Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ratnagiri415639

नए साल पर कोकण में पर्यटकों की भीड़, दापोली के समुद्री किनारे गुलजार

PPPRANAV POLEKAR
Dec 29, 2025 05:02:09
Ratnagiri, Maharashtra
हर्णे समुद्र किनारे पर्यटकांची गर्दी न्यू इअर सेलिब्रेशनसाठी मोठ्या संख्येनं पर्यटकांनी सध्या कोकणची वाट धरलीय. त्यामुळं सध्या कोकण हाऊसफूल झालय. इथले समुद्र किनारे गर्दीने फुलून गेलेत. मुंबई आणि पुण्याच्या जवळ असलेल्या दापोलीत देखील पर्यटकांची संख्या वाढलीय. दापोलीतील समुद्र किनाऱ्यांवर देखील रेकाँर्ड ब्रेक गर्दी पहायला मिळतेय. दापोलीतील हर्णे बंदरात मासे खरेदीसाठी पर्यटकांची गर्दी होतेय. हर्णे बंदरातील मच्छी लिलावासाठा प्रसिद्ध आहे आणि लिलाव पाहण्यासाठी देखील पर्यटक खासकरुन येत असतात.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VKVISHAL KAROLE
Dec 29, 2025 06:48:20
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:संभाजी नगर महापालिका युती संदर्भात आमची चर्चा करण्याचा प्रयत्न सुरुय भाजप कडून प्रतिसाद मिळाला नाही, आम्ही अजूनही त्यांच्या प्रतिसादाची वाट बघतोय आम्हाला महायुतीत लढायचं आहे, सकारात्मक असेल तर महायुतीत लढू, अन्यथा पर्याय एकनाथ शिंदे काढतील आज पासून आम्ही अर्ज भरायला सुरुवात केलीय, काही उमेदवार आज अर्ज भरतील, युती चे बोलणे अंतिम झाल्यानंतर एबी फॉर्म देऊ.. जागावाटप अजून अंतिम नाही, ठरले की पक्षासमोर मांडू... अजूनही अंतिम बोलणी झाली नाही, भाजपला तातडीने काय प्रस्ताव द्यायचा ते द्या सांगितले आहे.. आम्ही 41 जागा प्रस्ताव दिल्या आहेत अंतिम तडजोड वरिष्ठ पातळीवर तडजोड निर्णय होईल... आम्ही आता प्रचाराला सुरूवात केलीय.. प्रत्येक कार्यकर्त्याला निवडणूक लढवायची आहे, बोलणी लांबणीवर पडताय मात्र असे चित्र आहे ते उबठा मामु आहेत ते मुस्लिल समाजाला जागा देतील की नाही तर मतांची बेरीज करायला ते तयार आहे... निवडणुकीत नाराज खुश होणार हे ठरलेले आहे, गणित असेच असतात, कुणी ही 100 टक्के खुश करू शकत नाही... ओन संजय राऊत ... आम्हाला भाजप जागा दाखवणार की नाही हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे आम्हाला उबठा ने सांगू नये आमचे बंड आणि आम्ही तुम्हाला घंटा वाजवायला दिली या कडे लक्ष द्या, रोज तुम्ही घंटा वाजवताय... यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, इतिहास याना कळत नाही हे नवे इतिहास जन्माला घालतात इति संजय राऊत असे पुस्तक निघेल... मुलांना तिकीट संजय राऊत विधान राजकारणात मुलांना तिकीट नवे नाही, हे घडत असत, भाजप ची भूमिका हा त्यांचा प्रश्न आहे, पण मुलगा आहे म्हणून तिकीट नाकारणे योग्य नाही... नागपूर युती बाबत एकनाथ शिंदे अंतिम निर्णय घेतील आम्ही कमजोर नाहीत इतकं लक्षात घ्या... दोन्ही एनसिपी एकत्र ते एकत्र आले यात आनंद ही नाही आश्चर्य पण नाही, बारामती राजकारण महाराष्ट्र नेहमी पाहत असतो... राज ठाकरे विधान ईव्हीएम् म्हणायचे , मोदी म्हणायचे, पैसे म्हणायचे लोक या विधानांना कंटाळले आहेत... असले वक्तव्य करून मतदार तुमच्या बाजूला येतील, असे शक्य नाही... शिवसेना मैदान बुक 5 दिवस मैदान बुक करून ते 5 दिवस प्रचंड जाहीर सभा ते घेणार आहेत आम्ही वाट बघतोय त्या प्रचंड सभांची, आम्ही पण सभेला जाऊ , 6 दिवस मैदान बुक केले आता सभा घेऊन दाखवा... आम्हाला आव्हान देऊ नका... नाराजी नाट्य होत राहते प्रत्येक पक्षात असे होते... एनिसपी बाबत काय ठरले माहिती नाही वरिष्ठ ठरवतील त्यांनी किती लढायचे ते पक्ष ठरेल...
