Back
उरुण ईश्वरपूर चुनाव में महायुती बनाम राष्ट्रवादी शरद पवार के बीच धमकी-वार विवाद
SMSarfaraj Musa
Nov 27, 2025 01:34:38
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
सांगलीच्या उरूण-ईश्वरपूर नगरपरिषदेच्या निवडणुकी दरम्यान हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारांना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे, तर विरोधकांना पराभव दिसत असल्याने खोटा आरोप केल्याचं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.दरम्यान तर याप्रकरणी दोन्ही गटाच्या तक्रारी दाखल करण्यात येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे।
सांगलीच्या ईश्वरपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवारचे आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात महायुतीचे सर्व घटक पक्ष आणि इतर विरोधक एकत्र येत निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे अत्यंत चुरशीने ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या प्रचार दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात उमेदवारांमध्ये जोरदार वादावादीचा प्रकार घडला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार शकील सय्यद आणि गीता बेलवलकर यांच्याकडून प्रभाग क्रमांक तीन मध्ये प्रचार सुरू असताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार खंडेराव जाधव यांच्या कार्यकर्त्यांकडून प्रचार थांबवत, जातिवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगरसेवक शकील सय्यद यांनी केलाय.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार खंडेराव जाधव यांनी महायुतीच्या सर्व नेत्यांचे आरोप फेटाळून लावत,जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आल्यामुळे आक्षेप घेतल्यावर हा प्रकार घडला,मात्र याला महायुतीकडून जातीय रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला,सदर प्रकरणी निवडणूक आयोगाकडे आपण तक्रार दाखल केल्याचं खंडेराव जाधव यांनी स्पष्ट केलंय.
निवडणुकीचा प्रचार दरम्यान घडलेल्या या वादाच्या प्रकारामुळे ऊरुण ईश्वरपूर मध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 27, 2025 02:01:020
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 27, 2025 02:00:430
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 27, 2025 02:00:250
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 27, 2025 01:35:11132
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 27, 2025 01:34:51115
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 27, 2025 01:32:4095
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 27, 2025 01:32:17176
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 27, 2025 01:31:31145
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 27, 2025 01:30:59160
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 26, 2025 17:32:4295
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 26, 2025 17:04:23Khed, Maharashtra:पुणे-नाशिक मार्ग पर पेठ बासपास के पास चार वाहन दुर्घटना, ट्रक ब्रेक फेल से टेम्पो टायर फट कर दो कारें भिड़ीं, चार घायल
150
Report
SNSWATI NAIK
FollowNov 26, 2025 15:46:58125
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 26, 2025 15:32:09136
Report
SNSWATI NAIK
FollowNov 26, 2025 15:31:41156
Report