Back
संभाजी नगर में कांग्रेस का वंचित से गठबंधन, उद्धव ठाकरे की शिवसेना एकाकी?
VKVISHAL KAROLE
Dec 19, 2025 08:47:10
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
महाविकास आघाडीत कुठला पक्ष कोणासोबत राहणार हे स्पष्ट होत नाहीये त्यातच छत्रपती संभाजी नगर मध्ये काँग्रेसने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फाट्यावर मारत थेट वंचित सोबत मोट बांधण्याची तयारी सुरू केली आहे 29 प्रभागांपैकी 23 प्रभागांमध्ये त्यांचं जवळपास निश्चित झाल्याची माहिती काँग्रेस शहराध्यक्ष देत आहे त्यामुळे इथं महाविकास आघाडीत फूट पडल्याची चर्चा सुरुय... छत्रपती संभाजी नगरात महाविकास आघाडीत फूट ? काँग्रेसचे वंचित सोबत युती करण्याचे निश्चित.. संभाजी नगरात उद्धव ठाकरेंची शिवसेना एकाकी ? छत्रपती संभाजीनगर मध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडीतील मोठा घटक पक्ष असूनही एकाकी पडत असल्याचे चित्र दिसतंय, आतापर्यंत या पक्षातील सर्वच नेते महाविकास आघाडी एकत्र लढणार सांगत होते, मात्र त्यात काँग्रेसनं आता वंचित बहुजन आघाडी सोबत जाण्याची तयारी पूर्ण केली आहे.. 29 प्रभागांपैकी 23 प्रभागात त्यांची युतीची बोलणी, जागावाटप पूर्ण झाल्याची माहिती स्वतः काँग्रेस शहर अध्यक्ष देत आहे तर शिवसेना आणि राष्ट्रवादी सोबत बोलणे सुरू आहे मात्र वंचित सोबत जवळपास अंतिम झाल्याचं ते सांगताय, यावरून काँग्रेस ने या सर्वानाच फाट्यावर मारल्याचे चित्र आहे... छत्रपती संभाजी नगरात महाविकास आघाडीत फूट ? उद्धव ठाकरे शिवसेनेच्या पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी यावरून काँग्रेसला डिवचले आहे, जाताय तर उत्तम आहे सोबत राहूनही उपयोग नव्हता किमान आमच्यावर काँग्रेस सोबत जाणारे पक्ष म्हणून जे टीका करत होते त्यांचं तोंड बंद होईल आणि आमची पारंपारिक मत आम्हाला मिळतील, नुकसान होणार नाही असं खैरे यांचं म्हणणं आहे... पालकमंत्री संजय शिरसाट यांनीही यावरून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला टोला लागवलाय, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तुम्हाला सोडून देणार, गरज सरो वैद्य मरो अशी त्यांची भूमिका आहे , तुम्हाला दारोदार भटकल्याशिवाय पर्याय राहणार नाही असा टोला त्यांनी लावलाय.. या आधीही छत्रपती संभाजी नगरात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत चर्चा झाली आहे, त्यात काँग्रेसही आता वंचित सोबत जाते त्यामुळे शिवसेनेला इथे एकटाच लढावं लागेल असे चित्र दिसतंय.. शिवसेनेच्या दाव्यानुसार या शहरात त्यांची ताकद आहे असं ते सांगत असले तरी भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेचा मोठा आव्हान त्यांना आहे आणि सोबत मित्र पक्षही नाही त्यामुळं एकेकाळी गड असणाऱ्या संभाजी नगरात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची मात्र चांगलीच अग्निपरीक्षा होणार आहे... विशाल करोळे, छत्रपती संभाजी नगर...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
TTTUSHAR TAPASE
FollowDec 19, 2025 10:39:190
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 19, 2025 10:36:310
Report
PNPratap Naik1
FollowDec 19, 2025 09:48:060
Report
YKYOGESH KHARE
FollowDec 19, 2025 09:47:150
Report
AKAMAR KANE
FollowDec 19, 2025 09:46:490
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 19, 2025 09:46:400
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 19, 2025 09:21:540
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 19, 2025 09:19:350
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowDec 19, 2025 09:05:390
Report
PNPratap Naik1
FollowDec 19, 2025 09:00:480
Report
ABATISH BHOIR
FollowDec 19, 2025 08:47:580
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowDec 19, 2025 08:47:320
Report
PPPRANAV POLEKAR
FollowDec 19, 2025 08:35:010
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 19, 2025 08:23:320
Report