Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

सांगली बैंक भर्ती: सहकार विभाग ने मंजूरी दी, विपक्ष ने चौकसी तेज की

SMSarfaraj Musa
Oct 04, 2025 11:02:35
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
सांगली ब्रेकिंग - सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरतीला सहकार विभागाची परवानगी. 559 पद भरतीला सहकार खात्याकडुन मिळाली मंजुरी. सहकार विभागाच्या मंजूरीमुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी धक्का ! बँकेच्या गैरकारभार,नोकर भरती आणि भ्रष्टाचार प्रकरणी स्थगित असणारी चौकशी पुन्हा सुरू करण्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपुर्वी केले होते जाहीर. दरम्यान 88 कलमनव्य सुरू असलेली चौकशी पूर्ण झाल्याशिवाय नोकर भरती करू नये,अशी स्वतंत्र भारत पक्ष या शेतकरी संघटनेचे मागणी. अन्यथा आंदोलन करण्याचा स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांचा इशारा. बाईट - सुनील फराटे - जिल्हाध्यक्ष - स्वतंत्र भारत पक्ष, सांगली.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRASHANT PARDESHI
Oct 04, 2025 13:19:29
Dhule, Maharashtra:नंदुरबार जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा बांधावर मंत्री माणिकराव कोकाटे पोहचले. मंत्री माणिकराव कोकाटे आणि आणि भाजप आमदार राजेश पाडवी यांनी पाऊसामुळे नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे आणि भाजप आमदार राजेश पाडवी यांनी आज अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नंदुरबार तालुक्यातील चौपाळे पंचक्रोशीतील भागांचा दौरा करून प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि शासनाकडून तातडीने दिवाळीपूर्वूी मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. नंदুরबार जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत 65 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्याने जिल्हा अतिवृष्टीग्रस्त म्हणून घोषित करण्यात आला आहे. या अतिवृष्टीत पपई, केळी, कापूस तसेच इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सुमारे दोन हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. पंचनामे पूर्ण करून अहवाल शासनाकडे पाठविण्याची प्रक्रिया सुरू असून, शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मदत मिळावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे. ॲड. कोकाटे यांनी स्पष्ट केले की कुठल्याही विमा कंपनीचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. ज्या शेतकऱ्यांनी पिकविमा उतरवला आहे, त्या सर्वांना शासनाकडून मदत मिळणार आहे. त्यांनी पुढे सांगितले की, नंदंबार तालुक्यात सुमारे 20 किलोमीटर परिसरात मोठे नुकसान झाले असून प्रशासन युद्धपातळीवर कार्यरत आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Oct 04, 2025 13:04:01
Kalyan, Maharashtra:डोंबिवलीत ब्लिंकीट रायडर्सचा कामबंद आंदोलन! अतिरिक्त रायडर्स कमी करणे आणि लांब पल्ल्याच्या डिलिव्हरीसाठी योग्य मोबदला मिळावा अशा विविध मागण्या घेऊन रायडर्स आता रस्त्यावर उतरले आहेत. काल संध्याकाळपासून तब्बल 170 रायडर्सनी एकत्र येऊन कामबंद आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनामुळे कंपनीच्या ऑर्डर्सवर मोठा परिणाम झाला असून, मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याची आंदोलनकर्त्यांची भूमिका क्विक डिलिव्हरी सेवा देणाऱ्या 'ब्लिंकिट' कंपनीच्या रायडर्सनी आपल्या विविध मागण्यांसाठी डोंबिवली शहरात मोठे कामबंद आंदोलन सुरू केले आहे. कंपनीच्या सुमारे १७० रायडर्सनी एकत्र येत काल, संध्याकाळपासून सायकली आणि बाईकची चाके थांबवली आहेत. रायडर्सच्या मते, कंपनीने आपल्या कामाच्या धोरणात बदल केले आहेत, ज्यामुळे त्यांच्या उत्पन्नावर थेट परिणाम झाला आहे. प्रामुख्याने कंपनीने गरजेपेक्षा अधिक रायडर्सची भरती केली आहे. यामुळे प्रत्येक रायडरच्या वाट्याला येणाऱ्या ऑर्डर्सची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे, परिणामी त्यांचे दैनंदिन उत्पन्न घटले