415639
रामदास कदम पर आलोचना तेज, भास्कर जाधव की तीखी टिप्पणी
Ratnagiri, Maharashtra:रामदास कदम यांची उलटी गिनती सुरू....भास्कर जाधव यांची रामदास कदम यांच्यावर टीका. रामदास कदम हे बामलव्या आणि छमछम बार वाले म्हणून प्रसिद्ध...स्वतःच्या आईच्या नावाने असलेल्या बार मध्ये बारबाला नाचवून पैसे कमावणारे पितापुत्रांना लाज लज्जा नाही. गुंडाला रिव्हॉल्व्हर चे लायसन्स देणे हे रामदास कदम यांचा इतिहास पाहता नवीन नाही....ते अशा चुका वारंवार करत राहतील : भास्कर जाधव पुणे पोलिसांनी लायसन्स नाकारल्यानंतर गृहराज्यमंत्री म्हणून विशेष अधिकार वापरून लायसन्स दिले....भास्कर जाधव0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
किसानों के लिए मनसे का कड़ा इशारा: पीक लोन नहीं मिला तो बैंक अधिकारियों का चेहरा काला करेंगे
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... स्किप्ट :- पीक कर्ज देत नसाल तर तोंडाला काळं फासून मारीन .... पीक कर्जावरून मनसे आक्रमक... बँक व्यवस्थापकाला दिला थेट इशारा.... AC :- पीक कर्जाच्या मुद्द्यावरून मनसे शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे आक्रमक झालेत... “शेतकऱ्याला पीक कर्ज देत नसाल तर तुमच्या तोंडाला काळं फासून तुम्हाला मारीन, असा इशारा त्यांनी बँक व्यवस्थापकाला दिलाय. रेणापूर तालुक्यातील कारेपूरच्या महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेत सिबील खराब असल्याचं कारण देत शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारलं जात असल्याचा आरोप आहे. याच मुद्द्यावरून नागरगोजे यांनी बँक अधिकाऱ्यांना जाब विचारत संताप व्यक्त केला. शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना अडवणूक केली तर ती खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिलाय。0
0
Report
गणेश विसर्जन के स्वागत कमानों में शिवसेना दोनों गुटों की प्रतिकृतियाँ, बहस गरम
Sangli, Maharashtra:स्लग - गणरायाला निरोप देण्यासाठी ऐतिहासिक स्वागत कमानी सज्ज,दोन्ही शिवसेनेच्या स्वागत कमानी ठरल्या चर्चेचा विषय.. अँकर - सांगलीच्या मिरजेमध्ये अनंत चतुर्थी दिवशी पार पडणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीच्या स्वागतासाठी भव्य स्वागत कमानी सज्ज झाल्या आहेत. 70 ते 80 उंचीच्या कमानीच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक संदेश देण्याबरोबर पौराणिक देखावे साकारण्याची ऐतिहासिक परंपरा आहे,यंदाच्या स्वागत कमानी दोन्ही शिवसेनांकडून उभारण्यात आलेल्या स्वागत प्रमाणे या चर्चेचा विषय ठरले आहेत. एकमेकांच्या समोरासमोर उभारण्यात आलेल्या स्वागत कमानीच्या माध्यमातून एकमेकांना दिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे,शिवसेना ठाकरे गटाकडून खंडोजी खोपडेंचा शिरच्छेद करणारी प्रतिकृती साकारत,स्वराज्यातील गद्दारांना माफी नाही,अशा आशयाचा स्वागत कमान उभारण्यात आली आहे,तर शिवसेना शिंदे गटाकडून आनंद दिघेंच्या प्रति न्यायालयाची प्रतिकृती साकारत,अभिनेता सुशांतसिंह राजपूत,दिशा सालीयान यांचे फोटो लावत, आम्ही आत्महत्या केली नाही,आमची हत्या झाली आहे आम्हाला न्याय द्या,आमच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या,अशा आशयाचा मजकूर लिहिण्यात आलाय, त्यामुळे दोन्ही शिवसेनेकडुन स्वागत कमानींच्या माध्यमातून एकमेकांना डीवचण्याचा प्रकार करण्यात आला आहे, आणि या शिवसेनेच्या दोन्ही क्रमाने चर्चेचा विषय देखील बनल्या आहेत,याचा आढावा घेतला आहे, आमचे सांगलीचे प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी..0
0
Report
