Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

सांगली: भाजप प्रत्याशी दंपती ने विधायक कार्यालय में ठिय्या मारकर उमेदवारी की मांग की

SMSarfaraj Musa
Dec 27, 2025 10:54:53
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
सांगली महापालिका निवडणुकीत भाजपाच्या निष्ठावंतांना डावलण्यात जातय असे चित्र निर्माण झालंय,त्यामुळे भाजपाचे इच्छुक उमेदवार अस्वस्थ झाले आहेत. यातून एका इच्छुक उमेदवार दाम्पत्याने थेट भाजपा आमदार सुधीर गाडगीळ यांचे कार्यालय गाठत ठिय्या मारला.भाजपाचे पदाधिकारी असणारे दीपक माने यांनी त्यांच्या पत्नीसह आमदार सुधीर गाडगीळ यांच्या दालनामध्ये ठिय्या मारला होता.पक्षासाठी खस्ता खाऊन देखील ऐनवेळी उमेदवारी डावलण्यात येत असल्याची भावना निर्माण झाली असून विद्यमान आमदारांकडून याबाबत कोणती स्पष्ट करण दिले जात नसल्याचा आरोप यावेळी दीपक माने यांनी केला आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
LBLAILESH BARGAJE
Dec 27, 2025 12:53:03
Pune, Maharashtra:जयकुमार गोरे ऑन शंभूराज देसाई साताऱ्यात महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये चांगलाच कलगीतुरा पाहायला मिळाला होता... नाद आणि दहशत या दोन शब्दांवरून मंत्री जयकुमार गोरे आणि मंत्री शंभूराजे यांच्यात वाक्ययुद्ध पहायला मिळालं होतं... शंभूराजे देसाई यांनी बोलताना म्हटलं होतं की आम्ही कोणाचीही दहशत खपवून घेणार नाही...दरम्यान आज ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे अहिल्यानगर दौऱ्यावर असताना मंत्री गोरे यांनी शंभूराजे देसाई यांना प्रतिउत्तर दिलं आहे...मंत्री देसाई यांना दहशत नेमकी कोणाची आहे हे चांगलं माहित आहे...ते माझे सहकारी आणि मित्र आहेत...दहशत त्यांनाही चालत नाही आणि म्हणालाही चालत नाही असं गोरे म्हणाले.
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Dec 27, 2025 11:52:22
Dharashiv, Maharashtra:धाराशीवचे खासदार ओमराजे निंबाळकर पायी साल्हेरच्या किल्ल्यावर प्रसिद्ध शिवव्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे यांच्या शुभहस्ते मला “सह्याद्री भूषण” पुरस्कार प्रदान करण्यात आला. साल्हेर किल्ला केवळ उंचीचा नाही, तो शौर्य, स्वाभिमान आणि स्वराज्याच्या इतिहासाचा सर्वोच्च शिखर, ओमराजे निंबाळकर यांची फेसबुक पोस्ट मधून व्यक्त केली भावना. हिंदवी परिवार महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित हिवाळी मोहीम अंतर्गत महाराष्ट्रातील सर्वोच्च आणि ऐतिहासिक असा साल्हेर किल्ला पायी सर करण्याचा सुवर्णक्षणाचा साक्षीदार होण्याचा मान मला लाभला. सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांतून चालताना प्रत्येक पाऊल इतिहासाशी संवाद साधत होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गडावर उभं राहिल्यावर मन अभिमानाने भरून आलं आणि स्वराज्याची जाणीव अधिक गडद झाली. शारीरिक थकवा होता, पण मन मात्र उंच आकाशाला गवसणी घालत होतं. या ऐतिहासिक मोहिमेला विशेष अर्थ प्राप्त झाला, जेव्हा प्रसिद्ध शिवव्याख्याते व शिवचरित्रकार डॉ. शिवरत्न शेटे यांच्या शुभहस्ते मला “सह्याद्री भूषण” पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सन्मान वैयक्तिक नसून शिवविचार, सह्याद्री आणि इतिहासावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताचा आहे. हा पुरस्कार जबाबदारीची जाणीव करून देणारा आणि शिवरायांचा इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प दृढ करणारा आहे. साल्हेर किल्ला | थोडक्यात माहिती • महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला • उंची : सुमारे १५६७ मीटर (समुद्रसपाटीपासून) • जिल्हा : नाशिक • परिसर : बागलाण – साल्हेर–मुल्हेर डोंगररांग • ऐतिहासिक महत्त्व : इ.स. १६७२ मधील साल्हेरची लढाई — छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल सैन्यावर मिळवलेला निर्णायक विजय • वैशिष्ट्ये : विशाल पठार, पाण्याच्या टाक्या, प्राचीन अवशेष • साल्हेर–मुल्हेर ही किल्ल्यांची जोडी सह्याद्रीतील अत्यंत महत्त्वाची मानली जाते साल्हेर किल्ला केवळ उंचीचा नाही, तो शौर्य, स्वाभिमान आणि स्वराज्याच्या इतिहासाचा सर्वोच्च शिखर आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 27, 2025 11:51:52