आहे त्याच बरोबर रायडर्सना लांब पल्ल्याच्या डिलिव्हरीसाठी जुन्या दराप्रमाणे मोबदला दिला जात नाहीये. लांब पल्ल्यासाठी लागणारा वेळ, इंधन खर्च आणि शारीरिक कष्ट याचा विचार करून योग्य मोबदला मिळावा, अशी त्यांची मागणी आहे. सर्वात महत्त्वाची म्हणजे शनिवार आणि रविवारी कंपनी जादा रायडर्स भरती करते, ज्यामुळे त्यांचा रोजीवर परिणाम होतो. तसंच, डोंबिवलीहून माणकोलीसारख्या लांब भागात ऑर्डर देण्यासाठी लागणाऱ्या प्रवासाचा दर अत्यल्प आहे, तो वाढवावा, अशी मागणीही रायडर्सनी केली आहे. सध्या तब्बल 170 रायडर्सनी काम बंद ठेवलं असून, कंपनीच्या तब्बल 500 हून अधिक ऑर्डर्स थांबल्या आहेत. ‘जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही.’ अशी रायडर्सनी स्पष्ट भूमिका घेतली आहे की, या आंदोलनामुळे डोंबिवली पश्चिमेतील ग्राहकांना सेवा ठप्प झाली असून, कंपनीलाही मोठा आर्थिक फटका बसला आहे
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Oct 04, 2025 13:03:43
Washim, Maharashtra:वाशीम: महाराष्ट्र राज्य अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सच्या आदेशानुसार वाशीम जिल्हा पोलिसांनी विशेष मोहिम राबवून २८६ किलो ३५० ग्रॅम गांजाचा नाश केला आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक, अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्स, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी दिनांक १६ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत NDPS कायद्याअंतर्गत नोंद असलेल्या गुन्ह्यांतील अंमली पदार्थांचा नाश करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली वाशीम जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये नोंद असलेल्या १९ NDPS गुन्ह्यांतील एकूण २८६ किलो ३५० ग्रॅम गांजाचा नाश करण्यात आला.
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Oct 04, 2025 13:03:04
0
comment0
Report
AKAMAR KANE
Oct 04, 2025 13:00:56
Nagpur, Maharashtra:नागपुर हवाई अड्डे पर एक सप्ताह में पूरी होने वाली एयर स्ट्रिप को डेढ़ वर्ष तक लटकाकर नागपुर के नागरिकों को लगभग 50 करोड़ रुपये का ठगाने का आरोप एयर पोर्ट ऑथोरिटी पर लगाया गया है, जिसके चलते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ने उनके प्रशासन पर नाराजगी व्यक्त की। गडकरी ने विमानन क्षेत्र में देरी और धीमी गति की आलोचना भी की और कहा कि एयरपोर्ट अथॉरिटी का काम बहुत धीमा है। उन्होंने अम्फिबियस (सी प्लेन) सहित संबंधित कानून बनाने के बारे में भी बात की और कहा कि अगर समय पर कानून नहीं बना तो सरकार उचित कदम उठाने को तैयार है। नागपुर के उदाहरण में कहा गया कि नागपुर हवाई अड्डे की रनवे के निर्माण में डेढ़ वर्ष लगे और नागरिकों को 50 करोड़ रुपये का नुकसान माना गया। उन्होंने निरीक्षण किया और कहा कि समय-सारिणी बदलने, टिकट दरों में बढ़ोतरी और योजनाओं में विलंब के कारण यात्रियों को परेशानी उठानी पड़ी। इस संदर्भ में एअर ट्रैफीक कंट्रोलर गिल्ड ऑफ इंडियाकी दो दिवसीय परिषदा नागपुर में आयोजित की गई।
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Oct 04, 2025 12:34:49
Satara, Maharashtra:रामदास कदम साहेबांना शिवसेना नेते म्हणून जवळून ओळखतो त्यांची काम करण्याची पद्धत आणि बोलण्याची पद्धत ही सडेतोड आहे त्या दिवशी भाषणाच्या ओघात ते बोलून गेले असतील मात्र महानगरपालिकेच्या निवडणुकीचा याचा काही संबंध नाही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीचा सुपडा साफ होणार का महाविकास आघाडीचा होणार हे लवकरच कळेल एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना अनेक काम झाली हे सुद्धा त्यांनी पाहावं. अनिल परब बिथरलेले आहेत म्हणून अशा पद्धतीने ते व्यक्तिगत टीका करतात. अनिल परब यांनी चुकीचं वक्तव्य करून टीका केली याच्यानंतर कारवाई करण्याचे काही संबंध नाही त्यांच्यावर काही पुरावा नाही अशा पद्धतीचे परब आरोप करत आहेत ते बिथरलेले आहेत त्यामुळे ते नाहक व्यक्तिगत टीका करतात समाज अशा ठिकेकडे लक्ष देत नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यू प्रकरणात रामदास कदम यांनी सीआयडी चौकशीची मागणी केली आहे या प्रश्नावर बोलताना शंभूराजे यांनी उत्तर देत हा मोठा विषय आहे याबाबतीत आमच्यासारख्या लहान कार्यकर्त्यांनी बोलणं योग्य नाही पक्षांतर्गत या संदर्भात काही बोलता आलं तर नेत्यांजवळ आम्ही आमची भावना मांडू असं म्हणाले आहेत.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Oct 04, 2025 12:18:21
