Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

इस्लामपुर का नाम बदला: उरुण-ईश्वरपूर हुआ, सदाभाऊ खोत का जल्लोष

SMSarfaraj Musa
Nov 06, 2025 04:17:55
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
अँकर - सदाभाऊ खोत यांच्या प्रयत्नांनाने सांगलीच्या इस्लामपूरचे उरुण-ईश्वरपूर झाले. त्यामुळे मित्र पक्ष व रयत क्रांती संघटनेच्या वतीने फटाके,पेढे,वाद्यांच्या गजरात, फुलांची उधळण करत सदाभाऊ खोत यांचे ईश्वरपूरमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. आमदार सदाभाऊ खोतांनी विधान परिषदेत इस्लामपुरचे नाव बदलुन ईश्वरपूर करण्याची मागणी केली होती. त्यानंतर नामांतरानाच्या प्रक्रियेला वेग आला होता. आमदार गोपीचंद पडळकर व आ.सदाभाऊ खोत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर इस्लामपुरचे उरुण ईश्वरपूर असे नाव झाले आहे. त्यामुळे रयत क्रांती संघटना व मित्र पक्षाचे कार्यकर्त्यांनी सदाभाऊ खोत यांच्या नामांतरण झाल्यानंतर उरुण-ईश्वरपूर मध्ये दाखल झालेल्या आमदार सदाभाऊ खोत यांचे जल्लोशात स्वागत करत आनंदोत्सव साजरा केला आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
UPUmesh Parab
Nov 06, 2025 06:47:50
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 06, 2025 06:36:52
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - लँडिंग करताना विमानाच्या पंखात अडकला पतंगाचा मांजा, सोलापूर विमानतळवरील धक्कादायक घटना पायलटने सतर्कता दाखवत सुरक्षितपणे विमान लँड केला त्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली व विमानतळ परिसरात नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विरोधात गुन्हा नोंदण्यात आलंय बिलाल इब्राहिम शेख असे मांजा विक्री केल्याने गुन्हा दाखल झालेल्या आरोपी व्यक्तीचे नाव आहे काल दुपारी दोनच्या सुमारास मुंबईहुन सोलापूरला विमान आले, यामध्ये एकूण 34 प्रवासी प्रवास करत होते सोलापूर विमानतळाच्या रनवेवर लँड करत असताना विमानाच्या पंखात मांजा अडकल्याचे पायलटच्या लक्षात आलं पायलटने सतर्कता दाखवत सुरक्षितपणे विमान लँड केला त्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली आज सकाळी देखील दोन अल्पवयीन मुलं सुरक्षा भिंतीवरून उडी मारून विमानतळ परिसरात शिरले या दोघांना ही सुरक्षा रक्षकांनी तात्काळ ताब्यात घेत समज दिलीय
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Nov 06, 2025 06:36:12
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी जिल्ह्यातील आंजर्ले समुद्रकिनारी एक धक्कादायक घटना घडली आहे. पर्यटकाने स्टंटबाजी करताना आपली गाडी थेट समुद्रात नेल्याने गाडीला अखेर जलसमाधी मिळाली. ग्रामस्थांच्या माहितीनुसार हा पर्यटक मद्यधुंद अवस्थेत होता. या घटनेनंतर ग्रामस्थांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला पण गाडी पाण्यात बुडाली. दरम्यान, समुद्रकिनाऱ्यावर स्टंटबाजी आणि भरधाव वेगात वाहन चालवण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. समुद्रकिनाऱ्यावर वाहन नेण्यास बंदी असतानाही नियमांचा सर्रास भंग केला जात आहे, त्यामुळे पर्यटनासोबतच नागरिकांच्या सुरक्षेलाही गंभीर धोका निर्माण झाला आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 06, 2025 06:27:22
Solapur, Maharashtra:सολापुर ब्रेकिंग - शरद पवारांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 70 टक्के नव्या चेहऱ्यांना देण्यात येणार संधी - खा. धैर्यशील मोहिते- पाटील - राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा मोहोळ तालुक्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकीत स्वबळावरची तयारी - जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील उमेदवारांच्या निवडीचा फॉर्मुला तयार - शरद पवार यांच्याकडून स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी 70 टक्के नव्या चेहऱ्यांना देण्यात येणार संधी - काहीच नसताना शरद पवार यांच्यासोबत संकटाच्या वेळी पक्षासोबत राहणाऱ्या कार्यकर्त्यांना यावेळेस मिळणार संधी - राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी स्थानिक स्वराज्य निवडणुकी संदर्भातील भूमिका केली स्पष्ट - आमचा एकही पदाधिकारी निवडून नाही आला तरी चालेल तरीपण आम्ही लढा देणार आणि नवीन संधी देणार - राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष, आजी माजी आमदार यांची मिळून एक कमिटी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या उमेदवाऱ्या फायनल करणार आहे - येत्या दिवसात जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर कोर कमिटी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या उमेदवारांना बाबतीत निर्णय घेणार - आमची अट असणार, विद्यमान सरकार विरोधात काम करायचे त्यांनीच आमच्या सोबत यावं - खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी तालुका आणि पदाधिकाऱ्यांना आपली भाण्डणं बंद खोलीत करु, तिथे एकमेकांची कॉलर पकडू मात्र बाहेर येताना एकिनेच बाहेर येण्याचा दिला सल्ला - ज्यांना काम करायची तळमळ आहे अशांनाच पदे मिळणार
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Nov 06, 2025 06:20:29
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 06, 2025 06:19:36