शिरूर के पिंपरी दुमाला में भारी बारिश ने फलों और प्याज की फसल को राहत दी
Shirur, Maharashtra:शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला येथे मुसळधार पावसाची हजेरी; फळबागांसह कांदा पिकाला जीवदान, बळीराजा सुखावला! शिरूर तालुक्यातील रांजणगाव पिंपरी दुमाला परिसरामध्ये आज दुपारनंतर वरुणराजाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला असून शेतांमध्ये पाणीच पाणी झाले आहे. या दमदार पावसामुळे परिसरातील फळबागा तसेच कांद्याच्या पिकाला मोठा आधार मिळाला आहे. याशिवाय, पिण्याच्या पाण्यासोबतच शेतीच्या पाण्याचाही प्रश्न काही प्रमाणात सुटल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या पावसामुळे शेतातील उभ्या पिकांना संजीवनी मिळाली असली, तरी असाच चांगला पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात पडावा, अशीच अपेक्षा आता बळीराजा व्यक्त करत आहे. शेतकरी0
0
Report
Advertisement
केतन हत्या: आरोपपत्र अभी नहीं मिला, पिता का बड़ा दावा, परिवार पर सवाल
Varsoli, Maharashtra:(यात तिसरा आरोपी रितेश हंगे याचा फोटो जोडला आहे. तसेच विशाल अग्रवाल बाईट, cutaways, सिया गोयलच्या भावाचे visuals जोडले आहेत... सिया गोयल, तिचे आईवडील यांचे file फुटेज वापरावेत..) HEADLINE : केतन हत्या प्रकरणात आरोपपत्रावरून वडिलांचा मोठा दावा सियाच्या कुटुंबीयांच्या भूमिकेचीही चौकशी करण्याची मागणी ANCHOR : लोहगडावरील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात केतनचे वडिल विशाल अग्रवाल यांनी आरोपपत्रावरून मोठा दावा केलाय. आरोपपत्राची प्रत अद्याप मिळाली नसून, त्यासाठी न्यायालयात अर्ज केल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच, सियाच्या कुटुंबीयांच्या भूमिकेचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केलीय. VO केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आता आरोपपत्राची प्रत समोर येण्यापूर्वीच केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी अनेक सवाल उपस्थित केलेत. आरोपपत्र मिळाल्यानंतरच या प्रकरणात नेमके किती आरोपी आहेत आणि रितेश हांगे हा मुख्य आरोपी आहे की नाही, हे स्पष्ट होईल, असं विशाल अग्रवाल यांनी म्हटलंय. BYTE : विशाल अग्रवाल – केतनचे वडील (FILE NO. 05) VO दरम्यान, sिया आणि चेतनचं आधीच लग्न झाल्याची माहिती माध्यमांतून समजल्याचा दावा विशाल अग्रवाल यांनी केलाय.सियाच्या कुटुंबातील प्रवीण गोयल, पूजा गोयल, साहिल गोयल, रेणू मित्तल आणि नरेंद्र मित्तल यांना याबाबत माहिती होती का? माहिती असताना केतनसोबत सियाचं लग्न का जुळवण्यात आलं? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. या व्यक्तींचीही केतन हत्या प्रकरणातील कथित भूमिकेच्या अनुषंगाने चौकशी करावी, अशी मागणी विशाल अग्रवाल यांनी केलीय. End VO आता आरोपपत्रातून नेमकं काय समोर येतं, रितेश हांगेची भूमिका काय आहे आणि सियाच्या कुटुंबीयांच्या भूमिकेबाबत तपासात काय निष्पन्न होतं, हेच पाहणं महत्वाच ठरणार आहे. चैत्राली राजापूरकर, झी 24 तास, मावळ.0
0
Report
बार्शी वैराग में घर की दीवार ढहने से मावशी-भाची की दर्दनाक मौत
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - बार्शीतील वैराग मध्ये घराचे भिंत कोसळून मावशी - भाचीचा दुर्दैवी मृत्यू \n\n- सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातून अत्यंत दुर्दैवी घटना समोर \n- वैराग मधील खेंदाड गल्लीत पहाटेच्या सुमारास कमकुवत घराची भिंत कोसळून मावशी - भाचीचा दुर्दैवी मृत्यू \n- मीनल गुलाब ठोंबरे, सुमन महादेव पारदे असे मृत्यू झालेल्या दोन्ही महिलांची नावे \n- ग्रामस्थांनी पोलिसांच्या मदतीने ढीगार्याखाली अडकलेल्या दोन्ही महिलांना बाहेर काढून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच केले मृत घोषित \n- सदर घटनेची नोंद वैराग पोलीस ठाण्यात करण्यात आली असून दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येतेय\n\nबाईट - \n\nग्रामस्थ0
