Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Latur413531

लातूर में मध्यरात्रि दो जबरदस्त आग, तीन वाहन और एम्बुलेंस जलकर खाक

VBVAIBHAV BALKUNDE
Oct 23, 2025 07:00:43
Latur, Maharashtra
लातूर ब्रेकिंग न्यूज.... लातूर जिल्ह्यात मध्यरात्रीच्या सुमारास दोन भीषण आगीच्या घटना घडल्या आहेत... पहिली घटना औसा तालुक्यातील चलबुर्गा पाटीजवळ घडली, जिथं 108 क्रमांकाच्या अॅम्बुलन्सला अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागली... काही क्षणांतच संपूर्ण अॅम्बुलन्स जळून खाक झाली आहे. अॅम्बुलन्समध्ये ठेवलेल्या ऑक्सिजनच्या टाकीचा स्फोट झाल्याचीही माहिती समोर आली आहे. दरम्यान, मध्यरात्रीच दुसरी घटना उदगीर तालुक्यातील धोडहिप्परगा येथे घडली आहे... अज्ञातांनी गावात उभ्या असलेल्या तीन वाहनांना आग लावली. त्यात एक CNG वाहन, ओम्नी , कार, आणि एक दुचाकीचा समावेश आहे. आगीत ही सर्व वाहनं जळून खाक झाली असून घटनेनंतर गावकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत उशीर झाला होता. या दोन्ही आगीच्या घटनांमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे...
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SRSHRIKANT RAUT
Oct 23, 2025 11:36:38
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या पुसद येथे माणुसकीची भिंत च्या वतीने बेघर, निराधार, दिव्यांग, असहाय वृद्ध व अनाथांसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली. रुग्णालय परिसरात हा सोहळा संपन्न झाला. माणुसकीची भिंत परिसरात स्वच्छता करून गोरगरीब निराधार वृद्धांची व पुरुषांची दाढी-कटिंग करण्यात आली. त्यानंतर महिलांनी काडलेल्या रांगोळ्यांनी अंगण सजले. पाट मांडण्यात आले. त्यानंतर माणुसकीची भिंतच्या महिला सदस्यांनी टोपी, टॉवेल, नारळ पेढा देऊन वंचितांना ओवाळले. त्यांच्या कुटुंबातील महिलांना साड्या देण्यात आल्या. ओवाळणी कार्यक्रमानंतर सर्वांना भोजन देण्यात आले. गेल्या ९ वर्षांपासून माणुसकीची भिंत कडून हा उपक्रम सुरू आहे.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Oct 23, 2025 11:31:27
Jalna, Maharashtra:जालना :फक्त लढ म्हणा! आकांक्षाच्या दिड एकरावरील कपाशीचं अतिवृष्टीमुळे नुकसान, BAMS शिक्षणासाठी मदतीची गरज अँकर :जालन्याच्या अंबड तालुक्यातील टाका गावची आकांक्षा थोटे हिचं सध्या BAMS चं शिक्षण सुरू आहे.पण यंदा अतिवृष्टीमुळे आकांक्षाच्या शेतातील दिड एकरातील कपाशीचं मोठं नुकसान झालय.त्यामुळे आकांक्षाला तुमच्या मदतीची गरज आहे. व्हिओ :यंदा जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचं अतोनात नुकसान झालंय.असंच नुकसान अंबड तालुक्यातील टाका गावच्या आकांक्षा थोटे या विद्यार्थीनीचं झालंय.आकांक्षाच्या वडिलांकडे केवळ दिड एकर शेतीय.या सर्व जमिनीत कपाशीची लागवड केली होती. पण कपाशीत 8 दिवस पाणी साचलं आणि आज घडीला कपाशी पीक उद्धवस्त झालंय.सध्या आकांक्षा दिवाळीच्या सुट्टीत घरी आल्यानं कपाशी वेचणी करण्याच्या कामाला लागलीय.पण BAMS चं शिक्षण पूर्ण करायचं असल्यानं अभ्यास देखील जोरात सुरुय.आकांक्षा सध्या BAMS च्या दुसर्या वर्षात शिकत असून श्री आयुर्वेद कॉलेज नागपुरे या महाविद्यालयात तिचं शिक्षण सुरु आहे. बाईट : आकांक्षा थोटे,विद्यार्थीनी व्हिओ :२:केवळ दिड एकरवरील कपाशीच्या उत्पन्नातून आकांक्षाच्या शिक्षणाचा खर्च करणं तिच्या वडिलांसाठी आव्हान आहे त्यामुळे तुम्ही देखील आकांक्षाला मदत करू शकता. आकांक्षाचे बँक डिटेल्स आहेत. नाव- आकांक्षा बळीराम थोटे अकाऊंट नंबर -33233713412 IFSC कोड-SBINOOO3407 बँक-स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा,वडीगोद्री,ता अंबड जि जालना फोन पे नंबर-9529981807 (बळीराम थोटे,आकांक्षाचे वडील-9421652775) व्हिओ -2-यंदा शेतकरी अतिवृष्टीमुळे हतबल झालाय.त्याला हक्काचे 4 पैसे पिकातून मिळणं अवघड आहे.अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झाल्यानं मुलांच्या शिक्षणासाठी पैसे एकत्र करणं शक्य नाहीय.त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी पुढे या.मदत करा
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Oct 23, 2025 11:10:00
