Back
शिंदे के समर्थकों और rival पक्ष के बीच महाबळेश्वर नगरपालिका चुनाव में तकरार तेज
TTTUSHAR TAPASE
Nov 26, 2025 10:38:58
Satara, Maharashtra
सातारा - थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे महाबळेश्वरचे वातावरण सध्या नगरपालिका निवडणुकीमुळे चांगलेच तापले आहे. जागतिक स्तरावर नाव असणाऱ्या या पर्यटन स्थळा वरील नगरपालिका आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी शिंदेसेना प्रयत्न करते आहे. त्याचबरोबर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी ने आपले दंड थोपटले आहेत. ही महाबळेश्वर नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पाहूया यावरचा रिपोर्ट...
विओ - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुळगाव दरे हे महाबळेश्वर तालुक्यातील त्यामुळे या भागात त्यांनी अनेक वेळा येणे जाणे असते. या महाबळेश्वर दौऱ्यावर असताना शिंदे यांनी या भागातील शिवसैनिकांना ताकद दिली एवढेच नाही तर या भागात पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न देखील केले. सध्या होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकीत महाबळेश्वर मध्ये त्यांनी चांगलेच लक्ष घातले आहे. त्यांनी त्याचे खास सहकारी मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर या नगरपालिकेची जबाबदारी सोपवली आहे. त्याप्रमाणे शंभूराज देसाई यांनी देखील या ठिकाणी बैठका घेत चांगलेच वातावरण तापवले आहे. या महाबळेश्वर नगरपालिकेत नगराध्यक्ष पदासाठी कुमार शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कुमार शिंदे यांनी देखील पूर्ण ताकदीने महाबळेश्वर मध्ये शिवसेनेचे पॅनल उभे केलं आहे. जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी लढत होत असल्याची टीका कुमार शिंदे यांनी केली आहे
बाईट - कुमार शिंदे (शिवसेना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार)
विओ 2- या शिवसेनेच्या पॅनल ला राष्ट्रवादीचे आव्हान आहे. वाई मतदारसंघात महाबळेश्वर नगरपालिका येत असल्याने ती ताब्यात घेण्यासाठी वाईचे विद्यमान आमदार आणि मंत्री मकरंद पाटील यांनी देखील आपली ताकद लावली आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील शिंदे यांना विश्वास आहे ते आणि त्याचे पॅनल निवडून येईल
बाईट - सुनील शिंदे (राष्ट्रवादी उमेदवार)
विओ 3- एकूणच या बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने जिल्हा बरोबर राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SRSHRIKANT RAUT
FollowNov 26, 2025 10:52:560
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 26, 2025 10:51:060
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 26, 2025 10:50:380
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 26, 2025 10:46:03116
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 26, 2025 10:41:0078
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 26, 2025 10:39:1761
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 26, 2025 10:34:3492
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 26, 2025 10:34:1260
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 26, 2025 10:33:0273
Report
SNSWATI NAIK
FollowNov 26, 2025 10:21:59140
Report
KJKunal Jamdade
FollowNov 26, 2025 10:21:3492
Report
AKAMAR KANE
FollowNov 26, 2025 10:20:50111
Report
KJKunal Jamdade
FollowNov 26, 2025 10:20:2387
Report
SNSWATI NAIK
FollowNov 26, 2025 10:19:4677
Report