Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413304

रतनबाई देशमुख ने शेतकरी-कामगार पक्ष छोड़ने वालों को कड़ा जवाब दिया, भाजपा से भिड़ने की चेतावनी

SKSACHIN KASABE
Oct 08, 2025 08:35:37
Pandharpur, Maharashtra
दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या पत्नी रतनबाई देशमुख यांनी शेतकरी कामगार पक्ष सोडणाऱ्यांना कडक शब्दात फटकारले, आम्ही कशालाही टक्कर द्यायला तयार आहे. सांगोला तालुक्यात भाजप कडून शेकापला सुरुंग लावण्यास सुरुवात झाली आहे. शेतकरी कामगार पक्षातील काही ठेकदार असलेल्या मंडळींनी सत्ता असताना पक्षाचा फायदा घेऊन आपला स्वार्थ साधला आता हीच मंडळी पक्ष सोडून चालली आहेत. अशा मंडळींनी स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे नाव ही घेऊ नये आणि त्यांचा फोटो सुद्धा वापरू नये. जी परिस्थिती येईल त्याला टक्कर द्यायला आम्ही तयार आहे. असा इशारा देऊन कडक शब्दात रतनबाई देशमुख यांनी फटकारले आहे.
3
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
LBLAILESH BARGAJE
Oct 08, 2025 10:46:24
Pune, Maharashtra:वांडजारी समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाला प्रस्ताव पाठवावा या मागणीसाठी वाडगाव थाटे येथे तीन युवकांचे मागील आठ दिवसांपासून उपोषण सुरू आहे...या आंदोलनाकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केलाय...त्यामुळे संतप्त झालेल्या वाडगाव आणि थाटे या दोन्ही गावातील सर्व ग्रामस्थ एक दिवसाचे अन्न त्याग आंदोलन करणार आहे...तर 10 तारखेला सर्व ग्रामस्थ जलसमाधी आंदोलन करणार आहेत...तर येत्या रविवारी राज्यभर चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे असे ठराव आज आंदोलनस्थळी घेण्यात आलेत...आज वाडगाव थाटे येथे वंजारी समाजाची बैठक झाली त्यात हे आंदोलन टप्प्याटप्प्याने कसे पुढे न्यायचे याबाबत निर्णय झाले...दरम्यान यावेळी उपस्थित ओबीसी नेत्यांनी राज्यातील सर्व वंजारी समाजाच्या आमदारांना आवाहन करण्यात आले की, या आंदोलनाला पाठींबा द्यावा अन्यथा सर्व वंजारी समाजाच्या आमदारांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा अन्यथा वंजारी समाज असा आमदारांचाही निषेध केला जाईल असा इशारा देण्यात आलाय. बाईट:- बाळासाहेब सानप, ओबीसी नेते
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Oct 08, 2025 10:34:06
Pune, Maharashtra:Headline : वडगाव नगरपंचायत निवडणूक आरक्षण सोडतीचा निकाल जाहीर १७ प्रभागांसाठी आरक्षण निश्चित महिला उमेदवारांसाठी मोठी संधी वडगाव मावळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत जाहीर झाली असून, यंदा हे पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव ठरलं आहे. या निर्णयानंतर शहराच्या राजकारणात नव्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विविध पक्षांच्या महिला नेत्यांनी तयारीला वेग दिला आहे, तर सर्व वॉर्डचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुकांनी आपापल्या प्रभागात गणितं मांडायला सुरुवात केली आहे. दरम्यान, भाजप अजूनही वेट अँड वॉचच्या भूमिकेत असून, स्थानिक पातळीवर महायुतीचं समीकरण जुळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आरक्षण सोडतीनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून, नगराध्यक्षपद कोणत्या महिला नेत्या कडे जाणार, याची चर्चा वडगाव शहरात रंगली आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Oct 08, 2025 10:33:29
