान घेतलं - ही सुरुवात आहे... भाजपने सुरुवात खूप शून्यातून केली होती... - देशामध्ये आणि 23 राज्यांमध्ये सत्ता होत असताना अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये लढण्याची आम्हाला सवय आहे... आम्ही लढू जयकुमार गोरे ( सोलापूर पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री )
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VBVAIBHAV BALKUNDE
Dec 23, 2025 04:31:35
Latur, Maharashtra:अहमदपूरमध्ये पूर्ववैमनस्यातून तरुणाची निर्घृण हत्या….. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर शहरात पूर्ववैमनस्यातून एका 26 वर्षीय तरुणाची चाकू आणि काठीने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मागील वादाची कुरापत काढत सहा जणांनी संगनमत करून अमिर बागवान आणि शोएब बागवान या दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला केला. आरोपींनी जीवे मारण्याच्या उद्देशाने चाकू आणि काठीने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने शोएब बागवान याचा जागीच मृत्यू झाला, तर उमेर हा गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन आरोपी जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल असून, चार आरोपी फरार आहेत. फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत……
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 23, 2025 04:19:38
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Dec 23, 2025 04:19:22
Parbhani, Maharashtra:अँकर - परभणी महापालिकेत आज पासून नामनिर्देश अर्ज दाखल करता येणार आहे,30 डिसेंबर ही अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असणार आहे. प्रमुख पक्षांच्या अद्याप पर्यंत ईच्छूकांच्या मुलाखतीच संपत नसल्याने आज अपक्षांचेच उमेदवारी अर्ज येण्याची शक्यता आहे, परभणी महापालिकेत 65 नगर सेवक पदासाठी निवडणूक पार पडणार असून सत्ताधारी काँग्रेसने ही निवडणूक स्वबळावर लढविणार असल्याचे अगोदरच स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच वरिष्ठांच्या आदेशाकडे लक्ष आहे, पण भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची महापालिका निवडणुकीत युती होईल असे संकेत या दोन्ही पक्षाकडून मिळत आहेत. आमदार गुट्टे यांच्या यशवंत सेनेला नगर पालिकेत चांगलं यश मिळालं असून तीच यशवंत सेना परभणी मनपा सुद्धा लढविणार असल्याने यावेळीच्या निवडणुका रंगतदार होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे..
0
comment0
Report
HPHARSHAD PATIL
Dec 23, 2025 04:19:03
Palghar, Maharashtra:पालघर जिल्ह्यातील वाडा नगरपंचायत निवडणूक निकालानंतर भाजप नगरसेवक तेजेश पाटील यांच्या मिरवणुकीदरम्यान सीएनजी गाडी समोर फटाके वाजविण्यास विरोध करणाऱ्या दोन महिलांना भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत तीन महिला जखमी झाल्या असून त्याच्यावर सध्या वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी नवाज निर्वाचित नगरसेवक तेजस पाटील यांच्यासह सहा जणांविरोधात वाडा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला आहे. मात्र अजूनही मोकाट आरोपीना अटक झालेली नाही. त्यामुळे आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी जखमी महिला आणि त्याचे नातेवाईक करीत आहेत.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 23, 2025 04:06:32
