416812
Shinde की कोकण में सभा: महायुती की रणनीति, किसपर होगी चोट?
Oros, Maharashtra:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोकण दौऱ्यावर आहेत कोकणात शिंदेंच्या चिपळूण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी जाहीर सभा होणार आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांचे प्रचारार्थ एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे या सभेला पालकमंत्री नितेश राणे मंत्री उदय सामंत आमदार दीपक केसरकर आमदार निलेश राणे यांच्यासह महायुतीचे नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत. त्या सभेत एकनाथ शिंदे नेमके कोणावर तोफ डागतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले या सभास्थळावरून आढावा घेतल्या आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नितेश राणे बोले: मत्स्य योजना में भ्रष्टाचार, बैंक अधिकारी गलत व्यवहार पर कड़ा कदम
Yavatmal, Maharashtra:मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना, व मत्स्य ठेक्यांमध्ये भ्रष्टाचार होत आहे, ठेका एकाच्या नावाने तर चालविणारा तिसराच आहे. योजनांचा लाभ मिळवताना देखील मासेमारी करणाऱ्या बांधवांना बँकांकडून विनाकारण त्रास होत आहे, आता त्यांची मस्ती उतरवली जाणार असा इशारा राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिला आहे. दुष्काळी स्थितीचा आढावा घेण्यासाठी यवतमाळच्या कुंभारकिन्ही तलावावर नितेश राणेंनी मासेमारी करणाऱ्या बांधवांशी संवाद साधताना त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी यंत्रणे कडून होणारा त्रास व स्थानिक मच्छीमारांवर होणारा अन्याय त्यांनी कथन केला. त्यामुळे आता चुकीचे वागणाऱ्यांची गय नाही असा इशारा नितेश राणे यांनी दिला. बँकेचे अधिकारी लाभार्थ्यांच्या अर्जात शुल्लक कारणासाठी त्रुटी काढून अर्ज बाद ठरवतात. अशा अधिकाऱ्यांमध्ये थोडं शिस्त आणावी लागेल. पण बँकेचे अधिकारी स्वतःला मोठ समजत असेल तर त्यांनी मस्ती उतरविण्यासाठी काही प्रकार आहेत, ते वापरल्या जातील. झाडावर कीड आहे, तर आपण पेस्टिसाइड मारतो, तसे काही पेस्टिसाइड आमच्याकडे आहे अधिकाऱ्यांवर वापरण्यासाठी. असा इशारा मंत्री नितेश राणे यांनी दिला आहे.0
0
Report
महाराष्ट्र में मानसून का अंतिम चरण; 19% कमी से दुष्काळ गहरा, मराठवाड़ा चिंताजनक स्थिति
Ratnagiri, Maharashtra:महाराष्ट्रातून परतीचा मानसून अंतिम टप्प्यात; १९ टक्के तुटीसह राज्यावर दुष्काळाचे गडद सावट, मराठवाड्यात चिंताजनक स्थिती.. अँकर राज्यातून मानसूनची माघार वेगाने सुरू असून पुढील दोन ते तीन दिवसांत तो संपूर्ण महाराष्ट्राचा निरोप घेण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.. यंदा सरासरीच्या अवघा ८७ टक्के पाऊस झाल्याने राज्यात तब्बल १९ टक्के तूट नोंदवली गेली आहे.. यात मराठवाड्यात सर्वाधिक ४० टक्के,तर विदर्भात २३ टक्क्यांची मोठी घट झाली आहे.. परतीच्या पावसाचीही शक्यता मर्यादित असल्याने धरणांमधील अपुरा साठा,पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची भीती आहे.. रब्बी हंगाम धोक्यात येण्याची चिन्हे असून राज्यासमोर तीव्र दुष्काळाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे..0
0
Report
सूखे के बीच तूर की कीमत 10,400 प्रति क्विंटल, किसानों को राहत मिली
Washim, Maharashtra:दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तुरीच्या दरवाढीने काहीसा दिलासा मिळाला आहे.कारंजा बाजार समितीत तुरीला तब्बल १० हजार ४०० रुपये प्रतिक्विंटलचा उच्चांकी दर मिळाला.काल १ हजार क्विंटल तुरीची आवक झाली असून, किमान ९ हजार ४०० तर कमाल १० हजार ४०० रुपये दर मिळाला.दोन वर्षातील उच्चंकी दर आहे.दुष्काळा मुळे उत्पादन घटण्याची शक्यता आणि नवीन तूर बाजारात येण्यासाठी अजून तीन महिन्यांचा अवधी असल्याने, दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.0
