Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Satara415001

अजित पवार ने पुणे जमीन घोटाले पर साफ कहा, मेरे संबंध नहीं

TTTUSHAR TAPASE
Nov 10, 2025 01:46:35
Satara, Maharashtra
सातारा - साताऱ्यातील रहिमतपूर येथे झालेल्या सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मला वेगवेगळ्या कारणावर टार्गेट केलं जातं मला त्याबद्दल काही माहित नव्हतं असं सांगत पुन्हा एकदा पुणे जमीन घोटाळा प्रकरणावर वक्तव्य केलं आहे. मी सकाळी सहाला कामाला लागतोय रात्री दहा वाजता घरी जातोय त्यामुळे मला काही माहित नाहीये. नंतर मी माहिती घेतली त्यात काही व्यवहार झाला नाही एक रुपया कोणाला दिला नाही कुणाकडून घेतला नाही. त्याच बरोबर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घातले असून तिघांच्या वर गुन्हा दाखल झालाय असं सांगत या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.
13
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SGSagar Gaikwad
Nov 10, 2025 03:31:35
Nashik, Maharashtra:महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांची तारीख जाहीर करण्यात आली असून तिची पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. कॉपी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असून त्या दृष्टीने यंदा कडक परिस्थिती असेल, असे संकेतही देण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्यात सुमारे २५० केंद्रांवर दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेतल्या जातात. परीक्षा केंद्रावर सामूहिक कॉपी करताना आढळल्यास संबंधित परीक्षा केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्यात येणार आहे. यंदा प्रथमच शाळेबाहेर ड्रोनचाही वापर करण्यात येणार आहे. दहावी-बारावीची परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी यंदाही सरमिसळ पद्धत असणार आहे. गतवर्षी ज्या परीक्षा केंद्रांवर कॉपीचे प्रकार घडले, त्यांची मान्यता रद्द केली जाणार आहे. त्यावेळी सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे वेळेत शक्य नव्हते. त्यामुळे पर्यवेक्षकांचे मोबाइल कॅमेरे सुरू करून त्या निगराणीखाली परीक्षा पार पडली होती. जिल्ह्यात दुर्गम भागातील काही परीक्षा केंद्र संवेदनशील आहेत. ज्या केंद्रांवर सातत्याने कॉपी केसेस होत असतात त्या केंद्रांना अतिसंवेदनशील केंद्रांच्या यादीत ठेवण्यात आले आहे. अशा केंद्रांबाहेर आता ड्रोनची नजर ठेवण्यात येणार आहे...
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Nov 10, 2025 03:21:23
Nashik, Maharashtra:जिल्ह्यात २६२ पदांसाठी भरती जिल्ह्यात २६२ पदांसाठी भरती नाशिक ग्रामीण पोलिस दलात २१० पोलिस शिपाई, ५२ वाहनचालक अशा एकूण २६२ रिक्त पदांची, तर कारागृह दलात स्वतंत्ररीत्या ११८ शिपायांची भरती करण्यात येणार आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, ३० तारखेपर्यंत त्याची मुदत असणार आहे...राज्याच्या गृह खात्याकडून महाराष्ट्र पोलिस दलामध्ये १५ हजार पदांपेक्षा जास्त रिक्त जागांवर भरतीची घोषणा करण्यात आली. यानंतर भरती प्रक्रियेला सर्वच जिल्ह्यांमध्ये वेग आला आहे. नाशिक ग्रामीण पोलिस दलासह कारागृह दलाकडून विविध संवर्गातील रिक्त पदांकरिता अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याबाबतची सविस्तर माहिती महाराष्ट्र पोलिसांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे... गुणांची शारीरिक मैदानी चाचणी, तर १०० गुणांच्या लेखी परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. मैदानी चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवार एकास दहा या प्रमाणानुसार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरणार आहेत...
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Nov 10, 2025 03:19:16
Ratnagiri, Maharashtra:अज्ञात वाहनाच्या धडकेने जखमी होऊन झुडपात आडोशाला बसून राहिलेल्या बिबट्याला वनविभागाने पिंजऱ्यामध्ये जेरबंद केलं. या बिबट्याला पुणे येथे अधिक उपचारांसाठी पाठविण्यात येणार असल्याचं वनविभागाकडून सांगण्यात आलं. ही घटना लांजा तालुक्यातील केळंबे येथे घडली. वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार केळंबे येथील सुधा-विष्णूनगर येथे जखमी अवस्थेत बिबट्या मुख्य रस्त्यापासून १०० मीटर अंतरावर एका झुडपात लपून बसलेला होता. हा बिबट्या मादी जातीचा असून, दोन वर्षांचा आहे. त्याच्या मागील दोन पायांना गंभीर दुखापत झालेली होती. त्यामुळे त्याला चालता येत नव्हतं. जखमी अवस्थेतील या बिबट्यावर सुरुवातीला जाळी फेकण्यात आली. त्यानंतर बिबट्याला पकडून पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आलं.
