Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ratnagiri415639

उदय सामंत ने रत्नागिरी में प्रचार शुरू किया; साल में काम नहीं हुआ तो इस्तीफा

PPPRANAV POLEKAR
Nov 09, 2025 04:32:14
Ratnagiri, Maharashtra
Anchor - रत्नागिरी नगरपरिषदेच्या प्रचाराचा शुभारंभ राज्याच्या उद्योग मंत्री उदय सामंतांनी रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक पाच मधून केला. यावेळी बोलताना त्यांनी थेट निवडून येणारा नगरसेवकांना इशारा दिला आहे. निवडून आल्यानंतर पुढील वर्षभरात अपेक्षित काम न झाल्यास थेट राजीनामा घेतला जाईल. त्यानंतर पोट निवडणूक झाली तरी काही हरकत नाही असं सामंत यांनी म्हटलं आहे. तास वेळा रत्नागिरी शहरांमध्ये महायुती होणार असून प्रभाग क्रमांक पाच आणि सहा यामध्ये धनुष्यबाणावरील शिवसेनेचे उमेदवार असतील असे देखील सामंत यांनी जाहीर केले. तसेच 14 नोव्हेंबर पर्यंत उमेदवार घोषित केले जातील असं देखील सामंत यांनी सांगितले. प्रचाराच्या शुभारंभाच्या सभेला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहिल्यामुळे त्यांनी आभार देखील व्यक्त केले. Sound byte - उदय सामंत, उद्योगमंत्री लोकेशन - रत्नागिरी
13
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
UJUmesh Jadhav
Nov 09, 2025 06:32:21
Thane, Maharashtra:नीट परीक्षेतील गोंधळाचा फटका भिवंडीतील विद्यार्थिनीला... दोन निकालाने विद्यार्थिनीसह पालक चिंताग्रस्त... वैद्यकीय शिक्षा घेण्याचे स्वप्न देशभरातील लाखो विद्यार्थी बघत असतात. त्यासाठी शैक्षणिक अभ्यासासोबत नीट परीक्षेसाठी अनेक विद्यार्थी दिवसरात्र अभ्यासात गढून जातात. त्यातून उत्तम मार्क्स मिळवून वैद्यकीय शिक्षणाची संधी मिळावी ही विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांची दुर्दैम्य इच्छा. परंतु या नीट परीक्षेतील गोंधळातून भिवंडीतील एका विद्यार्थिनीसह तिच्या पालकांना धक्का बसला असून त्यातून नैराश्यग्रस्त होण्याची वेळ कुटुंबीयांवर आली आहे. मला ४९२ गुण असताना नंतर ते गुण २७५ कैसे झाले असा प्रश्न श्वेता हिला पडला असून माझी नक्की कोणती मार्कलिस्ट खरी आहे हेच कळत नसल्याचे सांगते. यामुळे मी केलेल्या मेहनतीवर नीट परिक्षा मंडळाने पाणी फेरले आहे. मी सतत दो वर्ष वैद्यकीय प्रवेशासाठी अभ्यास केला पण आज माझ्या हाती निराशा आली असून माझे वडील मध्यमवर्गीय आहेत. लाखो रुपये फी भरून मला वैद्यकीय शिक्षण नाही देऊ शकत तर नीट परीक्षा मंडळाच्या गोंधळामुळे माझ्यासह सर्व कुटुंबीय नैराशेत आले आहे, अशी प्रतिक्रिया श्वेता कृष्णा पिनाटे या विद्यार्थिनीने दिली आहे. बाईट:- श्वेता कृष्णा पिनाटे
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 09, 2025 06:22:53
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर शहर पोलिसांकडून 35 चोरीच्या दुचाकी जप्त, महागड्या गाड्या चोरणाऱ्या चोरट्याला ठोकल्या बेड्या सोलापूरात दुचाकी चोरीच्या मालिकेचा पर्दाफाश! जेलरोड पोलिसांच्या डीबी पथकाने लाखोंच्या गाड्या चोरी करणाऱ्या एका सराईत चोराला gजाआड केलं आहे. शंकर भरत देवकुळे असं आरोपीचं नाव असून, त्याच्याकडून तब्बल 35 चोरीच्या दुचाकी असा एकूण 10 लाख 98 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्या आहेत. हा आरोपी लाखोंच्या किंमतीच्या गाड्या फक्त पाच ते दहा हजारांत विकत होता. गाड्या फायनान्समधील असल्याचं सांगून तो ग्राहकांची फसवणूक करत होता.अशी माहिती पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी दिली. या कारवाईत सोलापूरसह पुणे, मुंबई, ठाणे आणि सांगली येथील चोरीच्या गाड्यांचा समावेश आहे. बाईट - एम.राजकुमार (पोलिस आयुक्त,सोलापूर)
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Nov 09, 2025 06:22:30