Pune, Maharashtra:भ्रष्टाचाराविरोधात लढा देणाऱ्या लोकपाल संस्थेने तब्बल सात लक्झरी बीएमडब्ल्यू गाड्या खरेदी करण्यासाठी निविदा काढल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या निर्णयावर विरोधकांसह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, आता या वादात जनआंदोलनाचे प्रणेते अण्णा हजारे यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लोकपाल कायदा झाला या कायद्यासाठी आम्ही खूप झगडलो, केंद्रा मध्ये लोकपाल आणि राज्यासाठी लोकयुक्त हे क्रांतिकारी कायदे झाले परंतु माझ्या कानावर असं वेड वाकड येईल हे मला माहित नव्हतं हा दुर्दैव आहे....भ्रष्टाचार होऊ नये म्हणून आपण अपेक्षा करतो मात्र भ्रष्टाचार होण्यासाठी कार्यवाही होतं असेल तर हा दुर्दैव आहे. आता जनता ठरवेल काय करायचं ते मी फक्त हे क्रांतिकारी कायदे कसे आणता येईल हे ठरवलं होतं आणि ते झाले आता जनता ठरवेल काय करायचं ते अशी प्रतिक्रिया अण्णा हजारें यांनी दिली आहे. खरंतर एका भ्रष्टाचारविरोधी संस्थेला अशा महागड्या गाड्यांची काय गरज आहे अशीचं चर्चा आता जनते मधून देखील होतांना दिसत आहे
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Oct 23, 2025 10:49:51
2
comment0
Report
GMGANESH MOHALE
Oct 23, 2025 10:49:15
Washim, Maharashtra:दिवाळीचा सण आनंदाचा असला तरी वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या चिंतेत आहेत. अतिवृष्टी आणि उत्पादनात झालेल्या मोठ्या घटेमुळे शेतकरी पूर्णपणे हाताशी आले आहेत. सरकारने जाहीर केलेली मदत अद्याप जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नाही. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला प्रतिक्विंटल फक्त तीन ते साडेतीन हजारांपर्यंतचा दर मिळत आहेत. त्यातच दिवाळी सुट्टीमुळे मागील पाच दिवसांपासून बाजार समित्या बंद आहेत. ऐन दिवाळी व रब्बी च्या पेरणीसाठीचं शेतकऱ्यांचं आर्थिक नियोजन सुरु आल्यामुळ शेतकऱ्यांना शेतीमाल खासगी बाजार समित्या व व्यापाऱ्यांकडेच विक्री करावी लागत असून, सोयाबीनला हमीभावाच्या तुलनेत त्यांची आर्थिक लूट सुरू आहे त्यामुळे शासनाने नाफेड मार्फत हमीभावाने सोयाबीन सह इतरही शेतमालाची खरेदी करण्याची मागणी शेतकऱ्यांनंकडून केली जातंय.
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Oct 23, 2025 09:35:25
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 23, 2025 09:30:16
Akola, Maharashtra:अकोला शहरातील गंगानगर भागातील पाण्याच्या टाकीजवळ सुरू असलेल्या घर बांधकामाच्या खोदकामामुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. घरकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यातून निघालेली माती रस्त्यावर पसरल्याने परिसरातील रस्ते चिखलमय झाले आहेत. या चिखलामुळे अनेक दुचाकीस्वार घसरून जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. बांधकाम करणाऱ्या व्यक्तीने या खोदकामासाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेतलेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय यामुळे अनधिकृतरित्या सुरू असलेल्या या कामाबाबत परिसरातील रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता या प्रकारावर महापालिका प्रशासन कोणती कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 23, 2025 09:18:44
Akola, Maharashtra:अकोला शहरातील एका हॉस्पिटलमध्ये आज सकाळी उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णाने गळफास घेऊन आत्महत्या केली. मृताचे नाव अमोल कावनपुरे (वय ३२, रा. पहाडीपुरा, बनोसा, ता. दर्यापूर, जि. अमरावती) असे आहे. अमोल हा २८ ऑक्टोबर रोजी पायाच्या उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. आज सकाळी नर्सने रुग्णाची रूम बंद असल्याचे लक्षात घेतले. दरवाजा तोडून पाहिले असता, अमोलने दुपट्ट्याने पंख्याला गळफास घेतल्याचे दिसले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलीस घटनास्थळी पोहोचले असून, पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. पोलिसांनी प्रकरणी नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे. मात्र ही आत्महत्या आजाराला कंटाळून केली असल्याची चर्चा आहे.
2
comment0
Report
Diwali 2025
Advertisement
Back to top