Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Satara415001

महाबळेश्वर में अचानक बारिश से पर्यटन प्रभावित, राहगीरों को परेशानी

TTTUSHAR TAPASE
Mar 26, 2026 15:03:05
Satara, Maharashtra
सातारा - मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वाढलेल्या उकाड्यानंतर पर्यटननगरी महाबळेश्वरमध्ये सायंकाळी अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सायंकाळी सातच्या सुमारास पडलेल्या मुसळधार पावसामुळे अवघे महाबळेश्वर थंडगार झाले, मात्र या अचानक आलेल्या पावसामुळे पर्यटकांची आणि नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. उन्हाळी हंगामाच्या सुरुवातीला पर्यटनासाठी मोठ्या संख्येने महाबळेश्वरमध्ये दाखल झालेल्या पर्यटकांना या अवकाळी पावसाचा अनपेक्षित सामना करावा लागला. सायंकाळी सुमारे एक तास कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन काही काळासाठी विस्कळीत झाले. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला, तर अचानक बदललेल्या वातावरणामुळे परिसरात गारवा पसरला.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
APAMOL PEDNEKAR
Mar 26, 2026 15:48:26
Mumbai, Maharashtra:घाटकोपरमध्ये मराठी मुलीचा पगार प्रिया अय्यर या कंपनीच्या मालकाने पगार न दिल्याने मनसे आक्रमक अखेर पगार मुलीच्या खात्यात मुलीने राज ठाकरेंचे मानले आभार घाटकोपरमध्ये मराठी मुलीचा पगार अय्यर या कंपनीच्या मालकाने थकवला मनसेच्या ठिय्या आंदोलनानंतर मुलीच्या खात्यात पगार मुलीच्या कुटुंबाने राज ठाकरेंची मानले आभार घाटकोपरमधील Cerabrus Consulting कंपनीत काम करणाऱ्या मराठी मुलीचा पगार थकवण्यात आल्याचा प्रकार उघड झाला. वारंवार पाठपुरावा करूनही कंपनीकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने कुटुंबीयांनी मनसेकडे धाव घेतली. यानंतर मनसे कामगार सेनेचे पदाधिकारी अनिश खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली कंपनीत ठिय्या आंदोलन करण्यात आले. मनसेच्या आक्रमक पवित्र्यामुळे कंपनी व्यवस्थापनाला अखेर माघार घ्यावी लागली आणि मुलीच्या खात्यात संपूर्ण थकीत पगार जमा करण्यात आला. यानंतर संबंधित मुलीने राज ठाकरे यांचे आभार मानले.
1014
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Mar 26, 2026 15:17:44
Ambernath, Maharashtra:पेट्रोल तुटवड्याच्या अफवांमुळे पेट्रोल पंपावर वाहनचालकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतायत. अंबरनाथमध्ये अशाच एका वाहनचालकाने टाकी फुल केली, पण त्यामुळे चक्क त्याची दुचाकी जळून खाक झाली. अंबरनाथाच्या सारंग पोळके यांनी गुरुवारी दुपारी कामावरून येताना दुचाकीत टाकी फुल होईपर्यंत पेट्रोल भरलं. यानंतर हे हायवेने अंबरनाथमध्ये आले असता नवरेनगर बस स्टॉपजवळ त्यांच्या गाडीला अचानक आग लागली. यावेळी त्यांनी स्थानिकांकडून पाणी घेऊन आग विझवण्याचाही प्रयत्न केला, पण गाडीत टाकी भरून पेट्रोल असल्यामुळे त्यांच्या प्रयत्न निष्फळ ठरले. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून तापमानात चांगलीच वाढ झालीये. अशावेळी पेट्रोल तुटवड्याच्या अफवांनी टाकी फुल्ल केल्यामुळे उष्णता निर्माण होऊन ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र या घटनेनंतर नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता आपली आणि आपल्या वाहनांची काळजी घेणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त होतंय.