0
Report
Advertisement
रत्नागिरी में 2601 हेक्टेयर नुकसान का पंचनामा, तीन तालुकें दुष्काळ घोषित
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त २ हजार ६०१ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण.. जिल्ह्यातील तीन तालुके दुष्काळग्रस्त.. यावर्षी अननुच्या प्रभावामुळे रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी राहिल्यामुळे यावर्षी भात पिक ७० ते ७५ टक्के पेक्षा जास्त धोक्यात आले आहे.. त्यामुळे शासनाने रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी,राजापूर,संगमेश्वर हे तीन तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत.. मात्र पालकमंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून नुकसानाचे पंचनामे सुरू असून आतापर्यंत जिल्ह्यातील ८ हजार ३४५ शेतकऱ्यांच्या २ हजार ६०१ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले आहेत..0
0
Report
छगन भुजबळ के प्रयास से येवला में नमो उद्यान का लोकार्पण, गणेश उत्सव पुरस्कार वितरण
Yeola, Maharashtra:अँकर:-मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नाने येवला नगरपालिकेच्या माध्यमातून एक कोटी रुपये खर्च करून शहरातील पटेल कॉलनी परिसरात उभारण्यात आलेल्या नमो उद्यानाचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. तसेच यावेळी येवला नगरपालिका व राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी आयोजित पर्यावरणपूरक गणेश उत्सव स्पर्धेतील विजेत्यांच्या बक्षिसांचे वितरण करण्यात आले.0
0
Report
नवी मुंबई एयरपोर्ट से सिंधुदुर्ग, जालगांव, गोवा और लक्षद्वीप के लिए सीधे हवाई सेवाएं
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई विमानतळाच्या कनेक्टिव्हिटीला नवे पंख, सिंधुदुर्ग, जळगाव, गोवा आणि लक्षद्विपशी आता थेट हवाई जोडणी. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने देशांतर्गत हवाई कनेक्टिव्हिटीच्या विस्तारात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला असून प्रादेशिक विमान कंपनी FLY91 च्या विमानाचे नवी मुंबई विमानतळावर प्रथमच आगमन झालेय. हैदराबादहून आलेलेल्या या औपचारिक विमानाचे पारंपरिक जलतोफेच्या सलामीने स्वागत करण्यात आले. यामुळे नवी मुंबई विमानतळाच्या वाढत्या हवाई नेटवर्कमध्ये आणखी एका महत्त्वाच्या विमान कंपनीची भर पडली असून FLY91 च्या हिवाळी वेळापत्रकानुसार नवी मुंबईहून सिंधुदुर्ग, जळगाव, गोवा आणि लक्षद्वीपमधील अगत्ती या चार ठिकाणी थेट हवाई सेवा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह पश्चिम किनारपट्टी आणि लक्षद्वीपमधील पर्यटन, व्यवसाय आणि प्रादेशिक प्रवासासाठी प्रवाशांना आता अधिक पर्याय उपलब्ध होणार आहेत.0
0
Report
Advertisement
सिन्नर में रस्ता रोको आंदोलन: धोंडबार-पाचपट्टा मार्ग और नदीजोड़ परियोजना पर तात्कालिक कार्रवाई
Sinnar, Maharashtra:सिन्नर तालुक्यातील धोंडबार-पाचपट्टा मंजूर रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे, कोनांबे-औंढेवाडी नादुरुस्त रस्त्याची दुरुस्ती करावी आणि या दोन्ही गावांचा नदीजोड प्रकल्पात समावेश करावा, या प्रमुख मागण्यांसाठी हरसुले फाटा (घोटी-सिन्नर महामार्ग) येथे तीव्र रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात स्थानिक लोकप्रतिनिधी,व संघटनांचे पदाधिकारी ग्रामस्थ हे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनाची दखल घेत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनी रस्त्यांवरील खड्डे पुढील ८ दिवसांत डांबराने भरण्याचे आणि मंजूर कामे त्वरित सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले. तसेच, जलसंपदा विभागाच्या प्रतिनिधींनी ग्रामपंचायतीने ग्रामसभेचा ठराव सादर केल्यानंतर दोन्ही गावांचा नदीजोड प्रकल्पातील समावेशाचा प्रस्ताव मंजुरीसाठी तात्काळ प्रशासनाकडे पाठवण्याचे आश्वासन दिले. अधिकाऱ्यांच्या या आश्वासनांनंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.0
