Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sindhudurg416812

सिंधुदुर्ग जिले में मतदान शुरू; 57,207 मतदाता नगरपरिषद चुनाव के लिए

UPUmesh Parab
Dec 02, 2025 03:04:30
Oros, Maharashtra
अनेक राजकीय घडामोडी मुळे चर्चेत राहिलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मतदान प्रक्रियेला सुरवात झालीय. आणि तीन नगरपरिषद साठी तब्बल एक नगरपंचायत 57 हजार 207 मतदार आज मतदानाचा हक्क बजावणार आहेत. नगराध्यक्ष पदाच्या चार जागासाठी 18 उमेदवार तर 77 नगरसेवक पदाच्या जगासाठी 270 उमेदवार रिंगणात उभे आहेत. मालवण मधील घटने नंतर जिल्ह्यात तणावाच वातावरण असलं तरी देखील मतदार उत्स्फूर्त पणे मतदान करताना दिसत आहेत. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSATISH MOHITE
Dec 02, 2025 03:21:16
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 02, 2025 03:18:23
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यातील रिसोड,कारंजा, मंगरुळपीर या तीन नगरपरिषद व मालेगाव नगरपंचायतीसाठी आज मतदान प्रक्रिया होत आहे.या चारही स्थानिक स्वराज संस्थांसाठीची सर्व तयारी जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली असून यंत्रणा सज्ज आहे.सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे.४ नगराध्यक्ष पदासाठी २७ उमेदवार आणि ९० नगरसेव पदासाठी तब्बल ३७४ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत.एकूण १७८ मतदान केंद्रांवर ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून यासाठी ९६१ कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून ९२८ पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.३ नगरपरिषद आणि एक नगर पंचायत मिळून एकूण १ लाख ४८ हजार ५८१मतदार असून यामध्ये ७५ हजार १६ पुरुष, ७३ हजार ५६१ महिला आणि ४ इतर मतदारांचा समावेश आहे.उमेदवारांचे भविष्य आज EVM मध्ये बंद होणार आहे.उद्याच्या मतमोजणीतून नेमकं कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.याचाच मतदान केंद्रावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी
70
comment0
Report
HPHARSHAD PATIL
Dec 02, 2025 03:05:23
Palghar, Maharashtra: पालघर जिल्ह्यातील पालघर , जव्हार आणि डहाणू या तीन नगरपरिषदा तर वाडा या नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी today मतदान होणार असून सकाळी सात वाजेपासून या मतदानाला सुरुवात झाली आहे . four ठिकाणी होत असलेल्या निवडणुकीसाठी एक लाख 16 हजार 660 इतके मतदार मतदान करणार असून यासाठी 125 मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत . यामध्ये पालघर नगरपरिषद हद्दीत 56 , डहाणू नगरपरिषद हद्दीत 41 , जव्हार नगर परिषद हद्दीत अकरा , तर वाडा नगरपंचायत हद्दीत 17 मतदान केंद्रांवर सध्या मतदान प्रक्रिया सुरू आहे. चार नगराध्यक्ष पदांसाठी 17 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून 94 नगरसेवक पदांसाठी 316 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपलं भविष्य आजमावणार आहेत.
23
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Dec 02, 2025 03:03:55
76
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Dec 02, 2025 03:03:32
Amravati, Maharashtra:अमरावती जिल्ह्यात मतदानाला सुरुवात; जिल्ह्यात 9 नगरपरिषद आणि 2 नगरपंचायतीसाठी आज मतदान अमरावती जिल्ह्यात मतदान होऊ घातल्या आहे. यात 11 नगराध्यक्ष पदासाठी तब्बल 64 उमेदवार रिंगणात आहेत. तर 250 नगरसेवक पदासाठी 1048 उमेदवार रिंगणात आहेत. 11 ठिकाणी भाजप और काँग्रेस स्वतंत्र निवडणूक लढत आहेत. 11 ठिकाणच्या निवडणुकांमध्ये 3 लाख 12 हजार 436 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पुरुष मतदारांची संख्या 1 लाख 56 हजार 92 असून महिलामतदारांची संख्या 1 लाख 56 हजार 332 आहे. एकूण 11 शहरात 366 केंद्रांवर मतदान होणार असून 1500 पोलीस कर्मचारी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. काही ठिकाणी अजित पवार गट शिंदे गट एकत्र आला असताना काही ठिकाणी राष्ट्रवादी आणि ठाकरे गट एकत्र आले आहेत. या निवडणुकदरम्यान अमरावती जिल्ह्यातूनच देवेंद्र फडणवीस यांनी धारणी येथे सभा घेऊन प्रचाराचा नारळ फोडला होता. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चार ठिकाणी जाहीर सभा घेतल्या तर नवनीत राणांनी मोठ्या प्रमाणावर रोड शो केला.
87
comment0
Report
Advertisement
Back to top