Back
सातारा में गैस-ईंधन संकट के खिलाफ महाविकास आघाडी का केंद्र-राज्य सरकार विरोधी बड़ा प्रदर्शन
TTTUSHAR TAPASE
Mar 13, 2026 13:03:10
Satara, Maharashtra
साताऱ्यात गॅस दरवाढ आणि इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने आज साताऱ्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुली पेटवून हातात ताट वाजवत निषेध नोंदवण्यात आला.या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट, मनसे तसेच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. आंदोलकांनी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र घोषणाबाजी करत गॅस दरवाढ आणि तुटवड्याचा निषेध केला.यावेळी आंदोलकांनी आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतात गॅस आणि इंधन टंचाई निर्माण होत असल्याचा आरोप करत युद्ध होणार असल्याची माहिती असतानाही केंद्र सरकारने कोणतीही पूर्वतयारी का केली नाही असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.तसेच केंद्र सरकारने उज्ज्वला योजना आणली असली तर वाढत्या गॅस दरांमुळे महिलांना पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली नसती अशी टीका आंदोलकांनी केली. केंद्र सरकारच्या निर्णयांमुळे जनतेत तीव्र नाराजी निर्माण होत असून याचा जनआक्रोश होईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.यावेळी राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचाही निषेध करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowMar 13, 2026 14:20:350
Report
ABATISH BHOIR
FollowMar 13, 2026 12:48:46143
Report
ABATISH BHOIR
FollowMar 13, 2026 12:48:08173
Report
SNSWATI NAIK
FollowMar 13, 2026 12:21:07196
Report
PNPratap Naik1
FollowMar 13, 2026 12:02:48184
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 13, 2026 11:52:43153
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 13, 2026 11:52:24117
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 13, 2026 11:50:1072
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 13, 2026 11:34:23167
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 13, 2026 11:19:51142
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 13, 2026 11:06:49Ambernath, Maharashtra:बदलापुरात महिलांच्या सुरक्षेसाठी "दामिनी पथका"ची स्थापना
उपनगराध्यक्षांनी दिल्या दामिनी पथकाला दोन दुचाकी
बदलापूर पोलीस ठाण्यात मुलांसाठी तक्रार निवारण कक्ष
121
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 13, 2026 11:06:30185
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 13, 2026 11:05:43116
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 13, 2026 10:49:38133
Report