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Nov 09, 2025 06:19:14
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी - लांजा नगरपंचायत निवडणूक स्वबळावर लढण्याची भाजपच्या लांजा शहरातील कार्यकर्त्यांची मागणी युती केल्यास सामूहिक राजीनाम्याचा देण्यात आलेला इशारा; लांजा शहर कमिटीच्या बैठकीतला निर्णय रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकी संदर्भात आज निरजन डावखरे यांच्यासोबत भाजपची महत्त्वपूर्ण बैठक लांजा नगरपंचायत निवडणुकबाबत कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली इच्छा आणि राजीनामेच्या इशारावर बैठकीत चर्चा होणार आम्ही महायुती म्हणून लढू...कार्यकर्त्यांची भावना समजून घेऊ ; भाजपाचे जिल्हा सरचिटणीस अमित केतकर यांची प्रतिक्रिया लांजा शहरातील कार्यकर्त्यांनी दिलेल्या सामूहिक राजीनामाच्या इशारानंतर महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं चित्र समोर लोकेशन - लांजा, रत्नागिरी
3
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 09, 2025 06:19:05
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगलीच्या बोरगाव मध्ये बैलगाडी शर्यतीचा थरार सुरू... देशातल्या सगळ्यात मोठ्या बैलगाडी शर्यतीला आता सांगलीच्या तासगाव तालुक्यातल्या बोरगाव मध्ये सुरुवात झालेली आहे. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांकडून श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यतीचा आयोजनण्यात आलेला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे यांच्या मंत्र्यांच्या उपस्थितीत बैलगाडी शर्यतीचा मुख्य सोहळा रंगणार आहे. जवळपास अडीच हजार बैलगाड्या या स्पर्धेत सहभागी झाल्या असून 500 एकर या बैलगाडी शर्यतीचा थरार सुरू झालेला आहे वेगवेगळ्या गटामध्ये आता बैलगाडी शर्यती पार पडत आहेत. त्याचबरोबर महिलांची बैलगाडी शर्यत देखील या ठिकाणी पार पडणार आहे. फॉर्च्यूनर, थार, ट्रॅक्टर, बुलेट दीडशे दुचाकी, अशी भरगच्च बक्षीस शर्यतीच्या निमित्ताने देण्यात येत आहेत. दुपारी २ वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैलगाडी शर्यत संघटनेचे पहिला अधिवेशन पार पडणार आहे, त्यानंतर मुख्य बैलगाडी शर्यतीला सुरुवात होणार आहे. शर्यतीचा थरारा पाहण्यासाठी सकाळपासून लाखो बैलगाडी प्रेमी या ठिकाणी हजेरी लावत आहेत.
2
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 09, 2025 06:05:43
2
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Nov 09, 2025 05:37:52
Beed, Maharashtra:बीड ब्रेक : अखेर ठरलं.. गेवराईत होणार महायुतीच्या मित्र पक्षात चुरशीची लढत. राष्ट्रवादीकडून शितल दाभाडे तर भाजपकडून गीता पवार निवडणुकीच्या रिंगणात. दोन्ही मित्र पक्षांनी केली नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची घोषणा. बातमी बीडच्या राजकीय गोठ्यातून आहे..गेवराई नगरपरिषद निवडणुकीत महायुतीतीलच दोन पक्ष आमने-सामने आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने युतीचा निर्णय न पाहता शितल दाभाडे यांना उमेदवार म्हणून घोषित केलं होतं, आणि आता भाजपनेही गीता बाळराजे पवार यांना रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे गेवराईत राष्ट्रवादी आणि भाजप याच्यात थेट सामना रंगणार आहे. शनिवारी झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत गीता पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. नगरपरिषद निवडणुकीसाठी सोमवारपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून, युती होणार की नाही याबाबत अद्यापही अनिश्चितता कायम आहे. मात्र गेवराईतल्या या निवडणुकीकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.