0
Report
भाजपा प्रत्याशी संगीता शिंदे के नामांकन से अमरावती में बंडखोरी बढ़ी
Amravati, Maharashtra:भाजपच्या डॉ. संगीता शिंदे करणार बंडखोरी; आज दाखल करणार उमेदवारी अर्ज, भाजपला अमरावतीत बंडखोरीचे मोठे ग्रहण अमरावती शिक्षक मतदार संघ निवडणूकीत भाजपला मोठ्या प्रमाणात बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. त्यात अजून भर म्हणून भाजपनेते व खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या भगिनी डॉ. संगीता शिंदे आज बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. आज संगीता शिंदे यांच्या निवडणूक नामांकन रॅलीला भाजपचे पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन भाजपचे महामंत्री नितीन गुडधे पाटील यांनी केले आहे. महायुतीत अमरावती मतदारसंघ शिंदे सेनेच्या वाटेला गेला असतानाच भाजप डॉ. संगीता शिंदे यांच्या उमेदवारीसाठी मैदानात उतरल्याने मोठ्या प्रमाणात भाजपची डोकेदुखी वाढणार आहे.0
0
Report
मराठवाडा में बारिश कमी से खरीफ फसलों को बड़ा नुकसान, पंचनामे 25% तक
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मराठवाड्यात अपुऱ्या पडलेल्या पावसामुळे खरीप पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. शासन आदेशानुसार नुकसानीचे पंचनामे सुरू झाले असून आतापर्यंत १३ लाख १५ हजार हेक्टरवरील म्हणजे २५.१४ टक्के पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत, जालना जिल्ह्यात ४७ टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. मराठवाड्यात खरीप पिकांसह फळबाग आदींचे लागवड क्षेत्र ५२ लाख ३२ हजार ४७४ हेक्टर असून आतापर्यंत ३ हजार ५८६ गावांतील १३ लाख १५ हजार २५६ हेक्टरवरील खरीप पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १ लाख २ हजार ७४६ हेक्टरवरील म्हणजेच १३.७५ टक्के पंचनामे झाले आहेत. जालना जिल्ह्यात ३ लाख १८ हजार ८१५ हेक्टरवरील (४६.९० टक्के), बीड जिल्ह्यातील २ लाख २३ हजार २९३ हेक्टरवरील (२६.०५ टक्के), लातूर जिल्ह्यातील १ लाख ७१ हजार ८९४ हेक्टरवरील २७.४०%, धाराशिव जिल्ह्यातील १ लाख ४५ हजार ९६९ हेक्टरवरील (२१.९८ टक्के), नांदेड जिल्ह्यातील ९५ हजार ७३१ हेक्टर (१३.४१ टक्के), परभणी जिल्ह्यातील १ लाख ८२ हजार ४९३ हेक्टरवरील (३३.०३ टक्के) आणि हिंगोली जिल्ह्यातील ७४ हजार ३१५ हेक्टरवरील (१९.०२ टक्के) नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत0
0
Report
Advertisement
अकोला में चारे पर पाबंदी: प्रशासन ने बाहर ले जाना रोका
Akola, Maharashtra:अकोला जिले में गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण के कारण चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हाधिकारी यांनी अकोला जिल्ह्यातून हिरवा आणि सुका चारा जिल्ह्याबाहेर नेण्यास तसेच विक्री करण्यास बंदी घातली आहे. 3 ऑक्टोबरपासून पुढील आदेशापर्यंत ही बंदी लागू राहणार आहे. अकोला जिल्ह्यात यंदा कमी पर्जन्यमानामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पशुधनासाठी लागणाऱ्या चाऱ्याची टंचाई होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. कडबा, कुटी, पेंढा, ऊसाचे पाचट व पाने, मका यासह कोणताही हिरवा किंवा सुका चारा पूर्वपरवानगीशिवाय जिल्ह्याबाहेर नेता येणार नाही. मात्र, जिल्ह्यात एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात स्वतःच्या जनावरांसाठी चारा नेण्यास परवानगी राहणार आहे. शासकीय चारा छावण्या आणि प्रशासनाने मंजूर केलेल्या वाहतुकीला या आदेशातून सूट देण्यात आली आहे. चाऱ्याची अवैध वाहतूक रोखण्यासाठी जिल्ह्याच्या सीमांवर पोलीस आणि आरटीओकडून तपासणी नाके सुरू करण्यात येणार आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक फौजदारी कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.0