Washim, Maharashtra:अँकर:वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील गोवर्धन गाव हे आई जगदंबा रेणुका मातेच्या जागृत ठाण्यासाठी प्रसिद्ध आहे.पौराणिक कथेनुसार आई जगदंबेने दैत्यांचा संहार केला, त्या विजयाचे जागृत प्रतीकात्मक स्वरूप म्हणून येथे दैत्याच्या सोंगाची परंपरा गेल्या १५० वर्षांपासून अखंडपणे गोवर्धन या गावात जोपासली जात आहे.या परंपरेत आई जगदंबा व दैत्याच्या प्रतिरूपात्मक भूमिकेचे सादरीकरण करण्यात येते, ज्याला स्थानिक भाषेत ‘सोंग’ असे म्हटले जाते. दरवर्षी या निमित्ताने दोन दिवस भव्य मिरवणूक काढण्यात येते.मिरवणुकीच्या पहिल्या दिवशी आई रेणुका मातेचे,तर दुसऱ्या दिवशी आई कालिंका मातेचे सोंग स्वरूपात दर्शन घडते. या धार्मिक व सांस्कृतिक परंपरेदरम्यान गावात लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांमध्ये उत्साह, श्रद्धा व आनंदाचे वातावरण निर्माण होते.गावकरी मोठ्या भक्तिभावाने या मिरवणुकीत सहभागी होतात.दैत्याच्या सोंगातून असत्यावर सत्याचा, अन्यायावर न्यायाचा विजय दर्शविला जातो, अशी श्रद्धा ग्रामस्थांमध्ये आहे.गोवर्धन गावातील ही सोंगाची परंपरा केवळ धार्मिक नव्हे तर लोककलेचा, लोकसंस्कृतीचा आणि सामाजिक ऐक्याचा जिवंत वारसा म्हणून आजही टिकून आहे.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Dec 23, 2025 04:05:52
Amravati, Maharashtra:श्री. शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने एक हजार दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव वाटप; अवयवाचे माप देताच अवघ्या तीन दिवसात मिळतात अवयव भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या jयंतीनिमित्त संस्थेचा स्तुत्य उपक्रम यामध्ये जयपुर फूटचे वाटप करण्यात येणार असून अवयवाचे माप घेतल्यानंतर केवळ तीन दिवसातच दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव मिळत आहे. त्यामुळे दिव्यांग बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे. हे अवयव मिळवण्यासाठी मध्य प्रदेश, तेलंगणा आणि राज्यातील इतरही कानाकोपऱ्यातून दिव्यांग बांधव अमरावती मध्ये दाखल होत आहे. आतापर्यंत 850 दिव्यांग बांधवांनी नोंद केली असून 400 पेक्षा अधिक दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयवांचे वाटप करण्यात आले आहे. दर्यापूरच्या एका व्यक्तीचा शेतात काम करताना थ्रेशर मध्ये हात कटून अपघात झाला होता. तेव्हापासून या व्यक्तीला हात नव्हता मात्र या उपक्रमाची त्यांना माहिती मिळतात त्यांनी पीडीएमसी रुग्णालयाशी संबंध सादर üç दिवसात कृत्रिम हात मिळवला आहे. त्यामुळे सात ते आठ वर्षानंतर पहिल्यांदा दुसऱ्या हाताची अनुभूती हा दिव्यांग बांधव घेताना दिसत आहे.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 23, 2025 04:02:01
Manchar, Maharashtra:ईव्हीएम यंत्रणेबाबत वेळोवेळी शंका उपस्थित केल्या जात असतात. काही काळापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतांची चोरी होत असल्याचा मुद्दा राष्ट्रीय पातळीवर उपस्थित केला होता. मात्र नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये अशा स्वरूपाचे आरोप फारसे समोर आले नव्हते. अशातच उत्तर पुणे जिल्ह्यातील मंचर नगरपंचायतीच्या निवडणुकीत एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. आम आदमी पार्टीचे उमेदवार सलीम बशीर इनामदार यांना केवळ एकच मत मिळाल्याने त्यांनी निवडणूक प्रक्रियेबाबत शंका उपस्थित केली आहे. या प्रकरणी आता त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याची तयारी दर्शवली आहे.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 23, 2025 03:52:01