5
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 09, 2025 05:36:31
Nagpur, Maharashtra:नागपूर वाघावरून हात फिरवून दारू पाजण्याची Ai निर्मित व्हिडिओ रील व्हायरल करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध नागपूर जिल्ह्यातील देवलापर पोलिसात अदखलपत्र गुन्हा दाखल झालाय... वन विभागाच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केलीय. नवी मुंबईतील राहुल नंदा याला पोलिसांनी नोटीस बजावली आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पक्षेत्र वन अधिकाऱ्यांनी याबाबत तक्रार केली होती... दरम्यान ब्रह्मपुरीतही एआयच्या निर्मित एका व्हिडिओत वाघ एका व्यक्तीवर हल्ला करत असल्याचा व्हिडिओ ही असाच व्हायरल झाला होता.... हा व्हिडिओ AI आधारित तयार करण्यात आल्याचेही वन विभागाने स्पष्ट केले होते . या AI आधारित व्हिडिओ बाबतही त कारवाई होण्याचे संकेत आहे. अशा AI निर्मित व्हिडिओंमुळे वन्यजीवांविषयी भीती आणि त्यातून राग निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.... त्यामुळे असे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर वेळीच आळा घालण्याची मागणी वन्यजीवप्रेमी व्यक्त करत आहे
2
comment0
Report
SKSACHIN KASABE
Nov 09, 2025 05:34:50
Pandharpur, Maharashtra:आई बापच महार वतन जमिनी लाटत असतील तर पार्थची चूक काय ? उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवारांच्या गंडलेल्या घोटाळ्यावर मुळशी पॅटर्न दोन हा चित्रपट बनवावा अशी उपरोधिक मागणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली आहे पुण्यातील 1800 कोटींची महार वतनाची जागा 300 कोटीत लाटण्याचं काम पार्थ पवार ने केले आई-वडिलांकडून मुले संस्कार शिकत असतात पार्थ पवार दोन-तीन वर्षांची होते तेव्हाच अजित पवार सुनेत्रा पवारांनी बारामतीच्या सोनगाव मधील तीन एकर महार वतन लाटले आणि पार्थच्या नावे केली बाराखडी शिकायच्या वयातच सातबारा ठेवण्याची कला पार्थ पवारांना आई बापाने शिकवली बापाने 70 हजार कोटी पचवल साधी ढेकर दिली नाही पार्थ पवार 1800 कोटीच्या घोटाळ्यात सापडले. मात्र नया है वह इसलिए उन्हें सोडून दिले.तसेच आता नवीन जमीन घोटाळा करताना त्यांनी जुन्या चुका करू नयेत असा वर्मावर घाव سुद्धा घातलेला आहे
7
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Nov 09, 2025 05:21:20
Pune, Maharashtra:मावळमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इनकमिंग सुरू झाले आहे. मावळात सध्या राजकारणाचा पटच बदलू लागलाय! अनेक कार्यकर्ते खांदे पालट करत असतानाच भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. ओव्हळे गावचे विद्यमान सरपंच दिलीप शिंदे यांनी भाजपला राम राम ठोकत आपल्या कार्यकर्त्यांनसह मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशासह मावळातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा ढवळून निघाली आहेत. पंचायत स्तरापासून विधानसभा पातळीपर्यंत कार्यकर्त्यांमध्ये हालचाल सुरू झाल्याने, येत्या निवडणुकांपूर्वी मावळात राजकीय तापमान चांगलंच वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताच दिलीप शिंदे यांनी ओव्हळे गावचा विकास जलदगतीने करावा तसेच गावांत पाण्याची समस्या त्वरित सोडवण्याची मागणी केलीये, यावर आमदार शेळकेंकडून आश्वासन देण्यात आलं...
5
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Nov 09, 2025 05:02:57
Bhandara, Maharashtra:गोंदिया जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांमध्ये होणार गठबंधन.... लवकरच याबाबतीत अधिकृत होणार घोषणा.... महाविकास आघाडीमध्ये बहुजन समाज पक्षाचा नगरपरिषदेत होणार समावेश.... नगरपंचायत नगरपरिषदेमध्ये काँग्रेस गठबंधन यांच्या होणार विजय ...काँग्रेस नेते माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांची माहिती काँगाप्रेमेश रागदार - काँग्रेसने तयारी केली असून काँग्रेसने आपले सहकारी महाविकास आघाडीचे मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट , शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी युती संदर्भात चर्चा केली असून याबाबत निर्णय होणार आहे. त्याचबरोबर या गठबंधन मध्ये बहुजन समाज पार्टीच्या सुद्धा समावेश करण्यासाठी चर्चा सुरू असल्याचा माजी आमदार आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते गोपालदास अग्रवाल यांनी सांगितले आणि जर युती झाली नाही तर स्वबळावर सुद्धा लढण्याची तयारी यावेळी त्यांनी दर्शवली आहे.
9
comment0
Report
Advertisement
Back to top