Nagpur, Maharashtra:नागपूर झुंड चित्रपटात काम केलेला,झुंड फेम बाबू छत्रीचा खुन झालाय नागपूरच्या जरीपटका भागात बाबू छत्रीचा त्याचाच मित्र ध्रुव साहू याने खुन केला.. मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांशू क्षत्रिय उर्फ बाबू छत्री आणि ध्रुव साहू यांच्यात दारूच्या नशेत वाद झाला होता. एका निर्माणाधीन इमारतीला लागून पडीक घर आहे. तिथेच बाबू आणि त्याचे नशेडी मित्र नेहमी नशा करत. रात्री दोनच्या sुमारास बाबू छत्री आणि त्याचा मित्र ध्रुव साहू यांच्यात मद्यप्राशनानंतर वादावादी झाली. याच वादातून ध्रुवने चाकूने बाबूवर वार केले आणि डोक्यात दगड घातला... यामध्ये बाबू छत्रीचा मृत्यू झाला... बाबू छत्रीच्या नावावर अनेक गुन्हे दाखल आहेत.. नागराज मंजुळे दिग्दर्शित अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला झुंड चित्रपटात प्रियांशी क्षत्रिय हा बाबू नावाचे पात्र साकारले होते
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Oct 08, 2025 10:06:06
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 08, 2025 10:04:49
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर में चिखलठाणा परिसरात गोरक्षकांनी जालना संभाजीनगर महामार्गावर रस्ता रोको केला, संभाजी नगरात गौरक्षकावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेधार्थ बगोरक्षकांनी रास्ता रोको केला आणि गोरक्षकावर भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध केला, काल चिकलठाणा परिसरात 20 ते 25 जणांच्या जमावांकडून गोरक्षकावर भ्याड हल्ला झाला होता, त्यात गोरक्षक गंभीर जखमी झाला होता, दरम्यान हल्ला करणाऱ्यांपैकी चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे... संपूर्ण घटनेचा तपास सुरू असून योग्य ते कारवाई करू असं पोलीस उपयुक्त प्रशांत स्वामी यांनी सांगितले... बाईट: पोलीस उप आयुक्त प्रशांत स्वामी
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Oct 08, 2025 10:04:26
Thane, Maharashtra:शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफी व नुकसान भरपाई शिवसेनेचा मोर्चा....शेकडो शिवसैनिक मोर्चात सहभागी... ॲंकर... संपूर्ण राज्यात गेली महिनाभरापासून अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या शेतीचे अ अतोनात नुकसान झाले. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी व नुकसान भरपाई मंजूर करावी या संदर्भात राज्यात माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे व शिवसेना सचिव विनायक राऊत यांच्या संकल्पनेतून शिवसेनाच्या वतीने मोर्चे काढण्यात आले. याच पार्श्वभूमीवर भिवंडीती देखील शिवसेनेच्या वतीने मोर्चा प्रांत व तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढत निवेदन सादर करण्यात आले. यावेळी शेकडो पदाधिकारी व शिवसैनिक सहभागी झाले होते. निवेदनात शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफी करा, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई हेक्टरी ५० हजार रुपये द्या, शेतकऱ्यांची वाहून गेलेली घर पुन्हा बांधून द्या व शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करा. अशा आशियाचे निवेदन माननीय प्रांत व तहसीलदार साहेब यांना देण्यात आले.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Oct 08, 2025 10:03:14
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यातील शिरपूर पोलीस ठाण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या सराईत आरोपीने पोलीस ठाण्यातूनच पलायन केल्याची घटना समोर आली आहे. आरोपीला रात्रीच्या वेळी लघुशंकेसाठी जाण्याची गरज असल्याचे सांगून त्याने पोलिसांची दिशाभूल केली. त्या वेळी संधी साधून त्याने पोलिस कर्मचाऱ्याच्या हाताला हिसकाव मारत पळ काढला. या प्रकारानंतर पोलीस ठाण्यात तसेच संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली आहे. घटनेनंतर तात्काळ नाकाबंदी करण्यात आली असून,विविध पोलीस पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना झाली आहेत. पोलिस आरोपीचा शोध घेण्यासाठी तपास आणि शोधमोहीम राबवत आहेत. या घटनेमुळे पोलिसांच्या सुरक्षेवर आणि दक्षतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Oct 08, 2025 10:02:23