kolhapur, Maharashtra:नागपूर - उमरेड शहरातील गाणगापूर परिसरात आई आणि मुलीची क्षुल्लक कारणातून हत्या, - पार्वताबाई फुकट अस वयोरुद्ध महिलेच तर संगीता रिठे असं मृतक मुलीचे नाव आहे. - गाणगापूर शिवारात माय- लेकी नाल्याला लागून असलेल्या घरामध्ये राहत होत्या, - पार्ववतीबाई यांनी एका व्यक्तीला शिवीगाळ केली त्यामुळे संतापून रागाचा भरात दोघीना लाकडी दांड्याने मारहाण केली. यात दोघीचा मृत्यू झाला. - संगीता रिठे हिचा विवाह शेगाव येथे झाला होता. पतीच्या मृत्यूनंतर ती आई जवळच राहत होती. - लाकडी दांडा नदीकाठवर फेकला, या घटनेने परिसरात खळबळ उडल्यानं मोठया प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. - उमरेड पोलिसांनी एकाला संशयाचा आधारावर ताब्यात घेतल आहे.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Dec 27, 2025 11:32:25
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ मध्ये ठाकरे कश शिवसेनेमधील दोन गटात तुफान राडा झाला आहे. नगर परिषद निवडणुकीदरम्यान पक्षातून हकालपट्टी झालेले विधानसभा प्रमुख संतोष ढवळे यांनी निवडणुकीतील पराभवास खासदार संजय देशमुख हे जबाबदार असल्याचा ठपका ठेवला आहे. ५८ पैकी एकही जागा शिवसेनेला जिंकता आली नाही. यामागे खासदार संजय देशमुख यांची निष्क्रिय भूमिका जबाबदार असल्याचा आरोप करीत ढवळे यांनी खासदार देशमुख यांच्या सत्काराचे आयोजन केले होते. दरम्यान या सत्काराच्या ठिकाणी शिवसेना उभाठाचे जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड, जिल्हा प्रमुख किशोर इंगळे शिवसैनिकांसह लाठ्या काठ्या घेऊन पोहोचले. त्यामुळे दोन्ही गट आमने-सामने आल्याने त्यांच्यात बाचाबाची, धक्काबुक्कीसह तुफान राडा झाला. शिवसैनिकांनी सत्काराचा हा कार्यक्रम उधळून लावला. यावेळी टेबल ची तोडफोड करण्यात आली. शिवाय खासदारांचे बॅनर काढून नेण्यात आले. बाईट : राजेंद्र गायकवाड : संतोष ढवळे
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 27, 2025 11:32:08
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकरी यंदा मोठ्या अडचणीत सापडले आहेत. पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पपईच्या बागांची अपेक्षेप्रमाणे वाढ होऊ शकली नाही. अनेक ठिकाणी पपईची झाडे पिवळी पडली असून फळधारणा मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. त्याचबरोबर रोगराईचाही प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून येत आहे. या प्रतिकूल परिस्थितीमुळे पपईच्या उत्पादनात सुमारे ६० ते ७० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत. पपई पिकासाठी खत,औषधे आणि मजुरीवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला होता. मात्र,अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या हाती अपेक्षित उत्पन्न आलेले नाही. सध्या बाजारात पपईला दर चांगले मिळत असले तरी उत्पादन अत्यल्प असल्याने त्याचा फारसा फायदा शेतकऱ्यांना होत नाही. परिणामी अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 27, 2025 11:31:11
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर मध्ये युती साठी शिवसेना भाजप मध्ये चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच आहे, पालकमंत्री संजय शिरसाठ आणि मंत्री अतुल सावे और दोन्ही पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या पाच तास मॅरेथॉन बैठकीत अजूनही काही जागाबाबत तिढा कायम आहे.. 90% पर्यंत बोलणं पूर्ण झालं मात्र उर्वरित आठ ते दहा जागांंबाबत चंद्रशेखर बावनकुळे एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवण्यात आलेला असल्याचं मंत्री संजय शिरसाठ यांनी सांगितलं आणि त्यानंतर वरून जो निर्णय येईल त्यानुसार आम्ही युतीची घोषणा करू, पुढील एक तासात सर्व चित्र स्पष्ट होईल अजून युती झाली नाही मात्र आम्ही युतीसाठी आग्रही असल्याचेही संजय शिरसाठ यांनी सांगितलं.. त्यामुळे पाच तास चाललेल्या मॅरेथॉन बैठकीत अजूनही पूर्णपणे अंतिम तोडगा निघाला नाही असंच म्हणता येईल... ( बातमी इनसाइड 2 प्रभागांवर दोन्ही पक्षाचा दावा आहे, यातील 8 जागांवर दोन्ही पक्ष ठाम आहे या बाबत वाद ही झालेत मात्र तोडगा नाही त्यामुळं हे हा वाद मुंबई पर्यंत गेलाय...)