2
comment0
Report
SKSudarshan Khillare
Nov 10, 2025 03:19:02
Niphad, Maharashtra:निफाड ब्रेकिंग न्यूज फ्लॅश नाशिकच्या ग्रामीण भागात कडाक्याची थंडी वाढली असून तापमानात मोठी घसरण नोंदवली गेली आहे. आज पहाटे निफाड परिसरात पाऱ्याने 9.5 अंश सेल्सिअस इतकी खाली घसरण केली. थंडीचा जोर वाढत असल्याने नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न केला. अनेक ठिकाणी सकाळपासूनच धुक्याचे प्रमाण देखील वाढले आहे. तापमानातील घट लक्षात घेता नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, आगामी 24 ते 48 तासात थंडीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नाशिक ग्रामीण भागात थंडीचा कडाका जाणवत असल्याने नागरिकांनी उबदार कपड्यांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
3
comment0
Report
SGSagar Gaikwad
Nov 10, 2025 03:18:48
Nashik, Maharashtra:महापालिका प्रभाग आरक्षण सोडत उद्या जाहीर होणार अँकर नाशिक महापालिकेची प्रभाग आरक्षण सोडत उद्या सकाळी १० वाजता कालिदास कलामंदिरात जाहीर होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज सकाळी १० वाजता कालिदास कला मंदिरात आरक्षण सोडतीसाठी रंगीत तालीम घेण्यात येणार आहे. याबाबत मनपाच्या निवडणूक शाखेने तयारी केली आहे. २० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलीये...राज्य निवडणूक आयोगाने महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी आरक्षण निश्चिती व सोडत कार्यक्रमाची घोषणा केली आहे. ३३ जागांवर ओबीसी, तर ६१ जागा महिलांसाठी राखीव करण्यात येणार आहे.आरक्षण ठरविताना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी जागांचे चक्रानुक्रमे फिरते आरक्षण लागू करण्यात येणार आहे. या प्रक्रियेत प्रारूप आरक्षण जाहीर होणार आहे...
2
comment0
Report
SGSagar Gaikwad
Nov 10, 2025 03:18:29
Nashik, Maharashtra:महापालिका प्रभाग आरक्षण सोडत उद्या जाहीर होणार नाशिक महापालिकेची प्रभाग आरक्षण सोडत उद्या सकाळी १० वाजता कालिदास कलामंदिरात जाहीर होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज सकाळी १० वाजता कालिदास कला मंदिरात आरक्षण सोडतीसाठी रंगीत तालीम घेण्यात येणार आहे. याबाबत मनपाच्या निवडणूक शाखेने तयारी केली आहे. २० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलीये.राज्य निवडणूक आयोगाने महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी आरक्षण निश्चिती व सोडत कार्यक्रमाची घोषणा केली आहे. ३३ जागांवर ओबीसी, तर ६१ जागा महिलांसाठी राखीव करण्यात येणार आहे.आरक्षण ठरविताना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी जागांचे चक्रानुक्रमे फिरते आरक्षण लागू करण्यात येणार आहे. या प्रक्रियेत प्रारूप आरक्षण जाहीर होणार आहे...
3
comment0
Report
SKSACHIN KASABE
Nov 10, 2025 03:16:08
Pandharpur, Maharashtra:Anchor - पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे माजी आमदार परिचारक यांच्या समोर विरोधी पक्षाचे नेते एकत्र येऊन आघाडी करून आव्हान देण्याच्या तयारीत असल्याने चुरस निर्माण होणार आहे. सर्वसाधारण महिलेसाठी नगराध्यक्ष पद राखीव आहे. यामुळे सलग साडे सात वर्ष नगराध्यक्ष पद भूषवलेल्या सौ साधनाताई नागेश भोसले यांनी कामाच्या जोरावर पुन्हा नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढण्याची घोषणा केल्याने इतर दोन्ही आघाडी पुढे पेच निर्माण झाला आहे. भोसले यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी भाजप अथवा तिसऱ्या आघाडीचा प्रयोग करुन नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढण्यावर माजी नगराध्यक्षा साधनाताई भोसले ठाम आहेत. भोसले यांची उमेदवारी अनेकांची डोकेदुखी वाढवणार आहे. तर परिचारक विरोधी आघाडीने माजी आमदार भारत भालके यांच्या सुनबाई डॉ प्रणिता भालके यांची उमेदवारी नगराध्यक्ष पदासाठी निश्चित केली आहे. परिचारक गट मात्र भाजप की आघाडी याचा निर्णय झाल्यानंतर त्यांचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर करेल अशी शक्यता आहे.
4
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Nov 10, 2025 03:00:50
3
comment0
Report
Advertisement
Back to top