Kolhapur, Maharashtra:Kolhapur जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाने दूध उत्पादकांना देशातील सर्वाधिक 136 कोटी रुपयांचा फरक दिल्याचा दावा केलाय. पण दुसरीकडे दूध संकलन संस्थांच्या खात्यामधून कर्ज रोखेच्या स्वरूपात 40% अधिक रक्कम कापून घेतली असल्याचा आरोप जिल्ह्यातील दूध संस्था आणि काही दूध उत्पादकानी केलाय.. मागील वर्षी प्रतिलिटर 25 पैसे इतकी रक्कम कर्ज रोखेच्या स्वरूपात गोकुळ दूध संघाने कपात केली होती, पण यावर्षी मात्र प्रति लिटर 1 रुपये 25 पैसे रक्कम कपात केल्याच दूध संस्थेचे म्हणणं आहे... यामुळे गोकुळ दूध संघाशी संलग्न असणाऱ्या संस्था आक्रमक झाले असून 10 तारखेपर्यंत दूध संघाने कर्ज रोखेच्या स्वरूपात कपात केलेली रक्कम तातडीने दिली नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. एकीकडे गोकुळचे नेते गोकुळचे आर्थिक स्थिती भक्कम असल्याचा दावा करत आहेत, मग दुसरीकडे कर्ज रोखेच्या स्वरूपात दूध संस्थांचे पैसे काढून का घेतले असा सवाल दूध संस्थानी उपस्थित केलाय. तर काही दूध उत्पादकांनी कर्ज रोखेच्या स्वरूपात कपात केलेली रक्कम परत दिली नाही तर दूध रोखण्याचा इशारा दिला आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 08, 2025 10:01:40
Akola, Maharashtra:अतिवृष्टीमुळे शेत आणि घरसंसार उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी होत असतानाही सरकारकडून केवळ फसव्या घोषणा आणि आकड्यांचा खेळ सुरू असल्याचा आरोप करत आज अकोल्यात शिवसेना ( UBT ) तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हंबरडा आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाचं नेतृत्व शिवसेनेचे उपनेते व आमदार नितीन देशमुख यांनी केलं. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं असून, शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी ठाकरे गट आक्रमक झाल्याचं यावेळी दिसून आलं. ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीची मदत, कर्जमाफी आणि पीकविमा रकमेचा त्वरित तडजोडीचा निधी देण्यात यावा, अशी प्रमुख मागणी आंदोलनादरम्यान करण्यात आली. यावेळी शिवसैनिकांनी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. आंदोलनानंतर आमदार देशमुख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Oct 08, 2025 10:01:20
Satara, Maharashtra:सातारा - कोरेगाव तालुक्यातील करंजखोप येथे ग्रामस्थांनी शिक्षकांच्या निष्काळजीपणाविरोधात शारदाबाई गोविंदराव पवार ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स या शाळेला टाळे ठोकले.ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, शिक्षक वेळेवर शाळेत येत नाहीत, काही वेळा अनुपस्थितही राहतात, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही शिक्षण प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही, असा आरोप ग्रामस्थानी केला है.घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थ आणि पालकांनी शिक्षण अधिकाऱ्यांविरोधात घोषणाबाजी केली.घटनेची माहिती मिळताच सहाय्यक विभागीय अधिकारी विनोद दाभाडे शाळेत दाखल होऊन परिस्थितीचा आढावा घेतला.ग्रामस्थांनी इशारा दिला आहे की, शिक्षकांचा कारभार सुधारला नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल.
0
comment0
Report
Advertisement
Back to top