Dhule, Maharashtra:झेंडूच्या फुलांना योग्य भाव मिळत नसल्यामुळे झेंडू उत्पादक शेतकऱ्याला आपल्या एक एकरावरील झेंडू शेतीवर नांगरणी फिरवण्याची वेळ आली आहे. धुळे जिल्ह्यातील शिंगावे येथील युवा शेतकरी मुकुल पाटील दरवर्षी झेंडूचे उत्पादन घेत असतात या वर्षी देखील एक एकरात दोन हजार झेंडूच्या फुलांची लागवड केली होती. मात्र सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे झेंडू फुलांवर मोठा परिणाम बघायला मिळाला होता सोबतच दिवाळी सारख्या सणाला देखील योग्य भाव मिळाला नसल्याने शेतकरी मुकुल पाटील यांना आर्थिक फटका सहन करावा लागला. भाव वाढत नसल्याने मुकुंद पाटील यांना आपल्या झेंडू फुलांच्या उभ्या शेतीवर नागरणी फिरवण्याची वेळ आली आहे.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Nov 06, 2025 06:00:46
Yeola, Maharashtra:द्राक्षाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यावर संकटाचे सावट गडद होत आहे. मॉसमी व बेमोसमी पावसामुळे जिल्ह्यातील द्राक्षबागांना मोठा फटका बसला आहे. याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर झाला असून आत्महत्यांच्या घटना, बागा नष्ट करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत. याची खास ग्राउंड रिपोर्ट निफाड, येवला, चांदवड परिसरात केला गेला. निफाड तालुक्यातील उगाव गावातील कैलास पानगव्हाणे यांनी द्राक्ष वेलींना गर्भधारणा न झाल्याने उत्पादन मिळणार नाही, तसेच कर्जाचे वाढते ओझे… या चिंतेतून दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली. येवला तालुक्यातील सोमनाथ घोरपडे या शेतकऱ्याने तर दोन एकर द्राक्ष बागांवर स्वतः कुऱ्हाड चालवून संताप व्यक्त केला. शेतकरी बाईट. तालुका कृषी अधिकारी येवला शुभम बेरड. सरकारने हवामानामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.
0
comment0
Report
SKShubham Koli
Nov 06, 2025 05:46:01
Thane, Maharashtra:* कातकरी मुलींची खरेदी विक्री थांबवण्यासाठी.. * वन जमिनीची वा गावठाणच्या हक्कासाठी... * गुलामी नष्ट करण्यासाठी... * आदिवासी कातकरी या आदिम जमातीचे अस्तित्व टिकवण्यासाठी... * जल जीवन मिशन योजने अंमलबजावणी करण्यासाठी अशा विविध मागण्यांना अनुषंगाणे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर विविध जिल्ह्यातून आदिवासी बांधव आत्मकләш आंदोलन करत आहेत... तर काही वेळातच एक भला मोठा मोर्चा देखील या आदिवासी बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एक भला मोठा मंच देखील या आत्मकләш आंदोलनाकरिता उभारण्यात आला आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी..
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 06, 2025 05:38:31
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली जिल्हा बँकेच्या कथित घोटाळ्याची चौकशी पुन्हा सुरू,आजी-माजी संचालक व अधिकाऱ्यांना बजावण्यात आल्या नोटिसा अँकर - सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कथित घोटाळया प्रकरणी कलम ८८ अंतर्गत सुरू असलेल्या चौकशीवरील स्थगिती शासनाने उठवल्यानंतर बॅंकेच्या आजी-माजी संचालकांसह तत्कालीन अधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत.बँकेचे ५० कोटी ५८ लाखांचे नुकसान केल्या प्रकरणी म्हणणे सादर करण्याच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत.जिल्हा मध्यवर्ती हा बँकेतील कालीन संचालक मंडळ व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून घोटाळा करत बँकेचे नुकसान केल्या प्रकरणी शेतकरी संघटनेचे नेते सुनील फराटे यांनी तक्रार केली होती. त्यानंतर या सर्व प्रकरणी चौकशी सुरू झाली होती,मात्र या चौकशीला वेळोवेळी स्थगिती देण्यात आली होती,आता ही स्थगिती सहकार विभागाकडून पुन्हा उठवण्यात आली आहे.या चौकशीला पुन्हा सुरुवात झाली असून मिरजेच्या उपनिबंधकांकडून बँकेच्या आजी-माजी संचालकांचा अधिकाऱ्यांना आता नोटीस बजावण्यात आली आहे.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 06, 2025 05:08:58
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:उस दरासाठी स्वाभिमानी आक्रमक, भिलवडी येथे ऊस वाहतूक करणारी वाहने रोखली. ऊस दर आंदोलनाची तीव्रता आता सांगली जिल्ह्यात वाढू लागली आहे, एफआरपी जाहीर केल्याशिवाय ऊस वाहतूक होऊ देणार नाही,अशी भूमिका घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आता ऊस वाहतूक रोखण्यात येत आहे. पलूस तालुक्यातल्या भिलवडी या ठिकाणी आक्रमक स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडवून धरले होते. ऊसाला पहिली उचल 3 हजार 751 रुपये तसेच गतवर्षी गाळप झालेल्या ऊसाला दोनशे रुपये मिळालेच,पाहिजे त्याशिवाय वाहने सोडणार नाही,अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्त्यांनी घेतली होता.यामध्ये हुतात्मा कारखाना,क्रांती कारखाना,सोनहिरा व दत्त इंडिया सांगली कारखाना यां कारखान्याची वाहने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्त्याने अडवली.त्यामुळे काही काळ याठिकाणी दरवाजा निर्माण झाला होता अखेर पोलीस बंदोबस्त ही वाहने रवाना झाली.
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Nov 06, 2025 05:08:34
0
comment0
Report
Advertisement
Back to top