0
Report
अकोला में किसानों का आक्रोश मोर्चा; नितीन देशमुख के भाषण पर विवाद
Akola, Maharashtra:कोरडा दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी अकोल्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. शिवसेना उपनेते आणि बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी शेतकऱ्यांना संबोधित करताना आमदार नितीन देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि त्यांच्या आमदारांवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांची साथ सोडून सत्तेसाठी गेलेल्या आमदारांवर निशाणा साधताना, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी एकही आमदार रस्त्यावर उतरत नसल्याची टीका नितीन देशमुख यांनी केली. मात्र, ही टीका करताना नितीन देशमुख यांची जीभ घसरल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे.0
0
Report
Advertisement
वाशिम के गायरान अतिक्रमण के खिलाफ ग्रामस्थों का अनिश्चितकालीन उपोषण
Washim, Maharashtra:वाशिम: अँकर:वाशिम तालुक्यातील गणेशपूर परिसरातील गुरांच्या चराईसाठी असलेल्या सार्वजनिक गायरान जमिनीवर काही ग्रामस्थांनी बेकायदेशीर अतिक्रमण करत नांगरणी केली आहे.या अतिक्रमण धारकांवर ग्रामपंचायतीने कोणतीही कारवाई केली नसल्याने मोठ्या प्रमाणात गायरान जमीन बळकावली आहे.या अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्या ऐवजी ग्रामस्थांवरच खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.त्यामुळे तात्काळ हे गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवून गायरान जमीन मोकळी करावी, ग्रामस्थांवरील गुन्हे मागे घेत दोषींवर कठोर कारवाई करावी या मुख्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे बेमुदत उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले आहे.जर न्याय मिळाला नाही तर आम्ही आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.0
0
Report
वाशीम में कारंजा के दो मज़दूरों के विवाद पर हत्या; शव खेत में दफन
Washim, Maharashtra:वाशीम: दोन मजुरांतील वाद टोकाला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.खेर्डा गावाजवळील अनई फाट्याजवळ एका मजुराचा खून करून त्याचा मृतदेह शेतातील खड्ड्यात पुरण्यात आला.या प्रकरणी कारंजा पोलिसांनी आरोपी मजुराला अटक केली आहे. शेतमालक संतोष तिडके यांच्या शेतात मध्य प्रदेशातील दोन मजूर कामावर होते.दोघांमध्ये झालेल्या वादातून एका मजुराने सहकाऱ्याचा खून केला आणि मृतदेह शेतात खड्डा करके पुरला.घटनेची माहिती मिळताच कारंजा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठवला.घटनेनंतर आरोपी पसार झाला होता. मात्र, कारंजा पोलीसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपीला अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास कारंजा पोलीस करीत आहेत.0
0
Report
अकोला में सूखा घोषित कर किसानों को तुरंत मदद दें, विपक्ष आक्रामक
