Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413001

अक्कलकोट में अतिवृष्टि से किसान परेशान, 106 करोड़ राहत पैकेज की मंजूरी

AAABHISHEK ADEPPA
Oct 23, 2025 04:38:50
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - अक्कलकोट तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा होण्यास सुरुवात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी सर्वात चांगले पॅकेज जाहीर केले असून अक्कलकोट मतदारसंघाला 106 कोटींच्या मदतीचा प्रस्ताव दिला. शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अक्कलकोट तालुक्यात पंचनामे करताना अडचणींमुळे माहिती भरण्यासाठी वेळ लागला. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात अतिवृष्टीमुळे ऑगस्ट ते सप्टेंबर या दोन महिन्यात 99 हजार 800 शेतकऱ्यांची एक लाख 12 हजार 750 हेक्टर शेती बाधित झाली आहे. 1469 घरात पाणी घुसले होते तर 2473 घरांची पडझड झाली आहे. पहिल्या टप्प्यात 61 हजार शेतकऱ्यांची यादी अपलोड झाली असून मदत मिळण्यास सुरुवात झाली आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GMGANESH MOHALE
Oct 23, 2025 08:45:42
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यात जून ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे वाशिम जिल्ह्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. महापुराने अनेक शेतजमिनी वाहून गेल्या, तर फळबागाही जमीनदोस्त झाल्या. या अतिवृष्टी चा मोठा फटका रिसोड तालुक्यातील नेतन्सा येथील शेतकरी धनंजय बाजड यांना बसला. त्यांच्या संत्रा बागेतील झाडे मुळासकट कोसळल्याने उत्पन्नाची शाश्वती उरली नाही. त्यामुळे बाजड यांनी तीन एकरवरील साडेतीनशे ते चारशे संत्र्याची झाडे जेसीबीच्या सहाय्याने उखडून टाकली. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, महसूल विभागाने पंचनामा करून अहवाल प्रशासनाकडे सादर केला आहे. मात्र मदत किती आणि कधी मिळणार याबाबत अनिश्चितता कायम असल्याने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 23, 2025 08:45:19
0
comment0
Report
AKAMAR KANE
Oct 23, 2025 08:04:16
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Oct 23, 2025 07:50:17
Baramati, Maharashtra:इंदापुर में कृषिमंत्री दत्तात्रय भरणे के अनुसार सितंबर के अंत के सप्ताह में 60 से 65 प्रतिशत वर्षा दर्ज़ हुई। नुकसान भरपाई के पंचनामे करने में देरी स्वीकार्य है, पर व्यवस्थागत कमी किसी जगह दिखी नहीं। एनडीआरएफ के नियम दो हेक्टेयर के थे, उसे तीन हेक्टेयर माना जाएगा, इसलिए दूसरे पंचनामे करने होंगे और आवश्यक जानकारी संकलन युद्ध-स्तर पर जारी है। लगभग 8,400 करोड़ रुपये के आसपास सहायता के ग्रन्ट/जीआर निकलने वाले हैं। बाकी राशि जल्द से जल्द दी जाएगी। केंद्र सरकार को नुकसान भरपाई की सटीक जानकारी देनी होगी इसलिए देरी हो रही है। मुख्यमंत्री और दोनों उपमुख्यमंत्रियों की नजर इस पर है। Shेतकरी कठिनाइयों के बीच कर्जमाफी के विषय पर राज्य के मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री उचित समय पर निर्णय लेंगे। हवामान विभाग का बारिश का संकेत बताता है कि एक ही दिन में साल की औसत वर्षा जैसी जलवर्ती स्थिति बन रही है, जिससे नदी-नाले उफान मार रहे हैं और नुकसान हो रहा है; यह जलवायु परिवर्तन का प्रभाव माना जा रहा है। भविष्य के लिए शेतकऱ्यां की सुरक्षा के लिए योजनाओं की योजना बनानी होगी ताकि पिक नुकसान कम हो सके। आरक्षण के बारे में राजनीति جاري है पर कानूनन जो सही है वही निर्णय लिया जाएगा, मुख्यमंत्री और अन्य रन्नीतिक पक्ष समन्वय से आगे बढ़ेंगे। 2029 तक मुख्यमंत्री पद पर रहने की राजनीतिक बात भी चर्चा में है। स्थानीय स्वराज्य संस्था और महायुती के बारे में चर्चा जारी है—जिल्हा परिषद व पंचायत समिती के चुनावों में महायुती एक साथ लड़ेगी, भिन्न-भिन्न जगहों पर पार्टी-केंद्रित लड़ाई संभव पर महायुती के पक्ष में एकजुटता बनी रहेगी।Indapoor जिल्हा परिषद व पंचायत समिती के लिए महायुती की भूमिका स्पष्ट रूप से तय नहीं है, पर चुनाव महायुती के रूप में ही लड़े जाएंगे, अंततः मुख्यमंत्री के आदेश एवं निर्णय के अनुसार सभी मानेंगे।