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 29, 2025 06:46:19
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचे निवडणूक प्रमुख असलेले आमदार किशोर जोरगेवार यांना त्यांच्या स्वीय सहाय्यकाचा धक्का, जोरगेवार यांचे स्वीय सहाय्यक राहिलेल्या ललित कासट यांच्या पत्नी दीपा कासट यांनी प्रभाग क्रमांक 10 म्हणजे एकोरी प्रभागातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. कासट यांनी याच मुद्यावर नुकताच राजीनामा दिलाय. भाजप अल्पसंख्याक आघाडीचे चंद्रपूर शहराध्यक्ष राशिद हुसेन यांच्या पत्नीला या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) कडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. राशिद हुसेन यांनी विधानसभा निवडणुतीत भाजप विरोधात काम केल्याचा कासट यांचा गंभीर आरोप आहे. पक्षावर विश्वास नसल्याने त्यांनी पत्नीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घडवून आणला आणि पत्नीला राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिकीट मिळवून देत असल्याचा देखील कासट यांचा दावा आहे. आम्ही अनेक वर्षापासून एकोरी प्रभागात काम करतोय आणि या प्रभागातून भाजप कधीही जिंकली नसल्यामुळे आम्ही या ठिकाणी दावेदारी केली मात्र पक्षाने आमच्या कामाची दखल न घेतल्यामुळे अपक्ष उमेदवारी दाखल केल्याचा कासट यांचा दावा आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 29, 2025 06:18:58
kolhapur, Maharashtra:नागपूर महानगरपालिकेत महाविकास आघाडीत सध्या काँग्रेस 129 जागांवर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष 12 जागांवर आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षासाठी 9 जागांची तयारी काँग्रेसने दर्शवली आहे.... दरम्यान वंचितलाही सोबत घेण्याबाबत प्रयत्न सुरू असून याबाबत चर्चा सुरू असल्याचाही काँग्रेस नेते आणि शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी सांगितले.... मनसे सोबत येत असल्यास त्यांना शिवसेना उद्धव ठाकरे च्या कोट्यातून जागा सोडाव्या आणि वंचित सोबत येत असल्यास काँग्रेसच्या कोट्यातून जागा दिल्या जाईल असेही ते म्हणाले.... मात्र महाविकास आघाडीचा अंतिम चित्र आज रात्री विमा उद्या सकाळी स्पष्ट होईल असेही त्यांनी स्पष्ट केले आमत: काँग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे (on महाविकास जागवाटप) -- UBT आणि Sp राष्ट्रवादी यांच्यासोबत रात्री उशिरा पर्यंत चर्चा झाली.. संध्याकाळी वा उद्या सकाळपर्यंत चित्र स्पष्ट होइल -- सध्या 12 जागी राष्ट्रवादी sp आणि 9 जागा UBT करता सोडल्या आहे.. काही बदल अपेक्षित आहे आणि अजून वंचितसोबत चर्चा सुरूय मनसेसाठी uBT ने जागा सोडाव्या वंचितला काँग्रेसच्या कोट्यातून जागा सोडू
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Dec 29, 2025 05:46:35
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली महापालिकेसाठी भाजपाची यादी फायनल ! भाजपा,जनसुराज्य व आरपीआय युतीची शक्यता.. सांगली महापालिका निवडणुकीसाठी अखेर भाजपाची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. भाजपकडून जनसुराज्य शक्ती पक्ष आणि आरपीआयला आपल्या युतीमध्ये स्थान देण्यात आला आहे. भाजपाकडून 74 जागांवर उमेदवार निश्चित झालेचं कळतंय, तर संबंधित उमेदवारांना अर्ज भरण्याच्या सूचना भाजपकडून देण्यात आल्याची माहिती असून भाजपायुतीमध्ये जनसुराज्य पक्षाला तीन आणि आरपीआयला एक जागा देण्यात आल्याची माहिती आहे. भाजपातील अंतर्गत गटबाजीमुळे काही दिवसांपासून उमेदवारीवर शिक्कामूर्त होण्यास विलंब झाला होता,अगदी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर उमेदवारीचा वाद पोहोचला होता,अखेर भाजपातला अंतर्गत कलह मुख्यमंत्र्यांनी संपुष्टात आणत महापालिका क्षेत्रात 74 जागांवरील उमेदवार निश्चित केल्याची माहिती समोर आली आहे. भाजपातला जनसुराज्य आणि आरपीआय युती सांगली महापालिका निवडणुकीमध्ये असणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Dec 29, 2025 05:32:33