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Dec 27, 2025 11:04:31
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Dec 27, 2025 09:47:13
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का दोन माजी महापौऱ्याचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश... कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश... राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या मेळाव्यात दत्तामामा भरणे यांच्या उपस्थितीत माजी महापौरासह इतर पक्षातील नेत्यांचा केला प्रवेश माजी महापौर यू एन बेरिया आणि माजी महापौर नलिनी चंदेले यांचा सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश...
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 27, 2025 09:47:01
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Dec 27, 2025 09:46:49
Pandharpur, Maharashtra:मुंबई मध्ये महायुती सत्तेत येईल आणि महापौर भाजपचा होईल. 15 जानेवारी रोजी कळेल घोडा मैदान जवळ आहे. 25 वर्ष ठाकरे सत्तेत होते त्यांनी काय केले. संधीसाधू पना आहे. लोक येतील गर्दी होईल पण मतदान पडणार नाही. असा टोला ठाकरे यांच्या एकत्र येण्याला लगावला आहे बाळासाहेब यांची स्टाईल वापरुन उपयोग नाही. त्यांचे विचार महत्त्वाचे कर्तबगारी महत्वाची, काँग्रेस मांडीवर जाऊन बसले. खुर्ची हव्यास पायी तुम्ही विचारांना तिलांजली दिली. आता बुलेट किंवा घोड्यावर उभे रहा किंवा ट्रक वर काही उपयोग नाही असा टोला ठाकरेना लगावला है पक्ष प्रवेश मुळे नाराजी थोडे दिवस राहणार आहे. कर्तबगार आहेत अशा लोकांना घ्यावे लागते. सध्या काँग्रेस , ठाकरे आणि शरद पवार पक्षात कोणी जात नाही. काँग्रेसचे बालेकिल्ले नेस्तनाबूत झाले आहेत. सोलापूर मध्ये राग थोडा दिवस असेल. दोन्ही देशमुख एकमेक विरोधात होते पण आता ते दोघे पक्ष विरोधात रागावले आहेत. बावनकुळे , मुख्यमंत्री त्यांच्याशी बोलत आहे. त्यांची नाराजी सुरू होईल. उद्धव ठाकरे कसे पंतप्रधान मटेरियल असू शकतात. मुख्यमंत्री असताना घरात बसून होते. त्यांनी कोरोना काळात सचिवालय मंत्रालय पायरी चढली नाही. अजित पवारांनी कुठे जायचे कोणा सोबत किती जागा घ्यायच्या हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे असे म्हणत अजित पवार शरद पवार युतीवरून डिवचले आहे
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Dec 27, 2025 09:46:25
Satara, Maharashtra:सातारा – थंडगार हवा ,गुलाबी थंडीचा त्या बरोबर स्ट्रॉबेरीचा आस्वाद घेण्यासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी नववर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्वर पर्यटकांनी फुलून गेले आहे महाबळેશ्वराची ख्याती जगभर आहे . समुद्र सपाटी पासुन सुमारे ४७०० फुट उंचीवर असलेल हे ठंडगार ठिकाण, सह्याद्रीच्या पर्वत रांगानमधील एक ठिकाण.... हे महाबळेश्वर नवीन वर्षचे स्वागत करण्यासाठी पर्यटकांनी फुलून गेले आहे .नवीन वर्षाच्या स्वागतासाठी संपुर्ण महाबळेश्वर पर्यटकांनी बहरून गेले आहे . कारण महाबळेश्वरची गुलाबी थंडी प्रत्तेकाला भारावुन सोडत आहे .या महाबळेश्वरच्या सौंदर्यत भर टाकणार ठिकाण म्हणजे वेन्ना लेक ज्या ठिकाणी पर्यटक बोटिंग चा आनंद मनमुराद घेत असल्याचं दिसत आहे . त्याच्या सोबतीला स्ट्रॉबेरी आणि कणीस याच्यावरही पर्यटक ताव मारताना दिसत आहेत . नाताळ च्या लागून आलेल्या सुट्ट्याचा आनंद घेण्यासाठी आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटकांचा महाबळेश्वर कडे ओढा वाढलेला दिसत आहे .
0
comment0
Report
Advertisement
Back to top