972
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 26, 2026 14:33:28
Kalyan, Maharashtra:कल्याण मध्ये रामनवमीनिमित्त भव्य रॅलीचे आयोजन हिंदुत्ववादी संघटनांसह शिवसेना भाजपा पदाधिकारी लोकप्रतिनिधी सहभागी. राम नवमी निमित्त आज कल्याण मध्ये भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीमध्ये नागरिक पारंपारिक वेशभूषेत सहभागी झाले होते संपूर्ण कल्याण भरामध्ये आज भगवे झेंडे लावून रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली या रॅलीमध्ये हिंदुत्ववादी संघटनांसह नागरिक भाजप शिवसेनेचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी देखील सहभागी झाले होते . दुर्गा माता चौक येथून भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेमध्ये ढोल लेझीम पथक , श्रीराम सीता लक्ष्मण , हनुमान, छत्रपती शिवाजी महाराज राणी लक्ष्मीबाई वेशभूषित बालगोपाल सहभागी झाल्याच्या पाहायला मिळालं
1028
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 26, 2026 13:46:12
966
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 26, 2026 12:18:57
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:पेट्रोल पंपांवरील वाढती गर्दी लक्षात घेता प्रशासनाचा मोठा निर्णय ANC : छत्रपती संभाजीनगर शहरात पेट्रोल पंपांवर वाढलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पुरवठा विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी घाबरून मोठ्या प्रमाणात इंधन साठवण्याचा प्रयत्न केल्याने काही ठिकाणी तात्पुरती टंचाई निर्माण झालेले चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने दुचाकी वाहनांना जास्तीत जास्त २०० रुपयांचे आणि चारचाकी वाहनांना २ हजार रुपयांपर्यंतच इंधन देण्याचे आदेश पेट्रोल पंप चालकांना दिले आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता आवश्यकतेनुसारच इंधन भरावे, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
1048
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 26, 2026 12:18:42
Nagpur, Maharashtra:देवेंद्र फडणवीस\n\n प्रभू श्रीरामांच्या या पवित्र रामनवमीच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो... मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांनी भारतीय जीवन पद्धतीमध्ये मर्यादेचं महत्त्व शिकवल आहे. नागपुरातील ही शोभायात्रा देशातील आगळी- वेगळी असते.. भव्य असते आणि मी नेहमी सहभागी होत असतो... शोभायात्रेचे तेज वाढत आहे.. सहभाग पण वाढत आहे..\n\n\n(on petrol -डिझेल रांग )\n-- मी महाराष्ट्रातील तमाम जनतेला विनंती करतो... केंद्र सरकारने आपल्याकडे पुरेसं पेट्रोल डिझेल असल्याच सांगल्यानंतरही विनाकारण लोक अधिकच पेट्रोल घेताय... त्यामुळे टंचाई निर्माण होते... डिमांड आणि सप्लाय याच्यावर स्ट्रेस येतो.. आपल्याकडे महिन्याला जो स्टॉक लागतो तो आपल्या देशाकडे आहे... पेट्रोल पंपावर कोणी काळाबाजार करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल...\n\n-- केंद्र सरकारने आपल्याकडे भरपूर खताचा साठा असल्याचे सांगितले आहे.. काही लोक त्याची काळाबाजार करण्याचा प्रयत्न करत आहे... आम्ही आढावा घेतल्यानंतर गेल्या तीन दिवसात DAP खपत 70% ने वाढली आहे... पुरेसा साठा आहे .या बाबतीत पॅनिक खरेदी होत आहे... पुरवठादार जे आहेत त्यांनी देखील या ठिकाणी होल्डिंग करून शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर कडक कारवाई करून फौजदारी कारवाईचा इशारा देत आहे \n..
1083
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Mar 26, 2026 12:06:44
Pune, Maharashtra:Anchor: कार्ला आई एकवीरेंच्या चैत्री यात्रेला गालबोट लागले असून, काल मध्यरात्रीच्या सुमारास दोन गटात राडा झाला होता. यावेळी दगडफेक ही झाली होती, परंतु ते प्रकरण मिटत नाही तोच पुन्हा वाद उफाळून आला असून पुन्हा एकदा काही हुल्लडबाज भाविकांनी दगडफेक करून गडावरील काही गवताळ भागाला आग लावली असून त्यामुळे कार्ला एकविरा यात्रेला गालबोट लागल्याचं दिसून आले..तर स्थानिक कार्ला वेहेरगाव ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनावर नाराजी व्यक्त केली..तर एक तासाने होमगार्ड घटनास्थळी दाखल झाले. मात्र होमगार्ड चे कोणीही ऐकण्यास तयार नसल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.
1005
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 26, 2026 11:20:11
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : गारपीटमुळे मोहोळ तालुक्यातील पापरी गावात द्राक्षबागेचे मोठे नुकसान - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील गारपीटीमुळे मोठे नुकसान - मोहोळ तालुक्यातील पापरी गावात द्राक्षबागेचे मोठे नुकसान - गारपीटीने द्राक्षाचे घड जमिनीवर पडल्याने नुकसान - काल रात्री गारपीट आणि वाऱ्यासह मोठा पाऊस आला. - त्यामुळे काढणी सुरु असलेली द्राक्षबाग पूर्णपणे वाया गेलीय. - आम्ही एकरी 2 लाख प्रमाणे 7 एकरावर द्राक्षबाग केली होती. - त्यातून 50 ते 60 लाख उत्पन्न अपेक्षित होते मात्र आता हे सर्व नुकसान झालेय. - लवकरात लवकर पंचनामा करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना कराव्यात अशी विनंती केली
977
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 26, 2026 11:01:45
Akola, Maharashtra:अकोल्यावरून मलकापूरच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसमध्ये आज एक धक्कादायक घटना घडली. प्रवासादरम्यान अचानक एका वृद्ध प्रवाशाला भोवळ येऊन ते बसमध्येच कोसळले. या घटनेमुळे बसमधील प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली होती.दरम्यान, बस चालकाने प्रसंगावधान दाखवत बस थेट अकोळयातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयाच्या आवारात नेली. मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर संबंधित वृद्धाचा उपचार होण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे समोर आले.मृत वृद्धाचे नाव एकनाथ तात्या पवार असून त्यांचे वय अंदाजे ९० वर्षे असल्याची माहिती मिळत आहे. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे बसमधील प्रवासी हादरले होते, तर रुग्णालय प्रशासनाकडूनही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
1094
comment0
Report
Advertisement
Back to top