0
Report
अकोला में 1900 किलो मिठाई-हलवा जब्त, तीन व्यापारियों के लाइसेंस निलंबित
Akola, Maharashtra:अकोला में खाद्य सुरक्षा और औषध प्रशासन ने बड़ी कार्रवाई कर अस्वच्छ और अनारोग्यदायी परिस्थितियों में परिवहन किया गया करीब 1900 किलोग्राम मिठाई और हलवा जब्त किया। इस साठे की कीमत लगभग 5 लाख 72 हजार रुपए है। इस प्रकरण में माल मांगने वाले तीन व्यापारियों के खाद्य परवाने निलंबित कर दिए गए। गोपनीय जानकारी के आधार पर एफएसएसएआई की टीम ने अकोला शहर के रायलीजिन क्षेत्र में Arco Transport में जांच की। गुजरात के अहमदाबाद से दो ट्रकों में विभिन्न ब्रांडों के हलवा और मिठाई का स्टॉक अकोला लाया गया था। जांच के दौरान मिठाई और हलवा के नमूने आगे की जाँच के लिए लिए गए, परंतु बाकी 1900 किलो साठा जप्त कर लिया गया है। जप्त किए गए इस साठे की अनुमानित कीमत 5 लाख 72 हजार रुपए है और इसे अकोला महापालिका के बायोगैस परियोजना के SWM प्रोसेसिंग प्लांट में नष्ट किया जाएगा।0
0
Report
समीर भुजबळ की मौजूदगी में अमोल शिंदे ने राष्ट्रवादी में प्रवेश किया
Yeola, Maharashtra:येवला नगरपालिकेचे गटनेते गणेश शिंदे यांचे ज्येष्ठ बंधू अमोल शिंदे यांनी आपल्या शेकडो पदाधिकाऱ्यांसह नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला यापूर्वी अमोल शिंदे हे युवा सेनेचे उपजिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहत होते मात्र त्यांना कोणतेही नियुक्तीपत्र दिले नाही असे शिवसेनेच्या वतीने जाहीर केल्याने शिंदे हे शिवसेनेत नाराज होते दरम्यान काही दिवसांपूर्वी अमोल शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना नगरसेवकांचा एक गट समीर भुजबळांच्या भेटीला गेला होता मात्र राज्यात सत्तेत असलेले सेना-भाजप राष्ट्रवादी यांच्या फॉर्मुल्यानुसार निवडून आलेल्या सदस्यांना प्रवेश येता येणार नसल्यामुळे केवळ अमोल शिंदे यांनाच सध्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देऊन त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस उपजिल्हाध्यक्ष तथा येवला लासलगाव मतदार संघ प्रवक्ते पदाची जबाबदारी देण्यात आली.राम गीत लॉन्स या ठिकाणी हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला याप्रसंगी माजी खासदार समीर भुजबळ,गटनेते गणेश शिंदे यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचे नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.0
0
Report
Advertisement
सोलापुर में पति ने पत्नी लौटाने के लिए गाढवीनी से प्रतिकात्मक विवाह किया
Solapur, Maharashtra:सोलापुर ब्रेकिंग : सोलापुरात बायको परत नांदायला यावी म्हणून एका व्यक्तीने चक्क 'गाढवीनी' सोबत प्रतिकात्मक लग्न केले - सोलापुरात बायको परत नांदायला यावी म्हणून एका व्यक्तीने चक्क 'गाढवीनी' सोबत प्रतिकात्मक लग्न केले - 16 वर्षांचा संसार तुटल्याने वैफल्यग्रस्त पिडीत पुरुषाने चक्क गाढवीनी सोबत प्रतिकात्मकरित्या विवाह केला असल्याचा दावा केला आहे. - दिपक सूर्यवंशी असं या व्यक्तीचे नाव असून आपल्या पत्नीने कुठलीही पूर्वकल्पना न देता सोडून गेली असल्याचा दावा केला आहे. - दिपक सूर्यवंशी यांचे मेव्हणे गणेश साळुंखे आणि मंगळवेढ्यातील माजी नगरसेवक सोमेश यावलकर यांनी आपल्या बायकोला दूर केल्याचा आरोप केला आहे. - मागील 15 दिवसांपासून दिपक सूर्यवंशी हे आपली बायको पूजा सूर्यवंशी ही परत यावी म्हणून प्रयत्न करत आहेत. - त्यासाठी अखेर त्यांनी सोलापूर जिल्हा परिषद गेट समोर लक्षवेधी धरणे आंदोलन केलेय. - मात्र याची प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने त्यांनी आज थेट गाढवीनी सोबत प्रतिकात्मक लग्न करून आगळे वेगळे आंदोलन केलेय. - या आंदोलनाच्या ठिकाणी दिपक सूर्यवंशीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे ही छायाचित्र ठेवले आहे. - दरम्यान रीतसर मंगलाष्टक पार पडून गाढवीनीच्या गळ्यात पुष्पहार अर्पण करून दिपक सूर्यवंशीने हा प्रतिकात्मक विवाह केला आहे.0