0
comment0
Report
PNPratap Naik1
Oct 23, 2025 07:32:38
Kolhapur, Maharashtra:ऐन दिवाळीच्या मध्यरात्री कोल्हापूर जिल्ह्यातील इंगळी मध्ये भानामतीचा प्रकार समोर आला आहे. गावाच्या प्रवेशद्वारावर गावातील काही तरुणांनी एकत्र येत हा भानामतीचा प्रकार केल्याचे CCTV मधून समोर आले आहे. या प्रकाराने हातकणंगले तालुक्यातील इंगळीतील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. गेल्या अनेक दिवसापासून हुपरी परिसरामध्ये असलेल्या तळंदगे, पट्टणकोडोली, यळगुळ, रेंदाळ गावात अघोरी भानामतीचा प्रकार वाढताना दिसत होता, त्यात ऐन दिवाळीत इंगळी गावच्या स्वागत कमानीखाली गावातील तरुण येत हा अघोरी भानामतीचा प्रकार केल्याचे समोर आले. रस्त्याच्या मधोमध केळाचे झाड, केळ, लिंबु, लाल भात आणि प्राण्याच काळिज असे साहित्य ठेवून भानामतीचा प्रकार करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी काही तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Oct 23, 2025 07:19:47
Kalyan, Maharashtra:कल्याणमध्ये ‘लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असा मार्गफलक लावला! नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काही दिवसांपूर्वी उद्घाटन झालं. मात्र विमानतळाचं नामकरण स्वर्गीय लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाने करावं, ही मागणी अद्यापही प्रलंबित आहे.या मागणीसाठी स्थानिक भूमिपुत्र आणि आगरी समाजाच्या संघटना विविध पद्धतीने आंदोलन करत आहेत.याच आंदोलनाचा भाग म्हणून आता कल्याणमधील तिसगाव परिसरात “लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई – 36 KM FROM TISGAON” असा फलक लावण्यात आला आहे.या फलकावर “सौजन्य: श्री तिसाई ग्रामस्थ मंडळ व नियोजन समिती, तिसगाव” अशी नोंद देखील आहे. या मार्गदर्शक फलकामुळे केवळ विमानतळाचं अंतरच नाही, तर स्थानिकांचा भूमिपुत्र दि. बा. पाटील यांच्या नावाचा सन्मान मिळावा हा भावही प्रकट होत आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा मात्रे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने यापूर्वी या विषयावर बैठक घेतली होती.त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडून हिरवा कंदील मिळाल्याचं सांगत प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल, असं आश्वासन दिलं होतं.मात्र त्या आश्वासानानंतरही स्थानिक भूमिपुत्रांकडून विविध पद्धतीने आंदोलन सुरूच आहे.कल्याणमध्ये लावण्यात आलेले हे फलक आता चर्चेचा विषय ठरले आहेत.या सूचनाफलकांच्या माध्यमातून जनतेचा आवाज आणि भूमिपुत्रांची भूमिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
4
comment0
Report
AAASHISH AMBADE
Oct 23, 2025 07:19:28
Chandrapur, Maharashtra:ताडोबाच्या पक्षी वैभवात नवी भर, वन्यजीव अभ्यासक आणि वनाधिकारी रुंदन कातकर यांनी शोधला युरोपियन नीलपंख पक्षी, कोळसा कुरण क्षेत्रात पहिल्यांदाच आढळला हा पक्षी, युरोपियन रोलर या नावानेही ओळखल्या जाणा-या पक्षाचा शीतकाळात असतो प्रवास, मात्र हा दुर्लभ सुंदर पक्षी ताडोबात प्रथमच आढळल्याने वन्यजीव वैविध्यतेत भर अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पक्षी वैभवात नवी भर पडली आहे. वन्यजीव अभ्यासक आणि ताडोबातील कोळसा क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी रुन्दन कातकर यांनी युरोपियन नीलपंख पक्षी शोधून काढला आहे. कोळसा कुरण क्षेत्रात हा पक्षी पहिल्यांदाच आढळला असून युरोपियन रोलर या नावानेही ओळखल्या जाणाऱ्या या पक्षाचा शीतकाळात प्रवास असतो. हा दुर्लभ- सुंदर पक्षी ताडोबात प्रथमच आढळल्याने वन्यजीव वैविध्यतेत भर पडली आहे. युरोप, पश्चिम आशिया आणि आफ्रिकेत आढळणारा हा पक्षी भारतात येत नाही. म्हणूनच ही घटना उत्साहवर्धक ठरली आहे. सुमारे 29 ते 32 cm लांब असलेला हा पक्षी निलवर्णी आभा लेवून असतो. त्याचे भक्षक, छोटे- मोठे कीटक ,पाली असून युरोपियन रोलरच्या शोधाने ताडोबातील समृद्ध वने, वन्यजीव वैविध्य व नैसर्गिक अधिवास महत्व देखील प्रामुख्याने पुढे आले आहे.