Nandgaon Rural, Uttar Pradesh:एकीकडे राज्यात ओला दुष्काळ पडला असून,शेतकरी अडचणीत आहे.मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला या सरकारला वेळ नाही. दुसरीकडे सरकार जातीजातीत वाद लावण्यात धन्यता मानत आहे. अशा शब्दात न्याय हक्क यात्रेनिमित्त नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथे झालेल्या सभेत प्रहार संघटनेचे प्रमुख, माजी मंत्री बच्चू कडू यांनी सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली.सरकार ओबीसी विरुद्ध मराठा, धनगर विरुद्ध आदिवासी पडळकर विरुद्ध जयंत पाटील असा वाद तेवत ठेवून शेतकरी मूळ प्रश्नांना बगल देत आहे.यांना श्रीरामाचे नाव घेण्याचा अधिकार नसल्याचा टोलाही बच्चू कडू यांनी लगावला. दरम्यान 28 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी नागपूर प्रहार संघटनेचे आंदोलन होणार आहे.जात पात विसरून शेतकरी म्हणून या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी बच्चू कडू यांनी केले.प्रारंभी जेसीबीमधून बच्चू कडू यांच्यावर पुष्पवृष्टी करून जल्लोषात स्वागत करण्यात आले.
2
comment0
Report
GMGANESH MOHALE
Oct 04, 2025 12:04:16
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Oct 04, 2025 11:49:49
Nanded, Maharashtra:Anchor - तब्बल दहा दिवसानंतर नांदेडच्या गोदावरी नदीला आलेला पुर पूर्णपणे ओसरला आणि नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. 24 सप्टेंबर पासून ते काल 3 ऑक्टोबर पर्यंत सलग गोदावरी नदीला पुर आला होता. जायकवाडी धरणासोबतच विष्णुपुरी प्रकल्पाच्या वरच्या बाजूच्या धरणांचे दरवाजे उघडण्यात आल्याने गोदावरी नदीला पूर आला होता. विष्णुपुरी प्रकल्प निर्माण झाल्यापासून पहिल्यांदाच या प्रकल्पाच्या 18 पैकी 17 दरवाजे उघडण्यात आले होते. तब्बल सहा दिवस प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडून गोदावरी नदीपात्रात अडीच लाख क्युसेक्स प्रति सेकंद प्रमाणे पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्यामुळे नांदेड शहरातील गोदावरी नदीकाठच्या सखल भागामध्ये पुराचे पाणी शिरले होते. श्रावस्ती नगर, सैलाब नगर, दुल्हेशाह रहेमान नगर, पाकिजा नगर, गोवर्धन घाट टेकडी, नावघाट, आसर्जन परिसरातील शेकडो घरे पुराच्या पाण्याखाली आली होती. तब्बल 10 दिवस शेकडो घरे पाण्याखाली आल्याने गोरगरिबांच्या घरातील संसार उपायोगी साहित्याचे प्रचंड नुकसान झाले. पत्राच्या आणि कच्च्या घरांचे नुकसान झाले. आता पुर पूर्ण ओसरल्यानंतर नागरिक आपला संसार पुन्हा सुरळीत करत आहेत. पुरामुळे मोठे नुकसान झाल्याने सरकारने तातडीने आर्थिक मदत करावी अशी विनंती पुरग्रस्त नागरिक करताहेत.
1
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Oct 04, 2025 11:37:41
Yavatmal, Maharashtra:देशातील पाच राज्यांमध्ये बंजारा समाज एसटी प्रवर्गात असून चार राज्यांमध्ये एस.सी. प्रवर्गात बंजारा समाजाचा समावेश आहे. एक दैवत, एक वेशभूषा, एक भाषा असताना महाराष्ट्रात व्हिजएनटी असलेल्या बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे अशी मागणी अखिल भारतीय बंजारा सेवा संघाचे अध्यक्ष डॉक्टर टी सी राठोड यांनी केली आहे. या मागणीसाठी बंजारा बहुल असलेल्या यवतमाळ मध्ये सहा ऑक्टोबरला विराट जन आक्रोश मोर्चा काढणार काढण्यात येणार आहे. त्यासाठी बंजारा आरक्षण कृती समितीचे गठन करण्यात आले आहे, राज्य सरकारमध्ये असलेले बंजारा समाजाचे मंत्री वगळता इतर सर्वपक्षीय बंजारा पुढारी या मोर्चात सहभागी होतील अशी माहिती डॉक्टर टी सी राठोड यांनी दिली.
0
comment0
Report
Dussera 2025
Advertisement
Back to top