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज.... एखाद्या पक्षातून दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर राज्यात आणि देशात काय घडतं, हे आपण अनेकदा पाहतो. पण लातूरमध्ये असं होत नाही कारण लातूरकरांची जी संस्कृती आहे या गोष्टी साठी सुद्धा स्वातंत्र आहे. महानगरपालिका निवडणुकीत पक्षांतराचा जोर असला तरी, मतदार मात्र उमेदवाराची गुणवत्ता तपासूनच निर्णय घेतील असा विश्वास काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केलाय. जनतेच्या मदतीला धावणारा आणि कामाच्या कसोटीवर खरा उतरलेला उमेदवारच काँग्रेसकडून दिला जाईल आणि लातूरकर अशाच सक्षम नेतृत्वाच्या पाठीशी उभे राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे..
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Dec 29, 2025 05:31:00
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Dec 29, 2025 05:30:39
Amravati, Maharashtra:अमरावती महापालिका निवडणुकीत बच्चू कडू यांची एन्ट्री; चांगला कार्यकर्ता व प्रहार अशी आमची युती असेल दहा ते पंधरा जागा आम्ही लढू – बच्चू कडू अमरावती महापालिकेत युतीचा विजेचा घोंगड असताना आता बच्चू कडू यांनी महापालिका निवडणुकीत एन्ट्री केली आहे त्यामुळे येत्या काळात अमरावतीच राजकारण चांगलच तापणार आहे. अमरावतीमध्ये बच्चू कडू यांची प्रहार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे त्यामुळे बच्चू कडू कोणाशी युती आघाडी करतात याकडे सर्वांचे लक्ष लागला आहे याविषयी बच्चू कडू यांना विचारलं असता त्यांनी याविषयी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अमरावतीमध्ये प्रहार चांगल्या कार्यकर्त्यांसोबत युती करायला तयार आहे. आम्ही चांगल्या कार्यकर्त्यांचा शोध घेत आहो चांगला कार्यकर्ता व प्रहार अशी आमची युती असेल अमरावतीमध्ये साधारणतः दहा ते पंधरा जागा आम्ही लढू पण त्या ताकदिच्या कार्यकर्ता भेटला तरच लढवू नाही तर लढणार नाही अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे。
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Dec 29, 2025 04:45:51
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Dec 29, 2025 04:30:19
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सेप्टिक टँक साफ करत असताना गुदमरून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना सांगलीच्या ईश्वरपूर नजीक असणाऱ्या पेठ येथे घडली आहे. पेठ येतील गावच्या हद्दीतील एका खाजगी कंपनीच्या सेप्टिक टॅंक साफ करण्याचे काम सुरू होते. यावेळी टॅंक मध्ये उतरलेल्या तिघा कामगारांचा ऑक्सिजन न मिळाल्याने गुदमरुन दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काल रात्रीच्यादरम्यान घडली आहे. तर त्यांना वाचवण्यासाठी गेलेला पाच जणांची प्रकृती ही बिघडली असून त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सेप्टिक टँक साफ करण्यासाठी सुरुवातीला सुभाष जाधव टँक मध्ये उतरले होते. मात्र टॅंक मधील विषारी वायूमुळे त्यांना चक्कर येऊन ते आतच पडले. त्यांना वाचवण्यासाठी सचिन तानाजी जाधव हे टॅंक मध्ये उतरले मात्र त्यांनाही गुदमरल्याने त्रास होऊन ते जागेवर बेशुद्ध पडले. त्यानंतर कंपनीतील कामगार रंगराव माळी यांनी मदतीसाठी धाव घेतली. ते टॅंकमध्ये उतरल्यावर तेही अडकले. या तिघांनाही तातडीने उपचारासाठी दाखल करण्याचा प्रयत्न झाला. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, कामगारांच्याकडून परंतु यामध्ये पाच कामगार जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top