2
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Oct 23, 2025 07:00:43
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज.... लातूर जिल्ह्यात मध्यरात्रीच्या सुमारास दोन भीषण आगीच्या घटना घडल्या आहेत... पहिली घटना औसा तालुक्यातील चलबुर्गा पाटीजवळ घडली, जिथं 108 क्रमांकाच्या अॅम्बुलन्सला अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागली... काही क्षणांतच संपूर्ण अॅम्बुलन्स जळून खाक झाली आहे. अॅम्बुलन्समध्ये ठेवलेल्या ऑक्सिजनच्या टाकीचा स्फोट झाल्याचीही माहिती समोर आली आहे. दरम्यान, मध्यरात्रीच दुसरी घटना उदगीर तालुक्यातील धोडहिप्परगा येथे घडली आहे... अज्ञातांनी गावात उभ्या असलेल्या तीन वाहनांना आग लावली. त्यात एक CNG वाहन, ओम्नी , कार, आणि एक दुचाकीचा समावेश आहे. आगीत ही सर्व वाहनं जळून खाक झाली असून घटनेनंतर गावकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत उशीर झाला होता. या दोन्ही आगीच्या घटनांमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे...
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Oct 23, 2025 06:55:31
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात कोलाम आदिवासी समाजात दिवाळीनिमित्त पारंपारिक नृत्यांचे करण्यात आले आयोजन अँकर:-- राज्यभरात दिवाळी सण आनंदोत्सवात साजरा होत असताना, चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील कोलाम आदिवासी समाजात पारंपारिक नृत्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्तिक प्रतिपदेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत चालणाऱ्या या कालावधीत, कोलाम समाजातील ‘घुसाळी’ आणि ‘दंडार’ या पारंपारिक नृत्यांच्या माध्यमातून स्थानिकांनी आपली सांस्कृतिक परंपरा जिवंत ठेवली आहे. या कार्यक्रमांना स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. डोंगरदऱ्यांमध्ये वसलेली कोलाम आदिवासी जमात आजही आपली पारंपारिक वेशभूषा, निसर्गपूजा आणि पारंपारिक श्रद्धा जपत आहे. सदर नृत्य कार्यक्रमांमुळे आदिवासी समाजातील प्राचीन संस्कृती आणि परंपरेचे जतन होत असून, स्थानिक समाजजीवनात सांस्कृतिक ऐक्य दृढ करण्यास अशा सांस्कृतिक परंपरांचा मोठा हातभार लागत आहे।
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Oct 23, 2025 06:51:24
Pune, Maharashtra:Anchor: भाऊबीजेच्या मंगलप्रसंगी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान, श्रीक्षेत्र देहू यांच्या वतीने ‘दिवाळी पहाट संगीत महोत्सव स्वरात्मिका प्रस्तुत भक्तीरस तुकोबांचा’ हा सुरेल कार्यक्रम मोठ्या भक्तिभावात पार पडला. संत तुकोबांच्या मुख्य मंदिरात सकाळच्या सुवर्णक्षणात गायिका काजल भेगडे यांच्या गायनाने वातावरण भक्तीमय झाले. त्यांच्या स्वरांनी तुकोबांच्या चरणी जणू भक्तिरसाची आरतीच अर्पण केली. या कार्यक्रमाला साथसंगत लाभली होती मृदंगावर ह.भ.प. भिमराव हांडे आणि तबल्यावर ह.भ.प. अजित लोहर यांच्या अप्रतिम तालसंवेदनाची. दिवाळीच्या प्रकाशात आणि तुकोबांच्या नामस्मरणात न्हाऊन निघालेल्या देहू नगरीत या दिवाळी पहाटेच्या भक्तिसूरांनी सर्व श्रोते मंत्रमुग्ध झाले.
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Oct 23, 2025 06:48:36
3
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Oct 23, 2025 06:47:30
0
comment0
Report
Diwali 2025
Advertisement
Back to top