Akola, Maharashtra:राज्यात अनेक भागांत पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी संकटात सापडला आहे... खरीप पिके हातातून जाण्याची भीती निर्माण झाली असून, कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, या मागणीसाठी आता विरोधक आक्रमक झाले आहेत. अकोल्यात काँग्रेसकडून गेल्या सहा दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू असतानाच, आज ठाकरे गटाच्या शिवसेनेनेही सरकारविरोधात रणशिंग फुंकलं. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी अकोल्यात भव्य शेतकरी आक्रोश मोर्चा काढत ठाकरे गट रस्त्यावर उतरला. शिवसेना नेते आणि बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्य भवन येथून हा मोर्चा काढण्यात आला. मोठ्या संख्येने शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. घोषणाबाजी करत मोर्चेकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. पावसाचा दीर्घ खंड, सोयाबीनसह खरीप पिकांचे नुकसान आणि वाढतं आर्थिक संकट... या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हा कोरड्या दुष्काळग्रस्त जिल्हा जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान, आमदार नितीन देशमुख यांनी सरकारला थेट ५ ऑक्टोबरचा अल्टिमेटम दिला आहे. या मुदतीपर्यंत शेतकऱ्यांसाठी ठोस मदत जाहीर झाली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला. ५ ऑक्टोबरनंतर शेतकऱ्यांसह समृद्धी महामार्ग बंद पाडू, असा इशाराच नितीन देशमुख यांनी सरकारला दिला आहे.0
0
Report
Advertisement
सेझ प्रकल्प रद्द: 45 गांवों के किसानों का आक्रोश पेण में धडक मोर्चा
Chendhare, Maharashtra: ४५ गावांतील शेतकऱ्यांचा धडक मोर्चा ....... ‘जमीन आमच्या हक्काची’; ७/१२ कोरा करा ........ सेझच्या नोंदी हटवण्याची शेतकऱ्यांची मागणी ...... पेण प्रांत कार्यालयावर शेतकाऱ्यांचा आक्रोश अँकर - महामुंबई सेझ प्रकल्प रद्द झाल्यानंतरही जमिनीवरील सेझच्या नोंदी कायम असल्याने पेण, पनवेल आणि उरण तालुक्यातील ४५ गावांतील शेतकरी आक्रमक झाले आहेत. ‘जमीन आमच्या हक्काची, सातबारा कोरा करा’ या मागणीसाठी शेतकाऱ्यांनी पेण प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढला. सेझसाठी दिलेल्या जमिनी मूळ मालकांना परत कराव्यात, सातबारा उताऱ्यावरील सेझच्या नोंदी तातडीने हटवाव्यात आणि शेतकऱ्यांचा जमिनीवरील हक्क पूर्ववत करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. प्रशासनाकडून ठोस निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला. जर उद्योगांना दिलेल्या जमिने परत घेण्याची मोहीम सरकार राबवत असेल तर शेतकऱ्यांच्या जमिनी परत का करत नाही असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.0
0
Report
रत्नागिरी के वेरळ में मोटरसाइकिल हादसा, युवक गंभीर घायल
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. वेरळ यहाँ महामार्गावर दुचाकीचा भीषण अपघात; तरुण गंभीर जखमी.. मुंबई-गोवा महामार्गावरील वेरळ (ता. खेड) येथे पहाटे झालेल्या भीषण अपघातात एक मोपेडस्वार तरुण गंभीर जखमी झाला.. या अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला असून, स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी तरुणाला १०८ रुग्णवाहिकेतून तातडीने कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत..0
0
Report
लसलगाव क्षेत्र में एक घंटे की बारिश से गर्मी मिटे, किसानों को मिली राहत
Lasalgaon, Maharashtra:लासलगाव परिसरात गेल्या दीड महिन्यांहून अधिक काळापासून पावसाने दडी मारली होती त्यामुळे वाढत्या उकाड्याने नागरिक हैराण झाले होते, तर पावसाअभावी मका, सोयाबीन, बाजरी, भेंडी यासह विविध खरीप पिके करपू लागली होती अशातच आज दुपाराच्या सुमारास लासलगाव परिसरात सुमारे एक तासाभर दमदार पावसाने हजेरी लावली अचानक झालेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला तर पिकांना पाण्याची नितांत गरज असताना झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे0