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यात सावकाराच्या जाचाला कंटाळून किडनी विकल्याप्रकरणी डॉक्टर कृष्णा उर्फ रामकृष्ण सुंचू (36) याला सोलापुरातून अटक झाले आहे. किडनी विक्री प्रकरणात पीडित शेतकरी रोशन कुडे याने फेसबुकच्या माध्यमातून किडनी विकण्यासाठी माहिती मिळवल्याची आणि त्यानंतर चेन्नई येथील डॉक्टर कृष्णा याने त्याला कंबोडिया येथे पाठवून किडनी काढल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी डॉक्टर कृष्णा याचा शोध घेतला असता डॉक्टर कृष्णा हे त्याचं बनावट नाव असल्याची आणि रामकृष्ण सुंचू हे त्याचं मूळ नाव असल्याची माहिती आली पुढे आलो होती. गरजू लोकांना हेरून तो किडनी विकण्यासाठी त्यांना कंबोडियाला नेत होता. रामकृष्ण सुंचू याच्या अटकेने आता या प्रकरणातील अवयव तस्करीच्या प्रकरणाचा खुलासा होण्याची शक्यता आहे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 23, 2025 03:48:58
Kolhapur, Maharashtra:ग्रोबझ शेअर ट्रेडिंग कंपनीवर गुन्हा दाखल होताच आरोपींच्या बँक खात्यावरील कोट्यावधी रुपये आणि एक किलो सोने कोल्हापूर पोलिसांनी जप्त केले नाही ? फॉरेन्सिक ऑडिट करायला का विलंब झाला ? असे अनेक प्रश्न उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने कोल्हापूर पोलिसांना फटकारले आहे. इतकच नव्हे तर सर्किट बेंचचे न्यायमूर्ती शिवकुमार डीगे यांनी तात्कालीन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनाही तपासा संदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश दिला आहे.. तात्कालीन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यानंतर दुसरे तात्कालीन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनाही या गुन्ह्याप्रकरणी सर्किट बेंच मध्ये ऑनलाइन उपस्थित राहून आपली बाजू मांडावी लागली. त्यामुळे ग्रोबझ शेअर ट्रेडिंग कंपनीच्या तपासाबद्दल कोर्टाने कोल्हापूर पोलिसांना चांगले धारेवर धरले आहे.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Dec 23, 2025 03:48:50
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Dec 23, 2025 03:48:37
Parbhani, Maharashtra:अँकर- परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील जी सेवन शुगर्स आणि अमडापूर येथील नृसिंहलक्ष्मी हे दोन साखर कारखाने शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य भाव देत नसल्याचा आरोप करीत परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मागील काही दिवसांपासून साखर कारखान्या विरोधात आंदोलन सुरू केलय. उसाला पहिली उचल किमान 3 हजार रुपयांची द्यावी आणि चार हजार रुपये प्रति मेट्रिक टन असा अंतिम भाव द्यावा या मागणीसाठी गंगाखेड येथील जी 7 साखर कारखाण्यावर शेतकऱ्यांनी संत जनाबाईच्या मंदिरातून साखर कारखान्यापर्यंत भजन दिंडी काढली होती. दिंडी जी सेवन साखर पोहोचून तीन तास उलटल्यानंतर ही साखर कारखाना प्रशासनाकडून कुणीच शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी येत नसल्याने यावेळी शेतकरी आक्रमक झाले होते,कारखान्याचत शिरण्याच्या विचारात असल्याने शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात नेऊन शेतकर्यांची सुटका केली,
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 23, 2025 03:39:15
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने महायुती नंतर आता महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून दावा प्रती दावा केला जात असला आहे.. शिवसेना ठाकरे गटानंतर आत्ता शरद पवार राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रत्येक प्रभागात किमान एक याप्रमाणे 21 जागा मिळाल्याच पाहिजेत अशी आक्रमक मागणी केली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेत महाविकास आघाडीचे नेतृत्व काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील करत आहेत. महाविकास आघाडी मध्ये सध्या जागा वाटपाची बोलणी सुरू असून काँग्रेस समोर जागावाटपमध्ये ठाकरे शिवसेना आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाला किती जागा द्यायच्या हे डोकेदुखी ठरले आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top