0
Report
बुलढाणा: दो गुटों के संघर्ष में नगरसेवक सहित एक अन्य कार्यकर्ता की मौत
Buldhana, Maharashtra:बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा शहरात एकाच समाजाच्या दोन गटांमध्ये झालेल्या भीषण हाणामारीत दोघांचा जागीच मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतकांमध्ये शिंदेसेनेचा एक विद्यमान नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) एका कार्यकर्त्याचा समावेश आहे. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे हा संपूर्ण रक्तरंजित संघर्ष थेट देऊळगाव राजा पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावरच घडला. दोन्ही बाजूंनी तलवारी आणि धारदार शस्त्रांनी एकमेकांवर सपासप वार केल्याने या दुहेरी हत्याकांडामुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काल देऊळगाव राजा शहरात एका कव्वालीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बसण्याच्या जागेवरून लहान मुलांमध्ये किरकोळ वाद झाला होता. मात्र, या क्षुल्लक वादाचे पर्यावसान आज मोठ्यांच्या हाणामारीत आणि दोन गटांमधील रक्तरंजित संघर्षात झाले. तक्रार देण्यासाठी किंवा वादाच्या संदर्भात दोन्ही गट पोलीस ठाण्यात पोहोचले असतानाच ठाण्याच्या प्रवेशद्वारावरच दोन्ही गट पुन्हा एकमेकांसमोर आले. पोलीस ठाण्याच्या दारातच वाद इतका विकोपाला गेला की दोन्ही बाजूंच्या लोकांनी थेट तलवारी आणि इतर धारदार शस्त्रे उपसून एकमेकांवर प्राणघातक हल्ले चढवले. झालेल्या या हल्ल्यात शिंदेसेनेचे नगरसेवक शेख अन्वर अली आणि राष्ट्रवादीच्या आरिफ पठाण या कार्यकर्त्याचा जागीच मृत्यू झाला. या हल्ल्यात सात जण गंभीर जखमी झाले असून प्राथमिक उपचारानंतर त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी जालना येथील शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे. या घटनेमुळे शहरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले असून खबरदारीचा उपाय म्हणून घटनास्थळी व शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.0
0
Report
अकोला: अंतरराज्यीय घरफोडी गैंग का पर्दाफाश, 12 लाख रुपए का माल बरामद
Akola, Maharashtra:Anchor : अकोला स्थानिक गुन्हे शाखेने आंतरराज્યीय घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. जिल्ह्यातील पाच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत झालेल्या तब्बल १० घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी १२ लाख ८ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याचा एक साथीदार अद्याप फरार आहे.अकोला जिल्ह्यातील विविध ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींचा शोध सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणचे तब्बल १८५ सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यासोबतच तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या माध्यमातून आरोपींचा माग काढण्यात आला. तपासाची चक्रे वेगाने फिरवत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातील विविध भागात आरोपींचा शोध घेतला. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी बुलडाणा, जळगाव खानदेश, बुऱ्हाणपूर आणि इंदूर असा तब्बल ७०० किलोमीटरचा प्रवास केला.या तपासातून आंतरराज्यीय टोळीतील मुख्य आरोपी पोलिसांच्या हाती लागला. त्याच्याकडून घरफोडीच्या गुन्ह्यांशी संबंधित १२ लाख ८ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपीकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.0
0
Report
Advertisement