0
Report
Advertisement
संगमनेर में जन मोर्चे के दौरान अधिकारी निवेदन स्वीकार; सूखा घोषित कराने की मांग
Shirdi, Maharashtra:प्रांत अधिका-यांची आंदोलकांनी फेकली खुर्ची.. आन्दोलक झाले आक्रमक.. कार्यालयात तोडफोड करण्याचा प्रयत्न... निवेदन घेण्यासाठी प्रांत अधिकारी न आल्याने आंदोलक आक्रमक... जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात संगमनेर येथे जनआक्रोश मोर्चा... राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची प्रमुख मागणी... आंदोलकांचा रोष पाहता प्रांत अधिकारी अरुण मुंडे आंदोलन स्थळी झाले दाखल... प्रांताधिकारी आणि विज वितरण अधिका-यांनी निवेदन.. स्विकारल्यानंतर मोर्चा करण्यात आला स्थगित...0
0
Report
संगमनेर के किसानों ने जिला कार्यालय में घुसकर प्रशासन के खिलाफ प्रदर्शन तेज किया
Shirdi, Maharashtra:संगमनेरमध्ये संतप्त शेतकरी थेट प्रांत कार्यालयात घुसले. निवेदन घेण्यासाठी प्रांत अधिकारी न आल्याने शेतकरी आक्रमक. पोलिसांचा विरोध झुगारुन शेतकरी थेट प्रांत कार्यालयात घुसले. पोलिस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची. आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात संगमनेरमध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा. विजेच्या प्रश्नावरून आक्रोश मोर्चा. प्रांत कार्यालयाच्या दारात शेतकऱ्यांनी मांडला ठिय्या. शेतकऱ्यांचा शासन प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी.0
0
Report
कोल्हापुर के खिद्रापूर ब्रांच में 40 लाख के गबन की आंतरिक जांच शुरू
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खिद्रापूर शाखेत सुमारे 40 लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. बँक कर्मचाऱ्यांनी खातेधारकांच्या खात्यातील रक्कम परस्पर स्वतःच्या आणि पत्नीच्या खात्यावर वळवल्याचे तपासात उघड झाले आहे. त्याचबरोबर शाखाधिकारी राजकुमार चौगुले यांच्या लॉगिनचा वापर करून ठेवीदारांच्या लाखो रुपयांच्या ठेव पावत्या मोडल्याचाही संशय आहे. या कथित गैरव्यवहारानंतर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने खिद्रापूर शाखेतील व्यवहारांची अंतर्गत चौकशी सुरू केली आहे… या प्रकरणात शाखेतील इतर कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे… दरम्यान, या कथित गैरव्यवहाराशी संबंधित एक ऑडिओ क्लिपही समोर आली आहे… त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आणि नेमका गैरव्यवहार किती रुपयांचा आहे, याबाबत अधिक तपास सुरू आहे. बँकेचे कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ शिंदे यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीदरम्यान संबंधितांकडून आतापर्यंत 23 लाख रुपये वसूल करण्यात आल्याचे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. खातेधारकांच्या रकमेचा परस्पर वापर झाला का ? ठेव पावत्या नेमक्या कशा मोडण्यात आल्या ? शाखाधिकारी यांच्या लॉगिनचा वापर कोणी केला? आणि या प्रकारात आणखी कोणाचा सहभाग आहे? या सर्व बाबींचा तपास बँकेच्या अंतर्गत चौकशीत केला जात आहे. पण दुसरीकडे बँक निरीक्षक ए एस पाटील आणि शाखाधिकारी राजकुमार चौगुले यांच्यामधील फोनचा संवाद सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. त्यामुळे या अपहर प्रकरणाची कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.0
0
Report
Advertisement
